अंतराळवीर Sergey Prokopyev ,Flight engineer Serena Aunon आणि Alexander Grest स्थानकातून पृथ्वीवर परतल्याच्या आनंदात -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -20 डिसेंबर
नासाच्या अंतराळ मोहीम 57 चे अंतराळवीर व कमांडर Alexander Grest सोयूझ कमांडर Sergey Prokopyev आणि Flight Engineer Serena Aunon -Chancellor हे तिघेही गुरुवारी सकाळी 12.2 a.m. वाजता अंतराळस्थानकातून पृथ्वीवर सुखरूप पोहोचले
जूनमध्ये हे तीनही अंतराळवीर स्थानकात राहण्यासाठी गेले होते त्यांनी स्थानकात 197 दिवस वास्तव्य केले त्या दरम्यान त्यांनी स्थानकातून पृथ्वीभोवती 3,152 वेळा फेऱ्या मारल्या आणि तिथल्या फिरत्या लॅब मध्ये सुरु असलेल्या संशोधनात सहभाग नोंदवला
नुकत्याच अंतराळस्थानकात राहायला गेलेली Anne McClain आणि Serena Aunon ह्या दोन्ही महिला Astronauts नि मिळून सोळा दिवस एकत्रित संशोधन केले प्रथमच अंतराळस्थानकात दोन महिला Astronauts एकत्र आल्या आता पुन्हा 28 फेब्रुवारीला अंतराळ स्थानकात राहायला जाण्याऱ्या तीन अंतराळवीरामध्ये Cristina Koch ह्या महिलाAstronautचा समावेश असल्याने पुन्हा स्थानकात दोन महिला Astronaut एकत्रित संशोधन करतील
महिला astronauts Serena Aunon आणि Anne McClain अंतराळ स्थानकातील जॅपनीज मोड्यूल मध्ये Air Circulation maintain करण्यासाठी vents cleaning करताना फोटो -नासा संस्था
ह्या अंतराळवीरांनी स्थानकातील वास्तव्यात अंतराळस्थानकातील झिरो ग्रॅविटीचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो जेव्हा ऑर्बिटल लॅब tip top shape मध्ये असते ह्या वर संशोधन केले कमांडर Alexander Grest आणि Serena Aunon ह्यांनी येण्याआधी रिसर्च सॅम्पल्स गोळा केले Nano Racks Plate Reader आणि Cellular adapatation स्टडीजच्या फ्रीझर मधील सॅम्पल्सचा त्यात समावेश आहे शिवाय अंतराळवीरांनी blood आणि urine ह्यांचे सॅम्पल्स घेऊन analyzed केले ह्या अंतराळवीरांनी अंतराळस्थानकातील ग्रोथ चेम्बरमधील स्थानकातील वातावरणाचा algae ग्रोथवर होणाऱ्या परिणामावरही संशोधन केले
Serena Aunon हिने कॅन्सर,व पार्किसन्स ह्या रोगांवर अत्याधुनिक उपचार पद्धत शोधण्यासाठी संशोधन केले
अंतराळवीर Prokopyev आणि Serena हे दोघेही प्रथमच अंतराळ स्थानकात राहायला गेले होते तर Alexander दुसऱ्यांदा स्थानकात राहायला गेले होते Prokopyev ह्यांनी ह्या दरम्यान अंतराळ स्थानकाच्या दुरुस्तीसाठी दोनवेळा space walk केला
28 feb. ला नासाचे नवीन तीन अंतराळवीर Nick Hague ,Christina Koch आणि Alexey Ovchinin अंतराळस्थानकात राहायला जातील तोवर सध्याचे तीन अंतराळवीर अंतराळ स्थानकात राहून तिथले संशोधन सुरु ठेवतील
No comments:
Post a Comment