नासाचे अंतराळवीर Bob Behnken -फोटो -नासा संस्था
नासा संस्था- 11 नोव्हेंबर
नासाचे अंतराळवीर आणी US Air force चे कर्नल Bob Behnken हे त्यांची नासा संस्थेतील बावीस वर्षांची कारकीर्द संपवून अकरा नोव्हेंबरला निवृत्त झाले आहेत 2000 साली जुलैमध्ये Bob ह्यांची नासा संस्थेत अंतराळवीर होण्यासाठी निवड झाली दोन वर्षे ट्रेनिंग घेतल्यानंतर नासाच्या Astronaut Office मधील Technical विभागात त्यांची ऑफिसर पदी निवड झाली अंतराळवीरांची निवड प्रक्रिया त्यांच ट्रेनिंग आणि त्यानंतर अंतराळयानाच उड्डाण आणि परत पृथ्वीवर सुरक्षित Landing ह्या सर्व प्रक्रियेत त्यांचा यशस्वी सहभाग होता
अमेरिकेची अंतराळमोहीम बंद होण्याआधी त्यांनी दोन वेळा Endeavor अंतराळयानातून अंतराळ स्थानकात जाण्यासाठी अंतराळ उड्डाण केले होते 2008 साली STS-123 मोहीमेद्वारा अंतराळवीर Bob Behnken पहिल्यांदा अंतराळस्थानकात गेले त्यानंतर 2010 साली दुसऱ्यांदा ते STS-130 मोहीमेद्वारा अंतराळस्थानकात गेले ह्या मोहिमेत ते मिशन स्पेशॅलिस्ट होते ह्या दोन्ही मोहिमेत त्यांनी जपान आणि कॅनडा अंतराळ एजन्सीचे स्थानकाच्या कामासाठीचे सामान स्थानकात पोहोचवले त्यांच्या दोन वेळच्या अंतराळवारीत त्यांनी स्थानकात 62 दिवस वास्तव्य केले आणि त्या दरम्यान स्थानकाच्या कामासाठी चार वेळा Space Walk केला आणि त्या साठी अंतराळात 100 तास व्यतीत केले त्यांच्या Air Force मधील कारकिर्दीत त्यांनी 25 पेक्षा जास्त वेगवेगळ्या Air Craft मधून 2000 तास उड्डाण केले आहे आणी आजवरच्या अंतराळ मोहिमे दरम्यान अंतराळ स्थानकात 93 दिवस वास्तव्य केले आहे
नासा आणि Space X Crew Dragon च्या पहिल्या व्यावसायिक आणि मानवी अंतराळ मोहिमेचा ऐतिहासिक शुभारंभ त्यांनी केला Space X Crew Dragon च्या पहिल्या आणि दुसऱ्या Demo -2 Test मोहिमेत ते पायलट होते ह्या दोन्ही वेळेस त्यांनी कुशलतेने यंत्रणा हाताळून Space X Crew Dragon मोहीम यशस्वी केली 2020 साली 30 मे ला अंतराळवीर Bob Behnken आणि Doug Hurley टेस्ट मोहिमेअंतर्गत Space X Crew अंतराळ यानातून पहिल्यांदा अंतराळ स्थानकात राहायला गेले आणि 2ऑगस्ट 2020 मध्ये परत सुखरूप पृथ्वीवर पोहोचले अमिरिकेची बंद पडलेली अंतराळ मोहीम पुन्हा सुरु झाल्यानंतर अमेरिकन निर्मित अमेरिकन अंतराळयानातून अमेरिकन भूमीवरून अंतराळवीरांना अंतराळ प्रवास करून स्थानकात नेण्या आणण्यासाठी आणि व्यावसायिक दृष्ठीने त्यांना लागणारे सामान आणि इतर नागरिकांना अंतराळ प्रवास घडविण्यासाठी हि मोहीम सुरु करण्यात आली आणि आता पाचव्यांदा अंतराळवीर अंतराळ स्थानकात पोहोचले आहेत ह्या आधीच्या चार मोहिमाही यशस्वी झाल्या आहेत
ह्या प्रसंगी बोलताना नासा संस्थेचे Administrator Bill Nelson म्हणाले,"Bob Behnken हे अत्यंत बुद्धीमान आणी कर्तुत्ववान अंतराळवीर आहेत अमेरिकन अंतराळविश्वातील त्यांनी केलेली कामगिरी अविस्मरणीय आहे अंतराळवीर Bob आणी अंतराळवीर Doug Hurley ह्या दोघांनी नासा आणी Space X Crew Dragon च्या अंतराळ विश्वातील ऐतिहासिक व्यावसायिक अंतराळ मोहिमेचा शुभारंभ केला आहे त्यांच्या ह्या सहयोगा बद्दल आणी नासा संस्थेतील कामगिरी बद्दल नासा संस्थेतर्फे त्यांचे आभार आणी त्यांना त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा!"
नासाच्या Johnson Space Center मधील Astronaut Office चे प्रमुख Reid Weisman ह्यांनी देखील अंतराळवीर Bob Behnken ह्यांच्या बद्दल असेच मत व्यक्त केले ते म्हणाले," अंतराळवीर Bob ह्यांनी अत्यंत कुशलतेने आणि शांततेने Astronaut ऑफिस मध्ये आणि ह्या मोहिमेत काम हाताळले नासा संस्थेत आणि अंतराळ विश्वात असे कर्तृत्वान आणि असामान्य नेतृत्व असलेले लोक खूप कमी आहेत त्यांच्या निवृत्ती नंतर आम्हाला त्यांची उणीव नेहमी जाणवेल त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा !
अंतराळवीर Bob Behnken ह्यांनी देखील ह्या मोहिमेत सहभागी केल्याबद्दल नासा संस्थेचे आभार मानले ते म्हणाले ,"मला ह्या देशाच्या अंतराळविश्वातील ऐतिहासिक मोहिमेचे नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल नासा संस्थेचे आणि सर्व टीमचे आभार ! अमेरिकेने पुन्हा एकदा अमेरिकन भूमीवरून स्वनिर्मित अंतराळयानातून अंतराळ प्रवास घडवला आणि मी देखील अमेरिकेची अंतराळविश्वातील भविष्यकालीन प्रगती पाहण्यासाठी उत्सुक आहे !"
No comments:
Post a Comment