नासाच्या अंतराळ मोहीम 70 च्या अंतराळवीरांसह सोयूझ MS-24 अंतराळयान स्थानकाच्या दिशेने अंतराळात झेपावले -फोटो नासा संस्था
नासा संस्था-16 सप्टेंबर
नासाच्या अंतराळमोहिमे 70 अंतर्गत नासाची अंतराळवीर Loral O'Haraरशियाचे अंतराळवीर Oleg Kononenko आणी Nikolai Chub अंतराळस्थानकात सुखरूप पोहोचले हे तीनही अंतराळवीर 15 तारखेला रशियाच्या सोयुझ MS-24 अंतराळयानातुन स्थानकात सहा महिने वास्तव्यासाठी गेले आहेत त्यांचे सोयुझ अंतराळयान कझाकस्थानातील बैकोनुर ऊड्डाण स्थळावरून 11.44 a.m.ला स्थानकात जाण्यासाठी अंतराळात झेपावले आणी तीन तासाच्या अंतराळ प्रवासानंतर 2.55 p.m.ला.स्थानकाच्या Rassvet Module जवळ पोहोचले स्थानक आणी सोयुझ यानाची Hatching व Docking प्रक्रिया पार पडल्यानंतर ह्या अंतराळविरांनी स्थानकात प्रवेश केला स्थानकात सध्या रहात असलेल्या अंतराळविरांनी ह्या अंतराळविरांचे स्थानकात स्वागत केले
नासाच्या अंतराळ मोहीम 69च्या अंतराळवीरांसोबत रशियन अंतराळवीर Nikolai Chub, Oleg Kononeno आणि अंतराळवीर Loral O' Hara स्थानकात पोहोचल्यानंतर Welcome Ceremony दरम्यान -फोटो नासा संस्था
हे अंतराळवीर स्थानकात पोहोचल्यानंतर काही वेळातच ह्या अंतराळवीरांचा Welcome Ceremony पार पडला तेव्हा स्थानकातील दहाही अंतराळवीर एकत्र जमले होते नासा आणी Roscosmos संस्थेतील प्रमुखांनी ह्या अंतराळवीरांशी लाईव्ह संवाद साधून त्यांचे स्थानकात सुखरूप पोहोचल्या बद्दल अभिनंदन केले आणी त्यांना स्थानकातील वास्तव्यासाठी आणि संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या अंतराळवीर Loral आणि Nikolai ह्यांच्या स्थानकातील प्रथम प्रवेशा बद्दल त्यांचे विशेष अभिनंदन केले अंतराळवीरांनी देखील त्यांना ह्या मोहिमेत सहभागी करून स्थानकात वास्तव्याची संधी दिल्याबद्दल आभार मानले अंतराळवीर Loral म्हणाल्या मला हि संधी दिल्याबद्दल नासा संस्थेतील सर्वांचे आभार त्यामुळेच मला पहिल्यांदाच पृथ्वीचे अद्भुत सौन्दर्य वरून पाहण्याची संधी मीळाली तो क्षण अनमोल आहे !अविस्मरणीय आहे !
हे अंतराळवीर आता अंतराळमोहिम 69 मधील अंतराळविरांसह तेथील संशोधनात सहभागी होतील रशियन अंतराळवीर Kononenko ह्यांची हि पाचवी अंतराळयात्रा आहे ते पाचव्यांदा स्थानकात वास्तव्यासाठी गेले आहेत अंतराळवीर Loral आणी अंतराळवीर Nikolai ह्यांची मात्र हि पहिलीच अंतराळवारी असुन ते पहिल्यांदाच स्थानकात रहायला गेले आहेत अंतराळवीर Loral सहा महिने स्थानकात राहुन संशोधन करणार आहे पण रशियन अंतराळवीर Oleg आणी Nikolai मात्र एक वर्ष स्थानकात वास्तव्य करणार आहेत
27 सप्टेंबरला नासाचे रेकॉर्ड ब्रेकर अंतराळवीर Frank Rubio ,रशियन अंतराळवीर Sergey Prokopyev आणी अंतराळवीर Dimitri Petelin हे तीन अंतराळवीर पृथ्वीवर परतणार आहेत अंतराळवीर Frank Rubio ह्यांनी स्थानकात सलग 371 दिवस रहाण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे हे अंतराळवीर पृथ्वीवर परतेपर्यंत हे दहाही अंतराळवीर स्थानकात एकत्र रहाणार असुन तेथील संशोधनात सहभागी होणार आहेत
No comments:
Post a Comment