Space X Crew -5 चे अंतराळवीर स्थानकातील Harmony Module मध्ये Welcome Ceremony कार्यक्रमात नासा संस्थेशी लाईव्ह संवाद साधताना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था-7 ऑक्टोबर
नासाच्या Space X Crew -5चे अंतराळवीर गुरुवारी अंतराळ स्थानकात पोहोचल्यानंतर स्थानकात राहात असलेल्या अंतराळवीरांनी त्यांच फुल देऊन स्वागत केल त्या नंतर काही वेळातच स्थानकात त्यांचा Welcome Ceremony पार पडला ह्या कार्यक्रमासाठी स्थानकातील अकराही अंतराळवीर एकत्र जमले होते नासाच्या Huston येथील संस्थेने ह्या अंतराळवीरांशी लाईव्ह संपर्क साधुन त्यांचे स्थानकात स्वागत केले आणी स्थानकाची कमांडर Samantha हिच्या हाती संवादाची सुत्रे दिली
अंतराळवीर Samantha -
अंतराळस्थानकात Crew 5 च्या सर्व अंतराळवीरांचे स्वागत ! तुम्हाला ईथे पोहोचलेल पाहून आनंद झाला अखेर तुम्ही ईथे पोहोचलात खरोखरच तुम्ही स्पेशल आहात कारण ह्या वेळेस रशियन अंतराळवीर Anna Kikina तुमच्यासोबत आहे Space X-Crew Dragon मधून अंतराळ प्रवास करुन स्थानकात पोहोचणारी ती पहिली रशियन महिला अंतराळवीर आहे त्यामुळे Anna चे स्पेशल स्वागत ! आणी Koichi तुमचेही स्पेशल स्वागत कारण तुम्ही पाचव्यांदा स्थानकात रहायला आला आहात Josh आणी Nicole तुमचेही स्वागत!आपण हा आनंद सेलिब्रेट करु यात तुमच्यासाठी स्पेशल Gift आहे शेवटचे आठ Balls तुमच्यासाठी आता जास्त वेळ घेत नाही कारण तुमचे कुटुंबीय तुम्हाला पहाण्यासाठी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी उत्सुक आहेत
Nicole Mann-
Thank you Samantha! खरोखरच हे सार आश्चर्यकारक आहे ,Mom बघ मी स्थानकात पोहोचलेय ! हे स्थानक बनवणाऱ्यांच कर्तुत्व असामान्य आहे आमच पृथ्वीवरच नासा संस्थेतील ट्रेनिंग,तिथले सहकारी अंतराळवीरआणि आमची टिम सारच खूप छान होत आता स्थानकात ह्या मोहीमेतील अंतराळविरांसोबत काम करायला मिळेल त्या मुळे नासा संस्था आणी स्पेस X टिममधील सर्वांंचे आभार त्यांच्या मुळेच आम्ही ईथे पोहोचलो आहोत विषेशतः माझ्या पतीचे आणी मुलाचे आभार मला माहिती नाही पुन्हा मला हि संधी मिळेल की नाही ते! त्यांच्या सपोर्टमुळेच मी ईथे येऊ शकले Mom!Dad!माझी बहिण Kirsten! तुमच्या सहकार्याने,प्रोत्साहनामुळे मी ईथे पोहोचले तुम्हा सर्वांचे आभार!
Josh Cassada
मीही Nicoleच्या पती आणी मुलाचे आभार मानतो त्यांच्यामुळे ती आमच्या टिममध्ये आली मला तिच्यासोबत काम करायला मिळाल आम्हाला ईतकी छान Crew mate मिळाली ती खूप छान आहे आमच्या टिममधील सगळेच खूप छान आहेत मी खूप नशीबवान आहे माझ्या संपूर्ण आयुष्यातले काही दिवस मी स्थानकात वास्तव्य करु शकेन मला ईथे संशोधन करायला मिळेल,नवीन अंतराळ विरांसोबत काम करायला मिळेल आमची टीम खूप छान आहे खरतर ट्रेनिंग आधी आम्ही एकमेकांना ओळखतही नव्हतो आता आम्ही चांगले मित्र झालो आहोत मी माझ्या कुटुंबातील सर्वांचे आभार मानतो त्यांच्यामुळेच मी ईथे येऊ शकलो नासा संस्था आणी माझ्या आयुष्यातील सर्वांचे आभार ज्यांनी मला येथे येण्यासाठी प्रोत्साहित केल
Koichi Wakata
मला ईथे आल्यावर पुन्हा माझ्या दुसऱ्या घरी परतल्यासारख वाटतय आपण घरातून काही दिवस बाहेर जाऊन आल्यावर जस वाटत तसच फिलींग आलय त्यासाठी माझ्या कुटुंबीयांचे आभार त्यांच्यामुळेच मी ईथे पुन्हा पुन्हा येऊ शकलो आणी मला हि संधी दिल्याबद्दल नासा संस्थेचे,संस्थेतील सहभागी देशांतील संस्थेचे आणी अर्थातच माझ्या देशाची संस्था JAXA चे खास आभार आता वेळ न घालवता लवकरात लवकर ह्या मोहीम 68च्या अंतराळवीरांसोबत काम करायला मी ऊत्सुक झालोय
Anna Kikina
स्थानकातील सर्व अंतराळवीर आमच्या येण्याने आनंदीत झाले आहेत त्यांनी ऊत्साहाने आमच फुल देऊन स्वागत केलय सर्व अंतराळवीर त्यांच्या कामातून वेळ काढून आमच्या स्वागतासाठी एकत्र जमले आहेत मला पण त्यांच्यासोबत वेळ घालवताना आनंद होतोय पहा सगळेच किती भाऊक झाले आहेत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत ज्यांच्यामुळे आम्ही ईथे पोहोचलो त्या संस्थेचे आभार ह्या अंतराळ विश्वातील,अंतराळ मोहिमेतील ,टिममधील सर्वांचे आभार ज्यांनी ह्या मोहिमा सुरू ठेवल्या आहेत त्यांच्यामुळेच आम्ही ईथे स्थानकात येऊ शकतो राहु शकतो हे International Friends Wonderful आहेत पृथ्वीवरील सर्वांना माझा Big Hello! तसेच माझे कुटुंबीय माझे पती Angelina !माझी Mom !,भाऊ सर्वांचे आभार आणि मला प्रेरित करणाऱ्या सर्वांचे आभार launching Site वर खरोखरच चमत्कार झाला वादळी वातावरणामुळे आमच launching लांबल पण वातावरण अनुकूल झालं आणि आम्ही इथे पोहोचलो
नासा संस्था -तुम्ही सर्वजण व्यवस्थित पोहोचलात आनंदी दिसत आहात आमच्याकडूनही तुमच्या सर्वांचे आभार आणी मोहिम 68 मध्ये आणि स्थानकात तुमच स्वागत !
No comments:
Post a Comment