पार्कर सोलर प्रोब सूर्याच्या कक्षेकडे मार्गक्रमण करताना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -10 नोव्हेंबर
सूर्याकडे झेपावलेले पार्कर सोलर प्रोब हे सौरयान अंतराळात यशस्वी मार्गक्रमण करत आता सूर्याजवळ पोहोचतेय सात नोव्हेंबरला नासा संस्थेत ह्या सौरयानातुन असे signals प्राप्त झाले आहेत
पार्कर सोलर प्रोब यान 11ऑगष्टला सूर्याकडे जाण्यासाठी अंतराळात झेपावले आणि कार्यरत होऊन यशस्वी मार्गक्रमण करत आता हे यान सूर्यापासून 15 मिलियन मैल अंतरावर पोहोचले आहे
विशेष म्हणजे ह्या आधी एकही सौऱयान सूर्याच्या इतक्या जवळ पोहोचले नव्हते 1976 मध्ये सूर्याकडे झेपावलेल्या Helios-B ह्या यानाने पार केलेल्या अंतराचा रेकॉर्ड पार्कर सौर यानाने मोडला आहे
पार्कर प्रोब चे मिशन कंट्रोल करणाऱ्या Johns Hopkins University च्या लॅब मध्ये सात नोव्हेंबरला शास्त्रज्ञांना 4.46 p.m. ला पार्कर प्रोब व्यवस्थित कार्यरत असून यशस्वी मार्गक्रमण करीत असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत
पार्कर सोलर प्रोब सूर्याच्या कक्षेजवळ जात असल्याचे संकेत मिळताच आनंदित झालेले शास्त्रज्ञ -फोटो -नासा संस्था
पार्कर सोलर प्रोब आता सूर्याच्या करोनाच्या दिशेने अत्यंत वेगाने प्रवास करत असून यानाचा वेग ताशी 213.200 मैल इतका आहे विशेष म्हणजे ह्या यानाचा वेग इतका प्रचंड आहे कि हे यान सतत त्याचा स्वत:चाच रेकॉर्ड मोडत आहे लवकरच यान सूर्याच्या करोनाच्या Perihelion जवळ पोहोचेल सूर्याचा हा करोनाआपल्याला साध्या डोळ्याने पाहता येत नाही इतका तो प्रखर प्रकाशमान असतो पण ग्रहण काळात मात्र आपण तो पाहू शकतो तिथे सतत उष्ण वारे वाहतात ,सौर वादळे होतात आगीच्या प्रचंड ज्वाळा सतत बाहेर पडतात अशा अत्युच्च तापमानात साधे सौर यान जळून खाक होऊ शकते पण पार्कर सोलर प्रोबला बसवलेली Thermal Protection System ह्या यानाचे सूर्याच्या प्रचंड उष्णतेपासून रक्षण करेल व यान सुरक्षित राहून त्याचे कार्य करेल
पार्कर सोलर प्रोब सूर्यावरील प्रचंड उष्णता ,सौरमंडळ,त्यावरील वादळे त्याचा पृथ्वीवरील वातावरणावर होणारा परिणाम ह्याचा अभ्यास करून पृथ्वीवर माहिती पाठवेल शिवाय सूर्याचा करोनाचा भाग अत्यंत उष्ण आणि त्या खालचा सूर्याचा पृष्ठभाग मात्र कमी उष्ण का असतो ? ह्या बाबतीतही माहिती मिळवेल
सध्या तेथील वातावरणाची उष्णता 820 डिग्री f.आहे पण जसजसे पार्कर सौऱयान सूर्याच्या कक्षेजवळ पोहोचेल तसतसे उष्णतामान वाढत जाईल व ते 2500 डिग्री f.पर्यंत पोहोचेल सूर्याच्या अत्युच्च तापमानात पोहोचल्यावर यानाला प्रचंड उष्णतेचा आणि तेथील रेडिएशनचा सामना करावा लागेल
नासाच्या वॉशिंग्टन येथील नासा सेंटर मधले Associate Administrator Thomas Zurbuchen ह्यांनी दिलेल्या माहिती नुसार पार्कर सोलर प्रोबची रचनाच अशी केली आहे कि हे सौर यान सूर्याच्या प्रभामंडळातील अत्युच्च तापमानात शिरताना स्वतःचे रक्षण स्वत:च करेल कारण पृथ्वीवरून ह्या यानावर नियंत्रण करणे कठीण आहे
आता पार्कर सोलर सौर यानाची स्वयंचलित operating system व्यवस्थित कार्यरत झाली असून सारे instrument हि व्यवस्थित कार्यरत होऊन डाटा गोळा करत आहेत आणि जर काही मायनर प्रॉब्लेम आला तरीही पार्कर प्रोबची ऑटोमॅटिक यंत्रणा कार्यरत होऊन तो प्रॉब्लेम सॉल्व करेल गेल्या साठ दशकात पार्कर सोलर प्रोब ने प्रथमच रेकॉर्डब्रेक अंतर पार करून मिळवलेल्या ह्या यशाने शास्त्रज्ञ आनंदित झाले आहेत
सूर्याच्या कक्षेच्या 68.63 कि.मी. अंतरावरून पार्कर सौरयान सूर्याभोवती सात वर्षे परिक्रमा करेल व तिथली माहिती मिळवेल .
No comments:
Post a Comment