Serena Aunon ,अंतराळवीर Sergey Prokopyev आणि Alexander स्थानकातील रशियन Segment मध्ये पार्टीच्या वेळेस सेल्फी घेताना फोटो -नासा संस्था
नासा संस्था -22 Nov.
नासाच्या अंतराळमोहीम 57 चे कमांडर Alexander Grest आणि flight engineer Serena Aunon Chancellor
ह्यांनी ह्या वर्षीचा Thanks Giving Day अंतराळस्थानकात साजरा केला रशियात हा दिवस साजरा होत नसला तरीही रशियन अंतराळवीर Sergey Prokopyev ह्यांनीही ह्या दोघांसोबत पार्टी एन्जॉय केली
अमेरिका व युरोप मध्ये दरवर्षी Thanks giving Day साजरा केला जातो वर्षभरात आपण ज्यांची मदत घेतली त्यांच्या उपकाराची ,कष्ठाची ,मदतीची कामाची ,प्रेमाची जाणीव ठेवून त्याची परतफेड म्हणून त्या सर्वांचे आभार मानण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो
त्या दिवशी स्पेशल फिस्टचे आयोजन केले जाते जेवणात विशेषतः टर्की पक्ष्याचे वेगवेगळे पदार्थ आवर्जून केले जातात आपले कुटुंबीय,आप्तस्वकीय आणि मित्रांसोबत पार्टीचे आयोजन केले जाते आणि अनेक स्वादिष्ठ पदार्थासोबतच टर्कीच्या पदार्थाचा आस्वाद घेतल्या जातो आणि साऱ्यांचे आभार मानले जातात
ह्या वर्षी स्थानकात राहायला गेलेल्याअंतराळवीर Alexander आणि Serena Aunon ह्यांना मात्र हा दिवस पृथ्वीवर साजरा करता आला नाही तरीही त्यांनी हा दिवस अंतराळ स्थानकात साजरा केला
अंतराळवीर Alexander Grest आणि Serena Aunon ह्या दोघांनी हा दिवस साजरा करण्यासाठी कामातून खास वेळ काढला पण अंतराळवीर Sergey Prokopyev ह्यांनी मात्र त्यांचे रोजचे काम संपवून ह्या दोघांच्या फीस्टमध्ये सहभाग नोंदवला
अंतराळवीर Alexander Grest आणि Serena ह्या दोघांनी Thanks Giving Day च्या दिवशी स्थानकातून पृथ्वीवर लाईव्ह संपर्क साधत त्यांच्या कुटुंबियांना, मित्रांना आणि पृथ्वीवासीयांना Thanks Giving Day निमित्य शुभेच्छा दिल्या आणि नुकत्याच स्थानकात गेलेल्या कार्गोशिप मधून खास त्यांच्यासाठी आलेले टर्की आणि इतर पदार्थांचे पार्सल दाखवले
Alexander म्हणाले कि हा दिवस आमच्यासाठी खास असतो आम्ही पृथ्वीवर अनेकदा हा दिवस साजरा केलाय पण ह्या वेळेस आम्ही हा दिवस स्थानकात साजरा करतोय म्हणून हा दिवस आमच्यासाठी स्पेशल आहे आम्ही भाग्यवान आहोत आम्हाला हि संधी दिल्याबद्दल आम्ही नासाचे आभारी आहोत हे स्पेशल फूड पाठवल्याबद्दलहि आम्ही त्यांचे विशेष आभार मानतो
आज आम्ही पार्टी करणार आहोत आणि आम्ही तिघे आम्हाला पाठवलेल्या टर्की पदार्थाचा आस्वाद घेणार आहोत आमच्या पार्टीत Spicy पाउंड केक,स्टफिंग candied yams आणि इतर फ्रोजन फूड चाही समावेश आहे
सेरेना म्हणाली कि खरोखरच Alexander म्हणतात तसा हा दिवस आमच्यासाठी खास आहे स्थानकात हा दिवस साजरा करण हि गोष्ट आमच्यासाठी भाग्याची आहे आणि हा अनुभव आमच्यासाठी रोमांचक आहे ,हा दिवस आमच्यासाठी खास आहे आणि सर्वानीच आपण जगात कोठेही असो आपल्यावर केलेल्या उपकारांची जाणीव ठेवून हा दिवस आवश्य साजरा करावा
No comments:
Post a Comment