Insight मंगळ यानाने मंगळाच्या भूमीवर प्रवेशताक्षणी मंगळग्रहाचा पाठवलेला पहिला फोटो -नासा संस्था
नासा संस्था -26 Nov.
नासाची मंगळ मोहीम यशस्वी करत नासाचे InSight मंगळयान अखेर मंगळ ग्रहावर निर्विघ्न पणे पोहोचले आहे सोमवारी 26 नोव्हेंबरला 3p.m.(EST) ला InSight मंगळयान मंगळाच्या भूमीवर यशवीपणे उतरले
पाच मे 2018ला InSight यान कॅलिफोर्निया येथील Vandenberg Airforce Base येथून 7.05p.m.ला मंगळाच्या दिशेने झेपावले होते आणि कुठलेही विघ्न न येता साडेसहामहिन्यांत तब्बल 300 मिलियन मैलाचा अंतराळप्रवास यशस्वीपणे पार करून अखेर मंगळावर पोहोचले आहे
Insight मंगळ यान मंगळ ग्रहावर दोन वर्षे म्हणजे मंगळावरील वर्षगणनेनुसार एक वर्षे चाळीस दिवस राहून संशोधन करेल
Insight यान 19,800 k.m. इतक्या प्रचंड वेगाने मंगळाच्या कक्षेत शिरले आणि अवघ्या साडेसहा मिनिटात ते मंगळाच्या भूमीवर पोहोचले सुद्धा ! यान मंगळाच्या कक्षेत शिरले तेव्हा यानाचा वेग प्रचंड असला तरीही मंगळाच्या वातावरणात शिरताच तेथील विरळ वातावरणाशी जुळवून घेत यानाने स्वयंचलित अत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने हळूहळू वेगावर नियंत्रण मिळवत आणि वेग कमी,कमी करत शुन्यावर आणला
यान मंगळाच्या कक्षेत शिरताच यानाचे पॅराशूट उघडले आणि यान मंगळाकडे झेपावू लागले जसजसे मंगळाची भूमी जवळ येऊ लागली तसतसा यानाचा वेग कमी झाला यान जमिनीच्या निकट येताच यानाची अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित होऊन यानाची चाके बाहेर आली आणि यान स्वत:वर नियंत्रण मिळवून मंगळाच्या भूमीवर स्थिरावले
अवघ्या साडेसहा मिनिटे इतक्या कमी वेळेत Insight यानात बसविलेल्या अत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने यानातील डझनावर ऑपरेशन्स कार्यान्वित झाली आणि यानाचे कार्य मंगळावर पोहोचल्यानंतरच्या क्षणभरात सुरु झालेही
Insight Mars लँडर वर सिस्मोमीटर बसवण्यात आला आहे जेव्हा हे मंगळयान मंगळावरील भूमीवर उतरले तेव्हा ह्या उपकरणाच्या एका रोबोटिक आर्मने पृष्ठभागावर सिस्मोमीटर बसवला Insight च्या ह्या अत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर वाहणाऱ्या उष्ण वाऱ्याचे प्रवाह आणि तीव्रता ह्यांचे मोजमाप करून त्यावर संशोधन करण्यात येईल विशेष म्हणजे ह्या रोबोटिक आर्मला बसविलेल्या अत्याधुनिक दुर्बिणीच्या साहाय्याने यानाने लगेचच तिथला पहिला फोटोही पृथ्वीवर पाठवला आहे
Insight यानाचे मंगळावर पोहोचल्यानंतरचे पहिले काम यानाला बसवण्यात आलेली सौर प्रणाली कार्यान्वित करणे हे होते कारण ह्या यानाचे कार्य सौर उर्जेवरच चालणार आहे आणि यानाने हि प्रणाली यशस्वीपणे कार्यान्वित केली पोहोचल्यानंतर पहिल्या सोळा मिनिटात हि प्रणाली सुरु करण्याची प्रोसेस सुरु झाली आणि नंतरच्या सोळा मिनिटात हि प्रणाली सुरु झाली
नासाच्या कॅलिफोर्नियातील Jet Propulsion Lab मधील ह्या Insight यानाच्या मंगळ मोहिमेशी संबंधित अधिकारी ,शास्त्रज्ञ ,इंजिनिअर्स आणि कर्मचारी मंगळयानाचा भूमिप्रवेश उसुकतेने पाहात होते जसजसे यान मंगळाकडे झेपावत होते तसतशी साऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली अखेर Insight मंगळाच्या भूमीवर सुखरूप पोहोचल्याचे पाहून सारेच आनंदित झाले यानाच्या मंगळ भूमीला स्पर्शण्याचा रोमांचक क्षण पाहताना शास्त्रज्ञ क्षणभर भारावले टाळ्या वाजवत हर्षोउल्हासाने साऱ्यांनी एकच जल्लोष केला एकमेकांचे अभिनंदन करत तर काहींनी नाचून ह्या ऐतिहासिक क्षणाचा आनंद साजरा केला
कॅलिफोर्नियातील J.PL lab मध्ये Insight मंगळावर लँडिंग झाल्याचे पाहून जल्लोष करताना शास्त्रज्ञ -फोटो-नासा संस्था
Insight चे मुख्य Investigater Bruce Banerdt म्हणतात कि,ह्या Insight च्या मंगळावरील लँडिंगचा क्षण पाहण आमच्यासाठी रोमांचक अनुभव होता पण आम्ही Insight जेव्हा रोबोटिक आर्मच्या साहाय्याने तिथली जमीन खणायला सुरु करेल त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात आहोत
ह्या Insight मंगळ यानासोबतच मंगळावर दोन CubeSats MarCOs पाठवण्यात आले असून त्यांनी देखील व्यवस्थित काम करायला सुरवात केली आहे
मंगळ ग्रहांभोवती फेऱ्या मारणाऱ्या ह्या उपग्रहांनी Insight मंगळावर पोहोचल्याचा संदेश कॅलिफोर्नियातील J.PL लॅबमध्ये दिला मार्को क्यूबसॅटच्या यशस्वी कार्याने मार्को चे प्रोजेक्ट मॅनेजर आणि टीम आनंदित झाले आहेत
नासा संस्थेतर्फे Insight मंगळ लँडिंग चे लाईव्ह प्रक्षेपण सोशल मीडियावरूनहि करण्यात आले होते
हि अमूल्य संधी साधत Times Square वर मंगळ ग्रहावरील Insight प्रवेशाचा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी अमेरिकन नागरिकांनी केलेली हि गर्दी -फोटो -नासा संस्था
Insight वर बसवलेल्या दुसऱ्या रोबोटिक आर्मचे काम त्याच्या सेल्फ हॅमरींगद्वारे मंगळावरील पृष्ठभागावर दहा ते सोळा फूट खोल खड्डा खणणे (पृर्वीच्या तुलनेत ह्याची खोली पंधरापट जास्त ) आणि तेथील माती व इतर अवशेषांचे उत्खनन करून त्याची संशोधित माहिती गोळा करून त्याचे नमुने पृथ्वीवर पाठवण्याचे आहे
मंगळयानाला सौर ऊर्जेसोबतच बॅटरीच्या ऊर्जेचा पुरवठा केल्या गेला असून शास्त्रज्ञाच्या अंदाजानुसार हे यान मंगळावर सव्वीस महिने कार्यरत राहू शकेल नासाच्या JPL lab चे Insight चे मुख्य प्रबंधक म्हणतात हा प्राथमिक अंदाज असला तरीही Insight ह्या पेक्षा जास्त काळ कार्यरत राहील
मंगळावरील वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी Seismology च्या ह्या प्रकल्पाचे स्वप्न शास्त्रज्ञ गेल्या चाळीस वर्षांपासून पहात आहेत त्या वेळेस मी student होतो आणि आज मी त्यात सह्भागी आहे असे JPL लॅबचे Insight mars Lander चे मुख्य Investigator Bruce Banordt म्हणाले होते आता त्यांचे ते स्वप्न साकार झाले आहे
ह्या मंगळयानाच्या यशस्वी मोहिमेमुळे मंगळावरील वातावरणाची,भूगर्भांची माहिती मिळेल शिवाय ब्रह्मांडातील पृथ्वी चंद्र आणि इतर ग्रहांची आपल्याला अवगत नसलेली माहितीही मिळेल
आगामी मानवासहित मंगळ मोहिमेसाठी,मंगळ ग्रहावरील मानवी निवासासाठी उपयुक्त ,योग्य ठीकाण ,तेथील मानवासाठी आवश्यक वातावरणाचीही माहिती मिळेल
मागच्या मंगळ मोहिमेत मंगळावरील माती,डोंगर दऱ्या ,volcanoes ,पाण्याचे आटलेले प्रवाह ह्यांची माहिती मिळाली आता ह्या ग्रहाची भूमिगत अंतर्गत रचना व वातावरणाची माहिती मिळेल
ह्या आधी 2012 मध्ये नासाचे क्युरियासिटी मार्स रोव्हर मंगळावर पोहोचले होते आता Insight Mars lander मंगळावर पोहोचले आहे आणि लवकरच तिथली अद्ययावत आधुनिक माहिती हे यान पृथ्वीवर पाठवेल
ह्या यशस्वी Insight मंगळ मोहिमेत नासा संस्थेसोबत France ,German आणि अनेक युरोपियन स्पेस एजन्सीची मदत मिळाली नासाचे नवे Administrator Jim Bridenstine ह्यांनी ह्या मोहिमेत सहभागी असलेल्या सर्वच शास्त्रज्ञाचे अभिनंदन केले Insight च्या यशस्वीतेसाठी ज्यांनी,ज्यांनी हातभार लावला त्या साऱ्याचे कौतुक करतानाच " ते म्हणतात हे यश त्या साऱयांच्या बुद्धिमत्तेचे ,कुशलतेचे आणि कठोर परिश्रमाचे आहे त्यांच्यामुळेच
हा ऐतिहासिक क्षण अनुभभवता आला "!
No comments:
Post a Comment