अंतराळवीर Samantha Cristoforetti आणि अंतराळवीर Oleg Artemyev स्थानकाबाहेरील रशियन सेगमेंट मध्ये स्पेसवॉक करताना -फोटो नासा संस्था
नासा संस्था - 21 जुलै
नासाच्या अंतराळ मोहीम 67चे अंतराळवीर आणि कमांडर Oleg Artemyev आणि फ्लाईट इंजिनीअर Samantha Cristoforetti ह्या दोघांनी गुरुवारी स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी स्पेसवॉक केला
ह्या दोघांनी बुधवारीच ह्या स्पेसवॉकची तयारी सुरु केली होती त्यांनी त्यांचे Orlan Spacesuit चेक केले चार्ज करून इतर आवश्यक तयारी केली गुरुवारी सकाळी 10.50a.m. ला हे दोघे स्पेसवॉक साठी स्थानकाबाहेर पडले आणि सात तासांनी स्पेसवॉक संपवून संध्याकाळी 5.55p.m.ला स्थानकात परतले स्पेसवॉकसाठी अंतराळवीर Oleg Artemyev ह्यांनी परिधान केलेल्या रशियन स्पेससूटवर लाल रंगांच्या रेषा होत्या तर अंतराळवीर Samantha ह्यांनी घातलेल्या रशियन स्पेससूटवर निळ्या रंगांच्या रेषा होत्या
सात तास पाच मिनिटांच्या ह्या स्पेसवॉक मध्ये ह्या दोघांनी स्थानकाच्या रशियन सेगमेंट मधील बाहेरील 37 फूट लांबीच्या Manipulator system जवळील भागात Platform &Workstation Adapter Hardware फिट केले व दहा Nano satellites install केले ह्याचा उपयोग स्थानकाला रेडिओ electronics data मिळवण्यासाठी होईल शिवाय ह्या दोघांनी स्थानकाच्या रशियन सेगमेंट मधील Nauka Laboratory ह्या भागात रोबोटिक आर्म फिट केला ह्या स्पेसवॉकर्सनी रोबोटिक आर्मसाठीचे External Control Panel कादून दुसरीकडे बसविले
हा तिसरा नवीन रोबोटिक आर्म आहे ह्या आधी स्थानकात Canadian नी बनविलेला Canadarm-2 आणि जापनीज रोबोटिक आर्म बसविलेला आहे ह्या रोबोटिक आर्मचा उपयोग स्थानकाच्या मेंटेनन्स साठी,रिसर्चसाठी आणि इतर कामासाठी होतो युरोपियन आर्मचा उपयोग पेलोड हलविण्यासाठी एक ठिकाणाहून दुसरीकडे नेण्यासाठी व रशियन सेगमेंटच्या बाहेरील भागातील Equipment इतरत्र नेण्यासाठी होतो ह्या शिवाय ह्या अंतराळवीरांनी ह्या स्पेसवॉक मध्ये पुढील स्पेसवॉक साठीचीही तयारी करून ठेवली
अंतराळवीर Oleg Artemyev ह्यांच्या अंतराळ कारकिर्दीतला हा सहावा स्पेसवॉक होता तर अंतराळवीर Samantha Cristoforetti ह्यांचा हा पहिलाच स्पेसवॉक होता आजवर स्थानकाच्या दुरुस्तीसाठी केलेला हा 251वा स्पेसवॉक होता आणि ह्या वर्षातील हा सहावा स्पेसवॉक होता
No comments:
Post a Comment