Thursday 30 November 2023

नासाच्या CHAPEA मिशन मधील धाडसी नागरिकांचे 150 दिवस पुर्ण Thanks giving day साजरा

  नासाच्या CHAPEA-1 मोहिमेतील सहभागी धाडसी नागरिक Thanks giving day निमित्त भाजीचे डेकोरेशन करुन शुभेच्छा देताना -फोटो -नासा संस्था

 नासा संस्था - 9 ऑक्टोबर  

नासाच्या  CHAPEA मोहिमे अंतर्गत पृथ्वीवरील कृत्रिम मंगळभूमीत एक वर्षाच्या वास्तव्यासाठी गेलेल्या आणी भविष्यकालीन मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांचे प्रातिनिधित्व करणाऱ्या चार धाडसी नागरिकांनी ह्या कृत्रिम मंगळ निवासातील नुकतेच 150 दिवस पूर्ण केले आहेत

 25 जूनला ह्या मोहिमेतील पहिल्या ग्रुप मधील कमांडर Kelly Haston  -(Research Scientist), Flight  Engineer- Ross Brockwell-, Medical Officer -Nanthan Jones आणी Microbiologist -Anca Selariu  हे चार धाडसी निवडक उमेदवार एक वर्षाच्या वास्तव्यासाठी ह्या पृथ्वीवरील कृत्रिम मंगळ सृष्टीत राहायला गेले होते नासाच्या CHAPEA मिशन अंतर्गत शास्त्रज्ञ निर्मित कृत्रीम मंगळभुमी मध्ये रहायला गेलेल्या पहिल्या ग्रुप मधील चार ऊमेदवारांनी ह्या भूमीतील वास्तव्याचे 150 दिवस पुर्ण केले आहेत नुकताच त्यांनी  ह्या कृत्रीम मंगळभुमीत Thanks giving day देखील साजरा केला त्या साठी सर्वांनी एकत्र जेवण केले त्यांनी तीथे ऊपलब्ध असलेल्या हिरव्या भाज्या,टोमॅटो आणी रंगीत सिमला मिरचीचा ऊपयोग करून डेकोरेशन केले आणी सर्वांना डेकोरेशन मधून Happy Thanks Giving Day निमित्त शुभेच्छा दिल्या ह्या शुभेच्छा त्यांनी सोशल मीडिया वरून शेअर केल्या आहेत

नासाच्या Crew Health & Performance Exploration Analog (CHAPEA) मोहिमे अंतर्गत नासाच्या J.PL lab मध्ये शास्त्रज्ञांनी कृत्रिम मंगळ भूमी निर्माण केली आहे नासाचे मंगळ मोहिमेतील अंतराळवीर प्रत्यक्ष मंगळावर जाण्याआधी आणि तिथे भविष्यकालीन मानवी वसाहत निर्माण करण्याआधी मंगळा सारखे वातावरण आणि भूमी असलेल्या ह्या शास्त्रज्ञ निर्मित मंगळभूमीत राहिल्यावर मानवी शरीरावर,आरोग्यावर काय परिणाम होतो हे संशोधित करण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे ह्या प्रयोगशील उपक्रमात सहभागी होऊन ह्या कृत्रिम मंगळ भूमीत एक वर्ष राहण्यासाठी धाडसी नागरिकांना नासा संस्थेने संधी उपलब्ध केली होती ह्या अभिनव उपक्रमा अंतर्गत निवड झालेल्या चार शिकाऊ अंतराळवीरांचा समावेश असलेले तीन ग्रुप तयार करण्यात आले होते

No comments:

Post a Comment