नासाच्या First Woman -Expanding Our Universe Graphic Novel मधील नायिका कमांडर Callie Rodringuez ,रोबो RT आणी अंतराळवीर Meshaya Billy सह चांद्रभूमीवर पोहोचल्यावर -फोटो नासा संस्था
नासा संस्था-26 आक्टोबर
नासाची आर्टिमस मोहीम अंतिम टप्यात पोहोचली आहे नासाच्या आर्टिमस मोहिमेतील महिला अंतराळवीर चंद्रभुमीवर पहिले पाऊल ठेवणार आहे पण त्या आधीच नासाच्या First Woman Graphic Novel सिरीज मधील नायिका अंतराळवीर आणी कमांडर Callie Rodriguez हिने Novel सिरीज मधील चांद्रमोहिमेत चंद्रावर पोहोचुन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे
नासाच्या First Woman Expanding Our Universe Novel सिरीज ईंग्लिश आणी Spanish भाषेत डीजीटली प्रसिद्ध होत आहेत त्याच अंकाच्या दुसऱ्या भागातील अंतराळवीर नायिका कमांडर Callie Rodriguez आणी तिचे सहकारी अंतराळवीर चंद्रावर पोहोचले आहेत आणी खाली चंद्रभुमीवर ऊतरून त्यांनी मोहिमेची सुरुवात देखील केली आहे
Novel सिरीज मधील चांद्र मोहिमेत कथेची नायिका Callie Rodriguez अंतराळवीर आहे आणी ती ह्या मोहिमेची कमांडर आहे तिच्या सोबत अंतराळवीर Meshaya Billy आणि तिचा रोबो RT आहे रोबोचे नाव तिच्या वडिलांची आठवण म्हणून आणि आर्टीमस मोहिमेचा सन्मान म्हणून तिने RT ठेवले आहे ती लहानपणापासूनच धाडसी आणि महत्वाकांक्षी आहे आणि तिचे ध्येय अंतराळवीर होऊन चंद्रावर जाण्याचे आहे त्या साठी ती कठीण परिस्थितीशी सामना करत तिचे ध्येय साध्य करते आणी चंद्रावर पोहोचते विशेष म्हणजे ती भारतीय मूळ वंशाची आहे चांद्रभूमीवर पोहोचल्यावर तिघे चांद्रभूमीवरील वेगवेगळ्या भागात गेले आहेत आणी चंद्राविषयी मानवाला आजवर अज्ञात असलेल्या गोष्टीचा शोध घेत आहेत हे तिघे तेथील संशोधीत माहिती गोळा करून तिथे सायंटिफिक प्रयोग करणार आहेत हे अंतराळवीर चंद्रावरील मानवासाठी ऊपयुक्त पोषक वातावरणाचा शोध देखील घेणार आहेत तसेच भुगर्भातील आणी भुमीवरील माहितीचा शोध घेत पुढे,पुढे मार्गक्रमण करत आहेत
ह्या Novel सिरीजच्या माध्यमातून नासा संस्था आर्टिमस मोहिमेतील युवा पिढीला संशोधन करण्यासाठी प्रेरित करत आहे शिवाय भविष्यकालीन आर्टिमस मोहीमेतील अंतराळवीर जेव्हा प्रत्यक्षात चंद्रावर पोहोचतील तेव्हा त्यांना देखील हि माहिती ऊपयोगी पडेल असे नासाचे Administrator Bill Nelson म्हणतात ",नासा नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सर्वांना अर्टीमस मोहिमेत सहभागी होण्याची संधी देते नासाचे अंतराळवीर नवनवीन मोहिमेद्वारे अंतराळविश्वातील मर्यादा ओलांडून प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण करत मानवाला अज्ञात असलेल्या गोष्ठीचा शोध घेत असतात नासा संस्था आर्टिमस मोहिमेतील महिला अंतराळविराला चंद्रभुमीवर पहिले पाऊल ठेवण्याचा मान देत आहे कारण आजवर नासाच्या अंतराळविश्वातील अंतराळमोहिमेत अनेक कर्तृत्ववान महिलांनी सहभाग नोंदवला आहे आणी कठीण परिस्थितीचा सामना करत संकटावर मात करून नासाची अंतराळ मोहीम यशस्वी करण्यास हातभार लावला आहे त्या सर्वांचे प्रातिनिधित्व करण्यासाठी हा सन्मान नासा संस्था करत आहे नासा संस्थेच्या ह्या मोहिमांचा उपयोग भविष्यकालीन भावी शास्त्रज्ञांना संशोधनासाठी होईल आम्ही नेहमीच आर्टीमस पिढीतील युवा संशोधकांना प्राधान्य देतो कथेतील नायिका अंतराळवीर Callie चांद्रमोहिमेत चंद्रावर पोहचली आहे आणि तिथे तिचे संशोधनही सुरु झाले आहे हि कथा आपल्याला आजवर कोणीही न केलेल काम करण्यासाठी प्रेरित करते आणि ह्या जगात अशक्य काही नाही फक्त इच्छा आणि ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करताना संकटावर मात करून यश प्राप्त करण्याची जिद्द हवी हे सूचित करते आणि आता नासाच्या आर्टीमस मोहिमेतील पहिली महिला अंतराळवीर जेव्हा चांद्रभूमीवर पहिले पाऊल ठेवेल तेव्हा ती जगभरासाठी प्रेरणादायी ठरेल !"
जेव्हा वाचक शेवटचे Callie ला भेटले तेव्हा ती आणि तिचा रोबो RT चंद्रावरील lava बोगद्यात आश्रय घेत होते आता पुढे काय होणार? हे जाणून घेण्याची उत्सुकता वाचकांना आहे First Woman Dream To Reality Novel सिरीजच्या दुसऱ्या भागाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे देशविदेशात Novel सीरिजच्या जवळपास 100,000 प्रती वितरित झाल्या आहेत आणि डिजिटली 300,000 दर्शकांची पसंती मिळाली आहे
No comments:
Post a Comment