नासाच्या मोहीम 56चे कमांडर Drew Feustel,flight engineer Ricky Arnold आणि Oleg Artemyev यांच्या अंतराळस्थानकातील वास्तव्यादरम्यानचा क्षण -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -2 oct.
नासाच्या अंतराळ मोहीम 56चे कमांडर Drew Feustel, flight engineer Ricky Arnold आणि flight engineer व सोयूझ कमांडर रशियन अंतराळवीर Oleg Artemyev गुरुवारी 40ct.ला पृथ्वीवर परतणार आहेत
हे तीनही अंतराळवीर सोयूझ MS-08 ह्या अंतराळ यानातून पृथ्वीवर परततील स्थानकातून निघाल्यानंतर जवळपास तीन तासानंतर त्यांचे सोयूझ यान कझाकस्थानातील Dzhezkazgan येथे पोहोचेल
त्या आधी 3oct.ला स्थानकात कमांडर ceremony पार पडेल सध्याचे कमांडर Drew Feustel स्थानकाच्या कमांडर पदाची सूत्रे Alexander Grest ( ESA ) ह्याच्या हाती सोपवतील
4oct.ला 12.30a.m.-ला अंतराळवीरांचा Farewell ceremony कार्यक्रम होईल आणि अंतराळवीर एकमेकांचा निरोप घेतील नंतर यानाचे Hatch Closure पार पडेल 3.30a.m.-ला यानाची Unlocking प्रक्रिया पार पडेल
6.30a.m.ते 6.51a.m.-वाजेपर्यंत Deorbit burn & 7.45 वाजता यानाचे Landing होईल व सर्व क्रिया व्यवस्थित पार पडल्यानंतर सोयूझ अंतराळयान पृथ्वीकडे झेपावेल
ह्या सर्व घडामोडींचे लाईव्ह प्रक्षेपण नासा t.v. वरून करण्यात येणार आहे
पृथ्वीवर पोहोचल्यानंतर ह्या अंतराळवीरांना हेलिकाफ्टरने कझाकस्थानातील recovery staging city Karaganda येथे नेण्यात येईल आणि चेकअप नंतर नासाच्या दोन विमानाने अंतराळवीर आपल्या इच्छित स्थळी पोहचतील
अंतराळवीर Feustel आणि Arnold नासाच्या विमानाने Houston येथे जातील तर रशियन अंतराळवीर Artemyev रशियातील त्यांच्या घरी Star City येथे जातील
ह्या तीनही अंतराळवीरांनी अंतराळ स्थानकात 197 दिवस वास्तव्य केले असून त्यांनी स्थानकातील त्यांच्या वास्तव्यादरम्यान स्थानकातून पृथ्वीभोवती 3,152 वेळा फेऱ्या मारल्या
अंतराळवीरांनी अंतराळस्थानकातील त्यांच्या वास्तव्यात स्थानकातील फिरत्या लॅब मध्ये सुरु असलेल्या संशोधनात्मक वैज्ञानिक प्रयोगात सहभाग नोंदवला हे संशोधन पृथ्वीवरील मानवी आरोग्यासाठी,अंतराळवीरांच्या स्थानकातील वास्तव्यासाठी व आगामी दूरवरच्या अंतराळ मोहिमांसाठी उपयुक्त आहे
No comments:
Post a Comment