Friday 29 September 2023

OSIRIS-REX अंतराळयानाने Bennu बटु ग्रहावरुन आणलेल्या नमुन्यांच्या कुपी पृथ्वीवर पोहोचल्या

 A desert landscape, sandy with tufts of green shrubs, is pictured here. In the middle of the image is a dark, cone-shaped object. To its left is an orange and white clump of fabric.

 OSIRIS-REX अंतराळ यानातून Bennu ह्या बटू ग्रहावरील गोळा केलेल्या नमुन्यांच्या कुपी पृथ्वीवर पोहोचल्यानंतर -फोटो नासा संस्था

नासा संस्था -25 सप्टेंबर 

नासाच्या OSIRIS -REX अंतराळयानाने Bennu ह्या बटु ग्रहावरुन गोळा केलेल्या दगड मातीच्या नमुन्यांंच्या कुपी सुरक्षितपणे पृथ्वीवर ऊतरवल्या आहेत रविवारी सकाळी 8 .52 मिनिटांनी Salt Lake City येथील Defense Training Range Utah येथील वाळवंटी प्रदेशात ह्या कुपी पोहोचल्या  OSIRIS अंतराळयानाने प्रुथ्वीच्या कक्षेत प्रवेश करून पँराश्युटच्या सहाय्याने त्या खाली ऊतरवल्या                       

हे नमुने 24 सप्टेंबरला पृथ्वीवर पोहोचल्यावर दीड तासाने नासाच्या OSIRIS मोहमेतील टिमने हे नमुने हॅन्गरच्या सहाय्याने ऊचलुन तात्पुरते ट्रेनिंग रेंजमध्ये नेले तेथील लॅब मधील Clean room मध्ये ह्या कुपींच्या कंटेनरवर सतत नायट्रोजनचा फवारा मारण्यात आला नायट्रोजनच्या फवारा मारल्याने ह्या कुपीतील नमुन्यांवर वातावरणातील ईतर वायू व रोगजंतूंचा संसर्ग न होता त्या मुळ स्वरुपात रहाण्यास मदत होते त्या नंतर ह्या नमुन्यांच्या कुपी 25 सप्टेंबरला नासाच्या Aircraft मधून Johnson Space Center Huston मध्ये पोहोचविण्यात आल्या आणी त्यानंतरच ह्या नमुन्यांच्या कुपी बाहेर काढण्यात आल्या 

 

Department of Defense Utah Test and Training Range मधील Clean room मध्ये नमुन्यांच्या कुपी हाताळताना नासाचे शास्त्रज्ञ -  फोटो- नासा संस्था

 Bennu ह्या बटुग्रहाचा शोध 1999 मध्ये अपोलो मोहिमेतील अंतराळवीरांनी Linear project दरम्यान लावला Bennu हा अंतराळात तरंगणाऱ्या सौरमालेतील ऊल्कापिंडा पैकी एक बटुग्रह आहे सौरमालेतील ग्रहांच्या निर्मितीच्या वेळी 4.5 मिलीयन वर्षांपूर्वी ब्रम्हांंडातील घडामोडी दरम्यान ह्या ग्रहाची निर्मिती झाली असल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे Bennu हा ग्रह अंतराळातील निखळलेल्या ग्रहांच्या दगड व मातीने बनलेला आहे हा ग्रह कार्बन समृध्द आहे आणी तेथील माती सृष्ठीच्या उत्पत्तीसाठी आवश्यक घटकांनी युक्त आहे  अशी माहिती शास्त्रज्ञांना संशोधनाअंती मिळाली होती Bennu ची निर्मिती देखील सौरमालेतील ग्रहांसोबतच झाली असली तरी पृथ्वीवर सजीव सृष्टी निर्माण झाली पण Bennu वर नाही म्हणून ह्या दगड मातीचे सखोल संशोधन केल्यास पृथ्वीच्या निर्मितीच्या वेळची आधीची परीस्थिती कशी होती सृष्ठिची निर्मिती कशी झाली तसेच सजीवांच्या जीवनासाठी आवश्यक वातावरण आणी पाण्याच्या निर्मितीचे गुढ ऊलगडण्यास मदत होईल असे शास्त्रज्ञांना वाटते त्यासाठी OSIRIS-REX  मोहीम राबविण्यात आली

8 सप्टेंबर 2016 ला OSIRIS-REX हे अंतराळयान Bennu ग्रहाच्या दिशेने अंतराळ प्रवासास निघाले आणी 3डिसेंबर 2018 मध्ये Bennu जवळ पोहोचले 20 आक्टोबर 2020-21 मध्ये OSIRIS अंतराळयानाने अंतराळयानाला बसविलेल्या स्वयंचलित यंत्रणेने कार्यरत होऊन तेथील भूमीवरील नमुने गोळा करण्यास सुरुवात केली ह्या यानाच्या रोबोटिक आर्म व त्याच्या टोकाला जोडलेल्या TAGSAM (Touch and go Sample Acquisition Mechanism) ह्या ऊपकरणाच्या सहाय्याने तेथील जमीन खोदून खडक आणी माती ऊचलुन कुपीत जमा करून सीलबंद करण्याचे काम यशस्वी केले आणी एप्रिल 2021मध्ये काम पुर्ण करून पुन्हा पृथ्वीच्या दिशेने निघाले ह्या सॅम्पलच्या कुपीमध्ये 250 ग्रॅम माती व खडकांचे नमुने आहेत हे नमुने आता जगभरातील शास्त्रज्ञांना वितरित करण्यात येणार असून शास्त्रज्ञ त्यावर सखोल संशोधन करतील  

नासाची परग्रहावरील नमुने गोळा करून पृथ्वीवर पोहोचवण्याची हि पहिलीच मोहीम यशस्वी झाल्यानंतर नासाचे Administrator Bill Neson आनंदित झाले आहेत त्यांनी OSIRIS मोहिमेतील टिमचे अभिनंदन केले ते म्हणाले ,"ह्या टिममधील शास्त्रज्ञांनी हि मोहीम यशस्वी करण्यासाठी अनेक वर्षे अहोरात्र परीश्रम केले आणी परग्रहावरील अंतर्गत भागातील नमुने गोळा करण्यात यश मिळवले आहे नासाने अंतराळ विश्वातील हे यश संपादन करून मानवाला ह्या विश्वात अशक्य असे काही नाही फक्त त्यासाठी अथक परीश्रम व जिद्द आवश्यक आहे हे दाखवून दिले आहे आता आणखी सखोल संशोधन केल्यानंतर Bennu ग्रह आणी सौरमालेतील ईतर ग्रह ह्यांच्यतील फरक कळेल आणी सौरमालेतील ग्रहनिर्मिती आणी पृथ्वीच्या ऊगमाचे रहस्य ऊलगडेल Bennu हा ग्रह कसा आहे पृथ्वी  साठी घातक आहे का? तो नष्ठ होताना पृथ्वीच्या कक्षेत शिरून पृथ्वीला घातक ठरेल का ? तेही कळेल कारण शास्त्रज्ञांच्या मते हा बटुग्रह जर पृथ्वीवर आढळला तर मोठा खड्डा पडेल आणि पाण्यात पडला तर त्सुनामी येईल ह्या बाबतीत शास्त्रज्ञ आता सखोल संशोधन करतील !"

OSIRIS मोहीमेचे Arizona University येथील Principal Investigator Dante Lauretta ह्यांनी देखील टिममधील सर्वांचे अभिनंदन केले ते म्हणाले,"हे यश आमच्या टिममधील सर्वांच्या अथक परीश्रमाचे फळ आहे हे यश अंतराळविश्वात मैलाचा दगड ठरेल आता अज्ञानाचा अंध:कार दुर होऊन यशाच्या दिशेने मार्गक्रमण सुरू झाले आहे ब्रम्हांंडातील मानवाला अज्ञात अशा गोष्टींंचा शोध घेताना अनेक वर्षे बिलीयन मैलांचा अंतराळ प्रवास करुन OSIRIS यानाने Bennu ग्रहावरील भूमी खोदून खडक मातीचे नमुने गोळा केले आणि ते व्यवस्थित कुपीत भरून सीलबंद केले आणी पॅराशूटच्या सहाय्याने सुरक्षितपणे खाली पृथ्वीवर ऊतरवले आहेत हे ह्या मोहिमेतील टीमचे असामान्य कर्तृत्व आहे  हा ऐतिहासिक क्षण आम्हा सर्वांसाठी मोलाचा आहे आम्ही आनंदीत आहोत नासा संस्थेतर्फे ह्या नमुन्यांच्या कुपी पृथ्वीवर पोहोचण्याच्या घटनेचे लाईव्ह प्रसारण करण्यात आले होते हा सोहळा प्रत्यक्ष पहाण्याची संधी देखील देण्यात आली होती त्याला नागरिकांनी ऊत्स्फुर्त प्रतिसाद दिला

No comments:

Post a Comment