नासाच्या Space X Crew -7 अंतराळ मोहिमेतील अंतराळवीर स्थानकात जाण्याच्या तयारीत -फोटो नासा संस्था
नासा संस्था - 28 ऑगस्ट
नासाच्या Space X Crew -7 अंतराळ मोहिमेतील नासाची अंतराळवीर Jasmin Moghbeli युरोपियन अंतराळवीर Andreas Mogensen जपानचे अंतराळवीर Satoshi Furukawa आणी रशियन अंतराळवीर Konstantin Borisov 27 ऑगस्टला स्थानकात सुखरूप पोहोचले हवामान ऊड्डाणासाठी अनुकूल नसल्याने ह्या अंतराळवीरांचे ऊड्डाण एक दिवस लांबले नासाच्या Florida Space Center येथील 39 A ऊड्डाण स्थळावरून 26 ऑगस्टला Space X Crew Dragon Endurance ह्या चारही अंतराळविरांसह अंतराळात झेपावले आणी रविवारी 27 ऑगस्टला 10.58 a.m.ला स्थानकात पोहोचले
Endurance Dragon Crew -7 मोहिमेतील अंतराळवीर स्थानकात पोहोचल्यानंतर -फोटो नासा संस्था
जाण्याआधी ह्या अंतराळविरांची ऊड्डाणपुर्व अंतीम चाचणी घेण्यात आली त्यांंचे स्पेससुट फिटिंग चेकअप,लिकेज चेकअप ,हेल्थ चेकअप व ईतर आवश्यक चेकअप नंतर हे अंतराळवीर ऊड्डाण स्थळी जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांना निरोप देण्यासाठी नासाचे Administrator Bill Nelson आणी ह्या मोहिमेतील प्रमुख हजर होते ह्या अंतराळविरांना निरोप देण्यासाठी त्यांचे कुटुंबीय देखील ऊड्डाणस्थळी आले होते पण गेल्या दोन महिन्यापासून हे अंतराळवीर Quarantine मध्ये होते त्यामुळे त्यांना कुटुंबीयांशी लांबुनच संवाद साधावा लागला त्यांच्याशी काही वेळ संवाद साधुन अंतराळवीरांनी सर्वांना Bye करत सर्वांचा निरोप घेतला तेव्हा त्यांच्या कुटुबीयांनी त्यांना सूरक्षीत अंतराळ प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या अंतराळप्रवासास निघण्यापूर्वी अंतराळविरांनी Endurance Dragon मध्ये प्रवेश केल्यावर पुन्हा एकदा सर्व ठिक आहे ना ह्याची खात्री केली आणी ठरलेल्या वेळी Space X Dragon सह अंतराळवीर अंतराळस्थानकात जाण्यासाठी अंतराळात झेपावले रविवारी 9.16a.m.ला Dragon स्थानकाजवळ पोहोचले आणी 10.58 a.m. ला स्थानक आणी Dragon ह्यांच्यातील hatching,docking प्रक्रिया पार पडली त्या नंतर अंतराळविरांनी स्थानकात प्रवेश केला स्थानकात सध्या रहात असलेल्या अंतराळवीरांनी ह्या चारही अंतराळविरांचे स्थानकात स्वागत केले त्या नंतर काही वेळातच ह्या अंतराळविरांचा Welcome Ceremony पार पडला
अंतराळ प्रवासा दरम्यान हे अंतराळवीर नासा संस्थेच्या सतत संपर्कात होते Space X Crew Dragon अत्यंत वेगाने अंतराळात मार्गक्रमण करत नियोजित प्रक्रिया पार पाडत होते अखेर अंतीम प्रक्रिया पार पाडत Dragon rocket पासून वेगळे झाले आणी प्रचंड वेगाने पृथ्वीच्या कक्षेतून झीरो ग्रव्हिटित प्रवेशले तेव्हा नासा संस्थेने लाईव्ह संपर्क साधुन Dragon चा अंतराळातील सुरक्षित प्रवेश आणी स्मूथ ड्रायव्हिंग केल्याबद्दल अंतराळविरांचे अभिनंदन केले आता Dragon मधून तुम्ही चार वेगवेगळ्या देशातील अंतराळवीर एकत्र अंतराळ प्रवास करत असल्याचे पाहून आम्हाला आनंद होत आहे आता खऱ्या अर्थाने Dragon International झाले आहे तुम्हाला तुमच्या पुढील प्रवासासाठी आणी स्थानकातील प्रवेशासाठी शुभेच्छा !असे म्हणत त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा Dragon मध्ये बसण्यासाठी मोकळी जागा आहे आम्ही देखील आनंदी आहोत आम्हाला नासा आणी आमच्या देशातील सहभागी संस्थेचे आभार मानावयाचे आहेत त्यांच्या मुळे आम्ही हा अदभूत प्रवास करतोय हा अभुतपुर्व,अविस्मरणीय क्षण अनुभवतोय आम्हाला ट्रेनिंग देणाऱ्या ह्या मोहीमेतील सहभागी सर्वांचेच आभारी आहोत त्यांच्या मुळेच आम्ही सुरक्षित अंतराळप्रवास करत आहोत असे म्हणत त्यांनी अंतराळातून पृथ्वीच अलौकिक सौंदर्य दाखवले
ह्या प्रवासात अंतराळवीर Andreas ह्यांच्या मुलाने दिलेले झीरो ग्रव्हिटी ईंडीकेटर 3 toed Sloth देखील कसे तरंगते ते दाखवले हा Sloth दोन ऐवजी तीन toed का आहे ह्या बद्दल विचारले असता Andreas," ह्यांनी सांगितले मागच्या क्रिसमसला सुट्टीत मी माझ्या फॅमिली सोबत Casta Rica येथील समुद्रकिनारी फिरायला गेलो होतो तीथे आम्हाला Sloth दिसला मी पायलट आहे माझ्या फॅमिलीत मला Slowest person म्हणतात त्यामुळे मला तीन toed Sloth ची गरज आहे असे त्यांना वाटते त्यांच्यासाठी ते लकी आहे मला त्यांची आठवण म्हणून त्यांनी हे ईंडीकेटर सोबत दिलय जपानी अंतराळवीर Satoshi Furuawa ह्यांनी देखील अंतराळात पुन्हा प्रवेश केल्यावर मी देखील आंनदीत झालो आहे असे सांगितले रशियन अंतराळवीर Borisov म्हणाले मी खूप Excited आहे Thanks ! ह्या.मोहिमेत सहभागी सर्वांचेच आभार त्यांच्यामुळे हे शक्य झाले !
अंतराळवीर स्थानकात पोहोचल्यानंतर काही वेळातच ह्या अंतराळविरांचा Welcome Ceremony पार पडला Welcome Ceremony साठी स्थानकातील अकरा अंतराळवीर एकत्र जमले नासा संस्थेने लाईव्ह संपर्क साधुन ह्या अंतराळविरांचे सुरक्षित अंतराळ प्रवास व स्थानकातील प्रवेशाबद्दल अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आणी स्थानकात प्रवेश केल्यानंतरचे त्यांचे मनोगत जाणून घेतले
सुरवातीला अंतराळवीर Frank आणी अंतराळवीर Sergey ह्यांनी ह्या अंतराळवीरांचे स्थानकात स्वागत केले '',स्थानकात सुखरूप पोहोचल्या बद्दल अंतराळमोहीम 69 तर्फे तुमचे अभिनंदन ! अंतराळवीर Satoshi आणी Andreas तुमचे स्वागत तुम्ही दुसऱ्यांंदा स्थानकात पोहोचला आहात पण अंतराळवीर Jasmine आणी Konstantin ,तुमच्या स्थानकातील प्रथम प्रवेशाबद्दल स्पेशल अभिनंदन आणी स्वागत ! आता तुम्ही खरोखरच अंतराळवीर झाला आहात हा तुमच्या आयुष्यातील महत्त्वपुर्ण क्षण आहे तुमच्या Happy flight आणी भविष्यकालीन स्थानकातील वास्तव्यासाठी आणी संशोधनासाठी शुभेच्छा ! आता आपण एकत्र संशोधन करणार आहोत !"
अंतराळवीर Jasmin -."Thanks ! Sergey आणी Frank तुम्ही केलेल्या स्वागताबद्दल आपण काही दिवस एकत्र ट्रेनिंग घेतल आहे आताचा क्षण खरोखरच महत्त्वाचा आहे आता आपण एकत्र रहाणार आहोत,संशोधन करणार आहोत आम्ही येथील झीरो ग्रव्हिटितील वास्तव्याचा अनुभव घेणार आहोत त्या साठी नासा संस्था,ईसा,Space X JAXA CSA आणी Roscosmos संस्थेतील सर्वांचे आभार त्यांच्यामुळे मी ईथे येऊ शकले हा क्षण अनभवु शकले येणाऱ्या काळात आम्ही निश्चितच चांगली कामगिरी पार पाडु तुमच्यापैकी तीनजण वेगळे आहेत पण मला आशा आहे तुम्ही आम्हाला संशोधनातील परीपूर्ण,ऊपयुक्त गोष्टी शिकवाल ह्या टिममध्ये सहभागी झाल्याचा मला अभिमान वाटतो आहे !"
अंतराळवीर Andreas -"मला सुध्दा Jasmine सारखच फिल होतय ह्या मोहीम 69 मध्ये सहभागी होताना अभिमान वाटतोय हि मोहीम आम्ही नक्की यशस्वी करु आधीच्या ESAच्या अंतराळवीरांनी केलेले अनेक युरोपियन आणी Danish Expt. मी पुढे चालू ठेवेन मला त्यासाठी ESA संस्थेचे आभार मानावयाचे आहेत त्यांच्या Hard Work बद्दल आणी मला ईथे येण्यासाठी Train केल्याबद्दल हि मोहीम अभुतपुर्व आहे ईथे स्थानकात पोहोचल्यानंतरचा क्षण अभुतपुर्व आहे,थरारक आहे ईथल्या ब्रिलीयंट इंटर नॅशनल टिम सोबत रहायला,संशोधन करायला मिळणार ह्याचा आनंद होतोय मी Excited आहे !"
अंतराळवीर Borisov -"खरच खूप Excited क्षण आहे हा शब्दात व्यक्त करता येत नाही ईथल्या झीरो ग्रॅविटीत ईतक्या सहजतेने तरंगताना ह्या सर्वांना पहाण किती कठोर परिश्रम करावे लागतात त्यासाठी !आणी आता मिही ईथल्या झीरो ग्रव्हिटित तरंगत्या अवस्थेत रहाणार मलाही त्या साठी खूप प्रयत्न करावे लागणार आहेत खूप कठीण आहे हे ईथल्या ईंटरनॅशनल टिमसोबत एकत्र संशोधन करताना एकी कीती महत्त्वाची आहे ह्याचा प्रत्यय येतोय ह्या ईंटरनॅशनल अंतराळस्थानकात आम्ही बहुतेकजण ईंटरनॅशनल रहिवासी आहोत ईथे पाच देशातील अंतराळवीर वास्तव्य करत आहेत आगामी काळात आम्ही एकत्र काम करणार आहोत नासा,Space X आणी सहभागी सर्व संस्थेचे आभार खरेच ईथले अंतराळवीर वैशिष्ट्यपूर्ण आहेत आता काही महिने आम्ही एकत्र संशोधन करणार आहोत आणी ईथल्या झीरो ग्रव्हिटितील रहाण्याची मजा अनुभवणार आहोत!"
हे चारही अंतराळवीर आता स्थानकात सहा महिने राहून तेथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होणार आहेत लवकरच Space X -6 अंतराळ मोहिमेतील चार अंतराळवीर पृथ्वीवर परततील तो पर्यंत स्थानकातील अकरा अंतराळवीर एकत्रित राहून तेथील संशोधनात सहभागी होतील
No comments:
Post a Comment