नासाच्या CHAPEA-1 मोहिमेतील सहभागी धाडसी नागरिक -फोटो -नासा संस्था
नासा संस्था - 9 ऑक्टोबर
नासाच्या CHAPEA मोहिमे अंतर्गत पृथ्वीवरील कृत्रिम मंगळभूमीत एक वर्षाच्या वास्तव्यासाठी गेलेल्या आणी भविष्यकालीन मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चार धाडसी नागरिकांनी ह्या कृत्रिम मंगळ निवासातील नुकतेच शंभर दिवस पूर्ण केले आहेत
नासाच्या Crew Health & Performance Exploration Analog (CHAPEA) मोहिमे अंतर्गत नासाच्या J.PL lab मध्ये शास्त्रज्ञांनी कृत्रिम मंगळ भूमी निर्माण केली आहे नासाचे मंगळ मोहिमेतील अंतराळवीर प्रत्यक्ष मंगळावर जाण्याआधी आणि तिथे भविष्यकालीन मानवी वसाहत निर्माण करण्याआधी मंगळा सारखे वातावरण आणि भूमी असलेल्या ह्या शास्त्रज्ञ निर्मित मंगळभूमीत राहिल्यावर मानवी शरीरावर,आरोग्यावर काय परिणाम होतो हे संशोधित करण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे ह्या प्रयोगशील उपक्रमात सहभागी होऊन ह्या कृत्रिम मंगळ भूमीत एक वर्ष राहण्यासाठी धाडसी नागरिकांना नासा संस्थेने संधी उपलब्ध केली होती ह्या अभिनव उपक्रमा अंतर्गत निवड झालेल्या चार शिकाऊ अंतराळवीरांचा समावेश असलेले तीन गृप तयार करण्यात आले होते
25 जूनला ह्या मोहिमेतील पहिल्या गृप मधील कमांडर Kelly Haston -(Research Scientist), Flight Engineer- Ross Brockwell-, Medical Officer -Nanthan Jones आणी Microbiologist -Anca Selariu हे चार धाडसी निवडक उमेदवार एक वर्षाच्या वास्तव्यासाठी ह्या पृथ्वीवरील कृत्रिम मंगळ सृष्टीत राहायला गेले होते नासा संस्थेतील ह्या मोहिमेतील प्रमुख Grace Douglas, Director-Vanessa Weik ,Judy Hayes (Human health & Performance Director ) ह्यांच्या उपस्थितीत ह्या चार उमेदवारांना ह्या Mars Habitat मध्ये एक वर्षासाठी बंदिस्त करण्यात आले होते
Mars Dune Alpha मधील वास्तव्या दरम्यान Nathan Jones ह्यांनी Anca Selariu ह्यांचा पहिल्यांदा हेअरकट केला तो क्षण -फोटो -नासा संस्था
भविष्यकालीन मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांच्या मंगळभुमीवरील वास्तव्यासाठी हा मोहीमपुर्व अभिनव प्रयोग राबविण्यात येत आहे त्यामुळे ह्या धाडसी नागरिकांना नासाच्या JPL Lab मधील शास्त्रज्ञ निर्मित कृत्रीम मंगळभुमीवरील मंगळ निवासात बंदिस्त करण्यात आले आहे मंगळ मोहिमेतील अंतराळवीर जेव्हा मंगळावर जातील तेव्हा त्यांना पृथ्वीपासून आणी त्यांच्या कुटुंबियांपासून दुर रहावे लागेल म्हणून ह्या अंतराळवीरांचे प्राथिनिधित्व करणाऱ्या धाडसी नागरिकांना देखील पृथ्वीवरील लोकांपासून त्यांच्या कुटुंबीयांपासुन दुर ठेवण्यात आले आहे फक्त नासा संस्थेतील ह्या मोहिमेतील प्रमुख त्यांच्या संपर्कात आहेत
JPL Lab मधील ह्या कृत्रीम मंगळवासातील शंभर दिवसांच्या वास्तव्यादरम्यान त्यांना आलेल्या शारीरिक,मानसिक समस्या,त्यावर मात करून त्यांनी केलेले संशोधन,रोबोटिक Operations, Personal Hygiene,Space Walk,आणी त्यांनी केलेली रोपांची लागवड ह्या विषयीची संशोधीत माहिती त्यांनी नासा संस्थेला दिली आहे ह्या चार धाडसी नागरिकांनी 378 दिवसापैकी व्यतीत केलेल्या त्यांच्या ह्या शंभर दिवसातील अनुभवलेले क्षण त्यांनी नुकतेच नासा संस्थेला फोटो आणी व्हिडीओ द्वारे पाठवले आहे
Nathan Jones ह्यांनी Mars Dune Alpha (J P L Lab)मधील Sand Box वर Mars Space Walk केला तो क्षण -फोटो -नासा संस्था
ह्या शंभर दिवसात Anca Selariu ह्यांचा Nathan Jones ह्यांनी पहिला हेअरकट केला तो क्षण,Nathan Jones ह्यांनी कृत्रीम मंगळ भुमीवरील Sand box वर केलेल्या Mars Space Walk चे फोटो, Ross Brockwelk आणी Anca Selaria ह्यांनी केलेल्या Geology Work वरील संशोधन करतानाचे फोटो शेअर केले आहेत
Mars Dune Alpha मध्ये Anca Selariu आणि Ross Brokwell Geology work करताना -फोटो -नासा संस्था
ह्या मोहिमेतील ऊमेदवार Johnson Space Center मधील 1,700 sq.foot जागेत तयार केलेल्या Mars Dune Alpha ह्या 3D printing चा वापर केलेल्या खोलीत वर्षभर राहणार आहेत ह्या चौघांसाठी सेपरेट रूम असून त्यात त्यांच्या संशोधनाचे साहित्य,मेडिकलचे साहित्य,रोबोटिक उपकरण,व्यायामासाठी,झोपण्यासाठी आणि इतर आवश्यक गोष्ठीसाठीची सोय करण्यात आली आहे ह्या एक वर्षाच्या निवासा दरम्यान ऊमेदवारांना मानसिक आणी शारिरीक दृष्ठ्या काय समस्या ऊद्भवतात त्यांच्या आरोग्यात काय बदल होतात मानवी शरीर मंगळासारख्या वातावरणाला कसे सामोरे जाते ह्याचे निरीक्षण नोंदवण्यात येत आहे आणी त्या समस्या निवारण्यासाठी ऊपाय शोधले जात आहेत त्या साठी नवीन Technology शोधण्यात येणार आहे ह्या मोहिमेचा ऊपयोग भविष्यातील मंगळ मोहिमेतील अंतराळविरांना होणार आहे
हे धाडसी उमेदवार अंतराळवीर नसल्यामुळे ह्या निवासा दरम्यान त्यांना मंगळग्रहावरील वातावरणात रहाण्यासाठी आवश्यक ट्रेनिंग देण्यात आले होते त्यांना अंतराळवीरांसारखे झिरो ग्रॅव्हीटीत राहण्याचे आणी तेथील निवासा दरम्यान कराव्या लागणाऱ्या Space Walk,Robotic operations,Habitat Maintenance,personal hygiene ह्या गोष्टींचेही ट्रेनिंग देण्यात आले त्या मुळे ह्या शास्त्रज्ञ निर्मित मंगळभूमीच्या बाहेरील भागात हे उमेदवार संशोधना बरोबरच अंतराळवीरांसारखा Space Walkही करणार आहेत त्या साठी त्यांना स्पेस सूटही देण्यात आले आहेत शिवाय ह्या मंगळभूमीत ते धान्य,भाजी,फळे वै रोपांची लागवडही करीत आहेत त्या साठी ह्या भूमीत खास मंगळावरील लाल माती,वाळू,मिनरल्सचा वापर करण्यात आला आहे
मंगळ
ग्रह पृथ्वीपासुन दुर असल्यामुळे
अंतराळविरांना
तेथून पृथ्वीवर संपर्क साधताना अडचण आली किंवा काही समस्या उद्भवल्यास
त्यांना त्वरीत मदत पाठवता येणार नाही त्यामुळे अशा आपद्कालीन समस्येवर
मात करण्याचे ट्रेनिंगही त्यांना देण्यात आले आहे शीवाय तेथील वातावरणातील
बदलामुळे येणारा मानसिक ताण किंवा ऊपकरणात अचानक काही कठीण समस्या निर्माण
झाली तर आपद्कालीन संकटांशी सामना करण्यासाठी प्रशिक्षीत करण्यात आले असून
हे सर्व उमेदवार नासा संस्थेच्या संपर्कात आहेत नासाच्या Artemis
मोहिमेअंतर्गत मानव चंद्रावर जाणार आहे त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली
आहे आगामी काळातील भविष्यकालीन मंगळ मोहीम आणि दूरवरच्या अंतराळ मोहिमेतील
अंतराळवीरांसाठी आणि मानवी निवासासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे
No comments:
Post a Comment