Tuesday 19 December 2023

अंतराळस्थानकाचे 25 व्या वर्षात यशस्वी पदार्पण

 

 International Space Station with Earth in the background

    अंतराळातील झिरो ग्रॅव्हीटीतील फिरते अंतराळस्थानक -फोटो नासा संस्था

  नासा संस्था- 8 डिसेंबर

नासा संस्थेतील पाच देशांनी मिळुन निर्माण झालेल्या अंतराळातील झीरो ग्रॅव्हिटीतील फिरत्या अंतराळस्थानकाने आता पंचविसाव्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे सहा डिसेंबरला नासा संस्थेतर्फे स्थानकाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला नासाचे Associate Administrator Robert Cabana आणी Space Station Program Manager Joel Montalbano ह्यांनी सध्या अंतराळस्थानकात रहात असलेल्या अंतराळ मोहीम 70 च्या अंतराळवीरांसोबत लाईव्ह संवाद साधुन त्यांना स्थानकाच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या 

अंतराळस्थानकाच्या निर्मितीचा शुभारंभ 25 नोव्हेंबर 1998 ला झाला पण 6 डिसेंबरला अंतराळात फिरणाऱ्या Zarya Module ला पहिल्यांंदा Unity Module जोडण्यात आले म्हणून सहा डिसेंबरला स्थानकाचा वर्धापन दिन साजरा केल्या जातो अमेरिका आणी रशिया ह्या दोन देशांनी मिळुन हे दोन Module एकत्र जोडले होते आता त्या भागात अंतराळस्थानकात वास्तव्य करणारे अंतराळवीर एकत्र जेवण करतात 

अंतराळस्थानकाच्या निर्मितीचा शुभारंभ करून हे दोन भाग एकमेकांना जोडण्याची मोहीम आखण्यात आली तेव्हा ह्या मोहिमेचे कमांडर Robert Cabana होते त्यांच्याच देखरेखीखाली हे भाग जोडण्यात आले आणी त्यांनीच पहिल्यांंदा स्थानकात प्रवेश केला स्थानकात प्रवेश करणारे ते पहिले अमेरिकन अंतराळवीर आहेत स्थानकाच्या वर्धापनदिनी अंतराळवीरांसोबत लाईव्ह संवाद साधताना त्यांनी हि माहिती दिली ते म्हणतात,"खरोखरच त्या वेळेस हे साहसी,थरारक काम मी केलय ह्यावर आता माझा विश्वास बसत नाही तुम्ही जिथे सध्या राहात आहात संशोधन करत आहात त्याचे श्रेय आम्हाला आहे तुम्ही तिथे वास्तव्य करून पृथ्वी संरक्षणासाठी आणी पृथ्वीवासीयांसाठी ऊपयुक्त संशोधन करत आहात ह्याचा ऊपयोग भावी पीढीसाठी आणी दुरवरच्या अंतराळ मोहीमेतील अंतराळवीरांसाठी होणार आहे 

अंतराळातील ह्या फिरत्या वास्तुचा आकार गोलाकार आणी अमेरिकेतील फुटबॉल फिल्ड एव्हढा आहे ह्या अंतराळातील झीरो ग्रॅव्हिटितील फिरत्या स्थानकात सहा क्वार्टर आणी दोन बाथरूम आहेत शीवाय व्यायामासाठी जीम आणी ईतर सायंटिफिक प्रयोग,संशोधन करण्यासाठी भरपूर जागा आहे अंतराळवीरांसाठी ताजी भाजी आणी अन्न पिकवण्यासाठी ह्या स्थानकात पृथ्वीसारखे कृत्रीम वातावरण असलेले व्हेजी चेंबर देखील आहे नवनवीन व्हेजी प्रोजेक्ट द्वारे अंतराळवीरांनी त्यात भाजी ऊगवण्यात यश मिळवले आहे आणी ताज्या भाज्यांचा आस्वाद देखील घेतला आहे 

अंतराळस्थानकाची निर्मिती जरी 1998 साली झाली असली तरी कित्येक वर्षांपासून अंतराळातील फिरत्या स्थानकाची अभीनव कल्पना मांडली गेली होती सोळाव्या शतकातच पहिल्यांदा Astronomer Johannes ह्यांंना अशी कल्पना सुचली अंतराळात फिरणाऱ्या अशा स्थानकात अंतराळात फिरता आणी रहाता  देखील येईल एक दिवस ते शक्य होईल आणी मानव अंतराळात प्रवास करेल असे त्यांनी म्हटले होते त्या नंतर 1860 मध्ये  Edward Everett Hale ह्यांंनी Brick Moon ह्या त्यांच्या लेखात अंतराळातील स्थानकाची कल्पना मांडली त्यांनी म्हटले होते पृथ्वीच्या वर अंतराळात फिरणारे मानव निर्मित घर असेल आणी त्यात मानवी वास्तव्य असेल हे अंतराळातील घर पृथ्वीवासीयांसाठी नवी दिशा देणारे ठरेल रशियन Theoretician Konstantin Tsiolkovsky ह्यांनी देखील अशाच अंतराळातील घराची कल्पना मांडली त्यात सौर ऊर्जेचा वापर करून प्रकाश निर्माण करता येईल आणी पृथ्वी सारखे वातावरण निर्माण करून आतमध्ये भाजी आणी धान्य पिकवता येईल असा विचार त्यांनी मांडला पुढे 1928 मध्ये पहिल्यांंदा Herman Noordung ह्यांनी अंतराळातील चाकाच्या आकाराच्या कृत्रीम ग्रॅव्हिटि असलेल्या अंतराळातील घराच्या बांधणीचे डिझाईन केले त्या नंतर 1952 मध्ये Willy Ley ह्यांनी देखील अशा अंतराळातील घराची कल्पना मांडली त्या आधी 1950 मध्ये US government मध्ये अशा अंतराळातील फिरत्या घराच्या निर्मितीबाबत चर्चा झाली अखेर 1960 मध्ये नासाच्या Huston येथील J.PL संस्थेत गरजेतून ह्या अंतराळस्थानकाच्या निर्मितीचा विचार करण्यात आला आणी नासाने Space Station निर्मितीचे पेटंट मिळवत Skylab च्या निर्मितीचा शुभारंभ केला 

त्या नंतर 1998 च्या डिसेंबरमध्ये अंतराळ स्थानकाचा शुभारंभ झाला आणी त्याचा हळूहळू विस्तार होत गेला सध्या नासा संस्थेत कॅनडा,युरोप,जपान,रशिया आणी अमेरिकेचा सहभाग आहे आजवर 21 देशातील 273 अंतराळवीर स्थानकात वास्तव्य करून आले आहेत तीथे सतत शेकडो विषयांवर सायंटिफिक संशोधन सुरू असते वेगवेगळ्या देशातील अंतराळवीर वेगवेगळ्या मोहीमे अंतर्गत स्थानकात जा,ये करतात, संशोधन करतात तीथुन लाईव्ह संवाद साधतात अंतराळस्थानकाच्या कामासाठी स्पेसवॉक करतात त्यात महिला अंतराळवीरही मागे नाहीत स्थानकातील वास्तव्या दरम्यान येणारे सण साजरे करतात,पार्टी करतात

अंतराळवीर जेव्हा स्थानकात पोहोचतात तेव्हा अंतराळस्थानक पाहून अंचबीत होतात अंतराळातील झीरो ग्रॅव्हिटीतील निर्मित झालेल्या अंतराळवीरांना प्रेरित करणाऱ्या मानवाच्या ह्या असामान्य कर्तृत्वाचे,कुशलतेचे ते कौतुक करतात जेव्हा त्यांना त्यांचा अविस्मरणीय क्षण कोणता हे विचारले जाते तेव्हा अंतराळातून दिसणारे पृथ्वीचे अलौकिक सौंदर्य आणी स्थानकातील प्रवेशाचा क्षण असे ऊद्गार त्यांच्या तोंडून बाहेर पडतात ते नासा संस्था आणी स्थानक निर्माण करणाऱ्या अभियंता,ईंजीनिअर,शास्त्रज्ञ,तंत्रज्ञांचे आभार मानतात खरोखरच पृथ्वीवरून प्रुथ्वीचे अलौकिक सौंदर्य पहाता येत नाही त्यासाठी अंतराळात जावे लागते म्हणूनच तिला अलौकिक म्हटले जात

No comments:

Post a Comment