Ingenuity मार्स हेलिकॉप्टर मंगळावरील आकाशात 62 वे उड्डाण करताना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -(JP.L Lab)- 13 ऑक्टोबर
नासाच्या Perseverance मंगळयानासोबत मंगळ ग्रहावर पोहोचलेल्या Ingenuity mars हेलिकॉप्टरने मंगळावरील आकाशात 62 वी यशस्वी भरारी मारली आहे
12 आक्टोबरला मंगळावरील आकाशात 18 मीटर उंचीवरून ऊड्डाण करताना Ingenuity हेलिकॉप्टरचा वेग 10m/s होता आणी Ingenuity समांतर रेषेत उड्डाण करत होते Ingenuity हेलिकॉप्टरने केवळ 119.30 सेकांदात 268 मिटर अंतर पार केले Ingenuity हेलिकॉप्टर उड्डाणासाठी ऊत्तर दिशेला आकाशात झेपावले आणी उड्डाण पुर्ण करून Ingenuity हेलिकॉप्टर मंगळ भूमीवरील पूर्वेला असलेल्या Airfield ह्या भागात खाली ऊतरले
शास्त्रज्ञांनी मंगळावरील आकाशात फक्त पाच ऊड्डाणासाठी Ingenuity मार्स हेलिकॉप्टरचे डिझाईन केले होते पण शास्त्रज्ञांचा अंदाज फोल ठरवत Ingenuity हेलिकॉप्टर सतत स्वयंचलित यंत्रणेने कार्यरत राहून मंगळावरील आकाशात यशस्वी भरारी मारत आहे आणी Ingenuityच्या यशस्वी ऊड्डाणामुळे शास्त्रज्ञ चकीत होत आहेत हे ऊड्डाण करतानाच Ingenuity हेलिकॉप्टरला बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक कॅमेऱ्याच्या सहाय्याने त्या भागातील फोटो,संशोधीत माहिती आणी व्हिडीओ काढुन Perseverance यानाला आणि पृथ्वीवरील शास्त्रज्ञांना मंगळावरील संशोधनात मदत करत आहे
10 एप्रिल 2021 पासून मंगळावरील आकाशात Ingenuity एकामागून एक ऊड्डाणे यशस्वी करत असुन शास्त्रज्ञ Ingenuity हेलिकॉप्टरची कार्यक्षमता पाहून प्रेरित होत आहेत आणी आता Ingenuity च्या 63 व्या ऊड्डाणाची तयारी करीत आहेत
No comments:
Post a Comment