नासाच्या अंतराळ मोहीम 70 चे अंतराळवीर Andreas Mogensen ,Jasmin Moghbeli , Satoshi Furukawa आणि Loral O' Hara नासा संस्थेशी लाईव्ह संवादा दरम्यान ख्रिसमस निमित्य शुभेच्छा देताना -फोटो नासा संस्था
नासा संस्था-23 डिसेंबर
25 डिसेंबरला जगभरात सर्वत्र ख्रिसमस साजरा केला जातो सर्वजण आपल्या कुटुंबियांसोबत,मित्रांसोबत एकत्र येऊन हा सण उत्साहात साजरा करतात पृथ्वीपासून दूर अंतराळातील फिरत्या अंतराळ स्थानकात वास्तव्य करणारे अंतराळवीर मात्र आपल्या कुटुंबियांसोबत हा सण साजरा करू शकत नाहीत पण स्थानकातील झिरो ग्रॅव्हीटीत हे अंतराळवीर स्थानकातील सहकारी अंतराळवीरांसोबत एकत्र येऊन हा सण साजरा करतात सध्या अंतराळ स्थानकात रहात असलेले नासाच्या अंतराळ मोहीम 70 चे अंतराळवीर Jasmin Moghbeli आणि Loral O Hara युरोपियन अंतराळवीर Andreas Mogensen जपानचे अंतराळवीर Satoshi Furukava ह्यांनी नासा संस्थेशी लाईव्ह संवाद साधताना पृथ्वीवासीयांना ख्रिसमस निमित्य शुभेच्छा दिल्या आहेत त्या वेळी संवाद साधताना
अंतराळवीर Jasmin Moghbeli म्हणाल्या ,
" माझ्यासाठी ख्रिसमस सण विषेश आहे माझ्या आयुष्यातील सुंदर क्षण मला तुमच्याशी शेअर करावयाचे आहेत त्याच दिवशी मी व माझे पती एकमेकांना प्रथम भेटलो आम्ही दोघेही दरवर्षी हा सण साजरा करतो आम्ही वेगवेगळ्या संस्कृतीत वाढलो पण आम्ही दोघेही आमचे सण वेगवेगळ्या पध्दतीने साजरे करून दोन्ही संस्कृतीचे जतन करतो आम्ही दरवर्षी आमच्या दोन छोट्या मुलींसोबत हे सण साजरे करतो आणि त्यांच्यामध्ये दोन्ही संस्कृती रूजवतो आमच्या भेटिच्या क्षणाची आठवण देणारा हा क्षण माझ्यासाठी म्हणूनच स्पेशल आहे आमच नात जस स्पेशल आहे तसच, सर्व जातीधर्माचे वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक एकत्र येत ख्रिसमस साजरा करतात हा सण सर्वांना आनंद देणारा आहे ह्या वर्षी मी माझ्या कुटुंबीयांसोबत हा सण साजरा करत नसले तरीही ईथे स्थानकात आम्ही सर्वजण तो साजरा करणार आहोत!"
"Happy Christmas !"
Loral O Hara-
माझ्यासाठी ख्रिसमसची सुट्टी आणी हा सण म्हणजे सर्व कुटुंबीय एकत्र येण्याचा क्षण ह्या वर्षी प्रथमच मी कुटुंबीयांशीवाय हा सण साजरा करणार आहे पण मी Super Excited आहे कारण मी ईथे स्थानकातील झीरो ग्रव्हिटीत माझ्या सहकारी अंतराळवीरांसोबत हा सण साजरा करणार आहे आणी हि आमची Space Family आहे स्थानकातील वास्तव्यात वेगवेगळ्या देशातील,संस्कृतीतील अंतराळवीर एकत्र येऊन हा सण साजरा करतात तेव्हा पृथ्वीवरील विविधतेची,संस्कृतीची ओळख होते जागतिक एकतेची जाणीव होते जगाकडे पहाण्याचा नवा दृष्टीकोन आणी नवी प्रेरणा मिळते असाच दृष्टिकोन आणि मानवतेची जाणीव पृथ्वीवासीयांना व्हावी असे मला वाटते
Satoshi Furukawa
"जपानमध्ये देखील नववर्षाच्या शुभारंभाला सर्वजण एकत्र जमतात धार्मिक स्थळांना भेटी देतात येणारे वर्ष आनंदी आणी सुखाचे जावे म्हणून सर्वजण प्रार्थना करतात ईथुन स्थानकातुन मी पृथ्वीवासीयांना ख्रिसमसच्या आणि नवीन वर्ष शेवटपर्यंत सुखाचे आणी आनंदी जावे अशी शुभेच्छा देतो !
Andreas Mogensen
"मी देखील ख्रिसमस हा सण माझ्या कुटुंबियांसोबत दरवर्षी साजरा करतो पण ह्या वर्षी मी माझ्या कुटुंबीयांसोबत नसलो तरीही ईथे मला माझ्या स्थानकातील Space Family सोबत हा सण साजरा करायला मिळणार आहे त्यासाठी नासा संस्थेचे आणी संस्थेतील सर्वांचे आभार आम्ही जेव्हा स्थानकातुन खाली पृथ्वीकडे पहातो तेव्हा ती शांत समृद्ध दिसते मला आशा आहे की,जगातील सर्व देशातील लोकांच्या सहकार्याने एकत्रीतपणे अशीच शांतता पृथ्वीवर प्रस्थापित होईल जगभरातील लोकांनी जर असे करायचे ठरवले तर एकमेकातील वितुष्टता जाऊन सर्वत्र शांतता निर्माण होईल मानवाने ठरवले तर काहीच अशक्य नाही ! आमच्या सर्वांकडून नासा संस्था आणि पृथ्वीवासीयांना ख्रिसमस निमित्य शुभेच्छा !"
Wish you happy Merry Christmas & Happy New Year !
No comments:
Post a Comment