नासाच्या मोहीम 58 ची अंतराळ वीरांगना Anne McClain कॅनडाचे अंतराळवीर Davis Saint आणि रशियन अंतराळवीर Oleg Kononenko अंतराळ स्थानकात जाण्यासाठी सज्ज
-फोटो -नासा संस्था
नासा संस्था -30 ऑगस्ट
नासाच्या अंतराळ मोहीम 58ची अंतराळ वीरांगना Anne McClain कॅनडाचे अंतराळवीर Davis Saint-Jacques आणि रशियन अंतराळवीर Oleg Kononenko लवकरच अंतराळस्थानकात राहण्यासाठी जाणार आहेत
जाण्याआधी ते सहा सप्टेंबरला नासाच्या Johnson Space Center मध्ये पत्रकारांशी संवाद साधतील व त्यांच्या या अंतराळ मोहिमेबद्दल माहिती सांगतील
हे अंतराळवीर 20 डिसेंबरला कझाकस्थानातील बैकोनूर मधल्या Cosmodrome वरून Soyuz MS-11ह्या अंतराळ यानातून अंतराळस्थानकाकडे रवाना होतील आणि अंतराळ स्थानकात सध्या रहात असलेल्या अंतराळवीरांसोबत तिथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतील
अंतराळ वीरांगना Anne McClainआणि Davis Saint Jacques ह्यांची हि पहिलीच अंतराळवारी आहे
रशियन अंतराळवीर Oleg Kononenko मात्र चवथ्यांदा अंतराळस्थानकात राहण्यासाठी जातआहेत आणि ते ह्या मोहीम 59च्या पथकाचे कमांडरपद सांभाळतील
हे तिन्ही अंतराळवीर अंतराळस्थानकात राहून तिथे सुरु असलेल्या वेगवेगळ्या सायंटिफिक प्रयोगाच्या संशोधनात सहभागी होतील McClain पहिल्या Tissues on chip ह्या प्रोजेक्ट अंतर्गत सुरु असलेल्या संशोधनात सहभाग नोंदवेल
U.S.मधून मेकॅनिकल आणि Aeronautical engineering ची पदवी घेतल्यानंतर McClainने इंग्लंड मधल्या Bath युनिव्हर्सिटीतून M.E Aerospace Engineering केले आहे .ती ह्या प्रोजेक्ट अंतर्गत अंतराळ स्थानकातील micro gravity चा tissues वर होणाऱ्या परिणामावर संशोधन करणार आहे
No comments:
Post a Comment