Sunday 31 December 2023

आर्टिमस मोहिमेतील Space X - Moon Landerआणी Elevator ची चाचणी यशस्वी


नासा संस्था -27 डिसेंबर

नासाचे आर्टिमस मोहिमेतील अंतराळवीर  Christina Koch ,Victor Glover,Ried Wiseman आणी Jeremy Hansen पुढच्या वर्षी चंद्रावर जाणार आहेत ह्या अंतराळवीरांची मोहीम दहा दिवसांची असुन त्यातील आठ दिवस अंतराळवीर चंद्रभुमीवर ऊतरून तेथील वातावरणातील आणी भुमीवरील संशोधीत माहिती गोळा करणार आहेत 

ह्या अंतराळवीरांना चंद्राच्या कक्षेतून खाली चंद्रभुमीवर ऊतरण्यासाठी आणी चंद्रभुमीवर फिरून माहिती मिळवण्यासाठी Moon Rover आणी Elevator ची आवश्यकता होती त्यासाठी नासा संस्थेने व्यावसायिक कंपनींना Rover तयार करण्याची संधी दिली होती आणी नासा संस्थेने Space -X ने तयार केलेल्या Moon Rover ची निवड केली होती आता ह्या Rover आणी Elevator च्या कार्यक्षमतेची,कार्यप्रणालीची आणी परीपूर्णतेची  चाचणी घेण्यात आली असून ती यशस्वी झाली आहे 

नासाच्या आर्टिमस III आणी IV मोहिमेतील अंतराळविरांच्या चांद्रमोहिमेसाठी तयार करण्यात आलेल्या Moon Rover आणी Elevator ची ऊड्डाणपुर्व अंतीम चाचणी घेण्यात आली ह्या चाचणीत अंतराळवीर Nicole Mann आणी Doug Wheels ह्यांनी भाग घेतला ह्या मोहीमेत चार अंतराळवीर  दहा दिवसांसाठी चंद्रावर जाणार आहेत त्यांचे Orion अंतराळयान चंद्राच्या कक्षेत शिरल्यावर चारपैकी दोन अंतराळवीर खाली चंद्रभुमीवर ऊतरतील व दोन अंतराळवीर चंद्राच्या कक्षेत फिरून संशोधीत माहिती गोळा करतील 

चंद्राच्या कक्षेतुन खाली ऊतरण्यासाठी हे अंतराळवीर Space X ने तयार केलेल्या Elevator चा ऊपयोग करतील आणी Moon Rover मधून फीरुन चंद्रभुमीवरील संशोधीत माहिती गोळा करतील त्या दरम्यान त्यांना तेथे आठ दिवस मुक्काम करावा लागणार आहे त्या साठी ह्या Rover मध्ये वरच्या बाजूला त्यांना रहाण्यायोग्य जागेची सोय करण्यात आली आहे तसेच अंतराळवीरांना फिरून चंद्रावरील वातावरणातील,भुमीवरील व भुगर्भातील नमुने  गोळा करावे लागतील हे नमुने गोळा करण्यासाठी लागणारी अत्याधुनिक यांत्रिक सामुग्री व  संशोधनासाठी लागणारे ईतर साहित्य ठेवण्यासाठीही त्यात  भरपूर जागा आहे 

ह्या Moon Lander च्या चाचणी दरम्यान दोन्ही अंतराळवीरांनी Axiom Space कंपनीने तयार केलेला स्पेससुट घातला होता अमेरीकेची आर्टिमस मोहीम पन्नास वर्षांनी सुरू झाली आहे त्यामुळे अपोलो मोहिमेतील अंतराळवीरांचे स्पेससुट आता जुने झाले आहेत त्यामुळे नासा संस्थेने अंतराळवीरांसाठी नवीन नाविन्यपूर्ण आणी चंद्रावरील वातावरणात सुरक्षित असा स्पेससुट तयार करण्याचीही संधी दिली होती त्यात Axiom कंपनीने तयार केलेल्या स्पेससुटची निवड झाली म्हणून ह्या चाचणी दरम्यान स्पेससुटचीही योग्यता तपासण्यात आली हा स्पेससुट तेथील वातावरणात वादळवाऱ्यात टिकेल का? त्यातून लिकेज होत नाही ना ?तो अंतराळवीरांच्या योग्य साईजचा आहे ना? आणी तो घालून तिथे सहजतेने फिरता येईल का? विषेश म्हणजे अंतराळवीरांना आवश्यक बाबींची पुर्तता करणारा टिकाऊ व सुरक्षित आहे ना हे तपासण्यात आले 

अंतराळवीरांनी नासाच्या J.PL स्पेस सेंटरमध्ये हा सस्पेसुट घालून Orion यानातुन Elevator वरुन खाली ऊतरुन Moon Lander मधून फिरून ह्या चाचणीत भाग घेतला त्यांना ह्या Moon Lander आणी Elevator ह्यांची कार्यप्रणाली आणी डिझाईन ह्याचा अनुभव कसा होता ह्या बाबतीत चर्चा करण्याची संधी दिली  तेव्हा त्यांनी ऊत्तम प्रतिक्रिया दिली 

Moon Lander आणी Elevator मध्ये वरच्या बाजूला मुबलक जागा फिरण्यासाठी बास्केट सारखे गोलाकार चाकावर चालणारे फिरणारे अत्याधुनिक ऊपकरण, Elevator मधून आत बाहेर चढण्या,ऊतरण्याची सोय आणी अंतराळवीरांना संशोधन करण्यासाठी,संशोधीत साहित्य ठेवण्यासाठी भरपूर जागा देखील आहे आणी कार्यप्रणाली ऊत्तम आहे,सुरक्षित आहे अशी प्रतिक्रिया अंतराळवीरांनी दिली 

नासा संस्था प्रमुख म्हणतात,आर्टिमस मोहीमेतील अंतराळवीरांच्या चंद्रावरील मानवी Landing साठी System तयार करण्यासाठीची प्रक्रिया कठीण होती पण नासा संस्थेतील आर्किटेक्टने बनवलेले डिझाईन आणी ईंजीनिअर्स,तंत्रज्ञांनी मिळुन केलेली Orion अंतराळयान आणी Space Launch System ची निर्मिती यशस्वी झाली आहे

नासाच्या आर्टिमस मोहिमेतील अंतराळवीरांची आपदकालीन टेस्ट संपन्न


आर्टिमस मोहिमेतील अंतराळवीर आपदकालीन ट्रेनिंग दरम्यान -फोटो - नासा संस्था 

नासा संस्था -21 डिसेंबर 

नासाच्या आर्टिमस मोहीमेची सध्या जय्यत तयारी सुरु आहे ह्या मोहिमेतील अंतराळवीर नासाच्या Johnson Space Center मध्ये अंतिम ट्रेनिंग घेत आहेत नुकतीच ह्या अंतराळवीरांची आपदकालीन टेस्ट पार पडली

नासाच्या आर्टिमस मोहीमेतील अंतराळवीर Christina Koch,Victor Glover ,Jeremy Hansen आणी Ried Wiseman ह्यांना नासाच्या JPL सेंटर मध्ये अंतराळयानातुन आपदकालीन स्थितीत बाहेर निघण्याचे ट्रेनिंग देण्यात आले आर्टिमस मोहिमे अंतर्गत चंद्रावर पोहोचुन हि मोहीम यशस्वी करून Orion यान पृथ्वीवर  समुद्रात खाली ऊतरताना काही आपदकालीन समस्या निर्माण झाल्यास किंवा काही कारणाने  त्यांना यानातुन बाहेर काढण्यासाठी रिकव्हरी टिम वेळेवर पोहोचली नाही तर यानातुन स्वतः बाहेर पडण्यासाठी  खास प्रशिक्षण देण्यात आले 

अशा वेळेस परिस्थितीवर नियंत्रण मिळवत अंतराळवीरांना यानाच्या किनाऱ्याजवळील भागातील आणी वरच्या बाजूला असलेल्या दारातून बाहेर पडण्याचे प्रशिक्षण देण्यात आले ह्या प्रशिक्षणसाठी अंतराळवीर Christina Koch ,अंतराळवीर Jeremy Hansen ह्यांनी विषेश परीश्रम घेतले नासाचे स्पेससूट टेक्निशियन ओव्हेन्स ह्यांनी अंतराळवीरांना सहकार्य केले 

Tuesday 26 December 2023

अंतराळवीरांच स्थानकातील ख्रिसमस सेलिब्रेशन


स्थानकातील kibo Lab मध्ये ख्रिसमस सेलिब्रेशन साठी केलेली सजावट - फोटो-नासा संस्था

नासा संस्था -26 डिसेंबर

नासाच्या अंतराळमोहिम 70चे अंतराळवीर Jasmin Moghbeli,Loral O Hara,जपानचे अंतराळवीर Satoshi Furukawa आणी युरोपियन अंतराळवीर Andreas Mogensen ह्यांनी 25 डिसेंबरला स्थानकात Christmas साजरा केला 
 

 
अंतराळातील झीरो ग्रव्हिटीत फिरणाऱ्या अंतराळ स्थानकातील Kibo Lab मध्ये स्थानकातील ऊपलब्ध सामान गोळा करून त्यांनी lab मधील कोपरा सजवला लाईट्स,मोजे,देशाचे झेंडे भिंतीवर लावले ख्रिसमस ट्रि सजवुन समोर जेवणाचे टेबल सजवले 
ह्या अंतराळवीरांनी ख्रिसमस सेलिब्रेशन साठी शांताक्लाज सारखा वेश व टोपी परीधान केली 
ह्या ख्रिसमस सेलिब्रेशनचा व्हिडीओ ह्या अंतराळवीरांनी शेअर केला आहे 
 

 
ह्या वेळी नासाच्या अंतराळवीर Jasmin Moghbeli ह्यांनी मनोगत व्यक्त केले ह्या क्षणी मी माझ्या कुटुंबीयांना आणी मित्रांना मिस करतेय पण माझ्या स्पेशल Space Family सोबत मी ख्रिसमस साजरा करत आहे आम्ही सर्वांनी एकत्र येऊन ख्रिसमससाठी हि सजावट केलीय आम्ही Cookies decorate केले आहेत केक आहे आणी ईतर पदार्थ पण आहेत आम्ही टेबलावर ते सजवून ठेवलेत आणी आता आम्ही जेवणाचा आस्वाद घेणार आहोत सर्वांना,
Happy Christmas !
 

 
 
 

Monday 25 December 2023

अंतराळवीरांनी दिल्या लाईव्ह संवादा दरम्यान पृथ्वीवासीयांना ख्रिसमसच्या शुभेच्छा

नासाच्या अंतराळ मोहीम 70 चे अंतराळवीर Andreas Mogensen ,Jasmin Moghbeli , Satoshi Furukawa आणि Loral O' Hara नासा संस्थेशी लाईव्ह संवादा दरम्यान ख्रिसमस निमित्य शुभेच्छा देताना -फोटो नासा संस्था
 

नासा संस्था-23 डिसेंबर

25 डिसेंबरला जगभरात सर्वत्र ख्रिसमस साजरा केला जातो सर्वजण आपल्या कुटुंबियांसोबत,मित्रांसोबत एकत्र येऊन हा सण उत्साहात साजरा करतात पृथ्वीपासून दूर अंतराळातील फिरत्या अंतराळ स्थानकात वास्तव्य करणारे अंतराळवीर मात्र आपल्या कुटुंबियांसोबत हा सण साजरा करू शकत नाहीत पण स्थानकातील झिरो ग्रॅव्हीटीत हे अंतराळवीर स्थानकातील सहकारी अंतराळवीरांसोबत एकत्र येऊन हा सण साजरा करतात सध्या  अंतराळ स्थानकात रहात असलेले नासाच्या अंतराळ मोहीम 70 चे अंतराळवीर Jasmin Moghbeli आणि Loral O Hara युरोपियन अंतराळवीर Andreas Mogensen जपानचे अंतराळवीर Satoshi Furukava ह्यांनी नासा संस्थेशी लाईव्ह संवाद साधताना पृथ्वीवासीयांना  ख्रिसमस निमित्य शुभेच्छा दिल्या आहेत त्या वेळी संवाद साधताना
अंतराळवीर Jasmin Moghbeli म्हणाल्या ,
" माझ्यासाठी ख्रिसमस  सण विषेश आहे माझ्या आयुष्यातील सुंदर क्षण मला तुमच्याशी शेअर करावयाचे आहेत त्याच दिवशी मी व माझे पती एकमेकांना प्रथम भेटलो आम्ही  दोघेही दरवर्षी हा सण साजरा करतो आम्ही वेगवेगळ्या संस्कृतीत वाढलो पण आम्ही दोघेही आमचे सण वेगवेगळ्या पध्दतीने साजरे करून दोन्ही संस्कृतीचे जतन करतो आम्ही दरवर्षी आमच्या दोन छोट्या मुलींसोबत हे सण साजरे करतो आणि त्यांच्यामध्ये दोन्ही संस्कृती रूजवतो आमच्या भेटिच्या क्षणाची आठवण देणारा हा क्षण माझ्यासाठी म्हणूनच स्पेशल आहे आमच नात जस स्पेशल आहे तसच,  सर्व जातीधर्माचे वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक एकत्र येत ख्रिसमस साजरा करतात हा सण सर्वांना आनंद देणारा आहे ह्या वर्षी मी माझ्या कुटुंबीयांसोबत हा सण साजरा करत नसले तरीही ईथे स्थानकात आम्ही सर्वजण तो साजरा करणार आहोत!"
"Happy Christmas !"
Loral O Hara-
माझ्यासाठी ख्रिसमसची सुट्टी आणी हा सण म्हणजे सर्व कुटुंबीय एकत्र येण्याचा क्षण ह्या वर्षी प्रथमच मी कुटुंबीयांशीवाय हा सण साजरा करणार आहे पण मी Super Excited आहे कारण मी ईथे स्थानकातील झीरो ग्रव्हिटीत माझ्या सहकारी अंतराळवीरांसोबत हा सण साजरा करणार आहे आणी हि आमची Space Family आहे स्थानकातील वास्तव्यात वेगवेगळ्या देशातील,संस्कृतीतील अंतराळवीर एकत्र येऊन हा सण साजरा करतात तेव्हा पृथ्वीवरील विविधतेची,संस्कृतीची ओळख होते जागतिक एकतेची जाणीव होते जगाकडे पहाण्याचा नवा दृष्टीकोन आणी नवी प्रेरणा मिळते असाच दृष्टिकोन आणि मानवतेची जाणीव पृथ्वीवासीयांना व्हावी असे मला वाटते 
Satoshi Furukawa
"जपानमध्ये  देखील नववर्षाच्या शुभारंभाला  सर्वजण एकत्र जमतात धार्मिक स्थळांना भेटी देतात येणारे वर्ष आनंदी आणी सुखाचे जावे म्हणून सर्वजण प्रार्थना करतात ईथुन स्थानकातुन मी पृथ्वीवासीयांना ख्रिसमसच्या आणि नवीन  वर्ष शेवटपर्यंत सुखाचे आणी आनंदी जावे अशी  शुभेच्छा देतो !
Andreas Mogensen
"मी देखील ख्रिसमस हा सण माझ्या कुटुंबियांसोबत दरवर्षी  साजरा करतो पण ह्या वर्षी मी माझ्या कुटुंबीयांसोबत नसलो तरीही ईथे मला माझ्या स्थानकातील Space Family सोबत हा सण साजरा करायला मिळणार आहे त्यासाठी नासा संस्थेचे आणी संस्थेतील सर्वांचे आभार  आम्ही जेव्हा स्थानकातुन खाली पृथ्वीकडे पहातो तेव्हा ती शांत समृद्ध  दिसते मला आशा आहे की,जगातील सर्व देशातील लोकांच्या सहकार्याने एकत्रीतपणे अशीच शांतता पृथ्वीवर प्रस्थापित होईल जगभरातील लोकांनी जर असे करायचे ठरवले तर एकमेकातील वितुष्टता जाऊन सर्वत्र शांतता निर्माण होईल मानवाने ठरवले तर काहीच अशक्य नाही ! आमच्या सर्वांकडून नासा संस्था आणि पृथ्वीवासीयांना ख्रिसमस निमित्य शुभेच्छा !"
                Wish you happy Merry Christmas & Happy New Year ! 


Wednesday 20 December 2023

अंतराळवीर Frank Rubio ह्यांनी व्हेजी चेंबरमधील तोडलेला पण नंतर हरवलेला टोमॅटो सापडला

 

 The seven-member Expedition 70 crew poses for a portrait inside the International Space Station's Kibo laboratory module. In the front row (from left) are, Commander Andreas Mogensen from ESA (European Space Agency) and NASA Flight Engineers Jasmin Moghbeli and Loral O'Hara. In the back are, Roscosmos Flight Engineers Nikolai Chub, Konstantin Borisov, and Oleg Kononenko; and JAXA (Japan Aerospace Exploration Agency) Flight Engineer Satoshi Furukawa.

 नासाच्या मोहीम 70 चे अंतराळवीर कमांडर अंतराळवीर Andreas Mogensen,Jasmin Moghbeli, Loral O'Hara,Nikolai Chub,Konstantin Borisov,Oleg Kononenko,Satoshi Furukawa एकत्रित संवाद साधताना -फोटो नासा संस्था

 नासा संस्था -14 डिसेंबर 

सहा डिसेंबरला अंतराळस्थानकाने 25व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे त्या निमित्ताने नासा संस्थेतील मान्यवरांनी सध्या स्थानकात रहात असलेल्या मोहीम 70 च्या अंतराळवीरांसोबत लाईव्ह संवाद साधुन त्यांना स्थानकाच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या त्या वेळी त्यांना काही  प्रश्नही विचारण्यात आले तेव्हा त्यांनी अंतराळवीर Frank Rubio ह्यांच्या हातुन हरवलेला टोमॅटो सापडल्याचे सांगितले

अंतराळवीर Frank Rubio ह्यांनी तोडलेले पण नंतर सापडलेले व्हेजी चेंबर मधील टोमॅटो -फोटो -नासा संस्था 

नासाचे अंतराळवीर वेगवेगळ्या मोहिमेअंतर्गत अंतराळस्थानकात रहायला जातात त्यांच्या तेथील वास्तव्यात त्यांना पृथ्वीसारखे ताजे पोषक अन्न आणी भाजी खायला मिळत नाही त्यांना पृथ्वीवरून प्रिझर्व केलेले फ्रोझन अन्न व भाज्या खाव्या लागतात त्यांना ईथल्या सारखे ताजे अन्न व भाज्या खायला मिळाव्यात म्हणून स्थानकात व्हेजी प्रोजेक्ट राबविण्यात येत आहे ह्या व्हेजी प्रोजेक्ट अंतर्गत आतापर्यंत वेगवेगळ्या भाज्या छोटे गहु,चेरी टोमॅटो,मिरचीची रोपे लाऊन ऊगवलेल्या भाज्यांंचा आस्वाद देखील अंतराळवीरांनी घेतला आहे  व्हेजी चेंबरमध्ये पृथ्वीसारखी रोपांना पोषक अशी वातावरण निर्मिती करण्यात आली आहे त्यासाठी रंगीत लाईटचा वापर करून ऊजेड,अंधार निर्मिती आणी तापमान नियंत्रण केल्या जाते 

अंतराळवीर त्यांच्या संशोधनाच्या कामातून वेळ काढून ह्या व्हेजी चेंबरमधील रोपांची निगा राखतात नासाचे रेकॉर्ड ब्रेकर अंतराळवीर Frank Rubio ह्यांनी स्थानकात 371 दिवस वास्तव्य केले होते अंतराळात जास्त दिवस राहिल्यावर मानवी शरीरावर काय विपरीत परिणाम होतो त्यांच्या शारीरिक मानसिक क्षमतेवर शरीरातील सर्व सिस्टीममध्ये काय बदल जाणवतात,पेशींमध्ये काय बदल होतात ह्या विषयीच्या मानवी संशोधनात ते सहभागी झाले होते त्यांच्या स्थानकातील वास्तव्यात त्यांनी ह्या गोष्टीचे निरीक्षण नोंदवून नमुने गोळा केले शीवाय सायंटिफिक प्रयोग व ईतर कामासोबत त्यांनी व्हेजी प्रोजेक्टमध्ये काम केले मार्चमध्ये ते पृथ्वीवर परतले

हरवलेल्या टोमॅटो बाबत सांगताना ते म्हणाले,"हो माझ्या हातून टोमॅटो हरवला होता मी व्हेजी चेंबरमधील टोमॅटोची कापणी करत होतो तेव्हा एक,दोन टोमॅटो जरा जास्त पिकलेले वाटले म्हणून मी ते दोन टोमॅटो प्लास्टिक पिशवीत घातले आणी velcroआणण्यासाठी गेलो टोमॅटोची पीशवी व्यवस्थीत राहील असे मला वाटले पण मी परत आलो तर पिशवी आणी टोमॅटो गायब झाले होते मी खूप वेळ सर्वत्र ते शोधले पण सापडले नाही सगळ्यांंना वाटल की मी ते टोमॅटो खाल्ले मी त्यांना ते हरवल्याचे सांगितले तरीही कोणीही त्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते मी टोमॅटो खाल्ले नव्हतेच मग ते सिध्द करण्यासाठी मी जवळपास विस तास वाया घालवले पण टोमॅटो सापडले नाहीत पण मला खात्री होती की कधी ना कधी ती टोमॅटोची पिशवी सापडेल मी पृथ्वीवर परतताना सहकारी अंतराळवीरांना ते शोधण्यास सांगितले होते अखेर मोहीम 70 च्या अंतराळवीरांना ते टोमॅटो सापडल्याचे त्यांनी सांगितले आणी मी ते खाल्ले नव्हते ह्याची त्यांना खात्री पटली !"

मोहीम 70 ची अंतराळवीर Jasmin Moghbeli हिने नासा संस्थेतील मान्यवरांशी लाईव्ह संवाद साधताना टोमॅटो सापडल्याचे सांगितले,"आम्हाला व्हेजी चेंबरमध्ये प्लॅस्टिक पीशवीत ते सापडले आमचा सहकारी Good Friend Frank आता पृथ्वीवर परतले आहेत त्यांनी ते टोमॅटो खूप शोधले होते आणी खरेच हरवले होते त्यानीं ते खाल्ले नव्हते हे आता सिद्ध झाले आहे !"

Frank Rubio ह्यांनी VEG-03 प्रोजेक्ट अंतर्गत ह्या चेरी टोमॅटोची लागवड केली होती ह्या X-ROOT  प्रोजेक्ट मध्ये Hydroponic,Aeroponic टेक्निकचा वापर करून माती किंवा ईतर आवश्यक गोष्टी न वापरता हि रोपे ऊगवण्यात आली रोपामधील पोषकद्रव्ये वाढविण्यासाठी आणि अंतराळवीरांना आवश्यक व्हिटॅमिन्स मिळावेत म्हणून हा प्रोजेक्ट राबविण्यात आला ह्याचा ऊपयोग दुरवरच्या अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांसाठीही होणार आहे 

ह्या सापडलेल्या टोमॅटोत आठ महिन्यानंतरही  विशेष फरक पडला नाही ते थोडेसे फिकट रंगाचे चपटे आणी वाळले आहेत त्यावर बुरशीही आली नाही आता हे टोमॅटो पृथ्वीवर परत आणले जाणार नाहीत तिथेच व्हेजी चेंबरमध्ये पुन्हा लागवडीसाठी वापरले जातील आणी अंतराळातील झीरो ग्र्ँव्हिटीतील वातावरणात टोमॅटोमधील जिन्स नवीन टोमॅटोमध्ये कसे ऊतरतात ह्याचे निरीक्षण नोंदवून संशोधन केल्या जाईल


Tuesday 19 December 2023

अंतराळस्थानकाचे 25 व्या वर्षात यशस्वी पदार्पण

 

 International Space Station with Earth in the background

    अंतराळातील झिरो ग्रॅव्हीटीतील फिरते अंतराळस्थानक -फोटो नासा संस्था

  नासा संस्था- 8 डिसेंबर

नासा संस्थेतील पाच देशांनी मिळुन निर्माण झालेल्या अंतराळातील झीरो ग्रॅव्हिटीतील फिरत्या अंतराळस्थानकाने आता पंचविसाव्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे सहा डिसेंबरला नासा संस्थेतर्फे स्थानकाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला नासाचे Associate Administrator Robert Cabana आणी Space Station Program Manager Joel Montalbano ह्यांनी सध्या अंतराळस्थानकात रहात असलेल्या अंतराळ मोहीम 70 च्या अंतराळवीरांसोबत लाईव्ह संवाद साधुन त्यांना स्थानकाच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या 

अंतराळस्थानकाच्या निर्मितीचा शुभारंभ 25 नोव्हेंबर 1998 ला झाला पण 6 डिसेंबरला अंतराळात फिरणाऱ्या Zarya Module ला पहिल्यांंदा Unity Module जोडण्यात आले म्हणून सहा डिसेंबरला स्थानकाचा वर्धापन दिन साजरा केल्या जातो अमेरिका आणी रशिया ह्या दोन देशांनी मिळुन हे दोन Module एकत्र जोडले होते आता त्या भागात अंतराळस्थानकात वास्तव्य करणारे अंतराळवीर एकत्र जेवण करतात 

अंतराळस्थानकाच्या निर्मितीचा शुभारंभ करून हे दोन भाग एकमेकांना जोडण्याची मोहीम आखण्यात आली तेव्हा ह्या मोहिमेचे कमांडर Robert Cabana होते त्यांच्याच देखरेखीखाली हे भाग जोडण्यात आले आणी त्यांनीच पहिल्यांंदा स्थानकात प्रवेश केला स्थानकात प्रवेश करणारे ते पहिले अमेरिकन अंतराळवीर आहेत स्थानकाच्या वर्धापनदिनी अंतराळवीरांसोबत लाईव्ह संवाद साधताना त्यांनी हि माहिती दिली ते म्हणतात,"खरोखरच त्या वेळेस हे साहसी,थरारक काम मी केलय ह्यावर आता माझा विश्वास बसत नाही तुम्ही जिथे सध्या राहात आहात संशोधन करत आहात त्याचे श्रेय आम्हाला आहे तुम्ही तिथे वास्तव्य करून पृथ्वी संरक्षणासाठी आणी पृथ्वीवासीयांसाठी ऊपयुक्त संशोधन करत आहात ह्याचा ऊपयोग भावी पीढीसाठी आणी दुरवरच्या अंतराळ मोहीमेतील अंतराळवीरांसाठी होणार आहे 

अंतराळातील ह्या फिरत्या वास्तुचा आकार गोलाकार आणी अमेरिकेतील फुटबॉल फिल्ड एव्हढा आहे ह्या अंतराळातील झीरो ग्रॅव्हिटितील फिरत्या स्थानकात सहा क्वार्टर आणी दोन बाथरूम आहेत शीवाय व्यायामासाठी जीम आणी ईतर सायंटिफिक प्रयोग,संशोधन करण्यासाठी भरपूर जागा आहे अंतराळवीरांसाठी ताजी भाजी आणी अन्न पिकवण्यासाठी ह्या स्थानकात पृथ्वीसारखे कृत्रीम वातावरण असलेले व्हेजी चेंबर देखील आहे नवनवीन व्हेजी प्रोजेक्ट द्वारे अंतराळवीरांनी त्यात भाजी ऊगवण्यात यश मिळवले आहे आणी ताज्या भाज्यांचा आस्वाद देखील घेतला आहे 

अंतराळस्थानकाची निर्मिती जरी 1998 साली झाली असली तरी कित्येक वर्षांपासून अंतराळातील फिरत्या स्थानकाची अभीनव कल्पना मांडली गेली होती सोळाव्या शतकातच पहिल्यांदा Astronomer Johannes ह्यांंना अशी कल्पना सुचली अंतराळात फिरणाऱ्या अशा स्थानकात अंतराळात फिरता आणी रहाता  देखील येईल एक दिवस ते शक्य होईल आणी मानव अंतराळात प्रवास करेल असे त्यांनी म्हटले होते त्या नंतर 1860 मध्ये  Edward Everett Hale ह्यांंनी Brick Moon ह्या त्यांच्या लेखात अंतराळातील स्थानकाची कल्पना मांडली त्यांनी म्हटले होते पृथ्वीच्या वर अंतराळात फिरणारे मानव निर्मित घर असेल आणी त्यात मानवी वास्तव्य असेल हे अंतराळातील घर पृथ्वीवासीयांसाठी नवी दिशा देणारे ठरेल रशियन Theoretician Konstantin Tsiolkovsky ह्यांनी देखील अशाच अंतराळातील घराची कल्पना मांडली त्यात सौर ऊर्जेचा वापर करून प्रकाश निर्माण करता येईल आणी पृथ्वी सारखे वातावरण निर्माण करून आतमध्ये भाजी आणी धान्य पिकवता येईल असा विचार त्यांनी मांडला पुढे 1928 मध्ये पहिल्यांंदा Herman Noordung ह्यांनी अंतराळातील चाकाच्या आकाराच्या कृत्रीम ग्रॅव्हिटि असलेल्या अंतराळातील घराच्या बांधणीचे डिझाईन केले त्या नंतर 1952 मध्ये Willy Ley ह्यांनी देखील अशा अंतराळातील घराची कल्पना मांडली त्या आधी 1950 मध्ये US government मध्ये अशा अंतराळातील फिरत्या घराच्या निर्मितीबाबत चर्चा झाली अखेर 1960 मध्ये नासाच्या Huston येथील J.PL संस्थेत गरजेतून ह्या अंतराळस्थानकाच्या निर्मितीचा विचार करण्यात आला आणी नासाने Space Station निर्मितीचे पेटंट मिळवत Skylab च्या निर्मितीचा शुभारंभ केला 

त्या नंतर 1998 च्या डिसेंबरमध्ये अंतराळ स्थानकाचा शुभारंभ झाला आणी त्याचा हळूहळू विस्तार होत गेला सध्या नासा संस्थेत कॅनडा,युरोप,जपान,रशिया आणी अमेरिकेचा सहभाग आहे आजवर 21 देशातील 273 अंतराळवीर स्थानकात वास्तव्य करून आले आहेत तीथे सतत शेकडो विषयांवर सायंटिफिक संशोधन सुरू असते वेगवेगळ्या देशातील अंतराळवीर वेगवेगळ्या मोहीमे अंतर्गत स्थानकात जा,ये करतात, संशोधन करतात तीथुन लाईव्ह संवाद साधतात अंतराळस्थानकाच्या कामासाठी स्पेसवॉक करतात त्यात महिला अंतराळवीरही मागे नाहीत स्थानकातील वास्तव्या दरम्यान येणारे सण साजरे करतात,पार्टी करतात

अंतराळवीर जेव्हा स्थानकात पोहोचतात तेव्हा अंतराळस्थानक पाहून अंचबीत होतात अंतराळातील झीरो ग्रॅव्हिटीतील निर्मित झालेल्या अंतराळवीरांना प्रेरित करणाऱ्या मानवाच्या ह्या असामान्य कर्तृत्वाचे,कुशलतेचे ते कौतुक करतात जेव्हा त्यांना त्यांचा अविस्मरणीय क्षण कोणता हे विचारले जाते तेव्हा अंतराळातून दिसणारे पृथ्वीचे अलौकिक सौंदर्य आणी स्थानकातील प्रवेशाचा क्षण असे ऊद्गार त्यांच्या तोंडून बाहेर पडतात ते नासा संस्था आणी स्थानक निर्माण करणाऱ्या अभियंता,ईंजीनिअर,शास्त्रज्ञ,तंत्रज्ञांचे आभार मानतात खरोखरच पृथ्वीवरून प्रुथ्वीचे अलौकिक सौंदर्य पहाता येत नाही त्यासाठी अंतराळात जावे लागते म्हणूनच तिला अलौकिक म्हटले जात

Thursday 30 November 2023

नासाच्या CHAPEA मिशन मधील धाडसी नागरिकांचे 150 दिवस पुर्ण Thanks giving day साजरा

  नासाच्या CHAPEA-1 मोहिमेतील सहभागी धाडसी नागरिक Thanks giving day निमित्त भाजीचे डेकोरेशन करुन शुभेच्छा देताना -फोटो -नासा संस्था

 नासा संस्था - 9 ऑक्टोबर  

नासाच्या  CHAPEA मोहिमे अंतर्गत पृथ्वीवरील कृत्रिम मंगळभूमीत एक वर्षाच्या वास्तव्यासाठी गेलेल्या आणी भविष्यकालीन मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांचे प्रातिनिधित्व करणाऱ्या चार धाडसी नागरिकांनी ह्या कृत्रिम मंगळ निवासातील नुकतेच 150 दिवस पूर्ण केले आहेत

 25 जूनला ह्या मोहिमेतील पहिल्या ग्रुप मधील कमांडर Kelly Haston  -(Research Scientist), Flight  Engineer- Ross Brockwell-, Medical Officer -Nanthan Jones आणी Microbiologist -Anca Selariu  हे चार धाडसी निवडक उमेदवार एक वर्षाच्या वास्तव्यासाठी ह्या पृथ्वीवरील कृत्रिम मंगळ सृष्टीत राहायला गेले होते नासाच्या CHAPEA मिशन अंतर्गत शास्त्रज्ञ निर्मित कृत्रीम मंगळभुमी मध्ये रहायला गेलेल्या पहिल्या ग्रुप मधील चार ऊमेदवारांनी ह्या भूमीतील वास्तव्याचे 150 दिवस पुर्ण केले आहेत नुकताच त्यांनी  ह्या कृत्रीम मंगळभुमीत Thanks giving day देखील साजरा केला त्या साठी सर्वांनी एकत्र जेवण केले त्यांनी तीथे ऊपलब्ध असलेल्या हिरव्या भाज्या,टोमॅटो आणी रंगीत सिमला मिरचीचा ऊपयोग करून डेकोरेशन केले आणी सर्वांना डेकोरेशन मधून Happy Thanks Giving Day निमित्त शुभेच्छा दिल्या ह्या शुभेच्छा त्यांनी सोशल मीडिया वरून शेअर केल्या आहेत

नासाच्या Crew Health & Performance Exploration Analog (CHAPEA) मोहिमे अंतर्गत नासाच्या J.PL lab मध्ये शास्त्रज्ञांनी कृत्रिम मंगळ भूमी निर्माण केली आहे नासाचे मंगळ मोहिमेतील अंतराळवीर प्रत्यक्ष मंगळावर जाण्याआधी आणि तिथे भविष्यकालीन मानवी वसाहत निर्माण करण्याआधी मंगळा सारखे वातावरण आणि भूमी असलेल्या ह्या शास्त्रज्ञ निर्मित मंगळभूमीत राहिल्यावर मानवी शरीरावर,आरोग्यावर काय परिणाम होतो हे संशोधित करण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे ह्या प्रयोगशील उपक्रमात सहभागी होऊन ह्या कृत्रिम मंगळ भूमीत एक वर्ष राहण्यासाठी धाडसी नागरिकांना नासा संस्थेने संधी उपलब्ध केली होती ह्या अभिनव उपक्रमा अंतर्गत निवड झालेल्या चार शिकाऊ अंतराळवीरांचा समावेश असलेले तीन ग्रुप तयार करण्यात आले होते

Saturday 25 November 2023

Happy Thanks Giving From Space

 Four Expedition 70 crewmates wish a Happy Thanksgiving from the International Space Station to the Earth below.

नासाच्या  अंतराळ मोहीम 70चे अंतराळवीर Andreas Mogensen ,Loral ,Jasmin आणी जपानी अंतराळवीर Satoshi अंतराळ स्थानकातून Thanks Giving Day निमित्त लाईव्ह संवाद साधून पृथ्वीवासियांना शुभेच्छा देताना -फोटो -नासा संस्था

 नासा संस्था -24 नोव्हेंबर

अमेरिकेत दरवर्षी  24 नोव्हेंबरला Thanks Giving Day उत्साहात साजरा केल्या जातो अमेरिकन नागरिक त्यांचे कुटुंबीय,नातेवाईक आणि मित्रांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करतात सर्वजण एकत्र येऊन पार्टीचे आयोजन करतात आणि वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश असलेल्या मेजवानीचा आस्वाद घेतात पृथ्वीपासून दूर अंतराळ स्थानकात तरंगत्या अवस्थेत राहणाऱ्या अंतराळवीरांना मात्र कुटुंबियांसोबत हा डे साजरा करता येत नाही पण अंतराळ स्थानकातील अंतराळवीर स्थानकातील सहकारी अंतराळवीर मित्रांसोबत हा दिवस साजरा करतात आणि पार्टी करून त्यांच्या जवळ असलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतात आणि नासा संस्थेशी लाईव्ह संपर्क साधून पृथ्वीवरील कुटुंबियांशी संवाद साधतात आणि Thanks giving Day च्या शुभेच्छा देतात

नासाच्या अंतराळ मोहीम 70 चे अंतराळवीर सध्या स्थानकात वास्तव्य करत आहेत नासाचे अंतराळवीर Jasmin Moghbeli,,Loral O'Hara,युरोपियन अंतराळवीर Andreas Mogensen आणी जपानचे अंतराळवीर Satoshi Farucawa  ह्यांनी स्थानकात Thanks giving day साजरा केला आणी नासा संस्थेशी लाईव्ह संपर्क साधत जगभरातील पृथ्वीवासियांना Thanks giving day च्या शुभेच्छा दिल्या

सुरवातीला अंतराळवीर Andreas ह्यांनी सर्वांची ओळख करून देत आम्ही चौघेजण आज ईथे स्थानकात Thanks giving day साजरा करणार असल्याचे सांगितले ते म्हणाले,आज हा दिवस आम्ही स्थानकात साजरा करत आहोत आज पृथ्वीवर सर्वजण हा दिवस त्यांच्या कुटुंबीयांसोबत मित्रांसोबत साजरा करत असतील आमच्या कुटुंबीयांना,मित्रांना तर आम्ही शुभेच्छा देणार आहोतच पण नासा संस्थेमुळे आम्ही ईथे स्थानकात पोहोचलो ईथे वास्तव्य करण्याची संधी मिळाली तसेच जगभरातील लोकांना शुभेच्छा देण्याचीही ईथुन आम्ही त्या सर्वांशी नासा संस्थेमार्फत संपर्क साधु शकत आहोत ह्या संधीचा फायदा घेत आम्ही सर्व पृथ्वीवासियांना शुभेच्छा देत आहोत        ,"Happy Thanksgiving Day "!

Jasmin Moghbeli -ह्या वर्षी आम्ही स्थानकात आहोत आणी आम्हाला खूप गोष्टींबद्दल Thanks म्हणायचे आहे सर्वात आधी ईथुन स्थानकातुन पृथ्वीच अलौकिक सौंदर्य पहाण्याची अमुल्य संधी मिळाल्या बद्दल! ह्या जगात पृथ्वी एकमेव आहे जीथे सजीव सृष्ठीआणी मानव आहे म्हणूनच तीचे संरक्षण करणे आवश्यक आहे ते ईथे आल्यावर कळते आमच्या आधी ईथे सर्व देशातील  अनेक अंतराळवीर राहून गेले आहेत त्यांनी त्यावेळी ईथे स्थानकातच Thanks giving Day  साजरा केला त्याचे आम्हाला स्मरण होत आहे त्या वेळी त्यांना तीथे पृथ्वीवर त्यांच्या कुटुंबीयांसोबत,मित्रांसोबत हा दिवस साजरा करता आला नव्हता पण आता ते त्यांच्या कुटुंबीयांसोबत हा दिवस साजरा करत असतील त्या सर्वांना आमच्या कुटुंबीयासोबत मित्रांसोबत  " Happy Thanks giving Day ! 

Loral O Hara - आज आम्ही स्थानकात Thanks giving दिवस साजरा करत आहोत आम्ही आज एकत्र डिनर करणार आहोत त्या साठी आम्ही काही पदार्थ व स्वीट आणलय आमच्याकडे Roast Turkey, Cranberry Souce,Butternut squash आहे आणी माझे फेवरीट Corn ,finish Cran Apple dessert आहे आज आम्ही ह्या सर्व पदार्थांचा एकत्र आस्वाद घेणार आहोत सर्वांना  "Happy Thanksgiving Day "!

Satoshi -आम्ही ईथे स्थानकात राहून हा दिवस साजरा करु शकतो आणी पृथ्वीवासियांसाठी ऊपयुक्त सायंटिफिक प्रयोगही करू शकतो हे सिध्द करणार आहोत भविष्य कालीन दुरवरच्या मंगळ व चंद्र मोहीमेतील  अंतराळविरांसाठी त्यांच्या तेथील त्यांच्या वास्तव्यासाठीची पुर्व तयारी आम्ही करत आहोत तुम्हा सर्वांना "Happy Thanks giving Day"!

Thursday 23 November 2023

नासाचे Curiosity मंगळयान मंगळावरील 4000 दिवसानंतरही कार्यरत

  Curiosity at 'Sequoia' in 3D: This anaglyph version of Curiosity’s panorama taken at “Sequoia” can be viewed in 3D using red-blue glasses.

 Curiosity मंगळ यानातील अत्याधुनिक यंत्रणा आणि High Resolution Mast Cam च्या साहाय्याने काढलेला फोटो (3DAnimation)-फोटो -नासा संस्था

 नासा संस्था -7 नोव्हेंबर

नासाच्या Curiosity मंगळयानाने मंगळावरील 4000 दिवस पुर्ण केले आहेत 5 ऑगस्ट 2012 मध्ये मंगळावरील Gale Crater वर पोहोचलेल्या Curiosity मंगळयानाने ह्या चार हजार दिवसात मंगळावरील अत्यंत महत्त्व पुर्ण संशोधीत सायंटिफिक माहिती गोळा करून त्याचे फोटो व व्हिडीओ पृथ्वीवर पाठवले आहेत आणी अजूनही यशस्वीपणे कार्यरत आहे मंगळावरील Gale Crater ह्या भागात चाक रोऊन मंगळयानाने संशोधनाचा शुभारंभ केला आणी यानातील अत्याधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने आसपासच्या भागात फिरून तेथील वातावरण व मंगळावरील करोडो वर्षांपुर्वीच्या सजीव सृष्ठीच्या अस्तित्वाला दुजोरा देणाऱ्या गोष्टींंचा शोध घेण्यास सुरवात केली  आणि हि मोहीम यशस्वी केली 

Curiosity मंगळ यानाने मंगळावरील प्राचीनकाळच्या अस्तित्वात असलेल्या पण आता आटलेल्या पाण्याचे स्रोत शोधले तेथील आटलेल्या नदीचे पात्र,दऱ्या,खोऱ्यातील व जमिनीवरील खडक,माती,वाळू आणी खनिजे शोधले आणि  त्याचे नमुने गोळा करून ते यानातील कंटेनरमध्ये भरण्याचे काम यशस्वीपणे पार पाडले सध्या Curiosity यान मंगळावरील Sequoia या भागात कार्यरत आहे आणी तेथील खडकांचे नमुने गोळा करत आहे Curiosity यानाने नुकताच तेथील खडकाचा 39 वा नवा नमुना कंटेनरमध्ये भरला आहे यानातील अत्याधुनिक High Resolution Mast Camera व रोबोटिक आर्मच्या सहाय्याने तेथील जमीन खोदून खडक फोडून त्याचा चुरा करून तो कंटेनरमध्ये भरला आहे आणी त्याचे रंगीत फोटो व व्हिडीओ पृथ्वीवर पाठवले आहेत

  Curiosity Views 'Sequoia' Using Its Mastcam: NASA’s Curiosity Mars rover used the drill on the end of its robotic arm to collect a sample from a rock nicknamed “Sequoia” on Oct. 17, 2023, the 3,980th Martian day, or sol, of the mission. The rover’s Mastcam captured this image.

Curiosity  मंगळ यानाने मंगळावरील Gale Crater वरील Sequoia ह्या भागातील खडकांचे नमुने घेण्यासाठी रोबोटिक आर्मच्या साहाय्याने ड्रिल केलेला भाग -फोटो -नासा संस्था (JPLLab)

ह्या नमुन्यांचे सखोल संशोधन शास्त्रज्ञ करणार आहेत मंगळावर पुरातन काळी सजीव सृष्ठीच्या अस्तित्वासाठी पोषक वातावरण होते का ? आणी असल्यास कालांतराने ते कसे नष्ट झाले हे शोधण्यासाठी Curiosity यान संशोधीत माहिती गोळा करत आहे ह्या मंगळयानाने Mount Sharp ह्या भागातील पाण्याच्या आटलेल्या नदीपात्राजवळील डोंगरकड्याच्या भागातील खडकांच्या थरातील खडकांचे नमुने गोळा केले त्यासाठी हे मंगळयान तीन मैल उंच डोंगर कड्यावर चढले आणि खाली आले

ह्या भागातील मागच्या वर्षी गोळा केलेल्या  खडकांच्या नमुन्याचे शास्त्रज्ञांनी सखोल संशोधन केले तेव्हा त्यामध्ये मिनरल्स खनिज व सल्फेट विपुल प्रमाणात सापडले आहे आणी ह्या गोष्टी सजीवांच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहेत शास्त्रज्ञांच्या मते ह्या गोष्टी सजीव सृष्ठीच्या उत्पत्तीसाठी आवश्यक आहेत आणि त्यांच्या पुरातन काळच्या  अस्तित्वाला दुजोरा देणाऱ्या आहेत त्या मुळे शास्त्रज्ञ आता मंगळावरील पुरातन काळी अस्तित्वात असलेले पाणी व सजीव सृष्ठीचे अस्तित्व कसे विकसित होत गेले आणी कसे नष्ट झाले ह्याचा शोध घेत आहेत

मंगळावरील पाण्याच्या आटलेल्या नदीपात्राजवळील भागातील  खडकांच्या नमुन्यात आढळलेल्या सल्फेट मूळे करोडो वर्षांपुर्वी मंगळावर खाऱ्या पाण्याचे अस्तित्व असावे आणी कालांतराने मंगळावरील वातावरणात झालेल्या नैसर्गिक व भुगर्भातील घडामोडींंमुळे अती पाऊस,पुर,भुकंप,ज्वालामुखीचा ऊद्रेक ह्या नैसर्गिक आपत्तीमुळे वातावरण बिघडत गेले आणी प्रचंड ऊष्णतेमुळे पाणी ऊकळुन त्याचे वाफेत रूपांतर होऊन नष्ट झाले असावे पण त्यातील काही थेंब खडकात वाळलेल्या स्वरूपात राहिले असावे असे मत शास्त्रज्ञ व्यक्त करतात आता नवीन नमुन्यांचे सखोल संशोधन केल्यानंतर त्यांच्या ह्या मताला दुजोरा मिळेल 

Curiosity यानाने मंगळावरील कमी प्रकाश अती थंडी आणी वादळा सारख्या संकटांवर मात करून हि संशोधित माहिती  गोळा केली आहे 2012 मध्ये मंगळावर झालेल्या धुलीवादळात Curiosity अडकले होते यानावर,यानातील पंख्यावर सौरपॅनलवर धुळ जमल्यामुळे काही काळ यंत्रणेवर परिणाम झाला होता यानाचा वेग मंदावला होता तेथील अंधुक प्रकाशात अत्यंत थंडीत देखील Curiosityत्या भागात  20 मैल अंतरापर्यंत चालून गेले होते त्यामुळे ते आता अधिक मजबूत झाले असे शास्त्रज्ञ म्हणतात

Friday 3 November 2023

नासाची महिला अंतराळवीर Jasmin Moghbeli आणि Loral O'Hara ह्यांचा स्थानकाच्या कामासाठी स्पेसवॉक संपन्न

 NASA astronauts Jasmin Moghbeli (top) and Loral O'Hara (bottom) team up during their first spacewalk for maintenance on the outside of the space station. Credit: NASA TV

 नासाची अंतराळवीर Jasmin Moghbeli आणि Loral O'Hara स्थानकाच्या कामासाठी स्थानकाबाहेरील भागात स्पेसवॉक करताना -फोटो -नासा संस्था

 नासा संस्था -1 नोव्हेंबर

नासाच्या अंतराळ मोहीम 70 ची महिला अंतराळवीर Jasmin Moghbeli आणी Loral O' Hara ह्या दोघींनी 1 नोव्हेंबरला स्थानकाच्या कामासाठी स्पेसवॉक केला ह्या स्पेसवॉकसाठी ह्या दोघींनी आदल्या दिवशीच तयारी करून ठेवली होती स्पेसवॉक साठी लागणारा स्पेससूट चेक करून चार्ज करून ठेवला स्पेसवॉकसाठी लागणारा टूल बॉक्स आणी त्यातील कॅमेरे आणि इतर सामान चेक केले ह्या स्पेसवॉक साठी Jasmin Moghbeli ने लाल रंगाच्या रेषा असलेला ड्रेस परिधान केला होता आणी Loral O' Hara ने परिधान केलेला स्पेससूट रेषा विरहित होता एक तारखेला बुधवारी सकाळी 8.05 मिनिटाला ह्या दोघी स्पेसवॉक साठी स्थानकाच्या Quest Airlock ह्या भागातून स्थानकाबाहेर पडल्या आणि सहा तास बेचाळीस मिनिटांनी स्पेसवॉक संपवून स्थानकात परतल्या 

  (From left) Astronauts Jasmin Moghbeli and Loral O'Hara are pictured trying on their spacesuits and testing their suits' components aboard the space station.

 अंतराळवीर Jasmin Moghbeli आणि Loral O'Hara स्पेसवॉक साठीचा स्पेससूट घालून चेक करताना -फोटो नासा संस्था

सहा तास बेचाळीस मिनिटांच्या ह्या स्पेसवॉक दरम्यान ह्या दोघीनी स्थानकाच्या पोर्ट ह्या भागातील सौर पॅनल मधील नूतनीकरणाचे काम केले ह्या भागातील सौर पॅनल वरील Solar Alpha Rotary joint असलेल्या भागातील बारा Trundle बेअरिंग्स पैकी एक बेअरिंग बदलला स्थानकाच्या पॉवर सिस्टिम मधील हा भाग सतत फिरत असतो आणि सूर्याचा मागोवा घेत सूर्यापासून मिळणारी सौर ऊर्जा मिळवून साठवून ठेवण्याचे काम करतो ह्या ऊर्जेचा उपयोग स्थानकासाठी वीज निर्मिती आणि सिस्टिम्स साठी होतो स्थानकाला लागणारा प्रकाश आणि स्थानकातील सायंटिफिक प्रयोग व इतर कामासाठी ह्या सौर ऊर्जेचा वापर होतो हा बेअरिंग बदलल्यामुळे आता Solar Array व्यवस्थित काम करीत असून स्थानकातील ऊर्जा निर्मितीची क्षमता वाढली आहे 

ह्या स्पेसवॉक मध्ये ह्या दोघीनी पुढच्या स्पेसवॉकची तयारी देखील करून ठेवली त्यांनी ह्या भागातील Handling bar fixture काढून ठेवला पुढील स्पेसवॉक मध्ये Solar Array वर केबल फिक्स करण्यासाठी व बाहेरील भागातील कॅमेऱ्यांसाठी ह्या कामाचा उपयोग होईल ह्या स्पेसवॉक मध्ये Radio Frequency Group हा Communication electronics box काढून ठेवायचा होता पण वेळ अपुरा पडल्यामुळे आणि स्पेसवॉक दरम्यान एक टूल बॉक्स हरवल्या मुळे हे काम लांबले नासा संस्थेतील प्रमुखांनी स्थानकाच्या बाहेरील कॅमेऱ्याच्या साहाय्याने टूल बॉक्स शोधला पण तिथे जाऊन टूल बॉक्स परत आणणे वेळेत शक्य नसल्यामुळे हे काम पूर्ण झाले नाही 

अंतराळवीर Jasmin Moghbeli आणि अंतराळवीर Loral O' Hara ह्यांचा हा पहिलाच स्पेसवॉक होता आणि फक्त महिलांनी केलेला चवथा स्पेसवॉक होता स्थानकाच्या कामासाठी केलेला हा ह्या वर्षातला बारावा स्पेसवॉक होता

Saturday 28 October 2023

नासाच्या Graphic Novel मधील नायिका अंतराळवीर आणी कमांडर Callie Rodriguez च्या चांद्रमोहिमेची सुरवात

                  नासाच्या First Woman -Expanding Our Universe Graphic Novel मधील नायिका कमांडर Callie Rodringuez ,रोबो RT आणी अंतराळवीर Meshaya Billy सह चांद्रभूमीवर पोहोचल्यावर -फोटो नासा संस्था

नासा संस्था-26 आक्टोबर

नासाची आर्टिमस मोहीम अंतिम टप्यात पोहोचली आहे नासाच्या आर्टिमस मोहिमेतील महिला अंतराळवीर चंद्रभुमीवर पहिले पाऊल ठेवणार आहे पण त्या आधीच नासाच्या First Woman Graphic Novel सिरीज मधील नायिका अंतराळवीर आणी कमांडर Callie Rodriguez हिने Novel सिरीज मधील चांद्रमोहिमेत चंद्रावर पोहोचुन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे 

नासाच्या First Woman Expanding Our Universe Novel सिरीज ईंग्लिश आणी Spanish भाषेत डीजीटली प्रसिद्ध होत आहेत त्याच अंकाच्या दुसऱ्या भागातील अंतराळवीर नायिका कमांडर Callie Rodriguez आणी तिचे सहकारी अंतराळवीर चंद्रावर पोहोचले आहेत आणी खाली चंद्रभुमीवर ऊतरून त्यांनी मोहिमेची सुरुवात देखील केली आहे

Novel सिरीज मधील चांद्र मोहिमेत कथेची नायिका Callie Rodriguez अंतराळवीर आहे आणी ती ह्या मोहिमेची कमांडर आहे तिच्या सोबत अंतराळवीर Meshaya Billy आणि तिचा रोबो RT आहे रोबोचे नाव तिच्या वडिलांची आठवण म्हणून आणि आर्टीमस मोहिमेचा सन्मान म्हणून तिने RT ठेवले आहे ती लहानपणापासूनच धाडसी आणि महत्वाकांक्षी आहे आणि तिचे ध्येय अंतराळवीर होऊन चंद्रावर जाण्याचे आहे त्या साठी ती कठीण परिस्थितीशी सामना करत तिचे ध्येय साध्य करते आणी चंद्रावर पोहोचते  विशेष म्हणजे ती भारतीय मूळ वंशाची आहे चांद्रभूमीवर पोहोचल्यावर तिघे चांद्रभूमीवरील वेगवेगळ्या भागात गेले आहेत आणी चंद्राविषयी मानवाला आजवर अज्ञात असलेल्या गोष्टीचा शोध घेत आहेत हे तिघे तेथील संशोधीत माहिती गोळा करून तिथे सायंटिफिक प्रयोग करणार आहेत हे अंतराळवीर चंद्रावरील मानवासाठी ऊपयुक्त पोषक वातावरणाचा शोध देखील घेणार आहेत तसेच भुगर्भातील आणी भुमीवरील माहितीचा शोध घेत पुढे,पुढे मार्गक्रमण करत आहेत 

ह्या Novel सिरीजच्या माध्यमातून नासा संस्था आर्टिमस मोहिमेतील युवा पिढीला संशोधन करण्यासाठी प्रेरित करत आहे शिवाय भविष्यकालीन आर्टिमस मोहीमेतील अंतराळवीर जेव्हा प्रत्यक्षात चंद्रावर पोहोचतील तेव्हा त्यांना देखील हि माहिती ऊपयोगी पडेल असे नासाचे Administrator Bill Nelson म्हणतात ",नासा नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सर्वांना अर्टीमस मोहिमेत सहभागी होण्याची संधी देते नासाचे अंतराळवीर नवनवीन मोहिमेद्वारे अंतराळविश्वातील मर्यादा ओलांडून प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण करत मानवाला अज्ञात असलेल्या गोष्ठीचा शोध घेत असतात नासा संस्था आर्टिमस मोहिमेतील महिला अंतराळविराला चंद्रभुमीवर पहिले पाऊल ठेवण्याचा मान देत आहे कारण आजवर नासाच्या अंतराळविश्वातील अंतराळमोहिमेत अनेक कर्तृत्ववान महिलांनी सहभाग नोंदवला आहे आणी कठीण परिस्थितीचा सामना करत संकटावर मात करून नासाची अंतराळ मोहीम यशस्वी करण्यास हातभार लावला आहे त्या सर्वांचे प्रातिनिधित्व करण्यासाठी हा सन्मान नासा संस्था करत आहे नासा संस्थेच्या ह्या मोहिमांचा उपयोग भविष्यकालीन भावी शास्त्रज्ञांना संशोधनासाठी होईल आम्ही नेहमीच आर्टीमस पिढीतील युवा संशोधकांना प्राधान्य देतो कथेतील नायिका अंतराळवीर Callie चांद्रमोहिमेत चंद्रावर पोहचली आहे आणि तिथे तिचे संशोधनही सुरु झाले आहे हि कथा आपल्याला आजवर कोणीही न केलेल काम करण्यासाठी प्रेरित करते आणि ह्या जगात अशक्य काही नाही फक्त इच्छा आणि ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करताना संकटावर मात करून यश प्राप्त करण्याची  जिद्द हवी हे सूचित करते आणि आता नासाच्या आर्टीमस मोहिमेतील पहिली महिला अंतराळवीर जेव्हा चांद्रभूमीवर पहिले पाऊल ठेवेल तेव्हा ती जगभरासाठी प्रेरणादायी ठरेल !"

जेव्हा वाचक शेवटचे Callie ला भेटले तेव्हा ती आणि तिचा रोबो RT चंद्रावरील lava बोगद्यात आश्रय घेत होते आता पुढे काय होणार? हे जाणून घेण्याची उत्सुकता वाचकांना आहे First Woman Dream To Reality Novel सिरीजच्या दुसऱ्या भागाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे  देशविदेशात Novel सीरिजच्या जवळपास 100,000 प्रती वितरित झाल्या आहेत आणि डिजिटली 300,000 दर्शकांची पसंती मिळाली आहे

Sunday 22 October 2023

नासाच्या Ingenuity मार्स हेलिकॉप्टरचे मंगळावरील आकाशात 62 वे यशस्वी ऊड्डाण

 https://mars.nasa.gov/mars2020-raw-images/pub/ods/surface/sol/00933/ids/edr/browse/heli/HNM_0933_0749765652_259ECM_N0610001HELI03940_0000LUJ01_1200.jpg

        Ingenuity मार्स हेलिकॉप्टर मंगळावरील आकाशात 62 वे उड्डाण करताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -(JP.L Lab)- 13 ऑक्टोबर 

नासाच्या Perseverance मंगळयानासोबत मंगळ ग्रहावर पोहोचलेल्या Ingenuity mars हेलिकॉप्टरने मंगळावरील आकाशात 62 वी यशस्वी भरारी मारली आहे 

12 आक्टोबरला मंगळावरील आकाशात 18 मीटर उंचीवरून ऊड्डाण करताना Ingenuity हेलिकॉप्टरचा वेग  10m/s होता आणी Ingenuity समांतर रेषेत उड्डाण करत होते Ingenuity हेलिकॉप्टरने केवळ 119.30 सेकांदात 268 मिटर अंतर पार केले  Ingenuity हेलिकॉप्टर उड्डाणासाठी ऊत्तर दिशेला आकाशात झेपावले आणी उड्डाण पुर्ण करून Ingenuity हेलिकॉप्टर मंगळ भूमीवरील पूर्वेला असलेल्या Airfield ह्या भागात खाली ऊतरले

शास्त्रज्ञांनी मंगळावरील आकाशात फक्त पाच ऊड्डाणासाठी Ingenuity मार्स हेलिकॉप्टरचे डिझाईन केले होते पण शास्त्रज्ञांचा अंदाज फोल ठरवत Ingenuity हेलिकॉप्टर सतत स्वयंचलित यंत्रणेने कार्यरत राहून मंगळावरील आकाशात यशस्वी भरारी मारत आहे आणी Ingenuityच्या यशस्वी ऊड्डाणामुळे शास्त्रज्ञ चकीत होत आहेत हे ऊड्डाण करतानाच Ingenuity हेलिकॉप्टरला बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक कॅमेऱ्याच्या सहाय्याने त्या भागातील फोटो,संशोधीत माहिती आणी व्हिडीओ काढुन Perseverance यानाला आणि पृथ्वीवरील शास्त्रज्ञांना मंगळावरील संशोधनात मदत करत आहे

10 एप्रिल 2021 पासून मंगळावरील आकाशात Ingenuity एकामागून एक ऊड्डाणे यशस्वी करत असुन शास्त्रज्ञ Ingenuity हेलिकॉप्टरची कार्यक्षमता पाहून प्रेरित होत आहेत आणी आता Ingenuity च्या 63 व्या ऊड्डाणाची तयारी करीत आहेत

Saturday 21 October 2023

Bennu ह्या बटुग्रहावरील नमुन्यात कार्बन आणी पाण्याचे अस्तित्व

 

 

 

  Bennu ह्या बटू ग्रहावरील गोळा केलेल्या नमुन्यांच्या कुपी असलेले OSIRIS यानातील OSIRIS-REx sample Collector-फोटो -नासा संस्था

 

नासा संस्था - 11ऑक्टोबर

करोडो वर्षांपूर्वी  सौरमंडळाच्या निर्मितीच्या वेळी ब्रह्मांडातील घडामोडी दरम्यान निर्माण झालेल्या आणि अंतराळात फिरणाऱ्या अनेक उल्कापिंडापैकी एक Bennu ह्या बटू ग्रह आहे आणी हा बटु ग्रह कार्बन समृद्ध आहे म्हणुन OSIRIS- REx मोहिमेद्वारे ह्या ग्रहावरील खडक मातीचे नमुने गोळा केल्या जात आहेत सप्टेंबरमध्ये OSIRIS अंतराळयानाने बटुग्रहावरील भुमीतील गोळा केलेल्या खडक,मातीच्या नमुन्यांच्या कुपी पृथ्वीवर पोहोचविल्या होत्या आता नासाच्या JP.L lab मधील शास्त्रज्ञांनी ह्या नमुन्यांचे प्राथमिक संशोधन केले असून  शास्त्रज्ञांच्या अपेक्षे प्रमाणे त्या मध्ये विपुल प्रमाणात कार्बन आणी पाण्याचे अस्तित्व आधळले आहे 

नासाच्या Johnson Space Center मधील शास्त्रज्ञांच्या टिम प्रमुखांनी हे नमुने बुधवारी प्रथमच ऊघडले हे नमुने सप्टेंबर महिन्यात पृथ्वीवर पोहोचले होते नासाच्या OSIRIS-REx मोहिमे अंतर्गत हे नमुने गोळा केल्या जात आहेत प्राथमिक संशोधनानंतर शास्त्रज्ञांना ह्या नमुन्यामध्ये विपुल प्रमाणात कार्बन आणी पाण्याचे अस्तित्व आधळले आहे  ह्या दोन्ही गोष्टी सजीव सृष्ठिच्या निर्मितीसाठी आवश्यक आहेत ह्या नमुन्यांचे सखोल संशोधन केल्यावर आपल्याला पृथ्वी आणी पृथ्वीवरील सजीव सृष्ठिच्या ऊत्पतीचे गुढ ऊकलेल असे नासाचे Administrator Bill Nelson म्हणतात अनादी काळापासून शास्त्रज्ञांना आणी मानवाला आपण कोण आहोत कुठुन आलो हि सजीव सृष्ठी कशी निर्माण झाली हे जाणून घेण्याची ऊत्सुकता आहे शास्त्रज्ञ त्यासाठी सतत प्रयत्न करत असतात नासाच्या OSIRIS अंतराळ यानाने प्रथमच Bennu ह्या परग्रहावरील नमुने सुरक्षित पणे पृथ्वीवर पोहोचवले आहेत ह्या पहिल्याच मोहिमेच्या यशाने शास्त्रज्ञांना पृथ्वी आणी सजीव सृष्ठीच्या निर्मितीचे गुढ ऊकलण्यास मदत होईल शीवाय भविष्यकालीन युवा संशोधकांना हि मोहीम संशोधनासाठी प्रेरणादायी ठरेल 

अंतराळात फिरणाऱ्या ह्या बटू ग्रहांबद्दल ह्या मोहिमेद्वारे माहिती गोळा केली जात आहे असे ग्रह भविष्यात नष्ट होताना पृथ्वीवर आदळल्यास पृथ्वीला त्या पासून धोका होऊ शकतो त्या मुळे हे ग्रह घातक आहेत का ? ह्या विषयी संशोधन केल्या जात आहे 

Bennu ग्रहावरील भुमीवरुन दगड मातीचे नमुने गोळा केल्यानंतर तेथील पहाड,दऱ्या,खोऱ्यातील माती,धुळ आणी खडकांचे नमुने गोळा करून त्यातील,केमिकल्स मिनरल्स,धातू ,पाण्याचे अस्तित्व ह्या बाबींचा शोध घेतला जाणार असून हे काम येत्या दहा वर्षात केले जाणार आहे त्यामुळे आपले सौरमंडल,सौरमालेतील ग्रह,ऊपग्रह,ताऱ्यांची निर्मिती कशी झाली आणी Bennu ची निर्मिती पृथ्वी बरोबरच झालेली असताना फक्त पृथ्वीवरच सजीव सृष्ठी कशी निर्माण झाली ह्याचे गुढ ऊकलण्याचा प्रयत्न केला जाईल

Tuesday 10 October 2023

नासाच्या CHAPEA मोहिमेतील धाडसी नागरिकांच्या पृथ्वीवरील कृत्रिम मंगळनिवासातील शंभर दिवस पूर्ण

 chapea

            नासाच्या CHAPEA-1 मोहिमेतील सहभागी धाडसी नागरिक -फोटो -नासा संस्था

 नासा संस्था - 9 ऑक्टोबर  

नासाच्या  CHAPEA मोहिमे अंतर्गत पृथ्वीवरील कृत्रिम मंगळभूमीत एक वर्षाच्या वास्तव्यासाठी गेलेल्या आणी भविष्यकालीन मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चार धाडसी नागरिकांनी ह्या कृत्रिम मंगळ निवासातील नुकतेच शंभर दिवस पूर्ण केले आहेत

नासाच्या Crew Health & Performance Exploration Analog (CHAPEA) मोहिमे अंतर्गत नासाच्या J.PL lab मध्ये शास्त्रज्ञांनी कृत्रिम मंगळ भूमी निर्माण केली आहे नासाचे मंगळ मोहिमेतील अंतराळवीर प्रत्यक्ष मंगळावर जाण्याआधी आणि तिथे भविष्यकालीन मानवी वसाहत निर्माण करण्याआधी मंगळा सारखे वातावरण आणि भूमी असलेल्या ह्या शास्त्रज्ञ निर्मित मंगळभूमीत राहिल्यावर मानवी शरीरावर,आरोग्यावर काय परिणाम होतो हे संशोधित करण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे ह्या प्रयोगशील उपक्रमात सहभागी होऊन ह्या कृत्रिम मंगळ भूमीत एक वर्ष राहण्यासाठी धाडसी नागरिकांना नासा संस्थेने संधी उपलब्ध केली होती ह्या अभिनव उपक्रमा अंतर्गत निवड झालेल्या चार शिकाऊ अंतराळवीरांचा समावेश असलेले तीन गृप तयार करण्यात आले होते  

25 जूनला ह्या मोहिमेतील पहिल्या गृप मधील कमांडर Kelly Haston  -(Research Scientist), Flight  Engineer- Ross Brockwell-, Medical Officer -Nanthan Jones आणी Microbiologist -Anca Selariu  हे चार धाडसी निवडक उमेदवार एक वर्षाच्या वास्तव्यासाठी ह्या पृथ्वीवरील कृत्रिम मंगळ सृष्टीत राहायला गेले होते नासा संस्थेतील ह्या मोहिमेतील प्रमुख Grace Douglas, Director-Vanessa Weik ,Judy Hayes (Human health & Performance Director ) ह्यांच्या उपस्थितीत ह्या चार उमेदवारांना ह्या Mars Habitat मध्ये एक वर्षासाठी बंदिस्त करण्यात आले होते 

Nathan Jones, CHAPEA mission 1 medical officer, gives Anca Selariu, CHAPEA mission 1 science officer, the first haircut inside the simulated Mars habitat.

Mars Dune Alpha मधील वास्तव्या दरम्यान Nathan Jones ह्यांनी Anca Selariu ह्यांचा पहिल्यांदा हेअरकट केला तो क्षण -फोटो -नासा संस्था

भविष्यकालीन मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांच्या मंगळभुमीवरील वास्तव्यासाठी हा मोहीमपुर्व अभिनव प्रयोग राबविण्यात येत आहे त्यामुळे ह्या  धाडसी नागरिकांना नासाच्या JPL Lab मधील शास्त्रज्ञ निर्मित कृत्रीम मंगळभुमीवरील मंगळ निवासात बंदिस्त करण्यात आले आहे मंगळ मोहिमेतील अंतराळवीर जेव्हा मंगळावर जातील तेव्हा त्यांना पृथ्वीपासून आणी त्यांच्या  कुटुंबियांपासून दुर रहावे लागेल म्हणून ह्या अंतराळवीरांचे प्राथिनिधित्व करणाऱ्या धाडसी नागरिकांना देखील पृथ्वीवरील लोकांपासून त्यांच्या कुटुंबीयांपासुन दुर ठेवण्यात आले आहे फक्त नासा संस्थेतील ह्या मोहिमेतील प्रमुख त्यांच्या संपर्कात आहेत 

JPL Lab मधील ह्या कृत्रीम मंगळवासातील शंभर दिवसांच्या वास्तव्यादरम्यान त्यांना आलेल्या शारीरिक,मानसिक समस्या,त्यावर मात करून त्यांनी केलेले संशोधन,रोबोटिक Operations, Personal Hygiene,Space Walk,आणी त्यांनी केलेली रोपांची लागवड ह्या विषयीची संशोधीत माहिती त्यांनी नासा संस्थेला दिली आहे ह्या चार धाडसी नागरिकांनी 378 दिवसापैकी व्यतीत केलेल्या त्यांच्या ह्या शंभर दिवसातील अनुभवलेले क्षण त्यांनी नुकतेच नासा संस्थेला फोटो आणी व्हिडीओ द्वारे पाठवले आहे

 Nathan Jones participates in a simulated “Marswalk” inside the 1,200 square foot sandbox, which is connected to the habitat through an airlock.

 Nathan Jones ह्यांनी  Mars Dune Alpha (J P L Lab)मधील Sand Box वर Mars Space Walk केला तो क्षण -फोटो -नासा संस्था 

ह्या शंभर दिवसात Anca Selariu ह्यांचा Nathan Jones ह्यांनी पहिला हेअरकट केला तो क्षण,Nathan Jones ह्यांनी कृत्रीम मंगळ भुमीवरील Sand box वर केलेल्या  Mars Space Walk चे फोटो, Ross Brockwelk आणी Anca Selaria ह्यांनी केलेल्या Geology Work वरील संशोधन करतानाचे फोटो शेअर केले आहेत

 CHAPEA crew members Ross Brockwell and Anca Selariu complete geology work using the glovebox inside the habitat.

  Mars Dune Alpha मध्ये Anca Selariu आणि Ross Brokwell  Geology work करताना -फोटो -नासा संस्था 

ह्या मोहिमेतील ऊमेदवार Johnson Space Center मधील 1,700 sq.foot जागेत तयार केलेल्या Mars Dune Alpha ह्या 3D printing चा वापर केलेल्या खोलीत वर्षभर राहणार आहेत ह्या चौघांसाठी सेपरेट रूम असून त्यात त्यांच्या संशोधनाचे साहित्य,मेडिकलचे साहित्य,रोबोटिक उपकरण,व्यायामासाठी,झोपण्यासाठी आणि इतर आवश्यक गोष्ठीसाठीची सोय करण्यात आली आहे ह्या एक वर्षाच्या निवासा दरम्यान ऊमेदवारांना मानसिक आणी शारिरीक दृष्ठ्या काय समस्या ऊद्भवतात त्यांच्या आरोग्यात काय बदल होतात मानवी शरीर मंगळासारख्या वातावरणाला कसे सामोरे जाते ह्याचे निरीक्षण नोंदवण्यात येत आहे आणी त्या समस्या निवारण्यासाठी ऊपाय शोधले जात आहेत त्या साठी नवीन Technology शोधण्यात येणार आहे ह्या मोहिमेचा ऊपयोग भविष्यातील मंगळ मोहिमेतील अंतराळविरांना होणार आहे  

 हे धाडसी उमेदवार अंतराळवीर नसल्यामुळे ह्या निवासा दरम्यान त्यांना मंगळग्रहावरील वातावरणात रहाण्यासाठी आवश्यक ट्रेनिंग देण्यात आले होते त्यांना अंतराळवीरांसारखे झिरो ग्रॅव्हीटीत राहण्याचे आणी तेथील निवासा दरम्यान कराव्या लागणाऱ्या Space Walk,Robotic operations,Habitat Maintenance,personal hygiene ह्या गोष्टींचेही  ट्रेनिंग देण्यात आले त्या मुळे ह्या शास्त्रज्ञ निर्मित मंगळभूमीच्या बाहेरील भागात हे उमेदवार संशोधना बरोबरच अंतराळवीरांसारखा Space Walkही करणार आहेत त्या साठी त्यांना स्पेस सूटही देण्यात आले आहेत शिवाय ह्या मंगळभूमीत ते धान्य,भाजी,फळे वै रोपांची लागवडही करीत आहेत त्या साठी ह्या भूमीत खास मंगळावरील लाल माती,वाळू,मिनरल्सचा वापर करण्यात आला आहे 

मंगळ ग्रह पृथ्वीपासुन दुर असल्यामुळे अंतराळविरांना तेथून पृथ्वीवर संपर्क साधताना अडचण आली किंवा काही समस्या उद्भवल्यास त्यांना त्वरीत मदत पाठवता येणार नाही त्यामुळे अशा आपद्कालीन समस्येवर  मात करण्याचे ट्रेनिंगही त्यांना देण्यात आले आहे शीवाय तेथील वातावरणातील बदलामुळे येणारा मानसिक ताण किंवा ऊपकरणात अचानक काही कठीण समस्या निर्माण झाली तर आपद्कालीन संकटांशी सामना करण्यासाठी प्रशिक्षीत करण्यात आले असून हे सर्व उमेदवार नासा संस्थेच्या संपर्कात आहेत नासाच्या Artemis मोहिमेअंतर्गत मानव चंद्रावर जाणार आहे त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे आगामी काळातील भविष्यकालीन मंगळ मोहीम आणि दूरवरच्या अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांसाठी आणि मानवी निवासासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे

Saturday 30 September 2023

नासाचे रेकॉर्ड ब्रेकर अंतराळवीर Frank Rubio रशियन अंतराळवीर Sergey Prokopyev आणी Dimitri Petelin पृथ्वीवर परतले

Expedition 69 NASA astronaut Frank Rubio is helped out of the Soyuz MS-23 spacecraft just minutes after he Roscosmos cosmonauts Sergey Prokopyev and Dmitri Petelin, landed in a remote area near the town of Zhezkazgan, Kazakhstan.

नासाचे अंतराळवीर Frank Rubio कझाकस्थानातील Zhezkazgan येथील भूमीवर परतल्यानंतर - फोटो नासा संस्था

 

नासा संस्था -27 सप्टेंबर 

नासाचे अंतराळवीर Frank Rubio आणी रशियन अंतराळवीर Sergey Prokopyev आणी Dimitri Petelin स्थानकात वर्षभरापेक्षाही जास्त काळ वास्तव्य करून पृथ्वीवर परतले आहेत हे अंतराळवीर सोयुझ MS-23 ह्या अंतराळयानातुन बुधवारी 3.54a.m.ला पृथ्वीवर येण्यासाठी निघाले आणी 7.17a.m.ला पृथ्वीवर पोहोचले कझाकस्थानातील Zhezkazgan येथे त्यांचे सोयुझ यान पोहोचले तेव्हा हे तिघेही पॅराशुटच्या सहाय्याने खाली ऊतरले नासाच्या अंतराळ मोहीम 68-69 अंतर्गत 21 सप्टेंबर 2022 मध्ये सोयुझ MS-22 ह्या अंतराळ यानातुन हे अंतराळवीर स्थानकात सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी गेले होते पण त्यांच्या यानात ऐनवेळी बिघाड झाल्याने त्यांचा स्थानकातील मुक्काम वाढला त्यानंतर सोयुझ MS-22 यान पृथ्वीवर रिकामेच परतले होते ह्या अंतराळवीरांना आणण्यासाठी सोयुझ MS-23 हे अंतराळयान फेब्रुवारी 2023 मध्ये स्थानकात पाठविण्यात आले 

पण ह्या अंतराळवीरांनी ह्या संधीचा ऊपयोग करत स्थानकात सलग जास्त दिवस रहाण्याचा विक्रम केला नासाचे अंतराळवीर Frank Rubio ह्यांनी स्थानकातील पहिल्याच अंतराळवारीत सलग 371 दिवस वास्तव्य करून विक्रम नोंदवला ह्या आधी नासाच्या Mark Vande Hai ह्यांनी स्थानकात सलग 355 दिवस वास्तव्य करून विक्रम नोंदविला होता रशियन अंतराळवीर Sergey आणी Dimitri ह्यांनी देखील स्थानकात 370 दिवस 21तास आणी 22 मिनिटे वास्तव्य केले हे तिघेही प्रथमच स्थानकात रहायला गेले होते 

स्थानकातील वास्तव्या दरम्यान ह्या तिघांनी स्थानकातील संशोधनात सहभाग नोंदवला अंतराळवीर Frank Rubio ह्यांनी स्थानकात जास्त दिवस राहिल्यास मानवी आरोग्यावर काय परिणाम होतात तेथील झीरो ग्रव्हिटितील वातावरणाला शरीर कसा प्रतिसाद देते ह्या विषयीच्या मानवी संशोधनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि वास्तव्या दरम्यान त्यांच्या शारीरिक बदलांचे नमुने घेतले ह्या मानवी संशोधनाचा उपयोग भविष्यकालीन आर्टेमिस मोहिमेतील अंतराळवीरांना आणि मंगळ मोहिमेतील दूरवरच्या मोहमेतील अंतराळवीरांच्या निवासासाठी होणार आहे शीवाय त्यांनी स्थानकात सुरु असलेल्या सायंटिफिक प्रयोगात सहभाग नोंदवला त्यांनी स्थानकातील व्हेजी प्रोजेक्ट अंतर्गत सुरु असलेल्या Plant Research आणी Physical Science Studies मध्ये सखोल संशोधन केले 

स्थानकातून निघण्याआधी स्थानकात ह्या अंतराळवीरांचा Farewell ceremony आणि Change Of Command Ceremony पार पडला ह्या वेळी नासा संस्थेने लाईव्ह संपर्क साधून ह्या अंतराळवीरांशी संवाद साधला अंतराळवीर Sergey Prokopyev ह्यांनी कमांडरपदाची सूत्रे अंतराळवीर Andreas Mogensen ह्यांच्याकडे सोपवली त्यांनी नासा संस्था आणि अंतराळवीरांचे आभार मानले भविष्यात संधी मिळाली तर मला इथे पुन्हा यायला आवडेल तुम्हा सर्वांसोबत काम करताना राहताना मजा आली तो काळ ग्रेट होता त्या बद्दल नासा संस्थेचे आभार त्यांच्या मुळेच हि संधी मिळाली त्यांनी वेळोवेळी कठीण प्रसंगी आम्हाला मार्गदर्शन केले 

Andreas Mogensen ह्यांनी मोहीम 70 चे कमांडर पद स्वीकारत अंतराळवीर Sergey ह्यांचे आभार मानले "तुमच्याकडून कमांडरपद घेताना स्थानकाची जबाबदारी स्वीकारणे हा माझा बहुमान आहे मला अभिमान वाटतोय तुम्ही तिघांनी खूप काळ इथे व्यतीत केला आहे त्या काळात ओढवलेल्या कठीन प्रसंगावर मात करून शांततेने धीराने परिस्थीती हाताळलीत तुमच धैर्य आणी Professionalism आम्हाला मार्गदर्शक ठरेल तुम्ही खूप ग्रेसफुली हि परस्थिती हाताळली तुम्ही सहा महिन्यांनी परतणार म्हणून तुमचे कुटुंबीय आनंदात असताना अचानक तुमचा मुक्काम आणखी सहा महिने वाढल्याचे कळताच त्यांची मनःस्थिती कशी झाली असेल ह्याची कल्पना येते पण त्यांनी देखील संयमाने हि परिस्थिती हाताळली तुमचे हे कौश्यल्य वाखाणण्याजोगे आहे त्याही परिस्थितीत तुम्ही स्थानकाची जबाबदारी उत्तम पार पाडली ह्या दरम्यान स्थानकात आलेल्या 15 अंतराळयान त्यातुन आलेले अंतराळवीर आणि कार्गोशिपचे स्वागत केले त्यांच्या पृथ्वीवर परतण्यासाठी मदत केलीत अंतराळवीर Dimitri आणि Sergey ह्यांनी सहावेळा तर Frank ह्यांनी तीनवेळा स्पेसवॉक केले तुमच्या वास्तव्या दरम्यान 28 अंतराळवीरांसोबत राहून एकत्र संशोधन केले तुमची कामाप्रती निष्ठा आणि कठीण प्रसंगातील हार्डवर्क आम्हाला प्रेरणादायी ठरेल इथल्या झिरो ग्रॅव्हीटीत तरंगत्या अवस्थेत एक वर्ष राहताना अंतराळवीरांची संख्या वाढल्यानंतरही संयमाने संशोधन करण्याची वृत्ती निश्चितच गौरवास्पद आहे मला आशा आहे तुम्ही जसे इथे आलात तशाच चांगल्या कंडीशन मध्ये परतत आहात तुमच्या स्मूथ आणि सुरक्षित लँडिंग साठी शुभेच्छा !"

त्या नंतर हे अंतराळवीर पृथ्वीवर येण्यासाठी निघाले पृथ्वीवर परतल्यानंतर ह्या तीनही अंतराळवीरांना नासाच्या रिकव्हरी टीमने यानातून बाहेर काढले आणि त्यांना प्राथमिक चेकअप साठी नेण्यात आले काही वेळाने अंतराळवीर Frank Rubio ह्यांना नासाच्या विमानाने Huston येथे पोहोचविण्यात आले आणि रशियन अंतराळवीरांना कझाकस्थानातील Karaganda येथे पोहोचविण्यात आले

Friday 29 September 2023

OSIRIS-REX अंतराळयानाने Bennu बटु ग्रहावरुन आणलेल्या नमुन्यांच्या कुपी पृथ्वीवर पोहोचल्या

 A desert landscape, sandy with tufts of green shrubs, is pictured here. In the middle of the image is a dark, cone-shaped object. To its left is an orange and white clump of fabric.

 OSIRIS-REX अंतराळ यानातून Bennu ह्या बटू ग्रहावरील गोळा केलेल्या नमुन्यांच्या कुपी पृथ्वीवर पोहोचल्यानंतर -फोटो नासा संस्था

नासा संस्था -25 सप्टेंबर 

नासाच्या OSIRIS -REX अंतराळयानाने Bennu ह्या बटु ग्रहावरुन गोळा केलेल्या दगड मातीच्या नमुन्यांंच्या कुपी सुरक्षितपणे पृथ्वीवर ऊतरवल्या आहेत रविवारी सकाळी 8 .52 मिनिटांनी Salt Lake City येथील Defense Training Range Utah येथील वाळवंटी प्रदेशात ह्या कुपी पोहोचल्या  OSIRIS अंतराळयानाने प्रुथ्वीच्या कक्षेत प्रवेश करून पँराश्युटच्या सहाय्याने त्या खाली ऊतरवल्या                       

हे नमुने 24 सप्टेंबरला पृथ्वीवर पोहोचल्यावर दीड तासाने नासाच्या OSIRIS मोहमेतील टिमने हे नमुने हॅन्गरच्या सहाय्याने ऊचलुन तात्पुरते ट्रेनिंग रेंजमध्ये नेले तेथील लॅब मधील Clean room मध्ये ह्या कुपींच्या कंटेनरवर सतत नायट्रोजनचा फवारा मारण्यात आला नायट्रोजनच्या फवारा मारल्याने ह्या कुपीतील नमुन्यांवर वातावरणातील ईतर वायू व रोगजंतूंचा संसर्ग न होता त्या मुळ स्वरुपात रहाण्यास मदत होते त्या नंतर ह्या नमुन्यांच्या कुपी 25 सप्टेंबरला नासाच्या Aircraft मधून Johnson Space Center Huston मध्ये पोहोचविण्यात आल्या आणी त्यानंतरच ह्या नमुन्यांच्या कुपी बाहेर काढण्यात आल्या 

 

Department of Defense Utah Test and Training Range मधील Clean room मध्ये नमुन्यांच्या कुपी हाताळताना नासाचे शास्त्रज्ञ -  फोटो- नासा संस्था

 Bennu ह्या बटुग्रहाचा शोध 1999 मध्ये अपोलो मोहिमेतील अंतराळवीरांनी Linear project दरम्यान लावला Bennu हा अंतराळात तरंगणाऱ्या सौरमालेतील ऊल्कापिंडा पैकी एक बटुग्रह आहे सौरमालेतील ग्रहांच्या निर्मितीच्या वेळी 4.5 मिलीयन वर्षांपूर्वी ब्रम्हांंडातील घडामोडी दरम्यान ह्या ग्रहाची निर्मिती झाली असल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे Bennu हा ग्रह अंतराळातील निखळलेल्या ग्रहांच्या दगड व मातीने बनलेला आहे हा ग्रह कार्बन समृध्द आहे आणी तेथील माती सृष्ठीच्या उत्पत्तीसाठी आवश्यक घटकांनी युक्त आहे  अशी माहिती शास्त्रज्ञांना संशोधनाअंती मिळाली होती Bennu ची निर्मिती देखील सौरमालेतील ग्रहांसोबतच झाली असली तरी पृथ्वीवर सजीव सृष्टी निर्माण झाली पण Bennu वर नाही म्हणून ह्या दगड मातीचे सखोल संशोधन केल्यास पृथ्वीच्या निर्मितीच्या वेळची आधीची परीस्थिती कशी होती सृष्ठिची निर्मिती कशी झाली तसेच सजीवांच्या जीवनासाठी आवश्यक वातावरण आणी पाण्याच्या निर्मितीचे गुढ ऊलगडण्यास मदत होईल असे शास्त्रज्ञांना वाटते त्यासाठी OSIRIS-REX  मोहीम राबविण्यात आली

8 सप्टेंबर 2016 ला OSIRIS-REX हे अंतराळयान Bennu ग्रहाच्या दिशेने अंतराळ प्रवासास निघाले आणी 3डिसेंबर 2018 मध्ये Bennu जवळ पोहोचले 20 आक्टोबर 2020-21 मध्ये OSIRIS अंतराळयानाने अंतराळयानाला बसविलेल्या स्वयंचलित यंत्रणेने कार्यरत होऊन तेथील भूमीवरील नमुने गोळा करण्यास सुरुवात केली ह्या यानाच्या रोबोटिक आर्म व त्याच्या टोकाला जोडलेल्या TAGSAM (Touch and go Sample Acquisition Mechanism) ह्या ऊपकरणाच्या सहाय्याने तेथील जमीन खोदून खडक आणी माती ऊचलुन कुपीत जमा करून सीलबंद करण्याचे काम यशस्वी केले आणी एप्रिल 2021मध्ये काम पुर्ण करून पुन्हा पृथ्वीच्या दिशेने निघाले ह्या सॅम्पलच्या कुपीमध्ये 250 ग्रॅम माती व खडकांचे नमुने आहेत हे नमुने आता जगभरातील शास्त्रज्ञांना वितरित करण्यात येणार असून शास्त्रज्ञ त्यावर सखोल संशोधन करतील  

नासाची परग्रहावरील नमुने गोळा करून पृथ्वीवर पोहोचवण्याची हि पहिलीच मोहीम यशस्वी झाल्यानंतर नासाचे Administrator Bill Neson आनंदित झाले आहेत त्यांनी OSIRIS मोहिमेतील टिमचे अभिनंदन केले ते म्हणाले ,"ह्या टिममधील शास्त्रज्ञांनी हि मोहीम यशस्वी करण्यासाठी अनेक वर्षे अहोरात्र परीश्रम केले आणी परग्रहावरील अंतर्गत भागातील नमुने गोळा करण्यात यश मिळवले आहे नासाने अंतराळ विश्वातील हे यश संपादन करून मानवाला ह्या विश्वात अशक्य असे काही नाही फक्त त्यासाठी अथक परीश्रम व जिद्द आवश्यक आहे हे दाखवून दिले आहे आता आणखी सखोल संशोधन केल्यानंतर Bennu ग्रह आणी सौरमालेतील ईतर ग्रह ह्यांच्यतील फरक कळेल आणी सौरमालेतील ग्रहनिर्मिती आणी पृथ्वीच्या ऊगमाचे रहस्य ऊलगडेल Bennu हा ग्रह कसा आहे पृथ्वी  साठी घातक आहे का? तो नष्ठ होताना पृथ्वीच्या कक्षेत शिरून पृथ्वीला घातक ठरेल का ? तेही कळेल कारण शास्त्रज्ञांच्या मते हा बटुग्रह जर पृथ्वीवर आढळला तर मोठा खड्डा पडेल आणि पाण्यात पडला तर त्सुनामी येईल ह्या बाबतीत शास्त्रज्ञ आता सखोल संशोधन करतील !"

OSIRIS मोहीमेचे Arizona University येथील Principal Investigator Dante Lauretta ह्यांनी देखील टिममधील सर्वांचे अभिनंदन केले ते म्हणाले,"हे यश आमच्या टिममधील सर्वांच्या अथक परीश्रमाचे फळ आहे हे यश अंतराळविश्वात मैलाचा दगड ठरेल आता अज्ञानाचा अंध:कार दुर होऊन यशाच्या दिशेने मार्गक्रमण सुरू झाले आहे ब्रम्हांंडातील मानवाला अज्ञात अशा गोष्टींंचा शोध घेताना अनेक वर्षे बिलीयन मैलांचा अंतराळ प्रवास करुन OSIRIS यानाने Bennu ग्रहावरील भूमी खोदून खडक मातीचे नमुने गोळा केले आणि ते व्यवस्थित कुपीत भरून सीलबंद केले आणी पॅराशूटच्या सहाय्याने सुरक्षितपणे खाली पृथ्वीवर ऊतरवले आहेत हे ह्या मोहिमेतील टीमचे असामान्य कर्तृत्व आहे  हा ऐतिहासिक क्षण आम्हा सर्वांसाठी मोलाचा आहे आम्ही आनंदीत आहोत नासा संस्थेतर्फे ह्या नमुन्यांच्या कुपी पृथ्वीवर पोहोचण्याच्या घटनेचे लाईव्ह प्रसारण करण्यात आले होते हा सोहळा प्रत्यक्ष पहाण्याची संधी देखील देण्यात आली होती त्याला नागरिकांनी ऊत्स्फुर्त प्रतिसाद दिला

Sunday 17 September 2023

नासाची अंतराळवीर Loral O' Hara दोन रशियन अंतराळविरासह स्थानकात पोहोचली

 The Soyuz rocket is launched with Expedition 70 NASA astronaut Loral O'Hara, and Roscosmos cosmonauts Oleg Kononenko and Nikolai Chub, Friday, Sept. 15, 2023, at the Baikonur Cosmodrome in Kazakhstan.

 नासाच्या अंतराळ मोहीम 70 च्या अंतराळवीरांसह सोयूझ MS-24 अंतराळयान स्थानकाच्या दिशेने अंतराळात झेपावले -फोटो नासा संस्था

 नासा संस्था-16 सप्टेंबर

नासाच्या अंतराळमोहिमे 70 अंतर्गत नासाची अंतराळवीर Loral O'Haraरशियाचे अंतराळवीर Oleg Kononenko आणी Nikolai Chub अंतराळस्थानकात सुखरूप पोहोचले हे तीनही अंतराळवीर 15 तारखेला रशियाच्या सोयुझ MS-24 अंतराळयानातुन स्थानकात सहा महिने वास्तव्यासाठी गेले आहेत त्यांचे सोयुझ अंतराळयान कझाकस्थानातील बैकोनुर ऊड्डाण स्थळावरून 11.44 a.m.ला स्थानकात जाण्यासाठी अंतराळात झेपावले आणी तीन तासाच्या अंतराळ प्रवासानंतर 2.55 p.m.ला.स्थानकाच्या Rassvet Module जवळ पोहोचले स्थानक आणी सोयुझ यानाची Hatching व Docking प्रक्रिया पार पडल्यानंतर ह्या अंतराळविरांनी स्थानकात प्रवेश केला स्थानकात सध्या रहात असलेल्या अंतराळविरांनी ह्या अंतराळविरांचे स्थानकात स्वागत केले

  The 10-person Expedition 69 crew is now aboard the space station. Front row from left are, Roscosmos cosmonauts Konstantin Borisov, Nikolai Chub, and Oleg Kononenko, and NASA astronaut Loral O'Hara. In the back are, ESA astronaut Andreas Mogensen, NASA astronaut Frank Rubio, cosmonauts Dmitri Petelin and Sergey Prokopyev, NASA astronaut Jasmin Moghbeli, and JAXA astronaut Satoshi Furukawa. Credit: NASA TV

 नासाच्या अंतराळ मोहीम 69च्या अंतराळवीरांसोबत रशियन अंतराळवीर Nikolai Chub, Oleg Kononeno आणि अंतराळवीर Loral O' Hara स्थानकात पोहोचल्यानंतर Welcome Ceremony दरम्यान -फोटो नासा संस्था

 हे अंतराळवीर स्थानकात पोहोचल्यानंतर काही वेळातच ह्या अंतराळवीरांचा Welcome Ceremony पार पडला तेव्हा स्थानकातील दहाही अंतराळवीर एकत्र जमले होते नासा आणी Roscosmos संस्थेतील प्रमुखांनी ह्या अंतराळवीरांशी लाईव्ह संवाद साधून त्यांचे स्थानकात सुखरूप पोहोचल्या बद्दल अभिनंदन केले आणी त्यांना स्थानकातील वास्तव्यासाठी आणि संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या अंतराळवीर Loral आणि Nikolai ह्यांच्या स्थानकातील प्रथम प्रवेशा बद्दल त्यांचे विशेष अभिनंदन केले अंतराळवीरांनी देखील त्यांना ह्या मोहिमेत सहभागी करून स्थानकात वास्तव्याची संधी दिल्याबद्दल आभार मानले अंतराळवीर Loral म्हणाल्या मला हि संधी दिल्याबद्दल नासा संस्थेतील सर्वांचे आभार त्यामुळेच मला पहिल्यांदाच पृथ्वीचे अद्भुत सौन्दर्य वरून पाहण्याची संधी मीळाली तो क्षण अनमोल आहे !अविस्मरणीय आहे !

हे अंतराळवीर आता अंतराळमोहिम 69 मधील अंतराळविरांसह तेथील संशोधनात सहभागी होतील रशियन अंतराळवीर Kononenko ह्यांची हि पाचवी अंतराळयात्रा आहे ते पाचव्यांदा स्थानकात वास्तव्यासाठी गेले आहेत अंतराळवीर Loral आणी अंतराळवीर Nikolai ह्यांची मात्र हि पहिलीच अंतराळवारी असुन ते पहिल्यांदाच स्थानकात रहायला गेले आहेत अंतराळवीर Loral सहा महिने स्थानकात राहुन संशोधन करणार आहे पण रशियन अंतराळवीर Oleg आणी Nikolai मात्र एक वर्ष स्थानकात वास्तव्य करणार आहेत 

27 सप्टेंबरला नासाचे रेकॉर्ड ब्रेकर अंतराळवीर  Frank Rubio ,रशियन अंतराळवीर Sergey Prokopyev आणी अंतराळवीर Dimitri Petelin हे तीन अंतराळवीर पृथ्वीवर परतणार आहेत अंतराळवीर Frank Rubio ह्यांनी स्थानकात सलग 371 दिवस रहाण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे हे अंतराळवीर पृथ्वीवर परतेपर्यंत हे दहाही अंतराळवीर स्थानकात एकत्र रहाणार असुन तेथील संशोधनात सहभागी होणार आहेत 

Saturday 9 September 2023

नासाच्या Space X Crew 6 - मोहिमेतील अंतराळवीर पृथ्वीवर परतले

 

 Space X Dragon Endeavour अंतराळवीरांसह Jacksonville येथील Atlantic समुद्राच्या खाडीत उतरताना फोटो -नासा संस्था

नासा संस्था - 4 सप्टेंबर 

नासाच्या Space X Crew -6 अंतराळ मोहिमेतील अंतराळवीर  Stephen Bowen,Woody Hoburg सौदी अरबचे अंतराळवीर Sultan Alneyadi आणी रशियन अंतराळवीर Andry Fedyaev त्यांचे स्थानकातील सहा महिन्यांचे वास्तव्य संपवून पृथ्वीवर परतले रविवारी 7.05 a.m.ला Space X Crew Dragon Endeavor ह्या चार अंतराळविरांसह स्थानकातून पृथ्वीवर येण्यासाठी निघाले आणी 4 तारखेला सोमवारी 12.17 a.m.ला पृथ्वीवर परतले Florida मधील Jacksonville येथील समुद्राच्या खाडीत Endeavor सुरक्षीतपणे खाली ऊतरताच नासाच्या रिकव्हरी टिमने ह्या अंतराळविरांना अंतराळयानातुन बाहेर काढले त्यानंतर त्यांचे प्राथमिक  चेकअप करण्यात आले चेकअप नंतर काही वेळाने हे अंतराळवीर नासाच्या विमानाने नासाच्या Houston Space center कडे रवाना झाले.

NASA's SpaceX Crew-6 are seen inside the SpaceX Dragon Endeavour spacecraft onboard the SpaceX recovery ship.

नासाच्या Space X Crew -6 चे अंतराळवीर  Andry Fedyaev,Woody Houburg,Stephen Bowen आणि Sultan Alneyadi पृथ्वीवर परतताना -फोटो नासा संस्था

ह्या अंतराळविरांनी स्थानकात 186 दिवस वास्तव्य केले 2 मार्च 2023 मध्ये हे अंतराळवीर स्थानकात रहायला गेले होते त्या दरम्यान त्यांनी पृथ्वी भोवती 2,976 वेळा फेऱ्या मारल्या आणी 78,875,292 मैलाचा अंतराळप्रवास केला  

अंतराळवीर पृथ्वीवर परतण्याआधी स्थानकात त्यांचा Farewell Ceremony पार पडला स्थानकातील सर्व अंतराळवीर त्या साठी एकत्र जमले नासा संस्थेतील प्रमुखांनी लाईव्ह संपर्क साधुन ह्या अंतराळवीरांना पृथ्वीवर सुरक्षीत परतण्यासाठी शुभेच्छा दिल्या आणी सहा महिन्याच्या वास्तव्यात त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल आणी ईतर कामाबद्दल त्यांचे अभिनंदन केले त्या नंतर मोहीम 69 चे स्थानकातील  कमांडर Sergey ह्यांनी अंतराळविरांशी संवाद साधत त्यांना निरोप दिला 

अंतराळवीर Sergey - "आपण सहा महिने एकत्र वास्तव्य केल खूप छान क्षण व्यतीत केले,एकत्र काम केल संशोधन करताना,Space Walk करताना तुम्ही केलेल सहकार्य,मैत्रीपूर्ण व्यवहार ह्या बद्दल Thanks! तुम्ही पृथ्वीवर सुरक्षित पोहोचावे म्हणून शुभेच्छा! माझी अशी ईच्छा आहे की,आम्ही पृथ्वीवर परतल्यावर पुन्हा आपण मित्र म्हणून भेटु जसे आपण स्थानकात भेटलो तसेच आणी आपल्या पृथ्वीवर परतल्याचा आनंद तिथल्या वातावरणात सेलिब्रेट करू. Good Luck !"

Steave -"Thanks Sergey तुम्ही सगळे कर्तृत्ववान आहात,बुद्धीमान आहात,अनुभवी आहात ह्या सहा महिन्यात आम्हाला तुमच्याकडून खूप शिकायला मिळाले Sergey,Dimma,Frank तुम्ही योग्य वेळी ईथे ऊपस्थित होतात आम्हाला अनुभव नव्हता त्यामुळे आम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज होती तुम्ही आमच्यासाठी रोल मॉडेल आहात तुम्ही वेळोवेळी आम्हाला मदत केली आगामी काळात तुम्ही पृथ्वीवर परतल्यानंतर आपण पुन्हा भेटु आणखी सहा महिन्यांंनी एक वर्ष पुर्ण होईल !"

Woody -"खरच ह्या सहा महिन्यात आयुष्यभर पुरेल ईतका अनुभव आम्हाला मिळाला तुमच्या सारख्या कर्तृत्ववान अंतराळवीरांसोबतचा हा काळ खूप लवकर गेला तुमच्या सोबत ह्या झीरो ग्रॅव्हिटीतल्या फिरत्या प्रयोगशाळेत संशोधन करताना एकत्र राहताना खुप मजा आली खूप नवा अनुभव अनुभवायला मिळाला ईथे आपण कामही भरपूर केल ईथे आलेल्या कार्गोशिप,Axiom Crew स्थानकात आल्यावर Hatching,Docking ची व्यवस्था करताना अंतराळवीरांचे स्वागत करतानाचा अनुभव नवा होता स्थानकाच्या कामासाठी केलेल्या तीन Space Walkचा अनुभव थरारक होता आणी आता स्थानक सोडून आम्ही परतणार आहोत Frank,Dimma,Sergey तुमच्या सोबत रहाताना,काम करताना तुम्ही किती ग्रेट आहात हे कळाल तुमचे स्थानकातील वास्तव्य आणखी सहा महिने लांबल तरी तुम्ही ते किती सहजपणे स्विकारलत Gracefully ! Frank ची लिडरशीप अमेझींग होती तुमच कठीण काळातील परिस्थिती हाताळण्याच कौशल्य मला नेहमी लक्षात राहील तुमच्या सोबतचा wonderful time ,Chess Game ,Sergey हि सारी मजा अनुभवायला मिळाली ते क्षण कायम लक्षात राहतील आपण नक्कीच पृथ्वीवर भेटु आणी आता ईथुन परत पृथ्वीवर परतताना 17,500 मैल वेगाने खाली ऊतरत Splash होतानाचा शेवटच्या क्षणाचा अनुभव देखील थरारक असेल !"

Sultan -Thanks Steave ,Woody,Sergey ! तुमच्या लिडरशिपबद्दल Thanks! तुमच्या सोबतचा सहा महिन्यांचा   वास्तव्याचा काळ खूप मजेत गेला,खूपच लवकर संपला अस वाटतय तुम्ही सांगितल त्या प्रमाणे आपण ईथे खूप काम केल सायंटिफिक संशोधन,स्थानकाच्या कामासाठीचा Space Walk सारच अविस्मरणीय ! ईथे आल्यावर जगातल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचता आल त्यांच्याशी संवाद साधता आला खूप मजा आली ईथल्या वातावरणात वास्तव्य करताना,संशोधन करताना! मी अशा देशातून ईथे आलो ज्या देशाने तीस वर्षांपासून अंतराळमोहिम थांबवली होती स्थानकात रहायला कोणी आले नव्हते पण मी लकी आहे मला ईथे यायला,रहायला,संशोधन करायला मिळाल आपल्या मनात ध्येय असेल ईच्छा असेल तर ती नक्कीच पुर्ण होते त्या साठी अथक प्रयत्न करायला हवे हे आता माझ्या ईथे येण्याने सिध्द झालय आमच्या देशातील भावी पिढीपुढे आता माझ ऊदाहरण असेल आता मी ईथल्या वास्तव्यात रहाण्याचा संशोधन करण्याचा अनुभव शेअर करेन वेळोवेळी स्थानकातून लाईव्ह संवादाद्वारे माझे अनुभव मी शेअर केले आहेतच अजूनही प्रश्नांची ऊत्तरे द्यायला मी तयार आहे माझ्यासाठी हा अनुभव अदभूत आहे Dimma चे मला आभार मानावयाचे आहेत त्याच्या सोबत घालवलेल्या अविस्मरणीय क्षणांसाठी Frank, स्पेशल आभार ! तु ऊत्तम लिडर,असामान्य मित्र आणी होस्ट आहेस ईथल्या वास्तव्यातील क्षण मजेशीर होते मला पुन्हा ईथे यायला मिळाले तर मी नक्की येईन मला पुन्हा ईथला अनुभव घ्यायला आवडेल Space X-7 च्या अंतराळवीरांनो ईथल्या वातावरणात रहाण्याची मजा अनुभवा प्रत्येक क्षणाची मजा घ्या हा अनुभव आयुष्यभराचा आहे Andy,Satoshi तुम्ही दुसऱ्यांंदा ईथे आला आहात पण प्रत्येक वेळी तुम्ही नवा अनुभव शोधाल नवीन ईंटरेस्टिंग काम कराल ईथुन वरून पृथ्वीकडे पहाण्याचा अनुभव अदभूत होता !

Andry - सगळ्यांंनी सांगितले आहेच माझ्याही भावना तशाच आहेत मला ईथे येण्याची ईथे राहून संशोधन करण्याची संधी दिल्याबद्दल नासा संस्थेतील सहभागी सर्व देशातील सर्वांचे आभार आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल,अडचणीच्या वेळी योग्य मार्गदर्शन केल त्या बद्दल आणी माझे कुटुंबीय मित्रांचे देखील आभार त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्या शिवाय इथे येणे शक्य नव्हत

 Sultan,Andry,तुम्ही सर्वांनी छान काम केलय तुम्ही Professionalismचे ऊत्तम ऊदाहरण आहात आणी माणूस म्हणूनही खूप छान आहात तुम्ही ग्रेट आहात हे सहा महिने मजेत गेले आम्हाला तुमची ऊणीव जाणवेल आपण पुन्हा पृथ्वीवर भेटु ! 

त्या नंतर नासा संस्थेतील प्रमुखांनी ह्या अंतराळवीरांना परतण्याआधी पुन्हा शुभेच्छा दिल्या आणि अंतराळवीर परतण्याच्या तयारीला लागले

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

टीप -ह्या ब्लॉगमधील काही शब्द हे अंतराळवीरांसाठी वापरले आहेत अंतराळवीर स्थानकातील झिरो ग्रॅव्हीटीत तरंगत्या अवस्थेत राहतात संशोधन करतात त्यांना पृथ्वीवरील मानवासारखे स्थिर उभे राहता येत नाही,खाता पिता झोपता येत नाही तरंगत्या अवस्थेत हे सार करून संशोधन करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात त्या मुळे पृथ्वीवरील माणसे आणि अंतराळवीर ह्यांच्यात जमीन अस्मानाचा फरक असतो माझ्या असे लक्षात आले आहे कि माझ्या ब्लॉगवरील शब्द  सहजतेने इतरत्र विचार न करता वापरे जातात ब्लॉगला Copy Right Act लावलेला आहे त्याची नोंद घ्यावी 

Wednesday 6 September 2023

भारताचे आदित्य L1 सौरयान सुर्याच्या दिशेने मार्गस्थ

Image

 भारताचे आदित्य L1 सौरयान इसरोच्या श्रीहरीकोटा येथील उड्डाणस्थळावरून अंतराळात झेपावताना फोटो -इसरो संस्था

ईसरो संस्था- 3 सप्टेंबर

भारताचे विक्रम -3 चांद्रयान चंद्रावर यशस्वीपणे कार्यरत झाल्यानंतर आता आठवडाभरातच भारताचे आदित्य L1 सौरयान सुर्याच्या दिशेने मार्गस्थ झाले आहे ईसरोच्या श्रीहरी कोटा येथील सतीश धवन अंतराळ संस्थेतील ऊड्डाण स्थळावरून दोन सप्टेंबरला सकाळी 11.55 मिनिटांनी भारताचे आदित्य L1 सौरयान P.S.L.V- C-57 रॉकेटच्या सहाय्याने सुर्याकडे जाण्यासाठी अंतराळात झेपावले आणी 63मिनिटे 20 सेकंदाच्या अंतराळ प्रवासानंतर यान  रॉकेटपासुन वेगळे झाले ह्या मोहीमेचा यशस्वी शुभारंभ झाला तेव्हा ईसरो संस्थेचे अध्यक्ष एस सोमनाथ आणी त्यांची टिम आनंदित झाली सोमनाथ ह्यांनी हि मोहीम यशस्वी झाल्याचे सांगत टिममधील त्यांच्या प्रमुख सहकाऱ्यांना व्यासपीठावर बोलवले आणी सर्वांचे अभिनंदन केले 

आदित्य L1 सौरयान 127 दिवसांच्या अंतराळ प्रवासानंतर सुर्याजवळ पोहोचेल सध्या आदित्य सौरयान पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करत असुन 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करत पृथ्वीच्या पाच स्थरातुन बाहेर पडण्यासाठीच्या पाच प्रक्रिया पार पाडेल आणी शेवटी पृथ्वीच्या शेवटच्या कठीण स्थरातुन बाहेर पडेल आदित्य सौरयान उर्वरित 121 दिवस सुर्याकडे जाण्यासाठी पृथ्वी ते सुर्य ह्या मधील 15 लाख कि.मी.चा अंतराळप्रवास करेल 

आदित्य L1 सौरयान चार महिन्यांनी सुर्याजवळ पोहोचेल आणी सुर्याच्या Lagrange point ( पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण संपून सुर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा आरंभ जेथे होतो तो L1 point ) जवळील Halo Orbit मध्ये स्थिरावेल ह्या भागातून परीभ्रमण करताना सूर्याच्या ग्रहण काळात देखील संशोधन करताना आदित्य L1 सौरयानास अडथळा येणार नाही आदीत्य L1 सौरयानातील अद्ययावत यंत्रणा आणी सात पेलोडच्या साहाय्याने आदित्य सौरयान सूर्यावरील संशोधन करणार आहे सौरयानातील सातपैकी चार पेलोडच्या यंत्रणे मार्फत सूर्याभोवतीचे तेजपुंज प्रभामंडळ त्यातून अखंडीत बाहेर पडणाऱ्या आगीच्या ज्वाळाचे लोट,बाहेर पडणारा प्रकाश आणी प्रकाश किरणांचे निरीक्षण नोंदवून त्याबद्दलची संशोधित माहिती गोळा करून पृथ्वीवर पाठवेल सूर्याचा करोना हा भाग सूर्याच्या पृष्ठभागापासून वेगळा का आहे इथे सतत बाहेर पडणाऱ्या आगीच्या ज्वाळा व त्यातून बाहेर पडणाऱ्या अखंडीत प्रकाशलाटा कशा तयार होतात त्यांचा प्रवाहित होण्याचा वेग आणी तापमान किती असते त्यातून ऊत्सर्जित होणारी अपायकारक कीरणे ,वायू आणी त्याचा आसपासच्या भागावर होणारा परिणाम ह्याचे संशोधन आदित्य L1 सौरयानातील ह्या यंत्रणे मार्फत केले जाईल

आदित्य L1 सौरयानातील ऊर्वरीत तीन पेलोडच्या यंत्रणेद्वारे सुर्याच्या पृष्ठभागातील प्रचंड ऊष्णता,तेथे तयार होणाऱ्या ऊष्णतेच्या सौरलाटा आगीचे लोट,सौरवादळ ह्याचे निरीक्षण नोंदवले जाईल ह्या भागातील चुंबकीय क्षेत्र आणी त्या भागात सतत घुमसणारी प्रचंड आग त्यातून बाहेर पडणाऱ्या ज्वाळा,बाहेर पडणारी विद्युत भारीत किरणे ,विद्युत भारीत कण,धुळीचे प्रचंड लोट त्यातून बाहेर पडणारे अपायकारक वायू कसे तयार होतात त्यांचा  वेग,ऊष्णतामान,तापमान कीती असते त्यांची निर्मिती प्रकीया कशी असते आणी त्याचा आसपासच्या वातावरणावर होणाऱ्या परीणामाचे निरीक्षण नोंदवून त्यावरील संशोधीत माहिती गोळा केल्या जाईल

  Image

सध्या आदित्य L1 सौरयानाने पृथ्वीच्या पहिल्या स्थरातून,दुसऱ्या स्थरात प्रवेश केल्याची माहिती ईस्रो संस्थेने ट्विटर वरून प्रकाशित केली आहे 

Saturday 2 September 2023

चंद्रावर आढळले ऑक्सिजन,सल्फर,आयर्नसह इतर धातूंचे अस्तित्व

Image

   प्रज्ञान रोव्हरने काढलेला विक्रम चांद्रयानाचा  फोटो - फोटो इसरो संस्था

इसरो संस्था - 30 ऑगस्ट

भारताच्या चांद्रमोहिमे अंतर्गत चंद्रावर गेलेले विक्रम चांद्रयान-3 तेथे पोहोचताच कार्यान्वित झाले काही तासांनी प्रज्ञान रोवर देखील यानातुन बाहेर पडले आणी कार्यान्वित झाले विक्रम यानाने त्याचा व्हिडीओ व चंद्रभुमीवरील फोटो पृथ्वीवरील इसरो संस्थेत पाठवले होते आता प्रज्ञान रोवरने देखील विक्रम यानाचा फोटो काढून पृथ्वीवर पाठवला आहे विक्रम चांद्रयान चंद्रभुमीवरील,भुगर्भातील आणी तेथील वातावरणाची माहिती प्रज्ञान रोवरच्या सहाय्याने संशोधीत करत आहे

प्रज्ञान रोवर यानातुन बाहेर पडून चंद्रभुमीवर मार्गक्रमण करीत असताना त्याच्या वाटेत मोठा खड्डा आढळला तेव्हा काही वेळ रोवर गोल,गोल फिरले आणी खड्ड्यापासून बचाव करत दुसऱ्या वाटेवर वळले तेव्हाचा व्हिडीओ व फोटो रोवरने ईस्रो संस्थेत पाठवला

 fImage

रोवरला बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक LIBS( Laser -Induced Breakdown Spectroscopy) लेसर ऊपकरणाच्या सहाय्याने रोवरने भुगर्भातील माती व खडकाचे परीक्षण केले तेव्हा अत्यंत महत्त्वपुर्ण माहिती प्राप्त झाली आहे चंद्रावरील भुपृष्ठाखालील माती व खडकात सल्फर,अल्युमिनियम,कॅलशियम,आयर्न,टिटॅनियम व क्रोमियम धातू सापडले असुन आता हायड्रोजनचा शोध घेतल्या जात आहे मानवी आयुष्यासाठी ऑक्सीजन आवश्यक आहे रोवरच्या APXS (Alfa Particle X-ray Spectrometer) ह्या ऊपकरणाद्वारे घेतलेल्या नमुन्यात देखील ह्या धातू व वायूचे अस्तित्व आढळले आहे सिलिकॉन देखील तेथे आढळले आहे 

रोवरच्या अत्याधुनिक यंत्रणेद्वारे चंद्रावरील व जमिनीखालील तापमानाची नोंद करण्यात आली असून सुर्यापेक्षा शीतल असणाऱ्या चंद्रावरील वातावरण प्रत्यक्षात अत्यंत ऊष्ण आहे ह्या ऊपकरणाने भुगर्भातील कंपने देखील नोंदवली आहेत

विक्रम चांद्रयान आणी प्रज्ञान रोवर चंद्राच्या दक्षिण भागात स्थिरावले आहे हा भाग ईतर भागापेक्षा वेगळा का आहे ह्याचा शोध यानातील अत्याधुनिक यंत्रणेद्वारे घेतल्या जात आहे तसेच त्या भागात पाण्याचे अस्तित्व आहे का तेथे सजीव सृष्ठिला पोषक वातावरण होते का ?आहे का ? ह्याचाही शोध घेण्यात येणार आहे

Thursday 31 August 2023

नासाच्या Space X Crew- 7 मोहिमेतील अंतराळवीर स्थानकात पोहोचले

  The Crew-7 astronauts walk out of the Neil Armstrong Operations and Checkout Building at NASA's Kennedy Space Center in Florida on Aug 26, 2023.

           नासाच्या Space X Crew -7 अंतराळ मोहिमेतील अंतराळवीर स्थानकात जाण्याच्या तयारीत -फोटो नासा संस्था

नासा संस्था - 28 ऑगस्ट 

नासाच्या Space X Crew -7 अंतराळ मोहिमेतील नासाची अंतराळवीर Jasmin Moghbeli युरोपियन अंतराळवीर Andreas Mogensen जपानचे अंतराळवीर Satoshi Furukawa आणी रशियन अंतराळवीर Konstantin Borisov 27 ऑगस्टला स्थानकात सुखरूप पोहोचले हवामान ऊड्डाणासाठी अनुकूल नसल्याने ह्या अंतराळवीरांचे ऊड्डाण एक दिवस लांबले नासाच्या Florida Space Center येथील 39 A ऊड्डाण स्थळावरून  26 ऑगस्टला  Space X Crew Dragon Endurance ह्या चारही अंतराळविरांसह अंतराळात झेपावले आणी रविवारी 27 ऑगस्टला 10.58 a.m.ला स्थानकात पोहोचले  

  NASA astronaut and Crew-7 Commander, Jasmin Moghbeli, poses for a photo in the first moments the Crew-7 quartet is onboard the International Space Station after hatch opening on August 27, 2023.

    Endurance Dragon Crew -7 मोहिमेतील अंतराळवीर स्थानकात पोहोचल्यानंतर -फोटो नासा संस्था

जाण्याआधी ह्या अंतराळविरांची ऊड्डाणपुर्व अंतीम चाचणी घेण्यात आली त्यांंचे स्पेससुट फिटिंग चेकअप,लिकेज चेकअप ,हेल्थ चेकअप व ईतर आवश्यक चेकअप नंतर हे अंतराळवीर ऊड्डाण स्थळी जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांना निरोप देण्यासाठी नासाचे Administrator Bill Nelson आणी ह्या मोहिमेतील प्रमुख हजर होते ह्या अंतराळविरांना निरोप देण्यासाठी त्यांचे कुटुंबीय देखील  ऊड्डाणस्थळी आले होते पण गेल्या दोन महिन्यापासून हे अंतराळवीर Quarantine मध्ये होते त्यामुळे त्यांना कुटुंबीयांशी लांबुनच संवाद साधावा लागला त्यांच्याशी काही वेळ संवाद साधुन अंतराळवीरांनी सर्वांना Bye करत सर्वांचा निरोप घेतला तेव्हा त्यांच्या कुटुबीयांनी त्यांना सूरक्षीत अंतराळ प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या अंतराळप्रवासास निघण्यापूर्वी अंतराळविरांनी Endurance Dragon मध्ये प्रवेश केल्यावर पुन्हा एकदा सर्व ठिक आहे ना ह्याची खात्री केली आणी ठरलेल्या वेळी Space X Dragon सह अंतराळवीर अंतराळस्थानकात जाण्यासाठी अंतराळात झेपावले रविवारी 9.16a.m.ला  Dragon स्थानकाजवळ पोहोचले आणी 10.58 a.m. ला स्थानक आणी Dragon ह्यांच्यातील hatching,docking प्रक्रिया पार पडली त्या नंतर अंतराळविरांनी स्थानकात प्रवेश केला स्थानकात सध्या रहात असलेल्या अंतराळवीरांनी ह्या चारही अंतराळविरांचे स्थानकात स्वागत केले त्या नंतर काही वेळातच ह्या अंतराळविरांचा Welcome Ceremony पार पडला

अंतराळ प्रवासा दरम्यान हे अंतराळवीर नासा संस्थेच्या सतत संपर्कात होते Space X Crew Dragon अत्यंत वेगाने अंतराळात मार्गक्रमण करत नियोजित प्रक्रिया पार पाडत होते अखेर अंतीम प्रक्रिया पार पाडत Dragon rocket पासून वेगळे झाले आणी प्रचंड वेगाने पृथ्वीच्या कक्षेतून झीरो ग्रव्हिटित प्रवेशले तेव्हा नासा संस्थेने लाईव्ह संपर्क साधुन Dragon चा अंतराळातील सुरक्षित प्रवेश आणी  स्मूथ ड्रायव्हिंग केल्याबद्दल अंतराळविरांचे अभिनंदन केले आता Dragon मधून तुम्ही चार वेगवेगळ्या देशातील अंतराळवीर एकत्र अंतराळ प्रवास करत असल्याचे पाहून आम्हाला आनंद होत आहे आता खऱ्या अर्थाने Dragon International झाले आहे तुम्हाला तुमच्या पुढील प्रवासासाठी आणी स्थानकातील प्रवेशासाठी शुभेच्छा !असे म्हणत त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा Dragon मध्ये बसण्यासाठी मोकळी जागा आहे आम्ही देखील आनंदी आहोत आम्हाला नासा आणी आमच्या देशातील सहभागी संस्थेचे आभार मानावयाचे आहेत त्यांच्या मुळे आम्ही हा अदभूत प्रवास करतोय हा अभुतपुर्व,अविस्मरणीय क्षण अनुभवतोय आम्हाला ट्रेनिंग देणाऱ्या ह्या मोहीमेतील सहभागी सर्वांचेच आभारी आहोत त्यांच्या मुळेच आम्ही सुरक्षित अंतराळप्रवास करत आहोत असे म्हणत त्यांनी अंतराळातून पृथ्वीच अलौकिक सौंदर्य दाखवले 

ह्या प्रवासात अंतराळवीर Andreas ह्यांच्या मुलाने दिलेले झीरो ग्रव्हिटी ईंडीकेटर 3 toed Sloth देखील कसे तरंगते ते दाखवले हा Sloth दोन ऐवजी तीन toed  का आहे ह्या बद्दल  विचारले असता Andreas," ह्यांनी सांगितले मागच्या क्रिसमसला सुट्टीत मी माझ्या फॅमिली सोबत Casta Rica येथील समुद्रकिनारी फिरायला गेलो होतो तीथे आम्हाला  Sloth दिसला मी पायलट आहे माझ्या फॅमिलीत मला Slowest person म्हणतात त्यामुळे मला तीन toed Sloth ची गरज आहे असे त्यांना वाटते त्यांच्यासाठी ते लकी आहे मला त्यांची आठवण म्हणून त्यांनी हे ईंडीकेटर सोबत दिलय जपानी अंतराळवीर Satoshi Furuawa ह्यांनी देखील अंतराळात  पुन्हा प्रवेश केल्यावर मी देखील आंनदीत झालो आहे असे सांगितले रशियन अंतराळवीर  Borisov म्हणाले मी खूप Excited आहे Thanks ! ह्या.मोहिमेत सहभागी सर्वांचेच आभार त्यांच्यामुळे हे शक्य झाले !  

अंतराळवीर स्थानकात पोहोचल्यानंतर काही वेळातच ह्या अंतराळविरांचा Welcome Ceremony पार पडला Welcome Ceremony साठी स्थानकातील अकरा अंतराळवीर एकत्र जमले नासा संस्थेने लाईव्ह संपर्क साधुन ह्या अंतराळविरांचे सुरक्षित अंतराळ प्रवास व स्थानकातील प्रवेशाबद्दल अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आणी स्थानकात प्रवेश केल्यानंतरचे त्यांचे मनोगत जाणून घेतले 

सुरवातीला अंतराळवीर  Frank आणी अंतराळवीर Sergey ह्यांनी  ह्या अंतराळवीरांचे स्थानकात स्वागत केले '',स्थानकात सुखरूप पोहोचल्या बद्दल अंतराळमोहीम 69 तर्फे तुमचे अभिनंदन ! अंतराळवीर Satoshi आणी Andreas तुमचे स्वागत तुम्ही दुसऱ्यांंदा स्थानकात पोहोचला आहात पण अंतराळवीर Jasmine आणी  Konstantin ,तुमच्या स्थानकातील प्रथम प्रवेशाबद्दल स्पेशल अभिनंदन आणी स्वागत ! आता तुम्ही खरोखरच अंतराळवीर झाला आहात हा तुमच्या आयुष्यातील महत्त्वपुर्ण क्षण आहे तुमच्या Happy flight आणी भविष्यकालीन स्थानकातील वास्तव्यासाठी आणी संशोधनासाठी शुभेच्छा ! आता आपण एकत्र संशोधन करणार आहोत !"

अंतराळवीर Jasmin -."Thanks ! Sergey आणी  Frank तुम्ही केलेल्या स्वागताबद्दल आपण काही दिवस एकत्र ट्रेनिंग घेतल आहे आताचा क्षण खरोखरच महत्त्वाचा आहे आता आपण एकत्र रहाणार आहोत,संशोधन करणार आहोत आम्ही येथील झीरो ग्रव्हिटितील वास्तव्याचा अनुभव घेणार आहोत त्या साठी नासा संस्था,ईसा,Space X JAXA CSA आणी Roscosmos संस्थेतील सर्वांचे आभार त्यांच्यामुळे मी ईथे येऊ शकले हा क्षण अनभवु शकले येणाऱ्या काळात आम्ही निश्चितच चांगली कामगिरी पार पाडु तुमच्यापैकी तीनजण वेगळे आहेत पण मला आशा आहे तुम्ही आम्हाला संशोधनातील परीपूर्ण,ऊपयुक्त गोष्टी शिकवाल ह्या टिममध्ये सहभागी झाल्याचा मला अभिमान वाटतो आहे !"

अंतराळवीर Andreas -"मला सुध्दा Jasmine सारखच फिल होतय ह्या मोहीम 69 मध्ये सहभागी होताना अभिमान वाटतोय हि मोहीम आम्ही नक्की यशस्वी करु आधीच्या ESAच्या अंतराळवीरांनी केलेले अनेक युरोपियन आणी Danish Expt. मी पुढे चालू ठेवेन मला त्यासाठी ESA संस्थेचे आभार मानावयाचे आहेत त्यांच्या Hard Work बद्दल आणी मला ईथे येण्यासाठी Train  केल्याबद्दल हि मोहीम अभुतपुर्व आहे ईथे स्थानकात पोहोचल्यानंतरचा क्षण अभुतपुर्व आहे,थरारक आहे ईथल्या ब्रिलीयंट इंटर नॅशनल  टिम सोबत रहायला,संशोधन करायला मिळणार ह्याचा आनंद होतोय मी Excited आहे !"

अंतराळवीर  Borisov -"खरच खूप Excited क्षण आहे हा शब्दात व्यक्त करता येत नाही ईथल्या झीरो ग्रॅविटीत ईतक्या सहजतेने तरंगताना ह्या सर्वांना पहाण किती कठोर परिश्रम करावे लागतात त्यासाठी !आणी आता मिही ईथल्या झीरो ग्रव्हिटित तरंगत्या अवस्थेत रहाणार मलाही त्या साठी खूप प्रयत्न करावे लागणार आहेत खूप कठीण आहे हे ईथल्या ईंटरनॅशनल टिमसोबत एकत्र संशोधन करताना एकी कीती महत्त्वाची आहे ह्याचा प्रत्यय येतोय ह्या ईंटरनॅशनल अंतराळस्थानकात आम्ही बहुतेकजण ईंटरनॅशनल रहिवासी आहोत ईथे पाच देशातील अंतराळवीर वास्तव्य करत आहेत आगामी काळात आम्ही एकत्र काम करणार आहोत नासा,Space X आणी सहभागी सर्व संस्थेचे आभार खरेच ईथले अंतराळवीर वैशिष्ट्यपूर्ण आहेत आता काही महिने आम्ही एकत्र संशोधन करणार आहोत आणी ईथल्या झीरो ग्रव्हिटितील रहाण्याची मजा अनुभवणार आहोत!"

हे चारही अंतराळवीर आता स्थानकात सहा महिने राहून तेथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होणार आहेत लवकरच  Space X -6 अंतराळ मोहिमेतील चार अंतराळवीर पृथ्वीवर परततील तो पर्यंत स्थानकातील अकरा अंतराळवीर एकत्रित राहून तेथील संशोधनात सहभागी होतील

 

Friday 25 August 2023

भारताची चांद्रयान -3 मोहिम यशस्वी विक्रम चांद्रयान चंद्रावर प्रज्ञान रोवरसह स्थिरावले

 Image

 भारताच्या चांद्रमोहीम -3 मधील विक्रम चांद्रयान चांद्रभूमीवर सुरक्षितपणे उतरून स्थिरावल्यानंतर -फोटो -इसरो संस्था

ईसरो  संस्था -24 ऑगस्ट 

भारताच्या चांद्रमोहिम -3 अंतर्गत चंद्रावर गेलेले विक्रम चांद्रयान बुधवारी चंद्रावर सूखरूप पोहोचले आणी संद्याकाळी 6 वाजुन 4 मिनिटांनी चंद्रभुमीवर सुरक्षीतपणे खाली ऊतरले विक्रम चांद्रयानाने हि मोहीम यशस्वी करत चंद्राच्या दक्षीण भागात चांद्रयान ऊतरवणारा पहिला देश म्हणून भारताची विक्रमी नोंद केली आहे विक्रम चांद्रयान चंद्रावर पोहोचताच ईसरोचे अध्यक्ष S Somanath ,चांद्रमोहिम 3 मधील प्रमुख शास्त्रज्ञ आणी सारे कर्मचारी आनंदित झाले विक्रम चांद्रयान चंद्रावर पोहोचताच यानाने पृथ्वीवरील ईस्रो संस्थेशी लाईव्ह संपर्क साधत " I reached my destination and you also !" असे ट्वीट केले चांद्रयान चांद्रभूमीवर स्थिरावताच काही तासानंतर विक्रम चांद्रयानातुन प्रज्ञान रोवर देखील बाहेर पडले आणी कार्यान्वित झाले विक्रम चांद्रयानाने चंद्राच्या कक्षेत फिरतानाच चंद्रभुमीवरील फोटो व व्हिडीओ काढून पृथ्वीवर पाठवणे सुरू केले होते विक्रम चांद्रयान चंद्रभुमीवर ऊतरताना ऊतरल्यावर आणी प्रज्ञान रोवर यानातुन बाहेर पडतानाचा व्हिडीओ देखील विक्रम चांद्रयानाने लगेचच पृथ्वीवर पाठवला आहे 

 Image

विक्रम चांद्रयान 14 जुलैला ईस्रोच्या श्रीहरीकोटा येथील ऊड्डाण स्थळावरून चंद्रावर जाण्यासाठी अंतराळात झेपावले आणी 41 दिवसांनी चंद्रावर पोहोचले ह्या आधीच्या चांद्रमोहिम 2 मधील विक्रम चांद्रयान चंद्रावर ऊतरताना नष्ठ झाले होते आणी दोन दिवस आधीच रशियाचे लुना चांद्रयान देखील चांद्रभूमीवर ऊतरताना नष्ठ झाले त्यामुळे ह्या वेळेस विक्रम चांद्रयान चंद्रावर सुरक्षीतपणे खाली ऊतरेल की नाही ह्या बद्दल ईस्रोचे अध्यक्ष आणी  ह्या मोहिमेचे प्रमुख शास्त्रज्ञ S.Somanath आणी त्यांची टिम सांशक होती पण अखेर हि मोहीम यशस्वी करत विक्रम चांद्रयान सुरक्षीतपणे चंद्रभुमीवर खाली ऊतरले

 


ईस्रो संस्थेतील शास्त्रज्ञांनी विक्रम चांद्रयान चंद्राच्या कक्षेत शिरताच चांद्रयान चंद्रभुमीवर ऊतरवण्याची तयारी सुरू केली होती सारी यंत्रणा सज्ज होती चांद्रयान चंद्रभुमीवर ऊतरण्याआधी चंद्राच्या कक्षेत फिरत होते आणी चंद्रावर ऊतरण्यासाठी योग्य जागेचे निरीक्षण करत होते योग्य जागा सापडताच विक्रम चांद्रयानातील स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित झाली चांद्रयानाने चंद्रभुमीवर ऊतरण्यासाठी वेगावर नियंत्रण ठेवत चंद्रभुमीच्या दिशेने झेप घेतली तेव्हा टिममधील शास्रज्ञ सर्तक झाले त्यांचे लक्ष यानावर केंद्रित झाले जसजसे विक्रम यान खाली खाली येत होते तसतशी शास्त्रज्ञांची ऊत्कंठा वाढत होती यानाने नियोजीत प्रक्रिया पार पाडताच सर्वजण टाळ्या वाजवत आनंद व्यक्त करत होते अखेरची प्रक्रिया पार पाडत यानाने स्थीती बदलली आणी वेग कमी करत उभ्या स्थितीत चंद्रभुमीवर सुरक्षीतपणे खाली ऊतरत जमीनीला स्पर्श केला तेव्हा ईस्रो संस्थेत सर्वांनी जल्लोष केला S.Somanath त्यांंचे सहकारी कर्मचारी निश्चिंत झाले त्यांच्या चेहऱ्यावर कर्तव्यपुर्तीचा आनंद दिसत होता ईस्रोतील चांद्रमोहिम 3 मधील शास्त्रज्ञ,ईंजीनिअर्स,तत्रंज्ञ,कर्मचारी साऱ्यांंनीच ऊभे राहून टाळ्या वाजवत हा क्षण अनुभवला

हि मोहीम यशस्वी होताच ईस्रोचे अध्यक्ष S.Somanath ह्यांनी चांद्रमोहिम यशस्वी झाल्याची अधिकृत घोषणा केली आणी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले," हे यश टिममधील सर्वांचे आहे गेल्या चार वर्षापासून सर्वजण ह्या मोहीमेसाठी रात्रंदिवस काम करत होते दैनंदिन व्यवहार करताना,खाताना,पितानाच नाही तर श्वास घेताना देखील ते हि मोहीम यशस्वी करण्याच्याच विचारात होते त्यांच्या सहकार्यामुळे अथक परीश्रमामुळे हे यश प्राप्त झाले आहे त्यामुळे त्यांचे अभिनंदन ! आधीच्या चांद्रयान 2 मोहिमेतील त्रुटी दुर करून ह्या मोहिमेत काही आवश्यक बदल करण्यात आले होते पण तरीही विक्रम चांद्रयान चंद्रभुमीवर ऊतरेपर्यंत आम्ही चिंतीत होतो पण अखेर हि मोहीम यशस्वी झाली आमच्यासाठी हा ऐतिहासिक क्षण अनमोल आहे पंतप्रधान मोदींनी परवानगी देऊन सहकार्य केल्यामुळे हे यश प्राप्त होऊ शकले त्यामुळे त्यांचे आभार 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं अफ्रिकेतील जोहन्सबर्ग येथून लाईव्ह टेलीकास्टद्वारे विक्रम चांद्रयान चंद्रभुमीवर ऊतरतानाच्या सोहळ्यात  सहभागी झाले होते चांद्रयान चंद्रभुमीवर ऊतरताच त्यांनी भारताचा तिरंगा फडकावत आनंद साजरा केला त्यांनी हि मोहीम यशस्वी केल्याबद्दल ईस्रो संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ, मोहिमेतील सहभागी शास्त्रज्ञ आणी सर्व कर्मचाऱ्यांंचे अभिनंदन केले ते म्हणाले,"आधीच्या मोहिमेतील अपयशाने खचून न जाता शास्त्रज्ञांनी हि मोहीम यशस्वी करुन देशाचे नाव ऊंचावले आहे विक्रम यानाने देशाच्या ईतिहासात विक्रमी नोंद केली आहे भारताने चंद्राच्या दक्षिण भागात यान ऊतरवुन चांद्रमोहिमेतील यशाच्या वाटेवर प्रथम पहिले पाऊल टाकले आहे हे यश शास्त्रज्ञांच्या आणी टिमच्या अपार मेहनतीने प्राप्त झाले आहे त्या साठी ईस्रो संस्थेतील ह्या टिममधील सर्वांचे अभिनंदन!" माझ्यासाठी हा  ऐतिहासिक क्षण अविस्मरणीय आहे!अनमोल आहे! ईस्रो तील ह्या मोहिमेतील सर्वांना पुढील वाटचालीसाठी शूभेच्छा ! देशातील 140 कोटी जनता ह्या ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार आहे सर्व जनतेचेही आभार अंतराळविश्वातील भारताचे भविष्यकालीन यश निश्चित आहे लवकरच भारत चंद्रावर गगनयान मोहिमेत मानव पाठवणार आहे मंगळ,शुक्र मोहिमेची तयारी सुरु आहे आजवर अमेरिका ,रशिया आणि चीनने चंद्रावर यान पाठवून चांद्रमोहीम यशस्वी केली होती आता भारतही यशस्वी चौथा देश झाला आहे 

विक्रम चांद्रयान व प्रज्ञान रोवर आता चंद्रभुममीवरील व भुगर्भातील खनिजे,माती,खडकांचे नमुने घेतील चंद्रावरील पुरातन सजीव स्रुष्ठिच्या अस्तित्वाला दुजोरा देणारे पुरावे व पाण्याच्या अस्तित्वाचा शोध घेतील तसेच भविष्यकालीन मानवसहित चांद्रमोहिमेतील अंतराळविरांसाठी रहाण्यायोग्य पोषक वातावरणाचा शोध घेतील तेथील वातावरणाचे निरीक्षण नोंदवून तेथील फोटो व व्हिडिओ प्रुथ्वीवर पाठवतील

Friday 18 August 2023

नासाच्या Space X Crew-6 मोहिमेतील अंतराळवीर सप्टेंबर मध्ये पृथ्वीवर परतणार

Clockwise from bottom, are NASA astronaut Stephen Bowen; UAE (United Arab Emirates) astronaut Sultan Alneyadi; NASA astronaut Woody Hoburg; and Roscosmos cosmonaut Andrey Fedyaev.
 
नासाच्या Space X Crew -6 चे अंतराळवीर Stephen Bowen ,Sultan Alneyadi ,Woody Hoburg आणी रशियन अंतराळवीर Andrey Fedyaev स्थानकातील वास्तव्या दरम्यान -फोटो नासा संस्था
 
नासा संस्था -17 आँगस्ट 
नासा आणी Space X Crew 6 अंतराळ मोहिमेतील अंतराळवीर त्यांचे स्थानकातील सहा महिन्यांचे वास्तव्य संपवून सप्टेंबरमध्ये पृथ्वीवर परतणार आहेत नासा आणी Space X ह्यांच्या अंतराळ मोहीम Crew -6 अंतर्गत नासाचे अंतराळवीर Stephen Bowen,Woody Hoburg सौदी अरबचे अंतराळवीर Sultan Alneyadi आणी रशियन अंतराळवीर Andrey Fedyaev हे चार अंतराळवीर तीन मार्च 2023 मध्ये सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी स्थानकात गेले होते 
स्थानकातील सहा महिन्यांच्या वास्तव्या दरम्यान हे अंतराळवीर तेथे सुरू असलेल्या सायंटिफिक संशोधनात सहभागी झाले विशेषतः त्यांनी स्थानकात सुरु असलेल्या Technology demonstrations, Student Robotic Challenges,Plant genetics ह्या विषयीच्या सायंटिफिक प्रयोगातील संशोधनात सहभाग नोंदवला  शीवाय अंतराळ स्थानकातील झीरो ग्रव्हिटितील वास्तव्या दरम्यान मानवी आरोग्यावर काय विपरीत परिणाम होतात ह्याचे निरीक्षण नोंदवून त्यावर सखोल संशोधन केले मानवाच्या विकासासाठी ऊपयुक्त आणी पृथ्वी संरक्षणासाठी आवश्यक  संशोधनातही ते सहभागी झाले  
हे अंतराळवीर एक सप्टेंबरला पृथ्वीवर परतणार आहेत Space X Crew Dragon Endeavor ह्या अंतराळवीरांसह Florida येथील समूद्रात ऊतरणार आहे पृथ्वीवर परतण्याआधी हे अंतराळवीर स्थानकातून पत्रकारांसोबत लाईव्ह संवाद साधणार आहेत आणि त्यांच्या सहा महिन्यातील वास्तव्याविषयी आणि त्या दरम्यान त्यांनी केलेल्या संशोधना विषयी माहिती देणार आहेत

Friday 11 August 2023

नासाच्या Space X-Crew -8 मोहिमेतील अंतराळविरांची निवड

  NASA’s SpaceX Crew-8 Crew Portrait

                         नासाच्या अंतराळ मोहीम Space X Crew -8 चे अंतराळवीर -फोटो नासा संस्था

 नासा संस्था - 4 ऑगस्ट 

नासाच्या Space X -Crew-8 अंतराळ मोहिमे अंतर्गत चार अंतराळवीर सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी स्थानकात  जाणार आहेत ह्या मोहिमे अंतर्गत नासाचे अंतराळवीर Matthew Dominick, Michael Barratt,Jeanette Epps आणी रशियन अंतराळवीर Alexander Grebenkin हे चार अंतराळवीर सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी स्थानकात जाणार आहेत 

ह्या मोहिमेत अंतराळवीर Matthew Dominick हे कमांडर पद,अंतराळवीर Michael  Barratt हे पायलट पद सांभाळणार आहेत अंतराळवीर Jeanette Epps आणी अंतराळवीर Alexander Grebenkin हे दोघे मिशन स्पेशॅलिस्ट पद सांभाळणार आहेत 

अंतराळवीर Dominick ह्यांची हि पहिलीच अंतराळवारी आहे 2017 मध्ये त्यांची नासा संस्थेत निवड झाली Colorado येथील रहिवासी असलेले Dominick ह्यांनी U.S. Navy Astronaut आणि U.S. Naval Test Pilot म्हणून काम केलय 

अंतराळवीर Michael Barratt ह्यांची हि तिसरी अंतराळवारी असून ते तिसऱ्यांदा स्थानकात राहायला जाणार आहेत ह्या आधी अंतराळ मोहीम 19-20 अंतर्गत 2009 साली ते स्थानकात रहायला गेले होते  ह्या मोहिमेत त्यांनी Flight Engineer पद सांभाळले होते त्यांच्या स्थानकातील वास्तव्या दरम्यान त्यांनी स्थानकाच्या कामासाठी दोन वेळा Space Walk केला आणि 2011 मध्ये STS-133अंतर्गत ते पुन्हा स्थानकात गेले होते त्यांच्या अंतराळ विश्वातील करिअर मध्ये त्यांनी आजवर स्थानकात 212 दिवस वास्तव्य केले आहे Michael Barratt वॉशिंग्टन येथील रहिवासी असून 2000 साली यांची नासा संस्थेत निवड झाली होती नासा संस्थेत Flight Surgeon & Project Physician पदी कार्यरत आहेत

Jeanette Epps ह्यांची हि पहिलीच अंतराळवारी आहे त्या New York च्या रहिवासी आहेत 2009 साली त्यांची नासा संस्थेत अंतराळवीर होण्यासाठी निवड झाली त्या आधी त्या Ford Motor co.आणि Intelligence Agency मध्ये कार्यरत होत्या Boeing Starliner -1 मोहिमेसाठीही त्यांची निवड झाली आहे रशियन अंतराळवीर Alexander Grebenkin हे देखील प्रथमच स्थानकात राहायला जाणार आहेत  

2024 मध्ये हे चार अंतराळवीर स्थानकात जाणार आहेत आणी अंतराळ मोहीम 70-71च्या अंतराळविरांसोबत  अंतराळ स्थानकात सुरू असलेल्या संशोधनात सहभागी होणार आहेत