Wednesday 17 October 2018

यवतमाळात दुर्गादेवीचे उत्साहात स्वागत


    यवतमाळातील दुर्गादेवीचे हे आकर्षक रूप आणि देखावे
     फोटो -पूजा दुद्दलवार(B.E.Soft.&B.M.C)

यवतमाळ -10 oct.
यवतमाळात दरवर्षी दुर्गोत्सव उत्साहात स्वागत केल्या जातो आकर्षक व नाविन्यपूर्ण देखाव्यामुळे इथल्या दुर्गा मंडळांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे ह्या काळात आजूबाजूच्या खेड्यातून लोक इथल्या दुर्गादेवी पाहण्यासाठी गर्दी करतात
ह्या वेळेस पाणीपुरवठा विभागातर्फे सतत रस्ते खोदल्या जात असल्याने काही मंडळांना आकर्षक देखावे तयार करण्यासाठी वेळ मिळाला नाही असे काही मंडळांनी सांगितले शिवाय यवतमाळ येथील कृत्रिम पाणी टंचाई, बंद असलेली लोकल फोन व इंटरनेट सेवा ,वाढती महागाई सततचे बंद या मुळे आलेली व्यापारातील मंद आदी अनेक कारणांनी लोकांनी वर्गणी देताना काटकसर केली विशेष म्हणजे काही मंडळांनीही बळजबरी न करता वर्गणी ऐच्छिक ठेवली हे ह्या वेळचे वैशिष्ठ निश्चितच कौतुकास्पद आहे
तरीही दुर्गादेविंचे आगमन दिव्यांच्या आकर्षक सजावटीने सजलेल्या रस्त्यांवरून मंडळांच्या उत्साही कार्यकर्त्यांच्या आदिवासी नृत्य ,टिपरी नृत्य वै. कला सादर करीत ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीने थाटामाटात  झाले  यवतमाळातील प्रत्येक चौकातच दुर्गादेवीची प्रतीष्ठापना झाली आहे त्या मुळे साहजिकच दुर्गादेवींची संख्याही वाढली आहे ह्या सर्व ठिकाणी होणारी नागरिकांची गर्दी पाहता पोलीस बंदोबस्तही चोक आहे यवतमाळात सर्वच ठिकाणी पोलीस बंदोबस्त असून ते लोकांना व्यवस्थित मार्गदर्शन करत आहेत
अशाच काही दुर्गादेवीच्या मंडळाबद्दल आणि सजावटीबद्दल घेतलेली हि माहिती
 छोटी गुजरीतील एकता मंडळ १९७१ सालापासून दुर्गादेवी बसवतात त्यांच्या मंडळातर्फे नेहमीच नाविन्यपूर्ण व पर्यावरणपूरक देखावे सादर केले जातात यंदा त्यांनी कृत्रिम फुले व हिरवळीचा वापर करून आकर्षक सजावटीचा इंद्रपुरी महाल साकारला आहे त्या साठी खास कलकत्यावरून हरी नामक कलाकाराला बोलवण्यात आले आहे त्यांनी त्यांच्या तीस सहकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीने वीस दिवसांच्या परिश्रमाने हा देखावा सादर केला आहे आणि तो खरोखरच आकर्षक आहे मंडळातर्फे सामाजिक कार्यही केल्या जाते शिवाय दररोज येणाऱ्या भक्तांना उपवासाचा फराळ वाटप केल्या जातो
यवतमाळ येथील वडगाव रोड वरील सुभाष क्रीडा मंडळाचे यंदाचे हे बावन्नावे वर्ष आहे दरवर्षी भव्यदिव्य व वेगळेपण दर्शवणारे देखावे सादर करण हे या मंडळाच वैशिष्ट .यंदाही त्यांनी केदारनाथ धामाचा देखावा साकारला असून त्यांनीही कलकत्त्याहून कारागीर बोलावले होते हा देखावा साकारण्यासाठी वीस पंचवीस कामगारांनी परिश्रम घेतले त्यांनी उंच डोंगर तयार केले असून डोंगरावर चढण्यासाठी व उतरण्यासाठी लोखंडी जिना बसवला आहे आणि आतमधल्या मोठ्या गुहेत नागाच्या फण्यावर दुर्गादेवी विराजमान झाली आहे उंच डोंगरावर शंकराची मूर्ती आहे प्रवेशद्वारावर आदिवासी वेशातील कलाकार,समोर कारंजे महादेव आणि गणपतीची मूर्ती येणाऱ्यांना आकर्षित करतात
आर्णी रोड वरील लोकमान्य दुर्गादेवीची मूर्तीही लक्षवेधी आहे मंडपात गोलाकार पाण्याच्या तळ्यात मध्यभागी दुर्गेची मूर्ती असून तिची समोरची बाजू दुर्गेचे सुंदर ,शांतरूप दर्शवते तर पाठीमागील मूर्ती कालीमातेचे क्रोधीत
रूप दर्शवते
आठवडी बाजारातील राणी झासी बंगाली दुर्गा मंडळाने कलकत्याच्या कालीमातेचे विलोभनीय रूप साकारणारी आकर्षक मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे
शिवाजीनगर मधील मंडळाने बालकांना आकर्षित करणारे छोटा भीम मधील ढोलकपूर गाव चलतचित्र माध्यमातून साकारले आहे. स्टेट बँक चौकातही केदारनाथ धाम साकारले आहे. दर्डा मातोश्री जवळील शिवराय मंडळाने दुर्गेची त्रिमूर्ती प्रतिष्ठापीत केली असून त्यासमोरील कारंजे लोकांना आकर्षित करत आहे.या शिवाय नेहमीच्या लोकमत चौक ,मेन लाईन ,गांधी नगर इथल्या म्हैसासूरमर्दिनीच्या रूपातील दुर्गादेवीही लोकांना आकर्षित करत आहेत.
ओम सोसायटी जवळ माँ एकविरा दुर्गोत्सव मंडळाने साठ फूट उंच शिवलिंग बनवून त्याच्या आतमध्ये देवी दुर्गा प्रतिष्ठापित केली आहे आणि आजूबाजूला बारा जोतिर्लिंगाची मूर्ती साकारली आहे प्रवेशदारावर समोर नंदीची
मूर्ती आहे आणि छोट्याशा तळ्यात एक घागर ठेवली आहे त्यात नागरिक नाणी टाकतात हे त्यांचे पंचविसावे वर्ष आहे.
समर्थवाडी मधल्या समर्थ दुर्गा उत्सव मंडळाचा देखावाही लक्षवेधी आहे त्यांनी खेड्यातील झोपडीच्या देखावा साकारला असून आतमध्ये गोल तळ्यात दुर्गादेवी विराजमान झाली असून बाहेर बैलाचा पुतळा आहे ह्या मंडळाला आदर्श दुर्गोत्सवाचे बक्षीस मिळाले आहे यंदा त्यांनी बाजूला बेटी बचाव ,पाणी अडवा पाणी जिरवा या सारखे वैचारिक लोकजागृती करणारे फलक लावले आहेत  

No comments:

Post a Comment