नासाच्या मोहीम 70 चे अंतराळवीर कमांडर अंतराळवीर Andreas Mogensen,Jasmin Moghbeli, Loral O'Hara,Nikolai Chub,Konstantin Borisov,Oleg Kononenko,Satoshi Furukawa एकत्रित संवाद साधताना -फोटो नासा संस्था
नासा संस्था -14 डिसेंबर
सहा डिसेंबरला अंतराळस्थानकाने 25व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे त्या निमित्ताने नासा संस्थेतील मान्यवरांनी सध्या स्थानकात रहात असलेल्या मोहीम 70 च्या अंतराळवीरांसोबत लाईव्ह संवाद साधुन त्यांना स्थानकाच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या त्या वेळी त्यांना काही प्रश्नही विचारण्यात आले तेव्हा त्यांनी अंतराळवीर Frank Rubio ह्यांच्या हातुन हरवलेला टोमॅटो सापडल्याचे सांगितले
अंतराळवीर Frank Rubio ह्यांनी तोडलेले पण नंतर सापडलेले व्हेजी चेंबर मधील टोमॅटो -फोटो -नासा संस्थानासाचे अंतराळवीर वेगवेगळ्या मोहिमेअंतर्गत अंतराळस्थानकात रहायला जातात त्यांच्या तेथील वास्तव्यात त्यांना पृथ्वीसारखे ताजे पोषक अन्न आणी भाजी खायला मिळत नाही त्यांना पृथ्वीवरून प्रिझर्व केलेले फ्रोझन अन्न व भाज्या खाव्या लागतात त्यांना ईथल्या सारखे ताजे अन्न व भाज्या खायला मिळाव्यात म्हणून स्थानकात व्हेजी प्रोजेक्ट राबविण्यात येत आहे ह्या व्हेजी प्रोजेक्ट अंतर्गत आतापर्यंत वेगवेगळ्या भाज्या छोटे गहु,चेरी टोमॅटो,मिरचीची रोपे लाऊन ऊगवलेल्या भाज्यांंचा आस्वाद देखील अंतराळवीरांनी घेतला आहे व्हेजी चेंबरमध्ये पृथ्वीसारखी रोपांना पोषक अशी वातावरण निर्मिती करण्यात आली आहे त्यासाठी रंगीत लाईटचा वापर करून ऊजेड,अंधार निर्मिती आणी तापमान नियंत्रण केल्या जाते
अंतराळवीर त्यांच्या संशोधनाच्या कामातून वेळ काढून ह्या व्हेजी चेंबरमधील रोपांची निगा राखतात नासाचे रेकॉर्ड ब्रेकर अंतराळवीर Frank Rubio ह्यांनी स्थानकात 371 दिवस वास्तव्य केले होते अंतराळात जास्त दिवस राहिल्यावर मानवी शरीरावर काय विपरीत परिणाम होतो त्यांच्या शारीरिक मानसिक क्षमतेवर शरीरातील सर्व सिस्टीममध्ये काय बदल जाणवतात,पेशींमध्ये काय बदल होतात ह्या विषयीच्या मानवी संशोधनात ते सहभागी झाले होते त्यांच्या स्थानकातील वास्तव्यात त्यांनी ह्या गोष्टीचे निरीक्षण नोंदवून नमुने गोळा केले शीवाय सायंटिफिक प्रयोग व ईतर कामासोबत त्यांनी व्हेजी प्रोजेक्टमध्ये काम केले मार्चमध्ये ते पृथ्वीवर परतले
हरवलेल्या टोमॅटो बाबत सांगताना ते म्हणाले,"हो माझ्या हातून टोमॅटो हरवला होता मी व्हेजी चेंबरमधील टोमॅटोची कापणी करत होतो तेव्हा एक,दोन टोमॅटो जरा जास्त पिकलेले वाटले म्हणून मी ते दोन टोमॅटो प्लास्टिक पिशवीत घातले आणी velcroआणण्यासाठी गेलो टोमॅटोची पीशवी व्यवस्थीत राहील असे मला वाटले पण मी परत आलो तर पिशवी आणी टोमॅटो गायब झाले होते मी खूप वेळ सर्वत्र ते शोधले पण सापडले नाही सगळ्यांंना वाटल की मी ते टोमॅटो खाल्ले मी त्यांना ते हरवल्याचे सांगितले तरीही कोणीही त्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते मी टोमॅटो खाल्ले नव्हतेच मग ते सिध्द करण्यासाठी मी जवळपास विस तास वाया घालवले पण टोमॅटो सापडले नाहीत पण मला खात्री होती की कधी ना कधी ती टोमॅटोची पिशवी सापडेल मी पृथ्वीवर परतताना सहकारी अंतराळवीरांना ते शोधण्यास सांगितले होते अखेर मोहीम 70 च्या अंतराळवीरांना ते टोमॅटो सापडल्याचे त्यांनी सांगितले आणी मी ते खाल्ले नव्हते ह्याची त्यांना खात्री पटली !"
मोहीम 70 ची अंतराळवीर Jasmin Moghbeli हिने नासा संस्थेतील मान्यवरांशी लाईव्ह संवाद साधताना टोमॅटो सापडल्याचे सांगितले,"आम्हाला व्हेजी चेंबरमध्ये प्लॅस्टिक पीशवीत ते सापडले आमचा सहकारी Good Friend Frank आता पृथ्वीवर परतले आहेत त्यांनी ते टोमॅटो खूप शोधले होते आणी खरेच हरवले होते त्यानीं ते खाल्ले नव्हते हे आता सिद्ध झाले आहे !"
Frank Rubio ह्यांनी VEG-03 प्रोजेक्ट अंतर्गत ह्या चेरी टोमॅटोची लागवड केली होती ह्या X-ROOT प्रोजेक्ट मध्ये Hydroponic,Aeroponic टेक्निकचा वापर करून माती किंवा ईतर आवश्यक गोष्टी न वापरता हि रोपे ऊगवण्यात आली रोपामधील पोषकद्रव्ये वाढविण्यासाठी आणि अंतराळवीरांना आवश्यक व्हिटॅमिन्स मिळावेत म्हणून हा प्रोजेक्ट राबविण्यात आला ह्याचा ऊपयोग दुरवरच्या अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांसाठीही होणार आहे
ह्या सापडलेल्या टोमॅटोत आठ महिन्यानंतरही विशेष फरक पडला नाही ते थोडेसे फिकट रंगाचे चपटे आणी वाळले आहेत त्यावर बुरशीही आली नाही आता हे टोमॅटो पृथ्वीवर परत आणले जाणार नाहीत तिथेच व्हेजी चेंबरमध्ये पुन्हा लागवडीसाठी वापरले जातील आणी अंतराळातील झीरो ग्र्ँव्हिटीतील वातावरणात टोमॅटोमधील जिन्स नवीन टोमॅटोमध्ये कसे ऊतरतात ह्याचे निरीक्षण नोंदवून संशोधन केल्या जाईल
No comments:
Post a Comment