भारताच्या चांद्रमोहीम -3 मधील विक्रम चांद्रयान चांद्रभूमीवर सुरक्षितपणे उतरून स्थिरावल्यानंतर -फोटो -इसरो संस्था
ईसरो संस्था -24 ऑगस्ट
भारताच्या चांद्रमोहिम -3 अंतर्गत चंद्रावर गेलेले विक्रम चांद्रयान बुधवारी चंद्रावर सूखरूप पोहोचले आणी संद्याकाळी 6 वाजुन 4 मिनिटांनी चंद्रभुमीवर सुरक्षीतपणे खाली ऊतरले विक्रम चांद्रयानाने हि मोहीम यशस्वी करत चंद्राच्या दक्षीण भागात चांद्रयान ऊतरवणारा पहिला देश म्हणून भारताची विक्रमी नोंद केली आहे विक्रम चांद्रयान चंद्रावर पोहोचताच ईसरोचे अध्यक्ष S Somanath ,चांद्रमोहिम 3 मधील प्रमुख शास्त्रज्ञ आणी सारे कर्मचारी आनंदित झाले विक्रम चांद्रयान चंद्रावर पोहोचताच यानाने पृथ्वीवरील ईस्रो संस्थेशी लाईव्ह संपर्क साधत " I reached my destination and you also !" असे ट्वीट केले चांद्रयान चांद्रभूमीवर स्थिरावताच काही तासानंतर विक्रम चांद्रयानातुन प्रज्ञान रोवर देखील बाहेर पडले आणी कार्यान्वित झाले विक्रम चांद्रयानाने चंद्राच्या कक्षेत फिरतानाच चंद्रभुमीवरील फोटो व व्हिडीओ काढून पृथ्वीवर पाठवणे सुरू केले होते विक्रम चांद्रयान चंद्रभुमीवर ऊतरताना ऊतरल्यावर आणी प्रज्ञान रोवर यानातुन बाहेर पडतानाचा व्हिडीओ देखील विक्रम चांद्रयानाने लगेचच पृथ्वीवर पाठवला आहे
विक्रम चांद्रयान 14 जुलैला ईस्रोच्या श्रीहरीकोटा येथील ऊड्डाण स्थळावरून चंद्रावर जाण्यासाठी अंतराळात झेपावले आणी 41 दिवसांनी चंद्रावर पोहोचले ह्या आधीच्या चांद्रमोहिम 2 मधील विक्रम चांद्रयान चंद्रावर ऊतरताना नष्ठ झाले होते आणी दोन दिवस आधीच रशियाचे लुना चांद्रयान देखील चांद्रभूमीवर ऊतरताना नष्ठ झाले त्यामुळे ह्या वेळेस विक्रम चांद्रयान चंद्रावर सुरक्षीतपणे खाली ऊतरेल की नाही ह्या बद्दल ईस्रोचे अध्यक्ष आणी ह्या मोहिमेचे प्रमुख शास्त्रज्ञ S.Somanath आणी त्यांची टिम सांशक होती पण अखेर हि मोहीम यशस्वी करत विक्रम चांद्रयान सुरक्षीतपणे चंद्रभुमीवर खाली ऊतरले
ईस्रो संस्थेतील शास्त्रज्ञांनी विक्रम चांद्रयान चंद्राच्या कक्षेत शिरताच चांद्रयान चंद्रभुमीवर ऊतरवण्याची तयारी सुरू केली होती सारी यंत्रणा सज्ज होती चांद्रयान चंद्रभुमीवर ऊतरण्याआधी चंद्राच्या कक्षेत फिरत होते आणी चंद्रावर ऊतरण्यासाठी योग्य जागेचे निरीक्षण करत होते योग्य जागा सापडताच विक्रम चांद्रयानातील स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित झाली चांद्रयानाने चंद्रभुमीवर ऊतरण्यासाठी वेगावर नियंत्रण ठेवत चंद्रभुमीच्या दिशेने झेप घेतली तेव्हा टिममधील शास्रज्ञ सर्तक झाले त्यांचे लक्ष यानावर केंद्रित झाले जसजसे विक्रम यान खाली खाली येत होते तसतशी शास्त्रज्ञांची ऊत्कंठा वाढत होती यानाने नियोजीत प्रक्रिया पार पाडताच सर्वजण टाळ्या वाजवत आनंद व्यक्त करत होते अखेरची प्रक्रिया पार पाडत यानाने स्थीती बदलली आणी वेग कमी करत उभ्या स्थितीत चंद्रभुमीवर सुरक्षीतपणे खाली ऊतरत जमीनीला स्पर्श केला तेव्हा ईस्रो संस्थेत सर्वांनी जल्लोष केला S.Somanath त्यांंचे सहकारी कर्मचारी निश्चिंत झाले त्यांच्या चेहऱ्यावर कर्तव्यपुर्तीचा आनंद दिसत होता ईस्रोतील चांद्रमोहिम 3 मधील शास्त्रज्ञ,ईंजीनिअर्स,तत्रंज्ञ,कर्मचारी साऱ्यांंनीच ऊभे राहून टाळ्या वाजवत हा क्षण अनुभवला
हि मोहीम यशस्वी होताच ईस्रोचे अध्यक्ष S.Somanath ह्यांनी चांद्रमोहिम यशस्वी झाल्याची अधिकृत घोषणा केली आणी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले," हे यश टिममधील सर्वांचे आहे गेल्या चार वर्षापासून सर्वजण ह्या मोहीमेसाठी रात्रंदिवस काम करत होते दैनंदिन व्यवहार करताना,खाताना,पितानाच नाही तर श्वास घेताना देखील ते हि मोहीम यशस्वी करण्याच्याच विचारात होते त्यांच्या सहकार्यामुळे अथक परीश्रमामुळे हे यश प्राप्त झाले आहे त्यामुळे त्यांचे अभिनंदन ! आधीच्या चांद्रयान 2 मोहिमेतील त्रुटी दुर करून ह्या मोहिमेत काही आवश्यक बदल करण्यात आले होते पण तरीही विक्रम चांद्रयान चंद्रभुमीवर ऊतरेपर्यंत आम्ही चिंतीत होतो पण अखेर हि मोहीम यशस्वी झाली आमच्यासाठी हा ऐतिहासिक क्षण अनमोल आहे पंतप्रधान मोदींनी परवानगी देऊन सहकार्य केल्यामुळे हे यश प्राप्त होऊ शकले त्यामुळे त्यांचे आभार
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं अफ्रिकेतील जोहन्सबर्ग येथून लाईव्ह टेलीकास्टद्वारे विक्रम चांद्रयान चंद्रभुमीवर ऊतरतानाच्या सोहळ्यात सहभागी झाले होते चांद्रयान चंद्रभुमीवर ऊतरताच त्यांनी भारताचा तिरंगा फडकावत आनंद साजरा केला त्यांनी हि मोहीम यशस्वी केल्याबद्दल ईस्रो संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ, मोहिमेतील सहभागी शास्त्रज्ञ आणी सर्व कर्मचाऱ्यांंचे अभिनंदन केले ते म्हणाले,"आधीच्या मोहिमेतील अपयशाने खचून न जाता शास्त्रज्ञांनी हि मोहीम यशस्वी करुन देशाचे नाव ऊंचावले आहे विक्रम यानाने देशाच्या ईतिहासात विक्रमी नोंद केली आहे भारताने चंद्राच्या दक्षिण भागात यान ऊतरवुन चांद्रमोहिमेतील यशाच्या वाटेवर प्रथम पहिले पाऊल टाकले आहे हे यश शास्त्रज्ञांच्या आणी टिमच्या अपार मेहनतीने प्राप्त झाले आहे त्या साठी ईस्रो संस्थेतील ह्या टिममधील सर्वांचे अभिनंदन!" माझ्यासाठी हा ऐतिहासिक क्षण अविस्मरणीय आहे!अनमोल आहे! ईस्रो तील ह्या मोहिमेतील सर्वांना पुढील वाटचालीसाठी शूभेच्छा ! देशातील 140 कोटी जनता ह्या ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार आहे सर्व जनतेचेही आभार अंतराळविश्वातील भारताचे भविष्यकालीन यश निश्चित आहे लवकरच भारत चंद्रावर गगनयान मोहिमेत मानव पाठवणार आहे मंगळ,शुक्र मोहिमेची तयारी सुरु आहे आजवर अमेरिका ,रशिया आणि चीनने चंद्रावर यान पाठवून चांद्रमोहीम यशस्वी केली होती आता भारतही यशस्वी चौथा देश झाला आहे
विक्रम चांद्रयान व प्रज्ञान रोवर आता चंद्रभुममीवरील व भुगर्भातील खनिजे,माती,खडकांचे नमुने घेतील चंद्रावरील पुरातन सजीव स्रुष्ठिच्या अस्तित्वाला दुजोरा देणारे पुरावे व पाण्याच्या अस्तित्वाचा शोध घेतील तसेच भविष्यकालीन मानवसहित चांद्रमोहिमेतील अंतराळविरांसाठी रहाण्यायोग्य पोषक वातावरणाचा शोध घेतील तेथील वातावरणाचे निरीक्षण नोंदवून तेथील फोटो व व्हिडिओ प्रुथ्वीवर पाठवतील
No comments:
Post a Comment