अंतराळवीर Jessica Watkins अंतराळवीर Bob Hines अंतराळवीर Kjell Lindgrenआणि Samantha Cristoforetti सहकारी अंतराळवीरांसोबत एका पार्टी दरम्यान -फोटो नासा संस्था
नासा संस्था -5 जुलै
गेल्या वीस वर्षांपासून अंतराळवीर 4 जुलैला अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन स्थानकात उत्साहात साजरा करतात त्या साठी त्यांची कामे लवकर आटोपून मोकळा वेळ काढतात स्थानकातील एखाद्या रिकाम्या जागेत त्यांच्याकडे असलेल्या सामानाचा वापर करून तो भाग सजवतात मागे अमेरिकेचा झेंडा लावतात लाईव्ह संवादाद्वारे संस्थेशी कुटुंबियांशी संवाद साधतात त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देतात सर्वजण एकत्र येऊन पार्टीचे आयोजन करतात त्यासाठी त्यांना नासा संस्थेकडून खास पदार्थ पाठवले जातात त्याचा आस्वाद घेत हे अंतराळवीर हा दिवस आनंदात व्यतीत करतात
ह्या वर्षीही अंतराळस्थानकात राहात असलेल्या अंतराळमोहीम 67 च्या अंतराळवीरांनी 4 जुलैला अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला ह्या अंतराळवीरांनी त्यांची महत्वाची कामे लवकर आटोपून ह्या साठी मोकळा वेळ काढला आणि रविवारी आणि सोमवारी स्वातंत्र्य दिना निमित्य मिळालेल्या सुट्टीचा आनंद लुटला
अंतराळवीर Kjell Lindgren आणि Bob Hines ह्यांनी नासा संस्थेशी लाईव्ह संवाद साधत सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या त्या सोबतच त्यांनी नासाच्या Johnson Space Centerच्या साठाव्या वर्धापनदिना निमित्य शुभेच्छाही दिल्या
त्यावेळी बोलताना Bob Hines म्हणाले ,"Johnson Space Center हे मानवी अंतराळ मोहिमेचे मुख्य केंद्र आहे इथूनच सर्व अंतराळ मोहिमांची आखणी केल्या जाते अंतराळवीरांची निवड प्रक्रिया,त्यांच ट्रेनिंग,अंतराळ यानाचे उड्डाण आणि लँडिंग प्रक्रिया देखील ईथुनच पार पाडल्या जाते Houston मधल्या संस्थेतुनच आपण सर्वांनी चांद्रभूमीवर पहिल्यांदा पाऊल ठेवलेल्या अपोलो मोहिमेतील अंतराळवीरांचा आवाज ऐकला होता आजवर ह्या संस्थेने अनेक अंतराळमोहिमा यशस्वी केल्या आहेत त्यातील अंतराळवीर अंतराळात प्रवास करून स्थानकात राहून आले आहेत ह्या पुढेही भविष्यकालीन चांद्र आणि मंगळ मोहिमेत विशेषतः आर्टेमिस चांद्र मोहिमेतील अंतराळवीर चंंद्रावर पोहोचतील ह्या संस्थेतील प्रमुख सायंटिस्ट,इंजिनीअर्स आणि कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! हा दिवस तुम्हा सर्वांना आनंदात जावो हि सदिच्छा ! आणी तुमच्या गौरवास्पद कामगिरीबद्दल अभिनंदन!"
Kjell Lindgren म्हणाले ,"Huston मधील Johnson संस्थेतील नासाचे कर्मचारी,स्टुडंट,टीम प्रमुख आणि शास्त्रज्ञांनी अनेक अंतराळ मोहिमांमध्ये सहभागी होऊन वेळोवेळी अंतराळवीरांना सहकार्य केले आहे त्यातील हजारो कर्मचाऱ्यांनी आम्हाला ट्रेनिंग देऊन अंतराळ भरारी मारण्यासाठी प्रवृत्त केले आहे त्यांच्यामुळेच देशाच आमच आणि आमच्या फॅमिलीच नाव उंचावल त्या सर्वांचे आभार संस्थेतील कर्मचारी,तंत्रज्ञ ,शास्त्रज्ञांचे आणि Huston चेही विशेष आभार आणि त्यांना वर्धापन दिनानिमित्य शुभेच्छा ! Happy 4th July !
अंतराळवीर Jessica Watkins आणि Samantha Cristoforetti ह्यांनी देखील सर्वांना स्वातंत्र्य दिनानिमित्य शुभेच्छा दिल्या
No comments:
Post a Comment