अंतराळवीर Drew Feustel ,अंतराळवीर Ricky Arnold आणि Oleg Artemyev पृथ्वीवर सुखरूप पोहोचल्यानंतर - फोटो -नासा संस्था
नासा संस्था -4 Oct.
नासाच्या अंतराळमोहीम 56चे अंतराळवीर Drew Feustel ,Ricky Arnold आणि Oleg Artemyev हे तिन्ही अंतराळवीर गुरुवारी चार तारखेला 7.44 a.m. वाजता (5.44pm.स्थानिक वेळ ) कझाकस्थानातील Dzhezkazgen येथे सुखरूप पोहोचले
ह्या तीनही अंतराळवीरांनी त्यांच्या अंतराळ स्थानकातील वास्त्यव्यात तेथे सुरु असलेल्या सायंटिफिक प्रयोगाच्या संशोधनात सहभाग नोंदवला शिवाय तिथे आलेल्या पाच कार्गोशिपच्या आगमनासाठी path तयार करून त्यांच्या docking ची सोय केली आणि त्यांच्या संशोधनाच्या कार्यातून वेळ काढत अमेरिकेतील 29 स्टेट मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली
अंतराळवीर Drew Feustel ह्यांनी त्यांच्या अंतराळ कारकिर्दीत तीनवेळा अंतराळयात्रा केली आणि अंतराळ स्थानकात 226 दिवस वास्तव्य केले तर Ricky Arnold ह्यांनी दोनवेळा अंतराळयात्रा केली आणि अंतराळ स्थानकात 209 दिवस वास्तव्य केले
ह्या अंतराळवीरांनी त्यांच्या स्थानकातील वास्तव्यादरम्यान संशोधनाबरोबरच अंतराळ स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी स्थानकाबाहेर तीनवेळा spacewalk केला
Drew Feustel ह्यांनी त्यांच्या अंतराळ कारकिर्दीत नऊवेळा स्पेसवॉक केला आणि त्या साठी स्थानकाबाहेर 61 तास 48मिनिटे व्यतीत केले आणि त्या मुळे जास्तवेळ स्पेसवॉक करणाऱ्या अमेरिकन अंतराळ वीरांच्या यादीत त्यांनी तिसरे स्थान मिळवले
Ricky Arnold ह्यांनी देखील त्यांच्या अंतराळ कारकिर्दीत पाच वेळा स्पेसवॉक केला आणि त्या साठी त्यांनी स्थानकाबाहेर 32 तास 4 मिनिटांचा वेळ व्यतीत केला
अंतराळ वीर Oleg Artemyev ह्यांनी दोनवेळा अंतराळवारी केली आणि त्या दरम्यान त्यांनी अंतराळ स्थानकात 366 दिवस वास्तव्य केले त्यांनी केलेला पहिलाच स्पेसवॉक मात्र रेकॉर्डब्रेक ठरला
त्यांनी केलेला 7 तास 46मिनिटांचा स्पेसवॉक रशियन Space Programm History मधला सर्वात जास्तवेळ केलेला स्पेसवॉक होता
No comments:
Post a Comment