नासाचे अंतराळवीर Frank Rubio कझाकस्थानातील Zhezkazgan येथील भूमीवर परतल्यानंतर - फोटो नासा संस्था
नासा संस्था -27 सप्टेंबर
नासाचे अंतराळवीर Frank Rubio आणी रशियन अंतराळवीर Sergey Prokopyev आणी Dimitri Petelin स्थानकात वर्षभरापेक्षाही जास्त काळ वास्तव्य करून पृथ्वीवर परतले आहेत हे अंतराळवीर सोयुझ MS-23 ह्या अंतराळयानातुन बुधवारी 3.54a.m.ला पृथ्वीवर येण्यासाठी निघाले आणी 7.17a.m.ला पृथ्वीवर पोहोचले कझाकस्थानातील Zhezkazgan येथे त्यांचे सोयुझ यान पोहोचले तेव्हा हे तिघेही पॅराशुटच्या सहाय्याने खाली ऊतरले नासाच्या अंतराळ मोहीम 68-69 अंतर्गत 21 सप्टेंबर 2022 मध्ये सोयुझ MS-22 ह्या अंतराळ यानातुन हे अंतराळवीर स्थानकात सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी गेले होते पण त्यांच्या यानात ऐनवेळी बिघाड झाल्याने त्यांचा स्थानकातील मुक्काम वाढला त्यानंतर सोयुझ MS-22 यान पृथ्वीवर रिकामेच परतले होते ह्या अंतराळवीरांना आणण्यासाठी सोयुझ MS-23 हे अंतराळयान फेब्रुवारी 2023 मध्ये स्थानकात पाठविण्यात आले
पण ह्या अंतराळवीरांनी ह्या संधीचा ऊपयोग करत स्थानकात सलग जास्त दिवस रहाण्याचा विक्रम केला नासाचे अंतराळवीर Frank Rubio ह्यांनी स्थानकातील पहिल्याच अंतराळवारीत सलग 371 दिवस वास्तव्य करून विक्रम नोंदवला ह्या आधी नासाच्या Mark Vande Hai ह्यांनी स्थानकात सलग 355 दिवस वास्तव्य करून विक्रम नोंदविला होता रशियन अंतराळवीर Sergey आणी Dimitri ह्यांनी देखील स्थानकात 370 दिवस 21तास आणी 22 मिनिटे वास्तव्य केले हे तिघेही प्रथमच स्थानकात रहायला गेले होते
स्थानकातील वास्तव्या दरम्यान ह्या तिघांनी स्थानकातील संशोधनात सहभाग नोंदवला अंतराळवीर Frank Rubio ह्यांनी स्थानकात जास्त दिवस राहिल्यास मानवी आरोग्यावर काय परिणाम होतात तेथील झीरो ग्रव्हिटितील वातावरणाला शरीर कसा प्रतिसाद देते ह्या विषयीच्या मानवी संशोधनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि वास्तव्या दरम्यान त्यांच्या शारीरिक बदलांचे नमुने घेतले ह्या मानवी संशोधनाचा उपयोग भविष्यकालीन आर्टेमिस मोहिमेतील अंतराळवीरांना आणि मंगळ मोहिमेतील दूरवरच्या मोहमेतील अंतराळवीरांच्या निवासासाठी होणार आहे शीवाय त्यांनी स्थानकात सुरु असलेल्या सायंटिफिक प्रयोगात सहभाग नोंदवला त्यांनी स्थानकातील व्हेजी प्रोजेक्ट अंतर्गत सुरु असलेल्या Plant Research आणी Physical Science Studies मध्ये सखोल संशोधन केले
स्थानकातून निघण्याआधी स्थानकात ह्या अंतराळवीरांचा Farewell ceremony आणि Change Of Command Ceremony पार पडला ह्या वेळी नासा संस्थेने लाईव्ह संपर्क साधून ह्या अंतराळवीरांशी संवाद साधला अंतराळवीर Sergey Prokopyev ह्यांनी कमांडरपदाची सूत्रे अंतराळवीर Andreas Mogensen ह्यांच्याकडे सोपवली त्यांनी नासा संस्था आणि अंतराळवीरांचे आभार मानले भविष्यात संधी मिळाली तर मला इथे पुन्हा यायला आवडेल तुम्हा सर्वांसोबत काम करताना राहताना मजा आली तो काळ ग्रेट होता त्या बद्दल नासा संस्थेचे आभार त्यांच्या मुळेच हि संधी मिळाली त्यांनी वेळोवेळी कठीण प्रसंगी आम्हाला मार्गदर्शन केले
Andreas Mogensen ह्यांनी मोहीम 70 चे कमांडर पद स्वीकारत अंतराळवीर Sergey ह्यांचे आभार मानले "तुमच्याकडून कमांडरपद घेताना स्थानकाची जबाबदारी स्वीकारणे हा माझा बहुमान आहे मला अभिमान वाटतोय तुम्ही तिघांनी खूप काळ इथे व्यतीत केला आहे त्या काळात ओढवलेल्या कठीन प्रसंगावर मात करून शांततेने धीराने परिस्थीती हाताळलीत तुमच धैर्य आणी Professionalism आम्हाला मार्गदर्शक ठरेल तुम्ही खूप ग्रेसफुली हि परस्थिती हाताळली तुम्ही सहा महिन्यांनी परतणार म्हणून तुमचे कुटुंबीय आनंदात असताना अचानक तुमचा मुक्काम आणखी सहा महिने वाढल्याचे कळताच त्यांची मनःस्थिती कशी झाली असेल ह्याची कल्पना येते पण त्यांनी देखील संयमाने हि परिस्थिती हाताळली तुमचे हे कौश्यल्य वाखाणण्याजोगे आहे त्याही परिस्थितीत तुम्ही स्थानकाची जबाबदारी उत्तम पार पाडली ह्या दरम्यान स्थानकात आलेल्या 15 अंतराळयान त्यातुन आलेले अंतराळवीर आणि कार्गोशिपचे स्वागत केले त्यांच्या पृथ्वीवर परतण्यासाठी मदत केलीत अंतराळवीर Dimitri आणि Sergey ह्यांनी सहावेळा तर Frank ह्यांनी तीनवेळा स्पेसवॉक केले तुमच्या वास्तव्या दरम्यान 28 अंतराळवीरांसोबत राहून एकत्र संशोधन केले तुमची कामाप्रती निष्ठा आणि कठीण प्रसंगातील हार्डवर्क आम्हाला प्रेरणादायी ठरेल इथल्या झिरो ग्रॅव्हीटीत तरंगत्या अवस्थेत एक वर्ष राहताना अंतराळवीरांची संख्या वाढल्यानंतरही संयमाने संशोधन करण्याची वृत्ती निश्चितच गौरवास्पद आहे मला आशा आहे तुम्ही जसे इथे आलात तशाच चांगल्या कंडीशन मध्ये परतत आहात तुमच्या स्मूथ आणि सुरक्षित लँडिंग साठी शुभेच्छा !"
त्या नंतर हे अंतराळवीर पृथ्वीवर येण्यासाठी निघाले पृथ्वीवर परतल्यानंतर ह्या तीनही अंतराळवीरांना नासाच्या रिकव्हरी टीमने यानातून बाहेर काढले आणि त्यांना प्राथमिक चेकअप साठी नेण्यात आले काही वेळाने अंतराळवीर Frank Rubio ह्यांना नासाच्या विमानाने Huston येथे पोहोचविण्यात आले आणि रशियन अंतराळवीरांना कझाकस्थानातील Karaganda येथे पोहोचविण्यात आले
No comments:
Post a Comment