Sunday 19 August 2018

नासाच्या मोहीम 56 चे अंतराळवीर Oleg आणि Sergey ह्यांचा स्पेसवॉक यशस्वी


Flight Engineers Oleg Artemyev and Sergey Prokopyev
          नासाच्या अंतराळ मोहीम 56 चे अंतराळवीर Oleg आणि Sergey  -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -17 ऑगस्ट
नासाच्या अंतराळ मोहीम 56 चे फ्लाईट इंजिनीअर  Oleg Artemyev आणि रशियाचे अंतराळवीर Sergey Prokopyev ह्यांनी अंतराळस्थानकाच्या तांत्रिक कामासाठी आणि आगामी स्पेसवॉक व कार्गोशिपच्या आगमनाच्या तयारीसाठी 15 ऑगस्टला यशस्वी स्पेसवॉक केला
हा स्पेसवॉक सात तास सेहचाळीस मिनिटांचा होता हे दोन्ही अंतराळवीर अंतराळ स्थानकातून 12.17 p.m. ला स्पेसवॉक साठी बाहेर पडले आणि 8.05 p.m. ला स्पेसवॉक पूर्ण करून स्थानकात परतले
ह्या सात तासांच्या स्पेसवॉक दरम्यान ह्या दोन्ही अंतराळवीरांनी स्थानकातील रशियन सेगमेंटचा बाहेरील भागात Small Technology Satellites आणि नव्या सायंटिफिक प्रयोगासाठी लागणारे आवश्यक पार्ट बसविण्यासाठी केबल बसवण्याचे काम पूर्ण केले

Roscosmos cosmonaut Sergey Prokopyev
       अंतराळवीर Sergey Prokopyev स्पेसवॉक दरम्यान केबल बसवताना -फोटो -नासा संस्था

जर्मन अंतराळ एजन्सी D LR आणि रशियन अंतराळ एजन्सी Roscosmos ह्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने नवा Icarus सायंटिफीक प्रयोग करण्यात येणार आहे ह्या प्रयोगांतर्गत पृथ्वीवरील  स्थलांतरित प्राण्याच्या हालचाली टिपण्यात येतील स्थानकाला बसवलेल्या अँटेना आणि GPS hardwareच्या मदतीने पृथ्वीवरील छोट्या प्राण्यांच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे जाण्याच्या हालचाली ,त्यांच्या मुळे पसरणारे रोग आणि इतर घडामोडी ट्रॅक केल्या जातील आणि त्या वर संशोधन केल्या जाईल
आजवर स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी अंतराळवीरांनी केलेला हा 212 वा स्पेसवॉक होता  Oleg Artemyev ह्यांच्या अंतराळवारीतील हा तिसरा स्पेसवॉक होता त्यांनी ह्या स्पेसवॉक साठी परिधान केलेल्या सूटवर लाल रंगाच्या रेषा होत्या आणि  20 नंबरचा आकडा असलेला हेल्मेट घातला होता
अंतराळवीर Sergey ह्यांचा हा पहिलाच स्पेसवॉक होता त्यांनी 18 नंबरचे लेबल असलेले हेल्मेट घातले होतेआणि त्यांनी परिधान केलेल्या सुटवर निळ्या रंगाच्या रेषा होत्या

No comments:

Post a Comment