Friday 30 December 2022

शाब्दिक ऊचलेगीरी वाढली

 सध्या सर्वत्र चोऱ्यांच प्रमाण वाढतच चाललय रोजच्या चोऱ्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत सर्वत्र भ्रष्टाचार वाढलाय मग ते कुठलही क्षेत्र असो कारण कायद्याचा,पोलीसांचा वचकच राहिला नाही !

हल्ली शाब्दिक ऊचलेगीरी पण वाढलीय एखाद्याचा लेख,बातमी वा ब्लॉगवरील ईतर साहित्य प्रकाशीत होताच त्यातले शब्द ऊचलेगीरी करून सर्रासपणे वापरले जातात तो शब्दवापर जीथे वापरलाय तिथे   योग्य ठरतो की नाही हेहि त्यांना समजत नाही कारण शब्दाचा अर्थच व तो कुठे,कोणासाठी योग्य ठरतो हे कळण्याची बुद्धी कमी असते म्हणून मग काही ऊचलेगीरी करणाऱ्यांच हस होत आणी विषेश म्हणजे हे साहित्य खालीपासून वरपर्यंत ऊचलेगीरी करून वापरल जात अशी लाँबीच सध्या सक्रीय झाली आहे 

काँपीराईट अँक्ट नुसार अशा साहित्य ऊचलेगीरी करणाऱ्यास दंड केल्या जातो पण काँपीराईट असुनही हे सर्रासपणे कसे घडते ? त्याचे पैसे संबंधीत लेखकाला का मिळत नाहीत ,कोठे जातात? कोण घेत? हे त्यांना कळायला हव आणी अशांना वेळीच समज देणे आवश्यक आहे 

कोणाचेही साहित्य सोशल मिडिया कींवा ईतरत्र वापरताना त्यांचे नाव छापणे परवानगी घेणे आवश्यक आहे पण असे ह़ोत नाही अर्थात ऊचलेगीरी करणाऱ्यांंचच हस होत म्हणून स्वतःचे शब्द वापरा ऊगाच ऊचलेगीरी करु नका म्हणजे हस होणार नाही आणी अर्थाचा अनर्थही होणार नाही

Thursday 29 December 2022

मंगळावरील आकाशात Ingenuity Mars helicopter चे 38 वे ऊड्डाण

  Image taken by Ingenuity Helicopter on Mars

           मंगळावरील आकाशात उड्डाण करताना Ingenuity Mars Helicopter -फोटो -नासा संस्था

 नासा संस्था -

Ingenuity Mars हेलिकॉप्टर Perseverance मंगळयानासोबत मंगळावर गेले होते तेव्हापासून तेथील आकाशात ऊड्डाण करत आहे ऊड्डाणादरम्यान Ingenuity हेलिकॉप्टर आसपासच्या भागाचे निरीक्षण नोंदवून तेथील फोटो व माहिती गोळा करुन Perseverance यानाला संशोधनात मदत करत आहे Perseverance टीममधील शास्त्रज्ञांना  Ingenuity हेलिकॉप्टर एक वर्षे कार्यरत राहील अशी अपेक्षा होती कारण मंगळावरील वातावरण अत्यंत क्षीण आहे अशा वातावरणात ऊड्डाण करणे कठीण जाते पण तेथील प्रतिकुल वातावरणात अजूनही Ingenuity हेलिकॉप्टर सतत ऊड्डाण करत आहे आणी आधीपेक्षा जास्त ऊंचीवर पोहोचुन शास्त्रज्ञांना आश्चर्यचकीत करत आहे 

24 डिसेंबरला Ingenuity मंगळयानाने मंगळावरील आकाशात 38 वी यशस्वी भरारी मारली आहे ह्या ऊड्डाणा दरम्यान हेलिकॉप्टरने 68 सेकंदात 53 फुट ऊंचीवरून मंगळभुमीवरील  344 feet अंतर पार केले ह्या वेळेस हेलिकॉप्टरचा वेग ताशी 8mph ईतका होता मंगळावरील Jezero Crator ह्या भागातील आकाशात हेलिकॉप्टरने हे 38 वे यशस्वी ऊड्डाण केले आहे

Wednesday 28 December 2022

 नासाच्या Perseverance मंगळयानाने मंगळभूमीवर पहिली सॅम्पलची ट्यूब ठेवली

  NASA’s Perseverance rover deposited the first of several samples onto the Martian surface

 नासाच्या Perseverance यानाने 21 डिसेंबर 2022ला मंगळावरील 653व्या मंगळदिवशी मंगळभूमीवर ठेवलेली  नमुन्याची ट्युब -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -22डिसेंबर

नासाच्या  Perseverance मंगळयानाने मंगळ भूमीवर पहिली खडकाचे नमुने भरलेली ट्यूब ठेवली  मंगळावरील आणि भूगर्भातील जमीन खोदून त्यातील खडक,माती आणि वाळू ह्यांचे नमुने यानातील Titanium ट्युब मध्ये भरण्याचे काम सध्या Perseverance यान करत आहे पहिल्या टप्प्यात येत्या दोन महिन्यात दहा ट्यूबमध्ये हे नमुने  भरले जाणार आहेत त्यातीलच एक खडकाच्या नमुन्याने भरलेली ट्युब मंगळावरील भूमीवर व्यवस्थित ठेवण्यात Perseverance यानाला यश आले आहे मंगळावरील,"Three Fork " ह्या भागात हे काम सुरु आहे 

नासा संस्थेच्या परग्रहावरील भूमीवरील नमुने गोळा करून ट्युब मध्ये भरून पृथ्वीवर परत आणण्याआधी तेथील भूमीवर जमा करून ठेवण्याच्या कामाचा हा ऐतिहासिक प्रारंभ आहे भविष्यकालीन मंगळ मोहिमेत ह्या जागेचा ऊपयोग डेपोसारखा होईल शास्त्रज्ञांच्या अपेक्षेनुसार ह्या मोहिमेत Perseverance यानाने आजवर 17नमुने गोळा केले असून त्यात मंगळावरील वातावरणातील नमुन्यांचा समावेश आहे ट्यूबमध्ये Perseverance यानाने जमा केलेल्या नमुन्यातील थोडे नमुने ट्युबमध्ये भरले जातील आणी थोडे यानातच ठेवले जाणार आहेत 

Perseverance यानाने मंगळभूमीवर ठेवलेल्या ह्या पहिल्या ट्यूब मधील हा नमुना Igneous खडकाचा असून तो लहान खडूच्या आकाराचा आहे ह्या टीममधल्या शास्त्रज्ञांनी ह्या खडकाला "Malay"असे नाव दिले आहे हा पहिला नमुना 31जानेवारी 2022 मध्ये Pereverance यानाने मंगळावरील Jezoro Crater ह्या भागातील South Seitah येथुन गोळा केलेला आहे 

विशेष म्हणजे हे नमुन्याने भरलेली ट्यूब जमिनीवर ठेवण्याचे काम Perseverance यान बनविणाऱ्या ह्या टीममधील  इंजिनीअर्स मार्फत केले गेले नाही तर यानाने स्वयंचलित यंत्रणेमार्फत हे काम पूर्ण केले जेव्हा हे काम यशस्वीरीत्या पार पडले तेव्हा ह्या मोहिमेतील टीम सतर्क झाली त्यांनी यानावर बसविलेल्या WHTSON कॅमेऱ्यावर लक्ष केंद्रित केले हा कॅमेरा यानाच्या सात फूट लांब रोबोटिक आर्मवर शेवटच्या टोकावर बसविण्यात आला आहे Perseverance यानाने गोळा केलेल्या नमुन्यांची ट्युब यानाच्या चाकात न अडकता व्यवस्थित जमिनीवर ठेवली गेली कि नाही हे पाहण्यासाठी हा कॅमेरा यानावर बसविण्यात आला आहे आणि टिमच्या अपेक्षेनुसार यानाच्या ह्या स्वयंचलित यंत्रणेमार्फत नमुन्याची ट्युब जमिनीवर उभी न राहता व्यवस्थित ठेवली गेली ह्या ट्यूब व्यवस्थित जमिनीवर ठेवल्या गेल्यामुळे आता नमुन्यांची ट्यूब रोबोटिक आर्मच्या सहाय्याने ऊचलुन रोबोटिक Lander मध्ये ठेवताना न अडकता व्यवस्थित ठेवल्या जाईल

Perseverance यानाने गोळा केलेल्या नमुन्यांच्या ह्या ट्यूब यानाला बसविलेल्या रोबोटिक आर्मच्या साहाय्याने Robotic Lander मध्ये ठेवण्यात येतील त्या नंतर पृथ्वीवर हे नमुने आणण्यासाठी पाठविण्यात आलेल्या दोन रॉकेट मधील Containment ट्युब मध्ये रोबोटिक आर्मच्या साहाय्याने नमुन्यांच्या ट्युब्स भरण्यात येतील नासाने बनविलेले हे रॉकेट प्रथमच परग्रहावर म्हणजे मंगळावर प्रज्वलित होऊन उड्डाण करेल त्या नंतर पृथ्वीवरून मंगळावर हे नमुने आणण्यासाठी पाठविण्यात आलेल्या अंतराळयानात हे Container ठेवण्यात येतील जर काही कारणामुळे अडचण आली आणि मंगळयान हे नमुने पाठवू शकले नाही तर दोन Sample Recovery Helicopters मार्फत हे काम पूर्ण केल्या जाईल  

मंगळावरील यानाने जमा केलेले खडकांचे आणि इतर नमुने ट्युब मध्ये भरून ती ट्युब जमिनीवर ठेवलेली पाहणे हे आमच्या टीमचे प्रमुख उद्दिष्ट साध्य झाले आहे हे काम सहा जानेवारीला संपेल उरलेले काम पूर्ण झाले की ह्या मोहिमेतील हा पहिला टप्पा संपेल असे नासाच्या J.PL Lab मधील Perseverance यानाच्या टीमचे Deputy Project Manager, Rick Welch म्हणतात 

मंगळावरील पुरातन सजीव सृष्टीच्या अस्तित्वाला दुजोरा देणारे मंगळावरील वातावरणातील व भूगर्भातील  पुरावे गोळा करण्यासाठी Perseverance यान मंगळावर गेलॆ आहे

Friday 23 December 2022

नासाच्या Insight मंगळयानाचे काम थांबणार

  An image of the final selfie taken by NASA's InSight Mars lander on April 24, 2022,. The lander is covered with a lot of dust than it was in its first selfie, taken in December 2018.

Insight मंगळ यानाने मंगळावरील 1,211व्या दिवशी 24 एप्रिल 2022 ला मंगळावरील धुली वादळाच्या दिवसात पाठवलेला Selfie ह्या फोटोत मंगळ यानावर साचलेली धूळ दिसत आहे -फोटो -नासा संस्था

नासा संस्था-21 डिसेंबर

नासाचे Insight मंगळयान चार वर्षांच्या यशस्वी कारकिर्दी नंतर आता रिटायर्ड होणार आहे चार वर्षांपूर्वी मंगळावर पोहोचलेल्या मंगळयानाने मंगळभुमीवरील व भुगर्भातील अत्यंत महत्वपूर्ण संशोधीत माहिती गोळा करून पृथ्वीवर पाठवीली आहे 

नासा संस्थेच्या South California येथील J.PL lab मधील Insight मंगळयानाच्या मिशन कंट्रोलरनी दोनवेळा प्रयत्न करूनही यानाशी संपर्क होऊ शकला नाही तेव्हा यानावर बसविण्यात आलेल्या सौरपॅनल मधून पुरेशी ऊर्जानिर्मिती होत नसल्याने यानातील सौरऊर्जेवर चालणाऱ्या बॅटऱ्या क्षीण झाल्याचे त्यांच्या लक्षात आले ह्या आधीच नासा संस्थेने यानाशी दोनवेळा प्रयत्न करुनही संपर्क होऊ शकला नाही तर हे मिशन थांबवण्याचा निर्णय घेतला होता 15 डिसेंबरला यानाशी शेवटचा संपर्क झाला होता पण आता मात्र संपर्क होत नसल्याने अखेर हे मिशन थांबविण्याचा  निर्णय घेण्यात आला हे मिशन थांबले तरीही ह्या टिममधील कंट्रोलर यानाच्या सतत संपर्कात रहाण्याचा प्रयत्न करतील व सिग्नल येण्याची वाट पहातील

नासाच्या Washington येथील Assistant Administrator Thomas Zurbuchen म्हणतात,"आम्ही Insight यानाचे पृथ्वीवरून मंगळावर जातानाचे Launching आणी मंगळग्रहावर पोहोचल्या नंतर तेथील भूमीवरच्या Landingचे थरारक क्षण अनुभवले आहेत त्यामुळे हे मिशन थांबविण्याचा निर्णय घेताना आम्हाला वाईट वाटत आहे ह्या यानाने चार वर्षात अत्यंत महत्वपुर्ण माहिती गोळा केली आहे मंगळावरील भुकंप विषयक माहिती पुढील संशोधनासाठी तर ऊपयोगी पडेलच पण पृथ्वीसाठीही हि माहिती ऊपयुक्त ठरेल

Insight मंगळयान 2018 मध्ये मंगळ ग्रहावरील व भुपृष्ठाखालील माहिती गोळा करण्यासाठी मंगळावर पोहोचले होते  मंगळावरील जमीन खोदून भुगर्भातील(Core  भागातील) खडकांचे प्रकार,लेयर्स,खोली,भुकंप प्रवण क्षेत्र ,ऊष्णता वाहक क्षेत्र शोधून तेथील संशोधित माहिती गोळा करणे आणि तेथील तापमान आणी तीव्रता मोजणे हे Insight यानाचे मुख्य ऊद्दिष्ठ होते 

French Space Agency (CNES)आणी E.TH  Zurich ( Marsquake service) ह्यांच्या सहयोगाने बनविलेल्या यानातील अत्यंत संवेदनशील Seismometer च्या सहाय्याने Insight यानाने चार वर्षात भूगर्भातील नियमित निरीक्षण नोंदवून मंगळावर झालेल्या 1,319 भुकंपाची नोंद केली ह्या भूकंपाचे फोटो आणी लाईव्ह व्हिडीओही पृथ्वीवर पाठवले त्यामुळे पृथ्वीवासीयांना मंगळावरील भुकंपाची तीव्रता व आवाज ऐकता आला 

ह्या संशोधीत माहितीचा ऊपयोग मंगळग्रहावरील भुगर्भातील Core भागातील लेअर निर्मितीचा काळ समजण्यासाठी होईल नासाच्या अपोलो मोहिमेनंतर प्रथमच पृथ्वीबाहेरील परग्रहावर भुकंपमापन यंत्र नेण्यात आले होते ह्या आधी अपोलो मोहिमेत  पहिल्यांदा अंतराळवीरांनी चंद्र ग्रहावर भुकंपमापन यंत्र नेले होते

Insight मंगळयानात Mole नावाचे एक Self-Hammering Spike  बसविण्यात आले होते आणी त्याला सेंसरयुक्त एक तार जोडण्यात आली होती मंगळयानाने रोबोटिक आर्मला जोडलेल्या Hammer च्या सहाय्याने मंगळावरील भुभाग खोदुन तारेला जोडलेल्या सेंसरच्या मदतीने भुगर्भातील ऊष्णता आणी खोली मोजली आणि हि संशोधित माहिती पृथ्वीवर पाठविली ह्या टिममधील शास्त्रज्ञांना ह्या Hammering Spike च्या साहाय्याने तेथील 16 फुट (5मीटर) खोल जमीन खोदणे अपेक्षित होते पण मंगळावरील भुभाग ईतर ग्रहावरील जमीनी प्रमाणे,भुसभुशीत रेताळ नसल्याने तेथील खडकाळ भुभागात  Hammer रूतवुन भुगर्भातील खडक खोदणे Insight यानाला शक्य झाले नाही त्यामुळे Hammer अपेक्षित भागापर्यंत पोहोचू शकले नाही आणि कार्यरत होऊ शकले नाही यानातील Hammer Spike फक्त भुगर्भातील 16 ईंच खोल भागापर्यंत खोदु शकले पण तोवर यान त्या भागातील खडक,लेयर्स आणी तेथील तापमानाची नोंद करण्यात यशस्वी ठरले होते त्यामुळे हे कार्य थांबविण्यात आले मात्र Insight मंगळ यानाला बसविलेल्या रोबोटिक आर्म आणि स्कुपच्या साहाय्याने मंगळ ग्रहांवरील वादळी दिवसात सौर पॅनलवर साचलेली धूळ काढण्यात यान यशस्वी ठरलेपण आता मात्र सौर पॅनल वर पुन्हा धूळसाचल्याने यानातील सौरऊर्जेवर चालणाऱ्या बॅटऱ्या क्षीण झाल्या आहेत

नासाच्या J.PL Lab चे Principal Investigator Bruse Banerdt म्हणतात," गेल्या चार वर्षात Insight आमचा मंगळावरील मित्र झाला होता जो आम्हाला तेथील संशोधित माहिती नियमित पाठवत होता त्या मुळे त्याला "Good bye!" म्हणताना जड जात आहे पण ह्या यानाने चार वर्षात त्याचे मूळ उद्दिष्ट साध्य केले आहे त्याने संशोधित केलेली माहिती युनिक आणि महत्वपूर्ण आहे 

नासाच्या J.PL Lab मधील Director Laurie Leshin ह्यांनी देखील असेच मत व्यक्त केले ते म्हणतात ," Insight मंगळ यान नावाप्रमाणेच यशस्वीपणे चार वर्षे कार्यरत राहिले त्याने मंगळावरील अत्यंत दुर्मिळ माहिती गोळा केली त्या साठी जगभरातील ह्या टीममधील सर्वांचे आभार ज्यांनी हे मिशन यशस्वी व्हावे म्हणून प्रयत्न केले खरोखरच हे मिशन थांबवताना Insight यानाला "Good Bye"! म्हणताना वाईट वाटतेय पण त्याचे कार्य सगळ्यांच्या सतत लक्षात राहील प्रेरणादायी ठरेल !"

Friday 16 December 2022

नासाची Artemis -1मोहीम यशस्वी Orion अंतराळयान चंद्रावरून पृथ्वीवर परतले

 NASA's Orion spacecraft shown splashing down in the Pacific Ocean, west of Baja California, at 9:40 a.m. PST Sunday, Dec. 11.

 नासाचे Orion अंतराळयान चंद्रावरून पृथ्वीवर परतल्यावर California येथील पॅसिफिक महासागरात खाली उतरताना -फोटो नासा संस्था

 नासा संस्था-11डिसेंबर

नासाच्या Artemis-1मोहिमेअंतर्गत चंद्रावर गेलेले Orion अंतराळयान पृथ्वीवर परतले रविवारी 11तारखेला California येथील पश्चिमेकडील भागातील पॅसिफिक महासागरात ते सुखरूप खाली ऊतरले Orion अंतराळयान 16 नोव्हेंबरला Florida येथील केनेडी स्पेस सेंटरमधील 39B ह्या ऊड्डाण स्थळावरुन चंद्रावर जाण्यासाठी अंतराळात झेपावले होते आता 25.5 दिवसानंतर मोहीम यशस्वी करून पृथ्वीवर परतले नासा संस्थेने पन्नास वर्षांनी पुन्हा सुरु केलेल्या ह्या Artemis 1 च्या यशाने ईतिहासाची पुनरावृत्ती केली ह्या आधी 11डिसेंबर 1972 मध्ये अपोलो 17 मोहिमेअंतर्गत अंतराळवीर Eugene Cernen आणी अंतराळवीर Harrison Schmitt हे अंतराळवीर चंद्रावर पोहोचले होते आणी चंद्रभुमीवर पाऊल ठेवणारे बारावे अंतराळवीर ठरले होते तेथे त्यांनी तीन दिवस व्यतीत केले होते नंतर हि मोहीम थांबविण्यात आली होती 

NASA's Orion spacecraft splashed down in the Pacific Orion at 12:40 p.m. EST Dec. 11, 2022.

          नासाचे  Orion अंतराळयान पॅसिफिक महासागरात उतरल्यानंतर फोटो -नासा संस्था

Artemis -1 च्या यशाने नासा संस्थेतील ह्या टिम मधील सर्वजण आनंदित झाले आहेत नासाचे Administrator Bill Nelson हे देखील आनंदित झाले आहेत ते म्हणाले,"Artemis मोहिमेला मिळालेले हे यश अंतराळविश्वातील दुरवरच्या अंतराळ मोहिमेला प्रेरित करणारे आहे ह्या टिममधील हजारो कर्मचारी,ईंजीनिअर्स,तंत्रज्ञ,शास्त्रज्ञ ह्यांनी अनेक वर्षे ह्या मोहिमेत स्वतःला झोकून देऊन अथक परीश्रम केले त्यांच्या प्रयत्नांना व असामान्य कर्तृत्वाला मिळालेले हे यश आहे नासा संस्थेतील सहकारी देश आणी एकत्रित मानवी प्रयत्नांना मिळालेले हे यश आहे आगामी दुरवरच्या अंतराळमोहिमेचा हा शुभारंभ आहे ब्रह्मांडातील दूरवरच्या मानवाला अज्ञात असलेल्या गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी असे एकत्रित प्रयत्न ऊपयुक्त ठरतील

ह्या मोहिमेदरम्यान Orion अंतराळ यानाने चंद्रावरील कक्षेत 80 मैल अंतरावर प्रवेश केला.आणी 270,000मैलाचा अंतराळ प्रवास केला ह्या अंतराळ यानातुन अंतराळवीरांना पाठवण्या ऐवजी  मानवी डमींना पाठविण्यात आले होते  चंद्रप्रवासादरम्यान मानवी अवयवांवर काय परिणाम होतो हे  पहाण्यासाठी त्यांना सेन्सर्स बसविण्यात आले होते

नासाचे Associate Administrator Jim Free म्हणतात,आता Orion अंतराळयान चंद्रावर जाऊन सुरक्षीत पृथ्वीवर परतल्यामुळे Artemis -2 मोहिमेतील अंतराळवीरांचा चंद्रावर जाण्याचा मार्ग सुरक्षित झाला आहे ह्या यशानंतर आता मानवी चंद्रमोहिमेचा शुभारंभ तर होईलच शिवाय तेथील सायंटिफिक शोध मोहिमेची देखील सुरूवात होईल आणी आगामी काळातील मंगळ मोहिमेसाठीही ह्याचा ऊपयोग होईल 

पृथ्वीच्या कक्षेत शिरण्याआधी Orion अंतराळयान Service Module पासुन वेगळे झाले ह्या प्रक्रीयेच्या वेळी पृथ्वीवरील E.SA संस्थेतील पॉवर हाऊस मधील ईंजीनिअर्सच्या टिमने सहकार्य केले Orion यान पृथ्वीच्या कक्षेत पुन्हा प्रवेश करण्याआधी यानाचे तापमान 5,000 degree Fahrenheit एव्हढे प्रचंड होते पण 20 मिनिटे आधी यानाने हळूहळू तापमान कमी केले यानाचा वेगही 25,000 mph ईतका होता पण यानाने वेगावर नियंत्रण मिळवत पॅराशूटच्या सहाय्याने समुद्रात ऊतरण्यासाठी वेग 20mph ईतका कमी केला 

ह्या मोहिमेतील Orion यान आजवर चंद्रावर गेलेल्या यानापेक्षा जास्तकाळ चंद्रावर राहिले तेही कुठल्याही स्पेस स्टेशनमध्ये न थांबता कार्यरत राहून यानाने हि मोहीम यशस्वी केली त्या साठी ह्या आधीच्या अपोलो 13 मोहिमेतील अंतराळ यानापेक्षा वेगळे Orion यानाचे विषेश डिझाईन तयार करण्यात आले होते 

आर्टिमस 1मोहिमेचे मॅनेजर Mike Sarafin म्हणतात,"आता Orion अंतराळयान चंद्रावर जाऊन पृथ्वीवर सुरक्षित परतले आहे आमच्या अपेक्षेप्रमाणे यानाने समुद्रात सुरक्षित बुडी देखील मारली आणी यानाने चंद्रावरील कठीण वातावरणात टिकाव धरला शिवाय यानाने परत पृथ्वीच्या कक्षेत शिरण्याआधी वेगावर नियंत्रणही मिळवले

Orion यान समुद्रात ऊतरण्याआधी तेथे नासा संस्थेची landing recovery team हजर होती त्यामध्ये US department of defense Navy amphibious specialists ,Space Force Weather specialist आणी Airforce Specialist तसेच Huston येथील नासा संस्थेतील ईंजीनिअर्स आणी टेक्नीशीयन्सचा समावेश होता 

आता लवकरच Orion यानाला ट्रक मधून नासा संस्थेच्या Kennedy Space Center मध्ये नेण्यात येईल त्यानंतर आर्टिमस टिममधील तंत्रज्ञ यानाचे Hatch ऊघडतील आणी त्यातील अनेक पेलोड ओपन करतील या बरोबरच यानातील मानवी डमी Commander Moonikin Compos,Space Biology experiments,Snoopy आणी official flight kit देखील ऊघडतील चंद्रावरील अंतराळ  प्रवासादरम्यान मानवी डमींवर काय परिणाम झाला व ईतर साहित्यावर तेथील वातावरणात काय बदल झाला ह्याचे निरीक्षण नोंदवतील त्यानंतर शास्त्रज्ञ त्यावर सखोल संशोधन करतील यानातील Capsule आणी heat shield ह्यांना अनेक टेस्ट आणी Analysis प्रक्रियेमधुन जावे लागेल आणी ह्यासाठी अनेक महिने लागतील  

Artemis मोहिमेतील हे पहिले ऊड्डाण यशस्वी करण्यात नासा संस्थेतील हजारो कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने बनविलेल्या SLS Rocket आणी अंतराळयान बनविणाऱ्या जगातील कुशल तंत्रज्ञांंच्या कर्तृत्ववान टिममुळे हे शक्य झाले आता नासा संस्था 2024 मधील Artemis II च्या मानवसहित मोहीमेची तयारी करत आहे

Friday 2 December 2022

अंतराळ स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी अंतराळवीर Josh Cassada आणी Frank Rubio Space Walk करणार

 NASA astronaut and Expedition 68 Flight Engineer Frank Rubio is pictured during a spacewalk tethered to the International Space Station's starboard truss structure.

 अंतराळ मोहीम 68 चे अंतराळवीर Frank Rubio अंतराळ स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी Space Walk दरम्यान -फोटो नासा संस्था

नासा संस्था -2 डिसेंबर

नासाच्या अंतराळ मोहीम 68चे अंतराळवीर Josh Cassada आणी Frank Rubio अंतराळ स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी 3डिसेंबरला Space Walk करणार आहेत हे दोन्हीही अंतराळवीर सकाळी 7.25 a.m.ला Space Walk साठी स्थानकाबाहेर पडतील आणी सात तासांंनी Space Walk संपल्यावर स्थानकात परततील  

ह्या Space Walk दरम्यान अंतराळवीर Josh Cassada लाल रंगाच्या रेशा असलेला स्पेससुट परीधान करतील आणी अंतराळवीर Frank Rubio ह्यांनी परिधान केलेला स्पेससुट रेशाविरहित असेल 

सात तासांच्या ह्या Space Walk दरम्यान हे अंतराळवीर स्थानकाच्या बाहेरील 3A power Channel ह्या Starboard truss ह्या भागात Solar Arrays (iROSA) install करणार आहेत  ह्या भागातील Solar channel वरून योग्य प्रमाणात पॉवर निर्मिती होत आहे कि नाही आणी बॅटरी अपेक्षित क्षमतेनुसार चार्ज होत आहे कि नाही हे चेक करण्यासाठी आणि सोलर चॅनेलची पॉवर चार्जिंग क्षमता वाढविण्यासाठी हा स्पेसवॉक करण्यात येणार आहे

ह्या आधी 1B सोलर channel मधील केबल routing मध्ये बदल करण्यात आला होता आणि स्थानकाला होणाऱ्या इलेक्ट्रिसिटी आणि पॉवर मध्ये काय बदल होतो हे चेक करण्यात आले होते ह्या पुर्वीच्या Space Walk मध्ये स्थानकाबाहेरील आठ power channel मधील एक channel बदलण्यात आले होते  सहसा अंतराळस्थानकात 1B सोलर channel वरुन निर्माण होणाऱ्या  ईलेक्ट्रिसीटी आणी ऊर्जेचा वापर केल्या जातो पण सद्या 1A सोलर channel वरुन हे काम केल्या जात आहे अंतराळस्थानकाला आवश्यक असलेला प्रकाश आणी सायंटिफिक प्रयोगासाठी आवश्यक असलेली Electric power ची क्षमता वाढविण्यासाठी हा Space Walk करण्यात येणार आहे

हे दोन्ही अंतराळवीर पुन्हा 19 डिसेंबरला Space Walk करणार आहेत ह्या Space Walk चे लाईव्ह प्रक्षेपण नासा टीव्ही वरुन करण्यात येणार आहे

Saturday 26 November 2022

स्थानकातून अंतराळवीरांनी दिल्या Thanks Giving Day च्या शुभेच्छा !

Happy Thanksgiving 2022 Astronauts International Space Station

मोहीम 68 चे अंतराळवीर Nicole Mann ,Koichi Wakata,Josh Cassada आणि Frank Rubio स्थानकातून Thanks Giving Day च्या शुभेच्छा देताना लाईव्ह संवादा दरम्यान -फोटो -नासा संस्था

नासा संस्था - 24 नोंव्हेंबर

अमेरिकेत दरवर्षी  24 नोव्हेंबरला Thanks Giving Day उत्साहात साजरा केल्या जातो अमेरिकन नागरिक त्यांचे कुटुंबीय,नातेवाईक आणि मित्रांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करतात सर्वजण एकत्र येऊन पार्टीचे आयोजन करतात आणि वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश असलेल्या मेजवानीचा आस्वाद घेतात पृथ्वीपासून दूर अंतराळ स्थानकात तरंगत्या अवस्थेत राहणाऱ्या अंतराळवीरांना मात्र कुटुंबियांसोबत हा डे साजरा करता येत नाही पण अंतराळस्थानकातील अंतराळवीर स्थानकातील सहकारी अंतराळवीर मित्रांसोबत हा दिवस साजरा करतात आणि पार्टी करून त्यांच्या जवळ असलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतात आणि नासा संस्थेशी लाईव्ह संपर्क साधून पृथ्वीवरील कुटुंबियांशी संवाद साधतात आणि Thanks giving Day च्या शुभेच्छा देतात

सध्या अंतराळ स्थानकात राहात असलेले नासाचे मोहीम 68 चे अंतराळवीर Frank Rubio ,Josh Cassada ,Nocole Mann आणि जपानी अंतराळवीर Koichi Wakata ह्यांनी देखील अंतराळ स्थानकात Thanks Giving Day साजरा केला त्या साठी त्यांच्या व्यस्त कामातून ह्या साठी वेळ काढला आणि पृथ्वीवासीयांना स्थानकातून लाईव्ह संवाद साधत शुभेच्छा दिल्या 

Frank Rubio - आम्हा मोहीम 68च्या अंतराळवीरांसाठी हा Thanks Giving Day स्पेशल आहे कारण आम्ही इथे स्थानकात आहोत आमच्या तर्फे Wish you & your  loved ones Happy Thanks Giving !

Koichi Wakata- आम्ही इथे घरापासून दूर स्थानकातील घरात आहोत अंतराळविश्वातील अंतराळ मोहीमांतील हजारो लोक ज्यांनी अंतराळ मोहिमेद्वारे अंतराळस्थानकातील मानवी वास्तव्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले त्या सर्वांचे विशेष आभार !

Nicole Mann -आमच्या ह्या मोहिमेतील सहभागी पृथ्वीवरील टीममधील सर्वांचे आभार त्यांच्या मदतीमुळे आम्ही इथे आहोत आमचे मित्र ,कुटुंबीय ज्यांच्या प्रोत्साहना मुळे आम्ही इथे येऊ शकलो आमच स्वप्न सत्यात उतरु शकल त्या सर्वांचे आभार ! Happy Thanks Giving Day !

Josh Cassada - इथे आता Greenwich mean time आहे म्हणजे पृथ्वी आणि स्थानकाच्या मधला अर्धा दिवस सुरु आहे त्या मुळे आम्हाला अजून Thanks Giving Day साजरा करण्यासाठी थोडा वेळ आहे आम्ही बुधवारी आणी गुरुवारी हा डे साजरा करू शकतो आम्ही फुटबॉल खेळण्याचा आणि पार्टीत फीस्ट साठी मिळालेल्या पदार्थांचा आस्वाद घेणार आहोत !

आम्हा सर्वांतर्फे Happy Thanks Giving Day !

 

Thursday 17 November 2022

नासाच्या Artemis 1मोहिमेचा यशस्वी शुभारंभ Orion अंतराळयान चंद्राच्या वाटेवर

 NASA’s Space Launch System rocket carrying the Orion spacecraft launches on the Artemis I flight test, Wednesday, Nov. 16, 2022, from Launch Complex 39B at NASA’s Kennedy Space Center in Florida.

 नासाच्या Artemis 1 मोहिमेतील S.LS Rocket आणि Orion चांद्रयान Kennedy Space Center येथील  उड्डाणस्थळावरून चंद्रावर जाण्यासाठी अंतराळात झेपावताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था - 16 नोव्हेंबर 

पन्नास वर्षांनी सुरु झालेली आणि अचानक उद्भवलेल्या अडचणींमुळे दोनवेळा लांबलेली नासाची Artemis 1 मोहीम अखेर यशस्वी झाली नासाच्या Kennedy Space Center येथील 39B ह्या उड्डाण स्थळावरून बुधवारी सकाळी 1वाजून 57 मिनिटाला  Orionचांद्रयान S.LS ह्या रॉकेट च्या साहाय्याने चंद्रावर जाण्यासाठी अंतराळात झेपावले 

ह्या आधी 29 ऑगस्टला Artemis 1चे उड्डाण होणार होते पण उड्डाणापूर्वी चेकिंग दरम्यान यानातील यंत्रणेतील Temperature Sensor Faulty असल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले त्या मुळे ऐनवेळी उड्डाण रद्द करण्यात आले त्या नंतर 4 सप्टेंबरला उड्डाणाआधीच्या चेकिंगच्या वेळी Rocket च्या Mobile Launcher च्या Interface मध्ये Liquid Hydrogen Leak होत असल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आल्याने उड्डाण लांबविण्यात आले होते अखेर Rocket पुन्हा नासा संस्थेच्या Assembly Building मध्ये नेण्यात आले सर्व सिस्टिम्स चेक करून दुरुस्ती नंतर पुन्हा रॉकेट उड्डाण स्थळी आणण्यात आले

Orion चांद्रयान जेव्हा अंतराळ प्रवासाचा पहिला टप्पा पार करेल तेव्हा अंतराळयानावर बसविलेले सौर Arrays उघडतील त्या वेळी नासा संस्थेतील Artemis मोहिमेतील टीममधील इंजिनीअर्स पृथ्वीवरून यानातील  सर्व सिस्टिमस वर लक्ष केंद्रित करतील आणि त्या योग्यरितीने कार्यरत झाल्या आहेत का हे चेक करतील 

रॉकेटच्या उड्डाणानंतर दीड तासांनी रॉकेटच्या पुढील भागातील ज्वलन प्रक्रिया यशस्वी झाल्यावर रॉकेटने पूर्ण क्षमतेने पेट घेतला आणि Orion चांद्रयानाने प्रचंड दाबाने पृथ्वीची कक्षा भेदून अंतराळात प्रवेश केला आणि  यान चंद्राच्या दिशेने मार्गस्थ झाले काही तासांच्या अंतराळ प्रवासानंतर  Orion चांद्रयानाच्या वरील भागात फिट केलेले दहा छोटे Cube Sat कार्यरत होतील प्रत्येक Cube Sat त्यांची सिस्टिम सुरु करतील आणि सौर ऊर्जेची सखोल माहिती आणि चंद्रावरील भविष्यकालीन मानवी मोहिमेसाठी आवश्यक असलेली टेक्निकल माहिती गोळा करतील आठ तासांच्या अंतराळ प्रवासानंतर Orion अंतराळयातील ज्वलन प्रक्रिया अनेकदा कार्यरत होईल आणि पेट घेईल त्या मुळे Orion चांद्रयानाला पुढे जाण्यासाठी ऊर्जा आणि फोर्स मिळेल नासा संस्थेतील मिशन Controllers ह्या घडामोडीवर लक्ष ठेवतील आणि यानाला आवश्यक त्या सूचना देऊन मार्गदर्शन करतील Orion 21नोव्हेंबरला चंद्रावर पोहोचेल आणि चंद्रापासून हजारो मैल दूरवरच्या कक्षेत स्थिरावेल 

Artemis 1 मोहिमेच्या  यशस्वी उड्डाणानंतर नासाचे Administrator Bill Nelson आनंदित झाले ,"नासाचे S.LS Rocket आणि Orion चांद्रयान ह्यांचे एकत्रित उड्डाण प्रत्यक्ष पाहतानाचे दृश्य अनोखे होते ह्या प्रथम मानवरहित चांद्रमोहीमेमुळे पृथ्वीची सीमारेषा ओलांडून अंतराळयान चंद्राच्या भूमीवर प्रवेश करेल त्याच्या यशस्वी पदार्पणामुळे आगामी काळातील दूरवरच्या अंतराळ मोहिमांची यशस्वी सुरवात होईल आणि मानवसहित चांद्रमोहिमेचा शुभारंभ होईल नासाची हि Artemis 1 मोहीम Artemis II मोहिमेसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे!"अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली

नासाचे Deputy Associate Administrator Jim Free देखील ह्या मोहिमेच्या यशाने आनंदित झाले आहेत ते म्हणाले ," ह्या Artemis 1मोहिमेला अपेक्षेपेक्षा खूप उशीर झाला अडचणी आल्या पण अखेर हि मोहीम यशस्वी झाली ह्या यशाने नासा आणि आमचे पार्टनर आता अंतराळविश्वातील अंतराळ मोहिमांच्या यशाच्या वाटेवर वाटचाल करत आहोत आणि मानवासाठी उपयुक्ततेच्याही !

Orion चांद्रयान चंद्रावर 40,000 मैलाचा अंतराळ प्रवास करेल आणि 25.5 (साडे पंचवीस दिवस )दिवस तेथे राहून चंद्रावरील सखोल निरीक्षण नोंदवून उपयुक्त माहिती गोळा करून पृथ्वीवर परतेल S.LS Rocket आणि Orion अंतराळयान नासाच्या Kennedy Space Center च्या उड्डाण स्थळावर 4नोव्हेंबरला पोहोचले पण वादळी वातावरणामुळे हवामान उड्डाणासाठी अनुकूल नव्हते त्या मुळे उड्डाण लांबले

Saturday 12 November 2022

अंतराळवीर Bob Behnken नासा संस्थेतून निवृत्त

  NASA astronaut Robert Behnken.

                               नासाचे अंतराळवीर Bob Behnken -फोटो -नासा संस्था

नासा संस्था- 11 नोव्हेंबर

नासाचे अंतराळवीर आणी US Air force चे कर्नल Bob Behnken  हे त्यांची नासा संस्थेतील बावीस वर्षांची कारकीर्द संपवून अकरा नोव्हेंबरला निवृत्त झाले आहेत 2000 साली जुलैमध्ये Bob ह्यांची नासा संस्थेत अंतराळवीर होण्यासाठी निवड झाली दोन वर्षे ट्रेनिंग घेतल्यानंतर नासाच्या Astronaut Office मधील Technical विभागात त्यांची ऑफिसर पदी निवड झाली अंतराळवीरांची निवड प्रक्रिया त्यांच ट्रेनिंग आणि त्यानंतर अंतराळयानाच उड्डाण आणि परत पृथ्वीवर सुरक्षित Landing ह्या सर्व प्रक्रियेत त्यांचा यशस्वी सहभाग होता 

अमेरिकेची अंतराळमोहीम बंद होण्याआधी त्यांनी दोन वेळा  Endeavor अंतराळयानातून अंतराळ स्थानकात जाण्यासाठी अंतराळ उड्डाण केले होते 2008 साली STS-123 मोहीमेद्वारा अंतराळवीर Bob Behnken पहिल्यांदा अंतराळस्थानकात गेले त्यानंतर 2010 साली दुसऱ्यांदा ते STS-130 मोहीमेद्वारा अंतराळस्थानकात गेले ह्या मोहिमेत ते मिशन स्पेशॅलिस्ट होते ह्या दोन्ही मोहिमेत त्यांनी जपान आणि कॅनडा अंतराळ एजन्सीचे स्थानकाच्या कामासाठीचे सामान स्थानकात पोहोचवले त्यांच्या दोन वेळच्या अंतराळवारीत त्यांनी स्थानकात 62 दिवस वास्तव्य केले आणि त्या दरम्यान स्थानकाच्या कामासाठी चार वेळा Space Walk केला आणि त्या साठी अंतराळात 100 तास व्यतीत केले त्यांच्या Air Force मधील कारकिर्दीत त्यांनी 25 पेक्षा जास्त वेगवेगळ्या Air Craft मधून 2000 तास उड्डाण केले आहे आणी आजवरच्या अंतराळ मोहिमे दरम्यान अंतराळ स्थानकात 93 दिवस वास्तव्य केले आहे

नासा आणि Space X Crew Dragon च्या पहिल्या व्यावसायिक आणि मानवी अंतराळ मोहिमेचा ऐतिहासिक शुभारंभ त्यांनी केला Space X Crew Dragon च्या पहिल्या आणि दुसऱ्या  Demo -2 Test मोहिमेत ते पायलट होते ह्या दोन्ही वेळेस त्यांनी कुशलतेने यंत्रणा हाताळून Space X Crew Dragon मोहीम यशस्वी केली 2020 साली 30 मे ला अंतराळवीर Bob Behnken आणि Doug Hurley टेस्ट मोहिमेअंतर्गत Space X Crew अंतराळ यानातून पहिल्यांदा अंतराळ स्थानकात  राहायला गेले आणि 2ऑगस्ट 2020 मध्ये परत सुखरूप पृथ्वीवर पोहोचले  अमिरिकेची बंद पडलेली अंतराळ मोहीम पुन्हा सुरु झाल्यानंतर अमेरिकन निर्मित अमेरिकन अंतराळयानातून अमेरिकन भूमीवरून अंतराळवीरांना अंतराळ प्रवास करून स्थानकात नेण्या आणण्यासाठी आणि व्यावसायिक दृष्ठीने त्यांना लागणारे सामान आणि इतर नागरिकांना अंतराळ प्रवास घडविण्यासाठी हि मोहीम सुरु करण्यात आली आणि आता पाचव्यांदा अंतराळवीर अंतराळ स्थानकात पोहोचले आहेत ह्या आधीच्या चार मोहिमाही यशस्वी  झाल्या आहेत

ह्या प्रसंगी बोलताना नासा संस्थेचे Administrator Bill Nelson म्हणाले,"Bob Behnken हे अत्यंत बुद्धीमान आणी कर्तुत्ववान अंतराळवीर आहेत अमेरिकन अंतराळविश्वातील त्यांनी केलेली कामगिरी अविस्मरणीय आहे अंतराळवीर Bob आणी अंतराळवीर Doug Hurley ह्या दोघांनी नासा आणी Space X Crew Dragon च्या अंतराळ विश्वातील ऐतिहासिक व्यावसायिक अंतराळ मोहिमेचा शुभारंभ केला आहे त्यांच्या ह्या सहयोगा बद्दल आणी नासा संस्थेतील कामगिरी बद्दल नासा संस्थेतर्फे त्यांचे आभार आणी त्यांना त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा!"

नासाच्या Johnson Space Center मधील Astronaut Office चे प्रमुख Reid Weisman ह्यांनी देखील अंतराळवीर  Bob Behnken ह्यांच्या बद्दल असेच मत व्यक्त केले ते म्हणाले," अंतराळवीर Bob ह्यांनी अत्यंत कुशलतेने आणि शांततेने Astronaut ऑफिस मध्ये आणि ह्या मोहिमेत काम हाताळले नासा संस्थेत आणि अंतराळ विश्वात असे कर्तृत्वान आणि असामान्य नेतृत्व असलेले लोक खूप कमी आहेत त्यांच्या निवृत्ती नंतर आम्हाला त्यांची उणीव नेहमी जाणवेल त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा !

अंतराळवीर Bob Behnken ह्यांनी देखील ह्या मोहिमेत सहभागी केल्याबद्दल नासा संस्थेचे आभार मानले ते म्हणाले ,"मला ह्या देशाच्या अंतराळविश्वातील ऐतिहासिक मोहिमेचे नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल नासा संस्थेचे आणि सर्व टीमचे आभार ! अमेरिकेने पुन्हा एकदा अमेरिकन भूमीवरून स्वनिर्मित अंतराळयानातून अंतराळ प्रवास घडवला आणि मी देखील अमेरिकेची अंतराळविश्वातील भविष्यकालीन प्रगती पाहण्यासाठी उत्सुक आहे !"

Friday 11 November 2022

अंतराळवीरांनी स्थानकात Halloween Day साजरा केला

  image of astronauts celebrating Halloween dressed up as video game and cartoon characters aboard the International Space Station.

 नासाच्या अंतराळ मोहीम 68चे अंतराळवीर Koichi Wakata अंतराळवीर Frank Rubio अंतराळवीर Nikole Mann आणि अंतराळवीर Josh Cassada व्हीडिओ गेम मधील कार्टूनचे मुखवटे घालून Halloween पार्टी साजरी करताना- फोटो -नासा संस्था

नासा संस्था-4 नोव्हेंबर

अमेरिकेत दरवर्षी 31आक्टोबरला Halloween दिवस साजरा केला जातो आपल्या पुर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून हा दिवस साजरा करतात त्या दिवशी भोपळ्याचे विषेश महत्व असते भोपळा कंदिलासारखा कोरून त्यात दिवे लाऊन रात्री घराबाहेर लावले जातात नागरीक वेगवेगळ्या डिझाइनचे चित्रविचित्र पोषाख परीधान करतात कार्टून्स वै चे मुखवटे घालतात आणी आपल्या कुटुंबीय,नातेवाईक आणी मित्रांसोबत पार्टीचे आयोजन करतात ह्या पार्टीत भोपळ्यापासून बनविलेल्या वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश असतो 

पण पृथ्वी पासून दुर अंतराळात स्थानकातील झीरो ग्रव्हीटित रहाणाऱ्या अंतराळविरांना इथल्यासारखा हा दिवस साजरा करता येत नाही तरीही 2000 साली अंतराळस्थानक स्थापन झाल्यापासुन दरवर्षी अंतराळवीर त्यांच्या  व्यस्त दिनचर्येतुन वेळ काढून स्थानकात हा दिवस साजरा करतात त्या दिवशी त्यांचे संशोधनाचे व इतर काम लवकर आटोपून वेळ काढतात स्थानकात असलेल्या सामानातुन स्थानकातील मोकळ्या जागी सजावट करतात  सर्व अंतराळवीर एकत्रीत येऊन वेगवेगळे ड्रेस व मुखवटे तयार करतात आणि ते घालून  Halloweenला पार्टीचे आयोजन करतात स्थानकात असलेल्या पदार्थांचा आस्वाद घेत Halloween चा आनंद लुटतात नासा संस्थेतर्फे त्यांना अशा  सणांच्या पार्टी साठी खास पदार्थ पृथ्वीवरून स्थानकात जाणाऱ्या कार्गोशिप मधून इतर सामानासोबत पाठवले जातात अंतराळवीर त्या दिवशी त्यांच्या कुटुंबियांशी लाईव्ह संवादही साधतात ह्या वर्षी देखील नासाच्या मोहीम 68 च्या अंतराळविरांनी व्हिडिओ गेम्स मधील कार्टून्सचे मुखवटे घालून Halloween साजरा केला

Sunday 30 October 2022

मंगळावरील Salty Region मधील खडकात Curiosity यानाने शोधले मिठाचे अस्तित्व

36th successful drill hole on Mount Sharp

 मंगळावरील Canaima ह्या भागातील पाणथळ भागाचे आटलेले स्रोत आणि Curiosity यानाने ड्रिल केलेला भाग -फोटो -नासा संस्था (JPL)

 नासा संस्था -19 ऑक्टोबर 

उन्हाळ्यात मंगळावरील रेताळ भागातुन प्रवास केल्यानंतर नासाचे Curiosity मंगळयान आता तेथील वाळवंटातील अरुंद भागातून मार्गक्रमण करीत पर्वतीय रांगातील आटलेल्या पाणथळ भागात पोहोचले आणि तेथील Sulfate युक्त भाग शोधून सक्रिय देखील झाले आहे Curiosity यानाच्या टीममधील शास्त्रज्ञ Curiosity मंगळयान ह्या भागात पोहोचण्याची बरेच दिवसांपासून वाट पाहात होते कारण ह्या भागात मिठाचे अस्तित्व असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली होती 

करोडो वर्षांपूर्वी मंगळावर अस्तित्वात असलेल्या मंगळावरील पाण्याचे स्रोत आटल्यामुळे तेथील पाणी नष्ठ झाले पण तेथे असलेल्या पाणथळ जागेतील नदी,नाले,तळे,झरे ह्यांचे अस्तित्व अजूनही तेथे आहे शास्त्रज्ञांच्या मते तेथे करोडो वर्षांपूर्वी पृथ्वीसारखे वातावरण होते कालांतराने अनैसर्गिक घडामोडी मुळे नैसर्गिक आपत्ती मुळे वातावरण बदलले आणि हळू,हळू नष्ठ झाले पण तेथे आटलेल्या पाणथळ जागेतील माती,वाळू ,खडक,मिनरल्स ह्यांच्या मध्ये आटलेल्या थेंबांच्या स्वरूपात अस्तित्वात राहिले ह्याच खडकांच्या नमुन्यात मिठाचे अंश देखील सूक्ष्म कणांच्या रूपात  सापडले आहे Curiosity मंगळ यान मंगळावर जाण्याआधी नासाच्या Mars Reconnaissance Orbiter ला अशा मंगळावरील जागा शोधण्यात यश आले होते तेव्हापासूनच शास्त्रज्ञ मंगळयान तेथे पोहोचण्याची उत्सुकतेने वाट पाहात होते 

आता Curiosity मंगळयान तेथे पोहोचले आणि यशस्वीरीत्या कार्यरत देखील झाले आहे ह्या यानाने तेथील क्षारयुक्त जमीन शोधून तेथील दगड,त्यांचे प्रकार आणि त्यातील मिठाच्या अस्तित्वाचे पुरावे शोधले आहेत Curiosity यानाने ड्रिल करून शोधलेल्या ह्या दगडांचा चुरा केल्यानंतर ह्या दगडांमध्ये आटलेल्या पाण्याच्या थेंबाचे अंश व पॉपकॉर्न textured nodulesच्या स्वरूपात मीठयुक्त मिनरल्स आढळले शास्त्रज्ञांनी सखोल निरीक्षण केल्यानंतर त्यांना ह्या दगडांमध्ये Magnesium Salt(Epsom Salt),Calcium Sulfate आणि Sodium Chloride (आपण वापरतो ते खाण्यातील मीठ ) सापडले ह्या मुळे मंगळावर पुरातन काळी सजीवांचे अस्तित्व असण्याच्या शक्यतेला दुजोरा मिळाला आहे 

  This grid shows all 36 holes drilled by NASA’s Curiosity Mars rover using the drill on the end of its robotic arm

    नासाच्या Curiosity मंगळ यानाने खोदलेल्या 36 खडकांचा ड्रिल केलेला भाग -फोटो नासा संस्था

शास्त्रज्ञांनी ह्या भागाला Canaima असे नाव दिले आहे हे ह्या मोहिमेतील 36 वे ड्रिल सॅम्पल आहे मंगळावरील हे खडक शोधून ड्रिल करून त्याचा चुरा करण हे काम अत्यंत कठीण आहे Curiosity यानाला बसविलेल्या सात फूट लांबीच्या रोबोटिक आर्मला जोडलेल्या हातोड्याने कठीण टोकदार दगड फोडताना रोबोटिक आर्मला आणि हातोड्याला हानी पोहोचू शकते कुठलाही दगड फोडताना आधी तेथील धूळ साफ करावी लागते नंतर ब्रश करून त्यावर मार्किंग करून छेद करून ड्रिल करावे लागते आणि हे काम  वाटते तेव्हढे सोपे नाही असे Curiosity च्या Project Manager Kathya Zamora - Garcia म्हणतात Curiosity तेथील खडकाळ भागात स्थिर राहणे आवश्यक असते त्याची पोझिशन योग्य दिशेने असणे त्याच्या अँटेनाची दिशा पृथ्वीकडे असणे आवश्यक असते शिवाय वाळवंटातून जाताना Curiosity यानाच्या चाकांचे घर्षण होऊन झीज होण्याची भीती असते चाक तेथील जमिनीत रुतुन बसू शकते दगड फोडताना यानातील यंत्रणेला हानी पोहोचू शकते

ह्या समस्या उदभऊ नये म्हणून Curiosity यानाची Engineer टीम सतत दक्ष असते मुख्य म्हणजे Curiosity यान त्याच्या सहा चाकावर स्थिर राहून योग्य दिशेने खडकाजवळ पोहोचून रोबोटिक आर्म कार्यरत करून योग्य दगड निवडून ड्रिल करणे आवश्यक असते  Curiosity यानातील Mast Camera आणि (Sample Analysis at Mars Instrument) SAM  च्या साहाय्याने हे काम केल्या जाते  Curiosity ची टीम आणि यानातील समन्वयामुळे हे काम Curiosity यानाने आता यशस्वीरीत्या पार पाडले आहे Curiosity यान 2012 साली मंगळावर पोहोचले होते आणि यानाने यशस्वीपणे कार्यरत राहून नुकतीच मंगळावरील दहा वर्षे पूर्ण केली आहेत

Sunday 16 October 2022

नासाच्या Space X Crew -4चे अंतराळवीर पृथ्वीवर परतले

 NASA, SpaceX Dragon Freedom spacecraft lands in the Atlantic Ocean off the coast of Jacksonville, Florida, Friday, Oct. 14, 2022.

 Space X Crew - 4 च्या अंतराळवीरांना घेऊन Freedom अंतराळयान पॅराशूटच्या साहाय्याने Florida मधील समुद्रात खाली उतरताना -फोटो-नासा संस्था

नासा संस्था -15ऑक्टोबर 

 नासाच्या Space X Crew -4 चे अंतराळवीर Bob Hines,Kjell Lindgren ,Jessica Watkins आणि युरोपियन अंतराळवीर Samantha Cristoforetti हे चारही अंतराळवीर स्थानकातील त्यांचे 170 दिवसांचे वास्तव्य संपवून पृथ्वीवर परतले प्रतिकूल हवामानामुळे एक दिवस उशिरा ते पृथ्वीवर परतले हे चारही अंतराळवीर शुक्रवारी 4.55p.m.ला पृथ्वीवर परतले

 Astronaut Samantha Cristoforetti handed over station command to cosmonaut Sergey Prokopyev as the Expedition 68 crew observed on Wednesday, Oct. 12, 2022.

 अंतराळवीर Samantha Cristoforetti स्थानकातील Command Change Ceremony दरम्यान स्थानकाची सूत्रे अंतराळवीर Sergey Prokopyev ह्यांच्या हाती सोपविताना -फोटो -नासा संस्था

स्थानकातून पृथ्वीवर येण्यासाठी निघण्याआधी स्थानकात Command Change Ceremony पार पडला तेव्हा अंतराळवीर Samantha Cristoforetti ह्यांनी स्थानकाची सूत्रे अंतराळवीर Sergey Prokopyev ह्यांच्या हाती सोपिवली ह्या चारही अंतराळवीरानां घेऊन Freedom Space X crew Dragon अंतराळ यान  फ्लोरिडा मधील Jacksnville येथील समुद्रात उतरले पृथ्वीच्या कक्षेत शिरताच अंतराळवीर पॅराशूटच्या साहाय्याने खाली उतरले  त्या नंतर अंतराळयान आणि  जहाज ह्यांच्यातील Hatching प्रक्रिया पार पडली नासाची Recovery Vessels आणि Recovery टीम तेथे आधीच पोहोचली होती त्यांनी आधी यानात प्रवेश केला आणि अंतराळवीरांचे प्राथमिक चेकअप केले आवश्यक प्रक्रिया पार पडल्यानंतर ह्या अंतराळवीरांना टीमने बाहेर उचलून आणले 

ह्या अंतराळवीरांना इतर आवश्यक बाबी पार पडल्यानंतर नासाच्या विमानाने Houston येथील Johnson Space Center येथे नेण्यात आले तेथून त्यांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात येईल आणि युरोपियन अंतराळवीर Samantha Critoforetti ह्यांना युरोप मध्ये पोहोचविण्यात येईल 

नासाचे Administrator Bill Nelson ह्यांनी" Welcome Home Crew-4! "असे म्हणत ह्या चारही अंतराळवीरांचे स्वागत केले अंतराळ स्थानकातील झिरो ग्रॅव्हीटीत राहून तिथल्या फिरत्या लॅब मध्ये संशोधन करण्याची संधी आयुष्यात एखाद्यालाच मिळते आपल्या पृथ्वीपासून आणि आपल्या कुटुंबियांपासून दूर तिथल्या विपरीत वातावरणात राहण सोप नाही ह्या चारही अंतराळवीरांनी तेथील वातावरणाशी जुळवून घेत सहा महिने तेथे राहून पृथ्वीवासीयांसाठी उपयुक्त नवे सायंटिफिक संशोधन केले आहे त्या साठी अंतराळवीर Jessica ,Bob ,Kjell आणि Samantha तुमचे आभार ! तुम्ही केलेल्या संशोधनासाठी !

हे अंतराळवीर 27 एप्रिलला स्थानकात राहायला गेले होते अंतराळवीर Hines ,Lindgren ,Watkins आणि Samantha ह्यांनी त्यांच्या स्थानकातील 170  दिवसांच्या वास्तव्यात 72,168,935 मैलांचा अंतराळ प्रवास केला आणि त्या दरम्यान त्यांनी पृथ्वीभोवती 2,720 वेळा फेऱ्या मारल्या  

अंतराळवीर Kjell Lindgren ह्यांची हि दुसरी अंतराळवारी होती त्यांच्या दोन वेळच्या अंतराळ कारकिर्दीत त्यांनी स्थानकात 311 दिवस वास्तव्य केले अंतराळवीर Samantha Cristoforetti ह्यांची देखील हि दुसरी अंतराळवारी होती त्यांनी त्यांच्या ह्या दोन वेळच्या अंतराळ कारकिर्दीत 369 दिवस स्थानकात वास्तव्य केल आणि जास्त दिवस स्थानकात राहणाऱ्या महिलांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची नोंद केली त्यांनी स्थानकाच्या कामासाठी अंतराळवीर Oleg Artemyev ह्यांच्या सोबत दोनवेळा Space Walk केला अंतराळवीर Bob Hines आणि Jessica Watkins मात्र पहिल्यांदाच स्थानकात राहायला गेले होते

Sunday 9 October 2022

स्थानकात Space X Crew -5 च्या अंतराळवीरांचा Welcome Ceremony संपन्न

 The four crew members from the SpaceX Crew-5 mission join the Expedition 68 crew during welcoming remarks inside the space station's Harmony module. Credit: NASA TV

 Space X Crew -5 चे अंतराळवीर स्थानकातील Harmony Module मध्ये Welcome Ceremony कार्यक्रमात नासा संस्थेशी लाईव्ह संवाद साधताना -फोटो -नासा संस्था

 

 नासा संस्था-7 ऑक्टोबर

नासाच्या Space X Crew -5चे अंतराळवीर गुरुवारी अंतराळ स्थानकात पोहोचल्यानंतर स्थानकात राहात असलेल्या अंतराळवीरांनी त्यांच फुल देऊन स्वागत केल त्या नंतर काही वेळातच स्थानकात त्यांचा Welcome Ceremony पार पडला ह्या कार्यक्रमासाठी स्थानकातील अकराही अंतराळवीर एकत्र जमले होते नासाच्या Huston येथील संस्थेने ह्या अंतराळवीरांशी लाईव्ह संपर्क साधुन त्यांचे स्थानकात स्वागत केले आणी स्थानकाची कमांडर Samantha हिच्या हाती संवादाची सुत्रे दिली 

अंतराळवीर Samantha -

अंतराळस्थानकात Crew 5 च्या सर्व अंतराळवीरांचे स्वागत ! तुम्हाला ईथे पोहोचलेल पाहून आनंद झाला अखेर तुम्ही ईथे पोहोचलात खरोखरच तुम्ही स्पेशल आहात कारण ह्या वेळेस रशियन अंतराळवीर Anna Kikina तुमच्यासोबत आहे Space X-Crew Dragon मधून अंतराळ प्रवास करुन स्थानकात पोहोचणारी ती पहिली रशियन महिला अंतराळवीर आहे त्यामुळे Anna चे स्पेशल स्वागत ! आणी Koichi तुमचेही स्पेशल स्वागत कारण तुम्ही पाचव्यांदा स्थानकात रहायला आला आहात Josh आणी Nicole तुमचेही स्वागत!आपण हा आनंद सेलिब्रेट करु यात तुमच्यासाठी स्पेशल Gift आहे शेवटचे आठ Balls तुमच्यासाठी आता जास्त वेळ घेत नाही कारण तुमचे कुटुंबीय तुम्हाला पहाण्यासाठी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी उत्सुक आहेत

Nicole Mann-

Thank you Samantha! खरोखरच हे सार आश्चर्यकारक आहे ,Mom बघ मी स्थानकात पोहोचलेय ! हे स्थानक बनवणाऱ्यांच कर्तुत्व असामान्य आहे आमच पृथ्वीवरच नासा संस्थेतील ट्रेनिंग,तिथले सहकारी अंतराळवीरआणि आमची टिम सारच खूप छान होत आता स्थानकात ह्या मोहीमेतील अंतराळविरांसोबत काम करायला मिळेल त्या मुळे नासा संस्था आणी स्पेस X टिममधील सर्वांंचे आभार त्यांच्या मुळेच आम्ही ईथे पोहोचलो आहोत विषेशतः माझ्या पतीचे आणी मुलाचे आभार मला माहिती नाही पुन्हा मला हि संधी मिळेल की नाही ते! त्यांच्या सपोर्टमुळेच मी ईथे येऊ शकले  Mom!Dad!माझी बहिण Kirsten! तुमच्या सहकार्याने,प्रोत्साहनामुळे मी ईथे पोहोचले तुम्हा सर्वांचे आभार!

Josh Cassada

मीही Nicoleच्या पती आणी मुलाचे आभार मानतो त्यांच्यामुळे ती आमच्या टिममध्ये आली मला तिच्यासोबत काम करायला मिळाल आम्हाला ईतकी छान Crew mate  मिळाली ती खूप छान आहे आमच्या टिममधील सगळेच खूप छान आहेत मी  खूप नशीबवान आहे माझ्या संपूर्ण आयुष्यातले काही दिवस मी स्थानकात वास्तव्य करु शकेन  मला ईथे संशोधन करायला मिळेल,नवीन अंतराळ विरांसोबत काम करायला मिळेल आमची टीम खूप छान आहे  खरतर ट्रेनिंग आधी आम्ही एकमेकांना ओळखतही नव्हतो आता आम्ही चांगले मित्र झालो आहोत मी माझ्या कुटुंबातील सर्वांचे आभार मानतो त्यांच्यामुळेच मी ईथे येऊ शकलो नासा संस्था आणी माझ्या आयुष्यातील सर्वांचे आभार ज्यांनी मला येथे येण्यासाठी प्रोत्साहित केल

Koichi Wakata 

मला ईथे आल्यावर पुन्हा माझ्या दुसऱ्या घरी परतल्यासारख वाटतय आपण घरातून काही दिवस बाहेर जाऊन आल्यावर जस वाटत तसच फिलींग आलय त्यासाठी माझ्या कुटुंबीयांचे आभार त्यांच्यामुळेच मी ईथे पुन्हा पुन्हा येऊ शकलो आणी मला हि संधी दिल्याबद्दल नासा संस्थेचे,संस्थेतील सहभागी देशांतील संस्थेचे आणी अर्थातच माझ्या देशाची संस्था JAXA चे खास आभार आता वेळ न घालवता लवकरात लवकर ह्या मोहीम 68च्या अंतराळवीरांसोबत काम करायला मी ऊत्सुक झालोय

Anna Kikina 

स्थानकातील सर्व अंतराळवीर आमच्या येण्याने आनंदीत झाले आहेत त्यांनी ऊत्साहाने आमच फुल देऊन स्वागत केलय सर्व अंतराळवीर त्यांच्या कामातून वेळ काढून आमच्या स्वागतासाठी एकत्र जमले आहेत मला पण त्यांच्यासोबत वेळ घालवताना आनंद होतोय पहा सगळेच  किती भाऊक झाले आहेत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत ज्यांच्यामुळे आम्ही ईथे पोहोचलो त्या संस्थेचे आभार ह्या अंतराळ विश्वातील,अंतराळ मोहिमेतील ,टिममधील सर्वांचे आभार ज्यांनी ह्या मोहिमा सुरू ठेवल्या आहेत त्यांच्यामुळेच आम्ही ईथे स्थानकात येऊ शकतो  राहु शकतो हे International Friends Wonderful आहेत पृथ्वीवरील सर्वांना माझा Big Hello! तसेच माझे कुटुंबीय माझे पती Angelina !माझी Mom !,भाऊ सर्वांचे आभार आणि मला प्रेरित करणाऱ्या सर्वांचे आभार launching Site वर खरोखरच चमत्कार झाला वादळी वातावरणामुळे आमच launching लांबल पण वातावरण अनुकूल झालं आणि आम्ही इथे पोहोचलो

नासा संस्था -तुम्ही सर्वजण व्यवस्थित पोहोचलात आनंदी दिसत आहात आमच्याकडूनही तुमच्या सर्वांचे आभार आणी मोहिम 68 मध्ये आणि स्थानकात तुमच स्वागत !

Friday 7 October 2022

नासाच्या Space X Crew -5 चे अंतराळवीर स्थानकात पोहोचले

  NASA's SpaceX Crew-5 crew members wave at Kennedy Space Center       नासाचे अंतराळवीर Anna Kikina ,Josh Casada ,Nicole Mann आणि Koichi Wakata केनेडी स्पेस सेंटर मधील Checkout Building मधून बाहेर पडल्यावर उड्डाणाच्या तयारीत -फोटो- नासा संस्था

नासा संस्था -7 ऑक्टोबर

नासाच्या Space X Crew -5 मोहिमेतील अंतराळवीर Nicole Mann, Josh Cassada जपानचे अंतराळवीर Koichi Wakata आणि रशियन अंतराळवीर Anna Kikina गुरुवारी 6.49 (p.m.)वाजता  स्थानकात सुखरूप पोहोचले मागच्या आठवड्यात  फ्लोरिडातील Ian वादळामुळे तेथील हवामान उड्डाणासाठी प्रतिकूल होते त्या मुळे ह्या अंतराळवीरांचे पूर्व नियोजित उड्डाण दोन वेळा लांबले होते अखेर बुधवारी हवामान अनुकूल झाल्यावर हे अंतराळवीर सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी स्थानकाच्या दिशेने मार्गस्थ झाले 

बुधवारी 12(p.m.)(EDT)वाजता नासाच्या Kennedy Space Center येथील 39 A ह्या उड्डाण स्थळावरून Space X Crew Dragon Endurance ह्या अंतराळ यानातून हे चारही अंतराळवीर स्थानकाच्या दिशेने अंतराळ प्रवासास निघाले आणि 29 तासांच्या अंतराळ प्रवासानंतर 4.57 (p.m.)वाजता स्थानकाच्या Harmony Module जवळ पोहोचले त्या नंतर दोन तासांनी स्थानक आणि Crew Dragon ह्यांच्यातील Hatching आणि Docking प्रक्रिया पार पडली आणि  अंतराळवीरांनी स्थानकात प्रवेश केला सध्या स्थानकात राहात असलेल्या अंतराळवीरांनी त्यांचे स्थानकात स्वागत केले त्या नंतर काही वेळाने स्थानकात त्यांचा Welcome Ceremony पार पडला  

NASA astronaut Nicole Mann enters the space station less than two hours after docking the Dragon Endurance crew ship to the Harmony module's forward port.

               नासाची अंतराळवीर Nicole Mann स्थानकात प्रवेश करताना -फोटो -नासा संस्था 

जाण्याआधी ह्या अंतराळवीरांचे नासाच्या केनेडी स्पेस सेंटर मधील Checkout बिल्डिंग मध्ये उड्डाणपूर्व चेकअप,स्पेससूट चेकअप व इतर आवश्यक चेकअप पार पडले ह्या अंतराळवीरांचे नातेवाईक बाहेर त्यांना निरोप देण्यासाठी उपस्थित होते निघण्याआधी ह्या अंतराळवीरांनी काही क्षण त्यांच्याशी संवाद साधला त्या नंतर नासाच्या गाडीतून ह्या अंतराळवीरांना उड्डाणस्थळी पोहोचविण्यात आले तेथे आवश्यक प्रक्रिया पार पडल्यानंतर अंतराळवीरांनी Space X Dragon अंतराळयानात प्रवेश केला आणि काही क्षणातच ठरलेल्या वेळी Falcon -9 रॉकेट प्रज्वलित झाले आणि यान स्थानकात जाण्यासाठी अंतराळात झेपावले ह्या मोहिमेत अंतराळवीर Nicole Mann ह्यांनी मिशन कमांडरपद Josh Cassada ह्यांनी पायलट पद Koichi Wakata आणि Anna Kikina ह्यांनी मिशन स्पेशॅलिस्ट म्हणून काम पाहिले  

अंतराळ स्थानकात आता अकरा अंतराळवीर एकत्रित राहतील हे चारही अंतराळवीर अंतराळ मोहीम 68च्या अंतराळवीरांसोबत  स्थानकात सहा महिने वास्तव्य करतील आणि तेथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतील हे अंतराळवीर स्थानकातील झिरो ग्रॅव्हीटीत मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामाचे निरीक्षण नोंदवून त्यावर सखोल संशोधन करणार आहेत विशेषतः Cardiovascular Health ,Bio printing, Fluid Behavior व इतर सायंटिफिक संशोधनात ते सहभागी होतील 

अंतराळवीर Koichi Wakata ह्यांची हि पाचवी अंतराळवारी असून ते पाचव्यांदा स्थानकात राहायला गेले आहेत  अंतराळवीर Josh Cassada ,Anna Kikina आणि Nicole Mann मात्र पहिल्यांदाच स्थानकात राहायला गेले असून त्यांची हि पहिलीच अंतराळवारी आहे

Friday 30 September 2022

तीन रशियन अंतराळवीर स्थानकातून पृथ्वीवर परतले

 The Soyuz MS-21 crew ship with three cosmonauts aboard is seen parachuting to a landing in Kazakhstan less than three-and-a-half hours after undocking from the space station. Credit: NASA TV

 रशियन अंतराळवीर पृथ्वीवर पोहोचल्यानंतर कझाकस्थानात पॅराशूटच्या साहाय्याने खाली उतरताना -फोटो नासा संस्था

नासा संस्था -29 सप्टेंबर

नासाच्या अंतराळ मोहीम 67चे रशियन अंतराळवीर Oleg Artemyev अंतराळवीर Denis Matveev आणि अंतराळवीर Sergey Korsakov अंतराळ स्थानकातील सहा महिन्यांचे वास्तव्य संपवून 29 सप्टेंबरला गुरुवारी पृथ्वीवर सुखरूप पोहोचले आहेत 

सोयूझ MS-21 हे अंतराळयान ह्या तीनही अंतराळवीरांना घेऊन 3.34a.m.ला स्थानकातून पृथ्वीच्या दिशेने निघाले आणि 6.57a.m.(EDT)ला कझाकस्थानातील Dzhezkazgan येथे पृथ्वीवर पोहोचले निघण्याआधी स्थानकात  ह्या तिन्ही अंतराळवीरांचा Farewell Ceremony आणि Change of Command Ceremony पार पडला सध्याचे स्थानकाचे कमांडर Oleg Artemyev ह्यांनी स्थानकाची सूत्रे अंतराळवीर Samantha Cristoforetti ह्यांच्या हाती सोपिवली 

 ESA (European Space Agency) astronaut Samantha Cristoforetti assumed command of the space station on Wednesday from Roscosmos cosmonaut Oleg Artemyev.

 अंतराळवीर Samantha Cristoforetti कमांडर पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अंतराळवीर Oleg Artemyev ह्यांच्या सोबत -फोटो नासा संस्था

स्थानकातील 195 दिवसांच्या वास्तव्यात ह्या तीनही अंतराळवीरांनी पृथ्वीभोवती 3,120 वेळा फेऱ्या मारल्या आणि त्या दरम्यान 78 मिलियन मैलाचा अंतराळ प्रवास केला ह्या तिघांनी तेथे सुरु असलेल्या सायंटिफिक संशोधनात सहभाग नोंदवला 

अंतराळवीर Artemyev तिसऱ्यांदा अंतराळस्थानकात राहायला गेले होते त्यांनी स्थानकात 561दिवस वास्तव्य केले त्यांच्या आजवरच्या अंतराळ कारकिर्दीत  अंतराळस्थानकाच्या तांत्रिक कामासाठी त्यांनी पाच वेळा स्पेसवॉक केला त्या दरम्यान त्यांनी अंतराळात 33 तास 12 मिनिटे व्यतीत केले 

अंतराळवीर Denis Matveev पहिल्यांदाच स्थानकात राहायला गेले होते त्यांनी त्यांच्या ह्या पहिल्या 195 दिवसांच्या वास्तव्यात चारवेळा स्थानकाच्या कामासाठी स्पेसवॉक केला आणि त्या दरम्यान त्यांनी अंतराळात 26 तास 7मिनिटे व्यतीत केले अंतराळवीर Sergey Korsakov हे देखील पहिल्यांदाच स्थानकात राहायला गेले होते त्यांनी स्थानकात 195 दिवस राहून तेथील संशोधनात सहभाग नोंदवला 

पृथ्वीवर परतल्यानंतर ह्या तीनही अंतराळवीरांना रशियाच्या हेलिकॉप्टर मधून कझाकस्थानातील Recovery Staging City Karaganda येथे नेण्यात आले तेथे आवश्यक मेडिकल चेकअप नंतर त्यांना Gagarin Cosmonaut ट्रेनिंग सेंटर मध्ये नेण्यात आले तेथून त्यांना रशियन विमानाने Star City येथे पोहोचविण्यात येईल

Monday 19 September 2022

नासाचे तीन अंतराळवीर सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी स्थानकात जाणार

                              At the Baikonur Cosmodrome in Kazakhstan, NASA astronaut Frank Rubio performs preflight checkouts in the Soyuz MS-22 spacecraft.

                         नासाचे अंतराळवीर Frank Rubio Preflight ट्रेनींग दरम्यान -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -17 सप्टेंबर 

नासाचे अंतराळवीर Frank Rubio रशियन अंतराळवीर Sergey Prokopyev आणि Dimitri Petelin हे सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी 21सप्टेंबरला स्थानकात जाणार आहेत 

हे तिनही अंतराळवीर कझाकस्थानातील बैकोनूर येथील उड्डाण स्थळावरून सकाळी 9.54a.m.वाजता (6.54p.m.स्थानिक वेळ ) सोयूझ M.S.-22 ह्या अंतराळ यानातून स्थानकात जाण्यासाठी अंतराळात उड्डाण करतील आणि तीन तासांच्या अंतराळ प्रवासानंतर1.11p.m.स्थानकाजवळ पोहोचतील स्थानकाच्या Rassvet Module जवळ पोहोचल्यानंतर दोन तासांनी सोयूझ अंतराळयान आणि स्थानक ह्यांच्यातील Docking आणि Hatching प्रक्रिया पार पडेल त्या नंतर हे तिन्ही अंतराळवीर स्थानकात प्रवेश करतील सध्या स्थानकात राहात असलेले अंतराळवीर ह्या तिघांचे स्थानकात स्वागत करतील 

सध्या नासाच्या अंतराळ मोहीम 67चे रशियन अंतराळवीर व स्थानकाचे कमांडर Oleg Artemyev अंतराळवीर Denis Matveev अंतराळवीर Sergey Korsakov  अमेरिकन अंतराळवीर Bob Hines अंतराळवीर Kjell Lindgren अंतराळवीर Jessica Watkins आणि युरोपियन अंतराळवीर Samantha Cristiforetti हे अंतराळ स्थानकात वास्तव्य करत आहेत आणि तेथील लॅबमध्ये सुरु असलेल्या सायंटिफिक प्रयोगात सहभागी होऊन संशोधन करत आहेत 

हे तिनही अंतराळवीर स्थानकात सहा महिने वास्तव्य करतील व तेथील संशोधनात सहभागी होतील अंतराळवीर Sergey Prokopyev हे दुसऱ्यांदा अंतराळस्थानकात राहायला जाणार आहेत त्यांची हि दुसरी अंतराळवारी आहे अंतराळवीर Dimitri Petelin मात्र पहिल्यांदाच स्थानकात राहायला जाणार असून त्यांचा हा पहिलाच अंतराळ प्रवास आहे 

ह्या अंतराळवीरांच्या Launching ,Docking ,Hatching आणि स्थानकातील प्रवेशाचे लाईव्ह प्रसारण नासा T.V. वरून करण्यात येणार आहे

Thursday 15 September 2022

Artemis मोहिमेतील अंतराळविरांचा स्पेससुट बनविण्यासाठी Axiom Space ची निवड

Artist’s Illustration: Two suited crew members work on the lunar surface. One in the foreground lifts a rock to examine it while the other photographs the collection site in the background.'

 Artemis मोहिमेतील अंतराळवीर स्पेससूट घालून चंद्रावरील भूमीवर फिरतानाचे काल्पनिक चित्र -फोटो नासा संस्था

 नासा संस्था-7 सप्टेंबर

पन्नास वर्षांनी अमेरिकन अंतराळवीर चंद्रावर पाऊल ठेवणार आहेत त्यामुळे नासाच्या Artemis चांद्रमोहिमेची जय्यत तयारी सुरु आहे ह्या मोहिमे अंतर्गत वेगवेगळ्या नाविन्यपुर्ण स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे ह्याच मोहिमेअंतर्गत आर्टेमिस मोहिमेतील अंतराळवीरांना चंद्रावरील भूमीवर फिरताना आणि स्पेसवॉक करताना घालण्यासाठी उपयुक्त असा स्पेससूट बनविण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली  होती त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला अंतिम दोन कंपन्यामधून नासा संस्थेने Axiom Space ह्या व्यावसायिक कंपनीची निवड निश्चित केली आहे आणि त्यांना स्पेससूट बनविण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले 

Artemis III ह्या मोहिमेतील अंतराळवीरांसाठी ह्या स्पेस सुटची निर्मिती करण्यात येणार आहे अंतराळवीरांना  तेथील भूमीवर फिरताना सुरक्षित आणि अंतराळात स्पेसवॉक दरम्यान टेक्निकल सिस्टिम्स व इतर आवश्यक बाबीसाठीची उपयुक्त्तता पारखून ह्या स्पेस सूटची निवड करण्यात आली ह्या स्पेससूटच्या निर्मिती साठी सुरवातीला $228.5 मिलियन खर्च देण्यात येणार आहे

नासाच्या ह्या मोहिमेतील मॅनेजर Lara Kearney म्हणतात ह्या ऐतिहासिक Artemis मोहिमेतील स्पेससूट व इतर आवश्यक गोष्टींच्या निर्मितीसाठी अंतराळविश्वातील Axiom Space ह्या व्यावसायिक कं.शी भागीदारी करण आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे ह्या स्पेससूट निर्मितीच्या निर्णयामुळे पन्नास वर्षानंतर ह्या मोहिमेतील अंतराळवीरांच्या चांद्रभूमीवरील पुन:प्रवेशाचा पाया रोवला जातोय आगामी काळात अंतराळवीर तेथे जातील तेथील भूमीवरील,वातावरणातील सायंटिफिक नमुने गोळा करतील तेथे मानवाला राहण्यायोग्य जागा शोधतील पृथ्वीवरील मानवासाठी उपयुक्त संशोधन करतील आणि अंतराळविश्वातील व्यावसायिक मोहिमेचीही सुरवात होईल

ह्या स्पेससूटचे डिझाईन बनविताना गेल्या पन्नास वर्षातील स्पेससूट एक्स्पर्टशी चर्चा करून काही त्रुटी दूर करून नवीन उपयुक्त बाबींचा समावेश त्यात करण्यात आला टेक्निकल सिस्टिम्स आणि सेफ्टीला प्राधान्य देण्यात आले ह्या स्पेस सूटची निर्मिती करताना त्याचे डिझाईन,क्वालिटी,अंतराळवीरांना लागणाऱ्या सर्व सिस्टिम्सची पूर्तता आणि सुरक्षितता ह्या सर्वांची जबाबदारी Axiom Space वर असेल ह्या सर्व बाबी नासा संस्थेतर्फे तपासल्या जातील ह्या करारानुसार 2034पर्यंत मागणीनुसार स्पेस सूटचा पुरवठा करावा लागेल त्या नंतर आवश्यकतेनुसार भविष्यकालीन अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांसाठी स्थानकात आणि स्थानकाबाहेर स्पेस वॉक दरम्यान घालण्यासाठी स्पेस सूट निर्मितीची ऑर्डर देण्यात येईल  

स्पेससूट तयार  झाल्यानंतर नासा संस्थेतील अंतराळवीरांच्या ट्रेनिंग दरम्यान पृथ्वीवरील अंतराळासारख्या झिरो ग्रॅविटीच्या कृत्रिम वातावरणात अंतराळवीर हा स्पेस सूट घालून त्याची चाचणी घेतील त्यानंतर तज्ञांमार्फत सर्व बाबींची पूर्तता आणि सुरक्षितता तपासून ह्या मुन वॉकिंग आणि स्पेस वॉकिंग स्पेससूटच्या निर्मितीवर अंतिम शिक्का मोर्तब होईल

Tuesday 6 September 2022

अंतराळ स्थानकाच्या कामासाठी रशियन अंतराळवीरांचा Space Walk संपन्न

 Spacewalkers Oleg Artemyev (bottom left) and Denis Matveev (right) extend the Russian Strela cargo crane from the Zarya module toward the Poisk module following work on the European robotic arm. Credit: NASA TV

 अंतराळवीर Oleg Artemyev आणि अंतराळवीर Denis Matveev रशियन सेगमेंट मध्ये Space Walk दरम्यान Strela Cargo Crane Zarya module पासून Poisk module पर्यंत वाढवत नेताना -फोटो नासा संस्था 

नासा संस्था-2 सप्टेंबर

नासाच्या अंतराळ मोहीम 67 चे कमांडर Oleg Artemyev आणी Flight engineer Denis Matveev ह्यांनी अंतराळ स्थानकाच्या रशियन सेगमेंट मधील कामासाठी शुक्रवारी Space Walk केला शुक्रवारी दोन सप्टेंबरला सकाळी 9.25 मिनिटांनी हे दोनही अंतराळवीर स्थानकाच्या समोरील भागातील Poisk Module मधून Space Walk साठी स्थानकाबाहेर पडले आणी 7 तास 47 मिनिटांनी Space Walk पुर्ण करून स्थानकात परतले 

सात तास सत्तेचाळीस मिनिटांच्या ह्या Space Walk मध्ये ह्या अंतराळवीरांनी स्थानकाच्या रशियन सेगमेंट मधील Nauka Laboratory बाहेरील भागात युरोपियन रोबोटिक आर्म फिट करण्यासाठी काम केले त्यांनी त्या भागातील External Control पॅनल काढून दुसऱ्या भागात फिट केले हे पॅनल युरोपियन रोबोटिक आर्मच्या वापरासाठी आवश्यक आहे ह्या युरोपियन रोबोटिक आर्मचा ऊपयोग अंतराळविरांना Space Walk करताना Payloads पकडण्यासाठी व ईतर आवश्यक सामान एका ठिकाणाहुन दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी तसेच ईतर कामासाठी होतो ह्या Space Walk मध्ये अंतराळवीरांनी Zarya Module भागातील Strela telescoping boom स्थानकाच्या Poisk module पर्यंत वाढविला शिवाय पुढिल Space Walk साठीची पूर्व तयारीही करून ठेवली

ह्या आधी 17 ऑगस्टला झालेल्या Space Walk दरम्यान अंतराळवीर Artemyev ह्यांच्या Orlan स्पेससुट मध्ये अचानक बिघाड झाला होता त्यांच्या बॅटरीचे रिडींग अनियमित येत असल्याचे नासा संस्थेतील संबंधीताच्या लक्षात आले त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून सुरक्षितते साठी त्यांना हा Space Walk त्वरित थांबवून परत स्थानकात बोलवण्यात आले होते हा बिघाड लक्षात येईपर्यंत ह्या दोन्ही अंतराळवीरांनी दोन तास सतरा मिनिटांच्या Space Walk पूर्ण केला होता त्यांनी रोबोटिक आर्मवर दोन कॅमेरे फिट करण्याचे काम त्या वेळात पुर्ण केले होते पण त्या वेळेसचे उर्वरित काम अपुर्ण राहिले होते ते काम ह्या Space Walk मध्ये पूर्ण करण्यात आले

ह्या Space Walk साठी अंतराळवीर Artemyev ह्यांनी परीधान केलेल्या रशियन स्पेससुटवर लाल रंगाच्या रेषा होत्या आणी अंतराळवीर Matveev ह्यांनी परीधान केलेल्या रशियन स्पेससुटवर निळ्या रंगाच्या रेषा होत्या अंतराळवीर Artemyev ह्यांच्या अंतराळ कारकिर्दीतला हा आठवा Space Walkहोता तर अंतराळवीर Matveev ह्यांच्या अंतराळ कारकिर्दीतला हा चवथा Space Walk होता आणी ह्या वर्षातला अंतराळस्थानकाच्या कामासाठी केलेला हा आठवा Space Walk होता 

Thursday 25 August 2022

भविष्यकालीन चांद्रमोहिमेतील अंतराळवीरांना चंद्रावर उतरण्यासाठी तेरा जागांची निवड

Shown here is a rendering of 13 candidate landing regions for Artemis III. Each region is approximately 9.3 by 9.3 miles (15 by 15 kilometers).

 भविष्यकालीन चांद्रमोहिमेतील अंतराळवीरांना उतारण्यायोग्य चंद्रावरील तेरा जागा -फोटो नासा संस्था 

नासा संस्था -19 ऑगस्ट

अमेरिकेच्या आर्टेमिस मोहीमेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे पन्नास वर्षांनी पुन्हा एकदा मानवी पाऊल चंद्र भूमीवर पडणार आहे आगामी काळात चंद्रावर मानवी निवासासाठी राहण्यायोग्य वातावरणाचा शोध घेऊन तेथील भूगर्भातील जमिनीचे उत्खनन करून तेथील खडक माती मिनरल्सचे नमुने गोळा करण्याचे काम हे अंतराळवीर करणार आहेत त्या साठी योग्य जागेचा शोध नासा संस्थेने घेतला असून हि तेरा ठिकाणे चंद्रावरील साऊथ पोल जवळ आहेत  

Washington तेथील नासा संस्थेतील Deputy Associate Administrator Mark Kirasich म्हणतात ह्या जागेची निवड झाल्यामुळे आता आपण चांद्र मोहिमेच्या आणखी जवळ पोहोचलो आहोत पन्नास वर्षांनी पुन्हा नव्या जोमाने ह्या मोहिमेची तयारी आता सुरु झाली आहे ह्या आधीचे अंतराळवीर जेथे गेले नव्हते अशा ठिकाणी पोहोचून अंतराळवीर तेथे अंतराळ यान आणि अंतराळवीरांच्या लँडिंगसाठी योग्य ठिकाणाचा शोध घेणार आहेत त्या मुळे भविष्यकालीन चांद्र मोहिमेतील अंतराळवीरांचे तेथे जाणेयेणे सुरु होईल हा प्रत्येक भाग चंद्रावरील साऊथ पोल जवळ सहा अंशावर स्थित आहे,भौगोलिक दृष्टया आणि चंद्रावरील पुरातन काळाचा शोध घेण्यासाठी योग्य आहे  

शास्त्रज्ञांच्या मते चंद्रावर वैज्ञानिक माहितीचा खजिना आहे हि तेरा ठिकाणे भूगर्भीय उत्खनना साठी समृद्ध आहेत ह्या प्रत्येक भागात उंच डोंगर आणि खोल दऱ्या आहेत उंच पहाडांवर पुरेसा सूर्यप्रकाश आहे खोल दऱ्यांमध्ये मात्र अंधार आहे त्या मुळे ऊन आणि सावली पण आहे डोंगरांच्या लांबच लांब रांगा आहेत आणि पाठारी भागही आहे त्या मुळे अंतराळवीरांना उतरण्यासाठी सुरक्षित आहे इथे उतरून अंतराळवीर रोबोटिक आर्मद्वारे भूगर्भातील जमिनीचे उत्खनन करू शकतो चंद्रावरील पुरातन काळातील शेकडो वर्षांआधीची वैज्ञानिक माहिती गोळा करू शकतील हे अंतराळवीर तेथील पाण्याचे अस्तित्व आणि सजीवसृष्ठी अस्तित्वात होती का ह्याचा शोध घेणारे पुरावे शोधतील हा भाग वैज्ञानिक दृष्ठ्या महत्वपूर्ण आहे आणि इथून अंतराळवीर आणि अंतराळ यानाचा पृथ्वीवरील संस्थेशी आणि संस्थेतील शास्त्रज्ञांशी संपर्क साधण्यास अनुकूल आहे 

ह्या तेरा जागेची निवड नासा संस्थेतील शास्त्रज्ञ आणि इंजिनीअर्सच्या टीमने केली आहे त्या साठी त्यांनी नासाच्या Lunar Reconnaissance Orbiter मधील डेटा आणि गेल्या दहा वर्षातील प्रकाशीत माहितीचा तसेच चंद्र विज्ञानाच्या माहितीचा निष्कर्ष काढून अंतिम निरीक्षणानंतर ह्या जागेंची अंतिम निवड केली त्यांनी तेथील लाँच विंडोसाठीची  उपयुक्तता सुरक्षित लँडिंगची सोय,ह्या भागातील भौगोलिक परिस्थिती,तेथील चढउतार योग्य प्रकाश सावली आणि संपर्क साधण्यास अनुकूल वातावरण असल्यामुळे ह्या जागेची निवड केली शिवाय भविष्यकालीन चांद्र मोहिमेतील Space Launch System,Rocket ,Orion Space Craft आणि Space X ह्या यानाच्या आणि मानवी अंतराळ मोहिमांचा विचार करून ह्या जागा निश्चित केल्या

Wednesday 10 August 2022

Blue Origin च्या NS-22 मोहिमे अंतर्गत सहा सामान्य प्रवाशांनी केले अंतराळ पर्यटन

                          Blue Origin च्या NS -22 चे अंतराळ प्रवासी -फोटो -Blue Origin 

Blue Origin -4 आँगस्ट

Blue Origin कंपनीच्या NS-22 मोहिमे अंतर्गत सहा प्रवासी गुरुवारी चार ऑगस्टला अंतराळ प्रवास करून परतले ह्या सहा प्रवाशांमध्ये Cobby cotton,Mario Ferrena,Vanessa O'Brien Clint Kelly,Sara Sabryआणी Steve Young ह्यांचा समावेश होता 


 

 Blue Origin च्या West Texas येथील ऊड्डाण स्थळावरून New Shepard यान ह्या सहा प्रवाशांना घेऊन  अंतराळात झेपावल्या नंतर काही वेळातच यान रॉकेट पासून वेगळे झाले आणी प्रचंड वेगाने अंतराळ प्रवासास निघाले अवघ्या काही मिनिटात यान पृथ्वी व अंतराळ ह्यांच्यातील सिमारेषा म्हणजेच Karman line पर्यंत पोहोचले यानाने हि रेषा भेदुन अंतराळात प्रवेश करताच सर्व अंतराळ प्रवाशांनी एकच जल्लोष केला आणी एकमेकांचे हात पकडून We are doing it!We are doing it असे म्हणत यानात तरंगण्याचा अदभूत आनंद लुटला ह्या प्रवाशांनी यानाच्या खिडकीतून अंतराळातील आजुबाजुचा काळोख आणी खाली पृथ्वीचे अलौकिक सौंदर्य पहाण्याचा आनंद घेतला अवघे अकरा मिनिटांचे  हे अविस्मरणीय अंतराळ पर्यटन घडवून New Shepard यान पृथ्वीवर सुखरूप परतले त्या नंतर Blue Origin च्या रिकव्हरी टीमने सर्वांना यानातून बाहेर काढले परतल्यानंतर सर्वांनीच Oh !My God !So Beautiful ! Amazing ! अशी प्रतिक्रिया व्यक्त केली 

Sara Sabry -(Mechanical &Biomedical engineer) अंतराळ प्रवास करणारी पहिली इजिप्शियन महिला आहे उड्डाणाआधी ती भावविवश झाली होती ती म्हणाली ह्या क्षणी माझ्या मनात संमिश्र भावना आहेत मी थोडीशी नर्व्हस आहे,जाण्यासाठी उत्सुकही आहे,Excited झाले आहे आज अंतराळ प्रवासात मी इजिप्तचे प्रातीनिधित्व करत आहे माझ्यासाठी हि सन्माननीय बाब आहे अंतराळ प्रवासाची हि ऐतिहासिक सुरवात आहे परतल्यानंतर ती म्हणाली अंतराळ प्रवासा दरम्यान मी माझ्या देशाचा विचार करत होते मी माझ्या देशाचे नाव अंतराळात घेऊन जात आहे आता माझ्या अनुभवानंतर माझ्या देशातील अनेक नागरिक देखील असा अंतराळ प्रवास करतील माझ्या भावना मी शब्दात व्यक्त करू शकत नाही हे जग खूप सुंदर आहे हा अदभूत अनुभव देखील अविस्मरणीय आहे ! तो सर्वांनी घ्यायला हवा 

Vanessa O' Brien ( British -American Explorer )ह्यांनी पृथ्वीवरील सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट सर केलय आणि सुमुद्राच्या तळाशी अत्यंत खोलवर बुडी मारलीय आता ह्या अंतराळ प्रवासानंतर त्यांनी अंतराळातील Karman line  भेदून अंतराळातही प्रवेश केला आहे त्या महिला समानतेसाठी कार्य करतात त्यांनी ह्या अंतराळ प्रवासात UN Women Flag सोबत नेला होता उड्डाणा आधी त्या म्हणाल्या थोडा नर्व्हसनेस असला तरी हि माझ्यासाठी सुवर्णसंधी आहे आता मी साऱ्या जगाशी मानवतेच्या दृष्ठीने जोडल्या गेले आहे मला आता हे रियलाईझ झालय कि स्त्रीयांना काहीही अशक्य नाही Blue Origin ने अंतराळविश्वात नव दालन खुल केलय त्या साठी thanks ! ह्या आधी अंतराळ प्रवास करण्यासाठी,अंतराळवीर होण्यासाठी वर्षानुवर्षे ट्रेनिंग घ्याव लागायच मिल्ट्रीत जाव लागायच पण आता सामान्य नागरिक थोडस ट्रेनिंग घेऊन अंतराळ प्रवास करू शकतो हि प्रगत जगाची नवी सुरवात आहे प्रवासा नंतर त्यांनीही हा अनुभव अविस्मरणीय असल्याचे सांगितले आणि त्या साठी Blue Origin आणि टीममधील सर्वांचे आभार मानत त्यांच्यामुळेच आम्ही हा अंतराळ प्रवासाचा अनुभव घेतल्याचे सांगितले

 Cobby Cotton -ह्या दहा बारा मिनिटातला हया वजनरहित अवस्थेतला अनुभव मजेशीर होता वरून पृथ्वीकडे पाहताना तिची व्यापकता पाहून आपण तिच्यापुढे किती छोटे आहोत ह्याची जाणीव मला झाली खूपच सुंदर अनुभव होता अविश्वसनीय होता 

Mario Ferreira हे देखील अंतराळ प्रवास करणारे पहिले पोर्तुगीज नागरिक आहेत New Shepard ची हि अंतराळ भरारी पाहून मी थक्क झालो अंतराळात प्रचंड काळोख होता आणि खाली पृथ्वीच अलौकिक सौन्दर्य !गेल्या अठरा वर्षांपासून मी अंतराळ प्रवासाची वाट पहात होतो खूप सुंदर आश्चर्यकारक प्रवास होता 

Clint Kelly - Technology Pioneer आहेत ते म्हणतात ह्या अंतराळ प्रवासाने माझ लक्ष अंतराळ विश्वातील मानवी अंतराळ प्रवासाच्या ऐतिहासिक सुरवातीकडे वेधल प्रवासात आधी आकाशातील बदलता निळा,जांभळा रंग अनुभवाला आणि मग काळोख पाहिला आणि क्षणात जाणवल आपण दुसऱ्या ठिकाणी आलो आहोत अंतराळात पोहोचलो आहोत ! तो क्षण अविस्मरणीय आहे

 Steve Young (Telecommunications Executive ) म्हणतात मला वाटत आता लोकांना आमच्याकडे पाहून असा अंतराळ प्रवासाचा अनुभव घ्यावासा वाटेल ते आमच्याकडे पाहून प्रेरित होतील ह्या अंतराळ पर्यटनाकडे आकर्षित होतील 

 ह्या मोहिमेतील पहिली इजिप्शियन अंतराळ प्रवाशी Sara Sabry पहिले पोर्तुगीज अंतराळ प्रवासी Mario Ferreria आणि सर्वात उंच शिखर सर करणारी आणि समुद्रात खोलवर बुडी मारून Guinness World Record करणारी Venessa O' Brien ह्या तिघांच्या समावेशामुळे हे उड्डाण ऐतिहासिक नोंद करणारे ठरले 

Blue Origin -NS -22 मोहिमेत New Shepard यानाने सहाव्यांदा नागरिकांनाअंतराळ पर्यटन घडवले  ह्या वर्षातील हे तिसरे मानवी अंतराळ उड्डाण होते आणि आजवरचे बाविसावे अंतराळ उड्डाण होते ह्या यशस्वी उड्डाणानंतर Blue Origin चे Vice President Phil Joyce प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले " मागच्या वर्षी आम्ही अंतराळ पर्यटन सुरु केले आणि एका वर्षात New Shepard यानाने एकतीस नागरिकांना अंतराळ पर्यटन घडवून आणले हि आमच्यासाठी सन्माननीय बाब आहे आम्ही आणि आमची टीम सामान्य नागरिकांना क्षणात पृथ्वीवरून अंतराळात नेऊन अंतराळ प्रवास घडवतो आमच्या टीममधील ह्या मोहिमेतील सर्वच टीमचे आभार त्यांच्यामुळेच हि मोहीम यशस्वी होत आहे "!

Sunday 7 August 2022

Space X Crew 5चे चार अंतराळवीर सप्टेंबरमध्ये स्थानकात रहायला जाणार

An image of NASA’s SpaceX Crew-5: NASA astronauts Nicole Mann and Pilot Josh Cassada, JAXA (Japan Aerospace Exploration Agency) astronaut Koichi Wakata, and Roscosmos cosmonaut Anna Kikina.

 Space X Crew -5 चे अंतराळवीर कमांडर Nicole Mann आणि पायलट Josh Cassada सोबत जपानचे अंतराळवीर Koichi Wakata आणि रशियन अंतराळवीर Anna Kikina -फोटो नासा संस्था 

नासा संस्था -4 ऑगस्ट 

नासाच्या Space X Crew -5  मोहिमे अंतर्गत चार अंतराळवीर 29 सप्टेंबरला सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी स्थानकात जाणार आहेत नासाचे अंतराळवीर Nicole Mann व Josh  Cassada जपानचे अंतराळवीर Koichi Wakata आणि रशियन अंतराळवीर Anna Kikina ह्या चार अंतराळवीरांचा त्यात सहभाग आहे 

ह्या मोहिमेत अंतराळवीर Nicole Mann  ह्यांची कमांडरपदी तर अंतराळवीर Josh Cassada ह्यांची पायलट पदी निवड झाली आहे अंतराळवीर Koichi Wakata आणि Anna Kikina ह्या मोहिमेत मिशन स्पेशॉलिस्ट म्हणून काम पाहतील हे चारही अंतराळवीर 29सप्टेंबरला नासाच्या Kennedy Space Center Florida येथील उड्डाणस्थळावरून Space X Crew Dragon आणि Falcon 9 रॉकेटच्या साहाय्याने स्थानकात जाण्यासाठी अंतराळात उड्डाण करतील 

A collage of NASA’s SpaceX Crew-5 from left to right, top to bottom :NASA astronauts Nicole Mann and Josh Cassada, JAXA (Japan Aerospace Exploration Agency) astronaut Koichi Wakata, and Roscosmos cosmonaut Anna Kikina.

अंतराळवीर Nicole Mann ,Anna Kikina आणि Josh Cassada हे पहिल्यांदाच स्थानकात राहायला जाणार असून अंतराळवीर Koichi Wakata मात्र पाचव्यांदा स्थानकात राहायला जाणार आहेत 

अंतराळवीर Nicole Mann ह्या अमेरिकेतील California येथील रहिवासी असून त्यांनी US Naval Academy मधून BE Mechanical Engineering ची पदवी घेतली आणि Standford University मधून Specialty in Fluid Mechanics मध्ये ME केले 2013 मध्ये त्यांची नासा संस्थेत अंतराळवीर होण्यासाठी निवड झाली तेव्हा त्या F/A-18 Hornet &Supper Hornet मध्ये Test Pilot पदी कार्यरत होत्या ह्या मोहिमेच्या कमांडर असल्यामुळे त्यांच्यावर अंतराळयानाच्या Launching पासून परत पृथ्वीवर Landing पर्यंतची जबाबदारी आहे 

अंतराळवीर Josh Cassada ह्यांचे देखील 2013 मध्ये नासा संस्थेत अंतराळवीर होण्यासाठी निवड झाली ते अमेरिकेतील Minnesota येथील रहिवासी आहेत त्यांनी Physicist आणि US Navy Test Pilot पदी काम केले आहे विशेषतः त्यांनी Naval Aviator होण्याला प्राधान्य दिले त्यांनी Albion College -Albion Michigan येथून Physics ची बॅचलर डिग्री घेतली आणि New York येथील University Of Rochester येथून डॉक्टरेट केले ते ह्या मोहिमेत Pilot पद सांभाळणार असल्याने त्यांच्यावर यानाच्या Systems आणि Performance ची जबाबदारी आहे शिवाय ते ह्या मोहिमेत Flight engineer म्हणूनही कार्यरत राहतील 

जपानचे अंतराळवीर Koichi Wakata हे पाचव्यांदा अंतराळ स्थानकात राहायला जाणार आहेत ह्या त्यांच्या चारवेळच्या अंतराळ कारकिर्दीत त्यांनी तीन वेगवेगळ्या अंतराळ यानातून अंतराळ प्रवास केला आहे मिशन स्पेशॉलिस्ट म्हणून अंतराळ यानाच्या Dynamic Launch च्या वेळी अंतराळातील उड्डाण आणि परत पृथ्वीवर landing च्या वेळी कमांडर आणि Pilot सोबत त्यांचा विशेष सहभाग असेल ह्या मोहिमेत स्थानकात पोहोचल्यावर ते मोहीम 68 च्या Flight Engineer पदावर कार्यरत राहतील 

रशियन अंतराळवीर Anna Kikina ह्यांची हि पहिलीच अंतराळवारी आहे त्या देखील अंतराळ यानाच्या Dynamic Launch आणि Landing च्या वेळी मिशन स्पेशॉलिस्ट म्हणून सहभागी होतील आणि ह्या मोहिमेत Flight engineer पदावर कार्यरत राहतील 

सध्या अंतराळ स्थानकात रहात असलेले चार अंतराळवीर ऑक्टोबर मध्ये Freedom Space X Crew Dragon मधून पृथ्वीवर परततील तोवर सर्व अंतराळवीर एकत्रित स्थानकात सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतील सध्या हे चारही अंतराळवीर अंतिम ट्रेनिंगसाठी उड्डाणस्थळी पोहोचले असून जाण्याआधी चार तारखेला त्यांनी नासा संस्थेतील प्रमुखांशी आणि अमेरिकेतील निवडक पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी नासा संस्थेतील त्यांना अंतराळवीर होण्यासाठीचे ट्रेनिंग देणाऱ्या ह्या मोहिमेतील सर्व कर्मचारी,शास्त्रज्ञ आणि इंजिनीअर्स चे आभार मानले आणि आम्ही सर्वजण स्थानकात जाण्यासाठी उत्सुक आहोत आणि त्या क्षणाची आतुरतेने वाट पहात आहोत असे सांगितले

Thursday 4 August 2022

Perseveranceयानाने गोळा केलेले मंगळावरील खडकांचे नमुने 2033 मध्ये पृथ्वीवर आणणार

This illustration shows a concept for multiple robots that would team up to ferry to Earth samples collected from the Mars surface by NASA's Mars Perseverance rover.

 Perseverance मंगळयानाने रोबोटिक टीमद्वारे गोळा केलेले मंगळावरील नमुने पृथ्वीवर आणतानाचे मंगळावरील काल्पनिक चित्र -फोटो -नासा संस्था 

 नासा संस्था -

 नासा आणी इसा ( युरोपियन स्पेस एजन्सी) संस्थेतील प्रमुखांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत Perseverance यानाने गोळा केलेले मंगळभुमीवरील खडकांचे नमुने 2033 मध्ये पृथ्वीवर परत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे  मंगळावरील Jezero Crater ह्या भागात कार्यरत असलेल्या Perseverance यानाने मंगळ ग्रहावरील पुरातन काळच्या सजीव सृष्ठीच्या अस्तित्वाला दुजोरा देणाऱ्या प्रवाहित पाण्याच्या आटलेल्या स्त्रोताच्या आसपासच्या भागातील व भुप्रुष्ठाखालील जमीनीचे उत्खनन करून तेथील खडकांचे नमुने गोळा केले आहेत 

आजवर Perseverance यानाने तेथील खडक,माती,मिनरल्सचे अनेक नमुने व एक Atmospheric नमुना गोळा केला आहे आगामी काळात Perseverance यानाद्वारे आणखी नमुने गोळा करण्यात येणार आहेत ह्या कामात Perseverance यानासोबत मंगळावर पोहोचलेल्या Ingenuity Mars helicopter ने देखील मोलाची मदत केली आहे Ingenuity mars हेलिकॉप्टरने मंगळग्रहावरील आकाशात आता 29 वेळा यशस्वी ऊड्डाण केले आहे आणि तेथील आसपासच्या भागातील,वातावरणातील निरीक्षण नोंदवून ऊपयुक्त संशोधीत माहिती व त्या भागातील फोटो काढुन पृथ्वीवर पाठवले आहेत विशेष म्हणजे शास्त्रज्ञांच्या अपेक्षेनुसार ह्या हेलिकॉप्टरची कार्यक्षमता एक वर्षापर्यंतच होती पण Ingenuity हेलिकॉप्टरने अपेक्षेपेक्षा जास्त काळ कार्यरत राहून टिममधील सर्वांना आश्चर्य चकीत केले आहे Ingenuity च्या ह्या यशाने प्रेरित होऊन शास्त्रज्ञांनी आता मंगळावरील नमुने पृथ्वीवर आणण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या हेलिकॉप्टरचे डिझाईनही Ingenuity वर आधारित बनवण्याचा निर्णय घेतला आहे सध्या Perseverance यान  Mars Ascent Vehicle आणि ESA चे Sample Transfer Arm ह्यांच्या साहाय्याने गोळा केलेले खडकांचे नमुने Sample Retrieval Lander मध्ये साठवत आहे 

पण आता ह्या टीममधील शास्त्रज्ञांनी मंगळ ग्रहावरील नमुने पृथ्वीवर आणण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या Sample Retrieval Lander आणि दोन Helicopters चे डिझाईन नवीन व अद्ययावत यंत्रणेने बनविले आहे त्या मुळे यानाला नमुने गोळा करण्यासाठी आता Fetch रोव्हर किंवा त्याच्याशी संलग्न अशा दुसऱ्या Lander ची आवश्यकता भासणार नाही ह्या नवीन Sample Retrieval Lander सोबत पाठविण्यात येणारे हेलिकॉप्टर बनविताना आधीच्या Ingenuity हेलिकॉप्टरचे डिझाईन वापरून त्यातील त्रुटी कमी करून काही सुधारणा करण्यात आल्या आहेत ज्या मुळे हे काम कमी त्रासाचे आणि सोपे होईल आता ह्या हेलिकॉप्टर मध्येच नमुने गोळा करण्याची क्षमता निर्माण केली असल्यामुळे हे काम आता हेलिकॉप्टर द्वारे केले जाईल 

2027-28 च्या उन्हाळ्यात Earth Return Orbiter आणि Sample Retrieval Lander मंगळग्रहावर पाठविण्यात येणार असून 2033 मध्ये ते तेथील खडकांचे व इतर नमुने घेऊन पृथ्वीवर परतेल नुकत्याच झालेल्या बैठकीत ह्या नव्या डिझाईन वर शिक्कामोर्तब झाल्याने लवकरच म्हणजे ऑक्टोबर महिन्यात ह्या कामाचा शुभारंभ होईल आणि एक वर्षांनी हे काम पूर्ण होईल त्यानंतर नासा संस्थेतील ह्या टीममधील इंजिनीअर्स ह्या डिझाईनची परिपूर्णता तपासून पाहतील त्यानंतर अंतिम मान्यता मिळेल 

Human &Robotic Exploration ESA चे Director David Parker ह्यांच्या मते आता हे काम लवकरच जोमाने सुरु होईल आणि आगामी काळात Earth Return Orbiter आणि हेलिकॉप्टर्स पृथ्वीवरून मंगळ आणि पुन्हा पृथ्वी असा ऐतिहासिक अंतराळ प्रवास सुरु करेल आणि Sample Transfer Arm द्वारे रोबोटिकली नमुन्यांच्या tubes Orbiting Sample Container मध्ये भरेल 

ह्या मंगळ मोहिमेतील नमुने पृथ्वीवर आणण्यासाठी नासा आणि ESAने मिळून एकत्रित केलेले काम वैशिष्ठपूर्ण आहे हे ऐतिहासिक असामान्य कर्तृत्व आहे अस नासाच्या वॉशिंग्टन येथील संस्थेचे Associate Administrator Thomas Zurbuchen म्हणतात सध्या मंगळावरील पहिल्या टप्प्यातील नमुने गोळा करण्याचे काम प्रगतीपथावर आहे 2021पासून Perseverance यान मंगळावरील Jezero Crater ह्या भागात कार्यरत आहे आणि तेथील खडकांचे नमुने गोळा करण्याचे काम यशस्वीपणे पार पाडत आहे आता तेथील खडकांचे अकरा नमुने आणि वातावरणातील एक नमुना (atmospheric sample) त्याने गोळा केले आहेत  हे नमुने जेव्हा पृथ्वीवर पोहोचतील तेव्हा नासाचे हे कर्तृत्व जगाला प्रेरित करेल हेलिकॉप्टरच्या नव्या डिझाईन मध्ये दीर्घकाळ उपयुक्ततेचा विचार करून  पूर्वीच्या तुलनेत काही बदल केले आहेत अंतिम मान्यतेआधी तज्ञांकडून त्याचे सूक्ष्म निरीक्षण करणे अत्यंत आवश्यक असते नासाच्या ह्या टीममधील इंजिनीअर्स हे काम करतील हे नमुने पृथ्वीवर आणल्यानंतर जगभरातील शास्त्रज्ञांना मंगळावरील खडकांचे अत्याधुनिक यंत्रणा वापरून त्यावर संशोधन करण्याची संधी दिली जाईल हे काम मंगळावर जाऊन करता येणे सध्यातरी शक्य नाही त्यामुळेच तेथील नमुने पृथ्वीवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला अपोलो चांद्र मोहिमेतील खडकांचे आणि मातीचे नमुने आता आपण अद्ययावत यंत्रणा वापरून पाहू शकलो तसेच भविष्यात मंगळग्रहांवरील नमुने पाहता येतील आणि संशोधित करता येतील

Saturday 23 July 2022

स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी अंतराळवीर Samantha आणि Oleg Artemyev ह्यांचा Space Walk संपन्न

ESA (European Space Agency) astronaut Samantha Cristoforetti works outside the space station's Russian segment to configure the new European robotic arm. Credit:NASA TV

अंतराळवीर Samantha Cristoforetti आणि अंतराळवीर Oleg Artemyev स्थानकाबाहेरील रशियन सेगमेंट मध्ये स्पेसवॉक करताना -फोटो नासा संस्था 

नासा संस्था - 21 जुलै 

नासाच्या अंतराळ मोहीम 67चे अंतराळवीर आणि कमांडर Oleg Artemyev आणि फ्लाईट इंजिनीअर Samantha Cristoforetti ह्या दोघांनी गुरुवारी स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी स्पेसवॉक केला 

ह्या दोघांनी बुधवारीच ह्या स्पेसवॉकची तयारी सुरु केली होती त्यांनी त्यांचे Orlan Spacesuit चेक केले चार्ज करून इतर आवश्यक तयारी केली गुरुवारी सकाळी 10.50a.m. ला हे दोघे स्पेसवॉक साठी स्थानकाबाहेर पडले आणि सात तासांनी स्पेसवॉक संपवून संध्याकाळी 5.55p.m.ला स्थानकात परतले स्पेसवॉकसाठी अंतराळवीर Oleg Artemyev ह्यांनी परिधान केलेल्या रशियन स्पेससूटवर लाल रंगांच्या रेषा होत्या तर अंतराळवीर Samantha ह्यांनी घातलेल्या रशियन स्पेससूटवर निळ्या रंगांच्या रेषा होत्या

सात तास पाच मिनिटांच्या ह्या स्पेसवॉक मध्ये ह्या दोघांनी स्थानकाच्या रशियन सेगमेंट मधील बाहेरील 37 फूट लांबीच्या Manipulator system जवळील भागात Platform &Workstation Adapter Hardware फिट केले व दहा Nano satellites install केले ह्याचा उपयोग स्थानकाला रेडिओ electronics data मिळवण्यासाठी होईल शिवाय ह्या दोघांनी स्थानकाच्या रशियन सेगमेंट मधील Nauka Laboratory ह्या भागात रोबोटिक आर्म फिट केला ह्या स्पेसवॉकर्सनी रोबोटिक आर्मसाठीचे External Control Panel कादून दुसरीकडे बसविले

हा तिसरा नवीन रोबोटिक आर्म आहे ह्या आधी स्थानकात Canadian नी बनविलेला Canadarm-2 आणि जापनीज रोबोटिक आर्म  बसविलेला आहे ह्या रोबोटिक आर्मचा उपयोग स्थानकाच्या मेंटेनन्स साठी,रिसर्चसाठी आणि इतर कामासाठी होतो युरोपियन आर्मचा उपयोग पेलोड हलविण्यासाठी एक ठिकाणाहून दुसरीकडे नेण्यासाठी व रशियन सेगमेंटच्या बाहेरील भागातील Equipment इतरत्र नेण्यासाठी होतो ह्या शिवाय ह्या अंतराळवीरांनी ह्या स्पेसवॉक मध्ये पुढील स्पेसवॉक साठीचीही तयारी करून ठेवली 

अंतराळवीर Oleg Artemyev ह्यांच्या अंतराळ कारकिर्दीतला हा सहावा स्पेसवॉक होता तर अंतराळवीर Samantha Cristoforetti ह्यांचा हा पहिलाच स्पेसवॉक होता आजवर स्थानकाच्या दुरुस्तीसाठी केलेला हा 251वा  स्पेसवॉक होता आणि ह्या वर्षातील हा सहावा स्पेसवॉक होता

अंतराळवीर Kjell Lindgren आणि Jessica Watkins ह्यांनी स्थानकातून साधला लाईव्ह संवाद

 अंतराळवीर Jessica Watkins आणि अंतराळवीर Kjell Lindgren  स्थानकातून लाईव्ह संवाद साधताना -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था -18 जुलै 

नासाच्या अंतराळ मोहीम 67 चे अंतराळवीर Kjell Lindgren आणी Jessica Watkins ह्यांनी Huston मधील WYPR(NPR) Redio (Baltimore )येथील Tom Hall (Midday )ह्यांच्याशी लाईव्ह संवाद साधला त्याचा हा वृत्तांत 

Tom-Dr.Watkins आणी Dr.Lindgren तुम्हाला पाहून आनंद झाला आधी तुम्ही आमच्यासाठी वेळ दिल्याबद्दल तुमचे आभार 

Dr.Watkins तुझी हि पहिली अंतराळवारी आहे त्या साठी तु दीर्घकाळ ट्रेनिंग घेतल असेल ह्या पहिल्या अंतराळ निवासातील तुला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट कोणती आहे ?

Watkins -हो ,ह्या मिशनसाठी आम्ही बराच काळ ट्रेनिंग घेतल माझी हि पहिलीच अंतराळवारी असल्याने अंतराळ प्रवास,स्थानकातील वास्तव्य हा माझ्यासाठी अत्यंत रोमांचक अनुभव होता मी Geologist असल्याने मला इथे स्थानकाच्या खिडकीतून खाली पृथ्वीकडे पहायला खूप आवडत पृथ्वीवरील वेगवेगळे भाग जिथे मला जावस वाटत होत आणि जायची ईच्छा आहे तो भाग मी ईथे वरुन पाहु शकते तेव्हा खूप अमेझिंग फिलींग येत 

Tom - Dr  Lindgren ,ह्या  मोहिमेसाठी तुम्ही दीर्घकाळ कठीण ट्रेनिंग घेतल असेल हि मोहीम सोपी नाही तुमच्या साठी सगळ्यात challenging गोष्ठ कोणती होती ?

Kjell Lindgren - हो ! अशा प्रकारची मोहीम कठीणच असते आणि आमच्यासाठी Challenging गोष्ठ म्हणजे बदललेला launching चा प्लॅन आमच launching लांबल त्या मुळे आमच्या schedule मध्ये  देखील थोडेफार बदल झाले आमची पृथ्वीवर परतण्याची तारीखही पण आम्हाला ट्रेनिंग मध्ये अशा कठीण परिस्थितीत adjust होण्याच ट्रेनिंग दिलेल असल्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही आताच स्थानकात Space X -25 Cargo Vehicle पोहोचले त्या मुळे आम्ही अत्यंत बिझी होतो त्यातील सामान काढण वै. 

Tom -Watkins तुझ काय मत आहे ? तुला काय Challenging वाटत ? सध्या स्थानकात सात अंतराळवीर वास्तव्य करत आहेत त्या मुळे राहण्यासाठी कमी जागा असल्याने तुमच्या प्रायव्हसीत बाधा येते का ?

Watkins -आम्ही चौघेजण इथे आणि तीन रशियन अंतराळवीर रशियन सेगमेंट मध्ये राहात असल्यामुळे प्रायव्हसीचा प्रॉब्लेम येत नाही माझे सहकारी अंतराळवीर खूप चांगले आहेत आम्ही चौघेजण आमच्या रशियन अंतराळवीर सहकाऱ्यांसोबत इथे वास्तव्य करतो,संशोधन करतो मोकळ्या वेळेत एकत्र येतो गप्पा मारतो एकत्र जेवण करतो त्या मुळे काही प्रॉब्लेम येत नाही उलट सगळ्यांची चांगली ओळख होते एकमेकांना समजून घेता येत आणि आम्ही इथे सर्वजण आनंदात मजेत वेळ घालवतो 

Tom -Lindgren हि तुझी दुसरी अंतराळवारी आहे ह्या आधीही तू स्थानकात वास्तव्य केले आहेस आधीच्या आणि आताच्या वास्तव्यात काय फरक जाणवतो ?

Lindgren -मी लकी आहे मला दुसऱ्यांदा स्थानकात राहायची संधी मिळालीय ह्या आधी मी 2015च्या अंतराळ मोहीमे अंतर्गत स्थानकात वास्तव्य केले होते त्या वेळेस आम्ही तिघे होतो आणि आम्ही सोयूझ अंतराळयानातून अंतराळ प्रवास केला होता आता आम्ही चौघे होतो आणि मी ह्या वेळेस Space X Crew Dragon मधून अंतराळ प्रवास केला Space X Dragon स्पेसियस आहे आरामदायी आहे सोयूझ यानात जागा कमी होती पण स्थानक त्यात सुरु असलेले सायंटिफिक प्रयोग स्थानकासाठीचा Space Walk सगळ  सारखच आहे फक्त माझ्या सोबतचे अंतराळवीर बदलले आहेत आधीचे अंतराळवीर चांगले होते आताचेही आहेत आताच्या रशियन अंतराळवीरांसोबत राहण्याचा अनुभव छान आहे अंतराळवीर बदलले तरी आम्ही सारखीच मजा अनुभवतो स्थानक आता अद्ययावत झाले आहे 

Tom -Watkins तू Geologist आहेस त्या मुळे तुझ्या संशोधनाच स्वरूप काय आहे तू करत असलेल्या संशोधनाचा उपयोग पृथ्वीसाठी आणि भविष्यकालीन अंतराळ मोहिमेसाठी कसा उपयुक्त ठरेल ?

Watkins - मी इथून पृथ्वीचे ग्रहाच्या दृष्टीकोनातून निरीक्षण करते विशेषतः चंद्र आणी मंगळ ग्रहांचे मी पृथ्वीवरची  geological माहिती गोळा करते भविष्यकालीन चंद्र आणि मंगळ मोहिमेसाठी उपयुक्त माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करते त्या साठी Remote Sensing Instrument चा उपयोग होतो शिवाय आताच स्थानकात आलेल्या कार्गोशिप मधून अनेक प्रकारचे Earth Science Experiments आले आहेत त्यात पृथ्वीवरील धुळीचे निरीक्षण ,हवामानातील बदलांचे निरीक्षण त्यांचा पृथ्वीवर होणारा परिणाम या सारखे अनेक सायंटिफिक प्रयोग इथे केल्या जात आहेत हे सर्व संशोधन करताना geologist म्हणून मला निश्चितच आनंद मिळतो हे ग्रहनिरिक्षण भविष्यकालीन अंतराळ मोहिमेसाठी अत्यंत आवश्यक आहे आणि पृथ्वीसाठीही 

Tom - Lindgren तू डॉक्टर आहेस तू इमर्जन्सी फिजिशियनचे ट्रेनिंग घेतले आहेस तुझ्या पृथ्वीवरील प्रॅक्टिस मध्ये आणि दोनवेळच्या अंतराळमोहिमेतील स्थानकातील प्रॅक्टिस मध्ये तुला काय फरक जाणवला तुझा अनुभव कसा होता ?

Lindgren - मी दोन्हीवेळेसच्या अंतराळवीरांच्या टीमचा आभारी आहे सुदैवाने मला त्यांना इमर्जन्सी ट्रीटमेंट देण्याची वेळ आली नाही स्थानकातील Aerospace medicine प्रॅक्टिस आणि पृथ्वीवरील प्रॅक्टिस ह्यात फरक आहे इथे खूप काळजी घ्यावी लागते पृथ्वीवरील वातावरण आणि स्थानकातील झिरो ग्रॅव्हीटीतील वातावरण ह्यात फरक आहे इथे शरीर तरंगत राहिल्याने शरीरावर विपरीत परिणाम होतो शिवाय सतत तरंगत्या अवस्थेत असल्याने शारीरिक इजा होण्याची शक्यता असते ती होऊ नये म्हणून सतत काळजी घ्यावी लागते तसेच आजारी पडू नये म्हणूनही काळजी घेतल्या जाते आम्हाला हेल्दी डायट फूड दिल जात आम्ही व्यायाम करतो आणि हेल्दी राहण्याचा प्रयत्न करतो इथून पृथ्वीवर परतल्यानंतरही आम्हाला आमची काळजी घावी लागते त्या साठी काही औषधे दिली जातात  तिथे पृथ्वीवर Aerospace इमर्जन्सी फिजिशियन मध्ये जे शिकवल जात ते इथे स्थानकात प्रत्यक्षात अनुभवायला मिळत अंतराळवीरांमधील शारीरिक बदल प्रत्यक्षात पाहता येतात शरीरातील Cardiovascular System ,Bone loss वै गोष्टी प्रत्यक्षात पाहून त्यांचे निरीक्षण नोंदवून त्यावर संशोधन करता येत 

Tom -Watkins आतापर्यंत स्थानकात फक्त दहा आफ्रिकन अमेरिकन अंतराळवीरांनी वास्तव्य केलय तू पहिली आफ्रिकन अमेरिकन महिला अंतराळवीर आहेस स्थानकात वास्तव्य करणारी ह्याचा भविष्यात कसा फायदा होईल 

Watkins - मी ह्या अंतराळमोहिमेतील एक हिस्सा आहे आधी आणि आताही अंतराळमोहिमेतील मानवी सहभाग आफ्रिकन अमेरिकन अंतराळवीरांसाठी यशस्वी पाऊलवाट आहे मला स्थानकात वास्तव्य करण्याची संधी मिळाली मी लकी आहे भविष्यकालीन आर्टेमिस चंद्र आणि मंगळ मोहिमेसाठी आताच्या संशोधनाचा उपयोग होणार आहे हि माझ्यासाठी सन्माननीय गोष्ट आहे 

Tom - Watkins तू लहानपणापासूनच अंतराळवीर व्हायच हे ठरवल होतस का ? नक्की केव्हा हे तुला रियलाईझ झाल त्यासाठी कसे प्रयत्न केलेस ?

Watkins - हो ! मी नऊ वर्षाची होते तेव्हापासूच अंतराळवीर व्हायच माझ स्वप्न होत पण मी जेव्हा तारुण्यात प्रवेश केला तेव्हा मला जाणवल आणि मी अंतराळवीर व्ह्यायच ठरवल  नशिबाने मला माझ्या टीचर्स आणि कुटुंबीयांनी साथ दिली माझ्या गुरुंनी मला योग्य मार्गदर्शन केले धैर्य दिल आणि मदत केली मग मी माझ द्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न केले मार्ग शोधला आणि संधी मिळताच अंतराळवीर होण्यासाठी अर्ज केला म्हणून मी मला साथ देणाऱ्या,मार्ग दाखवणाऱ्या सर्वांचे आभार मानते 

Tom- Lindgren तुझही अंतराळवीर होण्याच स्वप्न होत का ?तू  डॉक्टर होतास इमर्जन्सी फिजिशियन म्हणून प्रॅक्टिस करत होतास मग अंतराळवीर झालास दोन्ही पैकी एक फिल्ड निवडण कठीण होत का ?

Lindgren - हो ! मलाही अंतराळवीर व्हायच होत पण मी आधी मेडिसिनच क्षेत्र निवडल डॉक्टर होऊन प्रॅक्टिस केली दोन्ही क्षेत्र चांगले होते मला इमर्जन्सी डिपार्टमेंट मध्ये फिजिशियन म्हणून काम करण्याची संधी मिळाली पण मला नेहमी माझ अंतराळवीर होण्याच स्वप्न आठवायच तरीही मी ट्रेनिंग पूर्ण केल नंतर मला कळाल कि मी Aerospace medicine केल तर माझ स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळेल म्हणून मी Aerospace medicine च ट्रेनिंग घेतल मला त्याच दरम्यान Flight surgeon पदावर नोकरी मिळाली त्यामध्ये अंतराळवीर आणि त्यांचे कुटुंबीय ह्यांची काळजी घेण्यासाठी काम करायची संधी मिळाली आणि त्याच वेळेस अंतराळवीर पदासाठी निवड होणार असल्याचे कळाले मी अप्लाय केला आणि माझी 2009 मध्ये नासा मध्ये अंतराळवीर होण्यासाठी निवड झाली 

Tom -Watkins इथे Baltimore मध्ये वेब टेलेस्कोपशी संबंधित बरेच जण आहेत त्यांनी अंतराळातील दूरवरच्या  आजवर माहिती नसलेल्या भागातील ग्रहताऱयांचे अत्यंत सुंदर आणि आश्चर्यकारक फोटो पृथ्वीवर पाठवले आहेत त्यामुळे लोकांमध्ये जागृती निर्माण झाली आहे ते फोटो पाहून लोक ह्या मिशनकडे आकर्षित झाले आहेत तुझ काय मत आहे ?

Watkins -हो ! खरच हे Exiting आहे मला वाटत नासाच्या सर्व अंतराळ मोहिमा मध्ये लोकांचा सहभाग वाढला आहे लोक ह्या यशाने प्रेरित झाले आहेत नासाचे हे यश जगाला आणखी पुढे पुढे यशाच्या मार्गावर नेत आहे लवकरच सौरमाला आणि सौरमालेबाहेरील ब्रह्मांडातील दूरवरच्या ग्रहताऱ्यांबद्दलची मानवाला अज्ञात असलेली माहिती मिळेल आणि मानव अंतराळविश्वात प्रगत दिशेने वाटचाल करेल सध्या अंतराळ विश्वात व्यावसायिक कंपन्यानीही यशस्वी सुरवात केलीय Space X Dragon मधून आम्ही इथे पोहोचलो आहोत Boeing Starliner हि अंतराळस्थानकात येऊन गेले आता सामान्य लोकही अंतराळप्रवास करत आहेत आणि लवकरच Artemis -1चेही launching होईल तो क्षण सुपर Exiting चा असेल सध्याचा काळ अंतराळविश्वातील रोमांचक काळ आहे 

Tom -Lindgren स्थानकातील वास्तव्यानंतर तुझ्या मानवतेबद्दलचा दृष्टिकोनात काही फरक पडला का विशेषतः जागतिक दृष्टया ? 

Lindgren - हो ! निश्चितच फरक पडतो! इथे आल्यावर आमचा एक फायदा होतो आम्ही इथून पृथ्वीकडे पाहू शकतो पहिल्यांदा पृथ्वीच सौन्दर्य पाहून अचंबित होतो पृथ्वीवरची हिरवळ,पाणी वातावरण हे सार मानवी अस्तित्वासाठी आवश्यक आहे पण पृथ्वीवरची वृक्षतोड,हवेतील प्रदूषण आणि पाण्याचा अपव्यय पाहून वाईट वाटत इथे स्थानकातील वास्तव्यात आम्ही पाणी,अन्न आणि हवेचा तीस टक्के कमी वापर करतो ते वाचवण्याचा प्रयत्न करतो इथल्या कृत्रिम वातावरणात ह्या गोष्टींची कमतरता भासते दुसर म्हणजे इथे स्थानकाबाहेरचा काळोख,रुक्ष वातावरण आणि झिरो ग्रॅव्हीटीत राहताना पृथ्वीवरच दाट वातावरण पृथ्वीवरची हिरवळ आठवते आणि त्याच मोल जाणवत  पृथ्वीवरचे लोक हे सार तीस टक्केही वाचवताना दिसत नाहीत तेव्हा वाईट वाटत पृथ्वी रक्षणासाठी हे वाचवण किती आवश्यक आहे ते इथे आल्यावर कळत आणि आमच दुसर घर स्थानकाकडे पाहून मानवी कर्तृत्वाच कौतुक वाटत किती बुद्धिमत्ता वापरून त्यांनी हे वैशिष्ठपूर्ण असामान्य अंतराळातील फिरत घर बनवलय ह्याच आश्चर्य वाटत आणि इथे आंतरराष्ट्रीय टीमसोबत राहताना विश्वातील सर्व देश पाहायला मिळतात त्या देशातील अंतराळवीरांसोबत राहण्याची संशोधन करण्याची संधी मिळते थोडक्यात वैश्विक मैत्री होते दृष्ठीकोन वैश्विक होतो 

Tom -Watkins तुझ काय मत आहे ह्या बद्दल ?

Watkins -माझही मत Kjell सारखच आहे हे स्थानक सुरु ठेवण्यासाठी आणि आमच्या सुरक्षिततेसाठी आम्ही करत असलेल्या संशोधनासाठी सतत कार्यरत असणाऱ्या नासा संस्थेतील सर्वांचे कर्तृत्व असामान्य आहे त्यांच्यामुळेच आम्ही वैश्विक सहकारी अंतराळवीर एकत्रित काम करू शकतो आणि पृथ्वीच रक्षण करण किती आवश्यक आहे ते इथे आल्यावरच कळत 

Tom -Thank You So much! Safe Travels be Safe god speed !

Thursday 14 July 2022

नासाच्या James Web Telescope ने काढलेल्या ब्रम्हांडातील अज्ञात भागातील फोटो प्रकाशित

 An image of the edge of a nearby, young, star-forming region called NGC 3324 in the Carina Nebula. Captured in infrared light by NASA’s new James Webb Space Telescope, this image reveals for the first time previously invisible areas of star birth.

 नासाच्या James Web Telescope ने कॅमेराबद्ध केलेला ब्रह्मांडातील NGC 3324 Carina Nebula ह्या भागातील फोटो -फोटो नासा संस्था 

नासा संस्था -12 जुलै 

नासा आणि ESA ह्यांच्या सहकार्याने तयार केलेल्या James Web Telescope ने चित्रबद्ध केलेल्या ब्रह्मांडातील दूरवरच्या अज्ञात घडामोडीचे पहिले फोटो आता सर्वसामान्यांना पाहण्यासाठी उपलब्ध झाले आहेत सोमवारी Washington येथील White house मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष Joe Biden ह्यांच्या हस्ते ह्या पहिल्या फोटोंचे व व्हिडिओचे प्रकाशन करण्यात आले 

ह्या वेळी बोलताना Joe Biden म्हणाले,"James Web Telescope ने कॅमेराबद्ध केलेल्या ब्रह्मांडातील दूरवरच्या ठिकाणच्या आणि आजवर मानवाला अज्ञात असलेल्या घडामोडीचे हे फोटो आणि माहिती नवी आहे अमेरिकेने ह्या टेलिस्कोप द्वारे ते प्राप्त केले आहेत आजवर तेथे कोणीही पोहोचले नव्हते  ह्या घटनेमुळे अंतराळविश्वात अमेरिकेची ऐतिहासिक नोंद झाली आहे हे फोटो अमेरिकेतील नव्या तरुण पिढीला आणि लहान मुलांना प्रेरणादायी ठरतील त्यांना ह्या जगात अशक्य काही नाही हे कळेल हे फोटो रंगीत स्पष्ठ आणि नाविन्यपूर्ण आहेत    

 distant galaxies appear as bright glowing spots in this Webb telescope image, with some smeared by gravitational lensing; foreground stars appear bright with six-pointed diffraction spikes, owing to the shape of Webb's mirrors

 नासाच्या James Web Telescope मधील कॅमेऱ्याने चित्रबद्ध केलेला ब्रह्मांडातील दूरवरच्या SMACS 50723 ह्या भागातील तारका समूह आणि मध्यभागी त्यातील अस्पष्ट धूसर वस्तू फोटो -नासा संस्था 

नासा संस्थेने जेम्स वेब टेलिस्कोप 2021च्या डिसेंबर मध्ये अंतराळात प्रक्षेपित केला होता ह्या अथांग विश्वातील मानवाला अज्ञात असलेल्या गोष्ठी आणि घडामोडींचा शोध घेण्यासाठी ह्या टेलिस्कोप मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला ह्या विश्वातील अत्यंत सूक्ष्म घडामोडींचे निरीक्षण नोंदवून त्यांचे लाईव्ह चित्रण करता यावे म्हणून ह्या टेलिस्कोप मध्ये पूर्वी पेक्षा अधिक शक्तिशाली कॅमेरे बसविण्यात आले आहेत त्या मुळेच आता विश्वातील  अत्यंत दूरवरच्या आणि पुरातन आकाशगंगा,कृष्णविवर त्यातील ताऱ्यांचा उगम,अस्त,त्यांची निर्मिती प्रक्रिया आणि त्या भोवतालची वातावरण निर्मिती ह्या बद्दल माहिती मिळाली 

side-by-side views of Southern Ring planetary nebula as seen by Webb telescope (NIRCam, left; MIRI, right) against black backdrop of space; a bright star appears at center in both images, surrounded by an undulating ring of gas

        ब्रह्मांडातील ताऱ्याचा अस्त होण्याआधी त्याच्या पासून बाहेर पडणारे वायू -फोटो नासा संस्था 

नासा संस्थेने उपलब्ध केलेला हा फोटो आल्हाददायी आणि नयनरम्य आहे प्रथमदर्शनी आपल्याला हा फोटो पृथ्वीवरील डोंगराळ भागातील चंद्रोदयाच्या वेळचा आहे असे वाटते आजूबाजूला डोंगर त्यावर निळे आकाश आणि त्यात चमकणारे तारे पाहून हा समज होऊ शकतो पण प्रत्यक्षात फोटोतील वातावरण अत्यंत उष्ण,घोकादायक आणि भयाण काळोखातील कृष्णविवरातील निर्वात पोकळीतील आहे 

हा फोटो पृथ्वीपासून 2000 प्रकाशवर्षे दूर अंतराळातील दक्षिणेकडील NCG-3324  ह्या भागातील Carina Nebula  आणि त्या भोवतीच्या गॅसिअस वातावरणाचा आहे जेम्स वेब टेलिस्कोपच्या शक्तिशाली इन्फ्रारेड कॅमेऱ्याने हा फोटो कॅमेराबद्ध केला आहे ह्या फोटोत दिसणारे डोंगर म्हणजे आकाशगंगेतील कृष्णविवर त्यातील निर्वात पोकळीतील बाजूचे कडे आहेत आणि त्यातील तारे म्हणजे ह्या कृष्णविवरातील पोकळीतील प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे आत ओढल्या गेलेले अत्यंत उष्ण ग्रह तारे आहेत त्यांच्या सोबतच कृष्णविवरातील निर्वात पोकळीत ओढल्या गेलेले कॉस्मिक किरणे,अल्ट्रा व्हायोलेट किरणे ,विद्युतभारित किरणे त्या मुळे निर्माण झालेली उष्णता,रॅडिएशन प्रक्रियेमुळे तयार झालेले आगीचे लोट,त्यातून बाहेर पडणारे विषारी वायू ,धूळ आणि ह्या वातावरणातच होणारी नव्या ताऱ्यांची निर्मिती आणि जुन्या ताऱ्यांचा अस्त ह्या घडामोडीचे लाईव्ह चित्रण जेम्स वेबच्या कॅमेऱ्याने चित्रित केले आहे

 the galaxies in Stephan's Quintet appear as purple-pink swirls against the blackness of space in this JWST image; some foreground stars appear with diffraction spikes from the telescope's mirrors; numerous other galaxies and stars bespangle the image

                      ब्रह्मांडातील आकाशगंगेचा समूह आणि कृष्णविवर -फोटो नासा संस्था 

हे फोटो घेण्यासाठी जेम्स वेब कॅमेऱ्याला साडेबारा तास लागले ह्या फोटोतील ताऱ्यांची निर्मिती आणि अस्त हि प्रक्रिया अत्यंत जलद होती त्या मुळे ह्या वेगवान घडामोडींचे चित्रण करणे कठीण होते पण जेम्स वेब मधील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सेन्सिटिव्ह कॅमेऱ्याने हि निर्मिती प्रक्रिया तितक्याच वेगाने चित्रित केली फोटोतील डोंगर व रंगीत वातावरण कृष्णविवरातील विध्युत भारित वायू आणि गरम हवेमुळे बाहेर पडणारी धूळ ह्या मुळे तयार झाले आहेत आणि पृथ्वीपासून 7 प्रकाशवर्षे उंचीवर आहेत काही नवे ऊष्ण तारे  लाल रंगात दिसत आहेत तेथील अत्यंत प्रकाशमान Ionized किरणांचे वादळ आणि प्रचंड दाबामुळे बाहेर पडणारे वायू आणि धूळ ह्या धूसर वातावरणात नव्या ताऱ्याची निर्मिती स्पष्ठ दिसणे अशक्य असताना ह्या कॅमेऱ्याने चित्रित केलेल्या फोटोत ते स्पष्ठ आणि रेखीव दिसत आहेत नासा संस्थेने सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध केलेल्या इतर फोटोत अंतराळातील दूरवरच्या आकाशगंगांचा समूह,अंतराळात अस्त पावणाऱ्या ताऱ्याभोवतीचे वायूंचे ढगाळ वातावरण आणि त्यात चमकणाऱ्या ताऱ्यांचा समावेश आहे त्यातील एक तारा अत्यंत प्रकाशमान आहे 

हे फोटो पाहून नासाचे Administrator Bill Nelson आनंदित झाले आहेत ते म्हणतात ,"ह्या फोटो आणि लाईव्ह व्हिडीओ मुळे ब्रह्मांडातील मानवाला अज्ञात असलेली माहिती मिळाली आहे अशा अनेक अज्ञात गोष्ठी आगामी काळात प्राप्त होतील ह्या फोटोच्या सखोल संशोधनानंतर मानवाला ह्या विश्वातील अनाकलनीय गोष्ठीची उकल होईल आणि आपल्या पृथ्वीची निर्मिती आणि विश्वातील नेमके स्थान कळेल हे जेम्स वेब टेलेस्कोपच्या टीमच असामान्य कर्तृत्व आहे त्यांनी आमच स्वप्न सत्यात उतरवल आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो 

ह्या टीमचे प्रमुख सायंटिस्ट John Mather म्हणतात ह्या अथांग विश्वातील अत्यंत पुरातन दूरवरची निर्वात पोकळी त्यात चकाकणारे तारे ,तारकांचा समूह अस्त पावणाऱ्या ताऱ्याजवळ त्यातून बाहेर पडलेल्या रंगीबीरंगी वायूंचे डोंगर Absolutely Thrilling !

Saturday 9 July 2022

अंतराळवीरांनी 4 जुलैला स्थानकात साजरा केला अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन

 Expedition 67 crew members are pictured enjoying pizza during dinner time aboard the space station in May of 2022.

 अंतराळवीर Jessica Watkins अंतराळवीर Bob Hines अंतराळवीर Kjell Lindgrenआणि Samantha Cristoforetti  सहकारी अंतराळवीरांसोबत एका पार्टी दरम्यान -फोटो नासा संस्था

नासा संस्था -5 जुलै 

गेल्या वीस वर्षांपासून अंतराळवीर 4 जुलैला अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन स्थानकात उत्साहात साजरा करतात त्या साठी त्यांची कामे लवकर आटोपून मोकळा वेळ काढतात स्थानकातील एखाद्या रिकाम्या जागेत त्यांच्याकडे असलेल्या सामानाचा वापर करून तो भाग सजवतात मागे अमेरिकेचा झेंडा लावतात लाईव्ह संवादाद्वारे संस्थेशी कुटुंबियांशी संवाद साधतात त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देतात सर्वजण एकत्र येऊन पार्टीचे आयोजन करतात त्यासाठी त्यांना नासा संस्थेकडून खास पदार्थ पाठवले जातात त्याचा आस्वाद घेत हे अंतराळवीर हा दिवस आनंदात व्यतीत करतात 

ह्या वर्षीही अंतराळस्थानकात राहात असलेल्या अंतराळमोहीम 67 च्या अंतराळवीरांनी 4 जुलैला अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला ह्या अंतराळवीरांनी त्यांची महत्वाची कामे लवकर आटोपून ह्या साठी मोकळा वेळ काढला आणि रविवारी आणि सोमवारी स्वातंत्र्य दिना निमित्य मिळालेल्या सुट्टीचा आनंद लुटला 

अंतराळवीर Kjell Lindgren आणि Bob Hines ह्यांनी नासा संस्थेशी लाईव्ह संवाद साधत सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या त्या सोबतच त्यांनी नासाच्या Johnson Space Centerच्या साठाव्या वर्धापनदिना निमित्य शुभेच्छाही दिल्या 

त्यावेळी बोलताना Bob Hines म्हणाले ,"Johnson Space Center हे मानवी अंतराळ मोहिमेचे मुख्य केंद्र आहे इथूनच सर्व अंतराळ मोहिमांची आखणी केल्या जाते अंतराळवीरांची निवड प्रक्रिया,त्यांच ट्रेनिंग,अंतराळ यानाचे उड्डाण आणि लँडिंग प्रक्रिया देखील ईथुनच पार पाडल्या जाते Houston मधल्या संस्थेतुनच आपण सर्वांनी चांद्रभूमीवर पहिल्यांदा पाऊल ठेवलेल्या अपोलो मोहिमेतील अंतराळवीरांचा आवाज ऐकला होता आजवर ह्या संस्थेने अनेक अंतराळमोहिमा यशस्वी केल्या आहेत त्यातील अंतराळवीर अंतराळात प्रवास करून स्थानकात राहून आले आहेत ह्या पुढेही भविष्यकालीन चांद्र आणि मंगळ मोहिमेत विशेषतः आर्टेमिस चांद्र मोहिमेतील अंतराळवीर चंंद्रावर पोहोचतील ह्या संस्थेतील प्रमुख सायंटिस्ट,इंजिनीअर्स आणि कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! हा दिवस तुम्हा सर्वांना आनंदात जावो हि सदिच्छा ! आणी तुमच्या गौरवास्पद कामगिरीबद्दल अभिनंदन!"

Kjell Lindgren म्हणाले ,"Huston मधील Johnson संस्थेतील नासाचे कर्मचारी,स्टुडंट,टीम प्रमुख आणि शास्त्रज्ञांनी अनेक अंतराळ मोहिमांमध्ये सहभागी होऊन वेळोवेळी अंतराळवीरांना सहकार्य केले आहे त्यातील हजारो कर्मचाऱ्यांनी आम्हाला ट्रेनिंग देऊन अंतराळ भरारी मारण्यासाठी प्रवृत्त केले आहे  त्यांच्यामुळेच देशाच आमच आणि आमच्या फॅमिलीच नाव उंचावल त्या सर्वांचे आभार संस्थेतील कर्मचारी,तंत्रज्ञ ,शास्त्रज्ञांचे आणि Huston चेही विशेष आभार आणि त्यांना वर्धापन दिनानिमित्य शुभेच्छा ! Happy 4th July !

अंतराळवीर Jessica Watkins आणि Samantha Cristoforetti ह्यांनी देखील सर्वांना स्वातंत्र्य दिनानिमित्य शुभेच्छा दिल्या