Bennu ह्या बटू ग्रहावरील गोळा केलेल्या नमुन्यांच्या कुपी असलेले OSIRIS यानातील OSIRIS-REx sample Collector-फोटो -नासा संस्था
नासा संस्था - 11ऑक्टोबर
करोडो वर्षांपूर्वी सौरमंडळाच्या निर्मितीच्या वेळी ब्रह्मांडातील घडामोडी दरम्यान निर्माण झालेल्या आणि अंतराळात फिरणाऱ्या अनेक उल्कापिंडापैकी एक Bennu ह्या बटू ग्रह आहे आणी हा बटु ग्रह कार्बन समृद्ध आहे म्हणुन OSIRIS- REx मोहिमेद्वारे ह्या ग्रहावरील खडक मातीचे नमुने गोळा केल्या जात आहेत सप्टेंबरमध्ये OSIRIS अंतराळयानाने बटुग्रहावरील भुमीतील गोळा केलेल्या खडक,मातीच्या नमुन्यांच्या कुपी पृथ्वीवर पोहोचविल्या होत्या आता नासाच्या JP.L lab मधील शास्त्रज्ञांनी ह्या नमुन्यांचे प्राथमिक संशोधन केले असून शास्त्रज्ञांच्या अपेक्षे प्रमाणे त्या मध्ये विपुल प्रमाणात कार्बन आणी पाण्याचे अस्तित्व आधळले आहे
नासाच्या Johnson Space Center मधील शास्त्रज्ञांच्या टिम प्रमुखांनी हे नमुने बुधवारी प्रथमच ऊघडले हे नमुने सप्टेंबर महिन्यात पृथ्वीवर पोहोचले होते नासाच्या OSIRIS-REx मोहिमे अंतर्गत हे नमुने गोळा केल्या जात आहेत प्राथमिक संशोधनानंतर शास्त्रज्ञांना ह्या नमुन्यामध्ये विपुल प्रमाणात कार्बन आणी पाण्याचे अस्तित्व आधळले आहे ह्या दोन्ही गोष्टी सजीव सृष्ठिच्या निर्मितीसाठी आवश्यक आहेत ह्या नमुन्यांचे सखोल संशोधन केल्यावर आपल्याला पृथ्वी आणी पृथ्वीवरील सजीव सृष्ठिच्या ऊत्पतीचे गुढ ऊकलेल असे नासाचे Administrator Bill Nelson म्हणतात अनादी काळापासून शास्त्रज्ञांना आणी मानवाला आपण कोण आहोत कुठुन आलो हि सजीव सृष्ठी कशी निर्माण झाली हे जाणून घेण्याची ऊत्सुकता आहे शास्त्रज्ञ त्यासाठी सतत प्रयत्न करत असतात नासाच्या OSIRIS अंतराळ यानाने प्रथमच Bennu ह्या परग्रहावरील नमुने सुरक्षित पणे पृथ्वीवर पोहोचवले आहेत ह्या पहिल्याच मोहिमेच्या यशाने शास्त्रज्ञांना पृथ्वी आणी सजीव सृष्ठीच्या निर्मितीचे गुढ ऊकलण्यास मदत होईल शीवाय भविष्यकालीन युवा संशोधकांना हि मोहीम संशोधनासाठी प्रेरणादायी ठरेल
अंतराळात फिरणाऱ्या ह्या बटू ग्रहांबद्दल ह्या मोहिमेद्वारे माहिती गोळा केली जात आहे असे ग्रह भविष्यात नष्ट होताना पृथ्वीवर आदळल्यास पृथ्वीला त्या पासून धोका होऊ शकतो त्या मुळे हे ग्रह घातक आहेत का ? ह्या विषयी संशोधन केल्या जात आहे
Bennu ग्रहावरील भुमीवरुन दगड मातीचे नमुने गोळा केल्यानंतर तेथील पहाड,दऱ्या,खोऱ्यातील माती,धुळ आणी खडकांचे नमुने गोळा करून त्यातील,केमिकल्स मिनरल्स,धातू ,पाण्याचे अस्तित्व ह्या बाबींचा शोध घेतला जाणार असून हे काम येत्या दहा वर्षात केले जाणार आहे त्यामुळे आपले सौरमंडल,सौरमालेतील ग्रह,ऊपग्रह,ताऱ्यांची निर्मिती कशी झाली आणी Bennu ची निर्मिती पृथ्वी बरोबरच झालेली असताना फक्त पृथ्वीवरच सजीव सृष्ठी कशी निर्माण झाली ह्याचे गुढ ऊकलण्याचा प्रयत्न केला जाईल
No comments:
Post a Comment