आर्टिमस मोहिमेतील अंतराळवीर आपदकालीन ट्रेनिंग दरम्यान -फोटो - नासा संस्था
नासा संस्था -21 डिसेंबर
नासाच्या आर्टिमस मोहीमेची सध्या जय्यत तयारी सुरु आहे ह्या मोहिमेतील अंतराळवीर नासाच्या Johnson Space Center मध्ये अंतिम ट्रेनिंग घेत आहेत नुकतीच ह्या अंतराळवीरांची आपदकालीन टेस्ट पार पडली
नासाच्या आर्टिमस मोहीमेतील अंतराळवीर Christina Koch,Victor Glover ,Jeremy Hansen आणी Ried Wiseman ह्यांना नासाच्या JPL सेंटर मध्ये अंतराळयानातुन आपदकालीन स्थितीत बाहेर निघण्याचे ट्रेनिंग देण्यात आले आर्टिमस मोहिमे अंतर्गत चंद्रावर पोहोचुन हि मोहीम यशस्वी करून Orion यान पृथ्वीवर समुद्रात खाली ऊतरताना काही आपदकालीन समस्या निर्माण झाल्यास किंवा काही कारणाने त्यांना यानातुन बाहेर काढण्यासाठी रिकव्हरी टिम वेळेवर पोहोचली नाही तर यानातुन स्वतः बाहेर पडण्यासाठी खास प्रशिक्षण देण्यात आले
अशा वेळेस परिस्थितीवर नियंत्रण मिळवत अंतराळवीरांना यानाच्या किनाऱ्याजवळील भागातील आणी वरच्या बाजूला असलेल्या दारातून बाहेर पडण्याचे प्रशिक्षण देण्यात आले ह्या प्रशिक्षणसाठी अंतराळवीर Christina Koch ,अंतराळवीर Jeremy Hansen ह्यांनी विषेश परीश्रम घेतले नासाचे स्पेससूट टेक्निशियन ओव्हेन्स ह्यांनी अंतराळवीरांना सहकार्य केले
No comments:
Post a Comment