Wednesday 28 December 2022

 नासाच्या Perseverance मंगळयानाने मंगळभूमीवर पहिली सॅम्पलची ट्यूब ठेवली

  NASA’s Perseverance rover deposited the first of several samples onto the Martian surface

 नासाच्या Perseverance यानाने 21 डिसेंबर 2022ला मंगळावरील 653व्या मंगळदिवशी मंगळभूमीवर ठेवलेली  नमुन्याची ट्युब -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -22डिसेंबर

नासाच्या  Perseverance मंगळयानाने मंगळ भूमीवर पहिली खडकाचे नमुने भरलेली ट्यूब ठेवली  मंगळावरील आणि भूगर्भातील जमीन खोदून त्यातील खडक,माती आणि वाळू ह्यांचे नमुने यानातील Titanium ट्युब मध्ये भरण्याचे काम सध्या Perseverance यान करत आहे पहिल्या टप्प्यात येत्या दोन महिन्यात दहा ट्यूबमध्ये हे नमुने  भरले जाणार आहेत त्यातीलच एक खडकाच्या नमुन्याने भरलेली ट्युब मंगळावरील भूमीवर व्यवस्थित ठेवण्यात Perseverance यानाला यश आले आहे मंगळावरील,"Three Fork " ह्या भागात हे काम सुरु आहे 

नासा संस्थेच्या परग्रहावरील भूमीवरील नमुने गोळा करून ट्युब मध्ये भरून पृथ्वीवर परत आणण्याआधी तेथील भूमीवर जमा करून ठेवण्याच्या कामाचा हा ऐतिहासिक प्रारंभ आहे भविष्यकालीन मंगळ मोहिमेत ह्या जागेचा ऊपयोग डेपोसारखा होईल शास्त्रज्ञांच्या अपेक्षेनुसार ह्या मोहिमेत Perseverance यानाने आजवर 17नमुने गोळा केले असून त्यात मंगळावरील वातावरणातील नमुन्यांचा समावेश आहे ट्यूबमध्ये Perseverance यानाने जमा केलेल्या नमुन्यातील थोडे नमुने ट्युबमध्ये भरले जातील आणी थोडे यानातच ठेवले जाणार आहेत 

Perseverance यानाने मंगळभूमीवर ठेवलेल्या ह्या पहिल्या ट्यूब मधील हा नमुना Igneous खडकाचा असून तो लहान खडूच्या आकाराचा आहे ह्या टीममधल्या शास्त्रज्ञांनी ह्या खडकाला "Malay"असे नाव दिले आहे हा पहिला नमुना 31जानेवारी 2022 मध्ये Pereverance यानाने मंगळावरील Jezoro Crater ह्या भागातील South Seitah येथुन गोळा केलेला आहे 

विशेष म्हणजे हे नमुन्याने भरलेली ट्यूब जमिनीवर ठेवण्याचे काम Perseverance यान बनविणाऱ्या ह्या टीममधील  इंजिनीअर्स मार्फत केले गेले नाही तर यानाने स्वयंचलित यंत्रणेमार्फत हे काम पूर्ण केले जेव्हा हे काम यशस्वीरीत्या पार पडले तेव्हा ह्या मोहिमेतील टीम सतर्क झाली त्यांनी यानावर बसविलेल्या WHTSON कॅमेऱ्यावर लक्ष केंद्रित केले हा कॅमेरा यानाच्या सात फूट लांब रोबोटिक आर्मवर शेवटच्या टोकावर बसविण्यात आला आहे Perseverance यानाने गोळा केलेल्या नमुन्यांची ट्युब यानाच्या चाकात न अडकता व्यवस्थित जमिनीवर ठेवली गेली कि नाही हे पाहण्यासाठी हा कॅमेरा यानावर बसविण्यात आला आहे आणि टिमच्या अपेक्षेनुसार यानाच्या ह्या स्वयंचलित यंत्रणेमार्फत नमुन्याची ट्युब जमिनीवर उभी न राहता व्यवस्थित ठेवली गेली ह्या ट्यूब व्यवस्थित जमिनीवर ठेवल्या गेल्यामुळे आता नमुन्यांची ट्यूब रोबोटिक आर्मच्या सहाय्याने ऊचलुन रोबोटिक Lander मध्ये ठेवताना न अडकता व्यवस्थित ठेवल्या जाईल

Perseverance यानाने गोळा केलेल्या नमुन्यांच्या ह्या ट्यूब यानाला बसविलेल्या रोबोटिक आर्मच्या साहाय्याने Robotic Lander मध्ये ठेवण्यात येतील त्या नंतर पृथ्वीवर हे नमुने आणण्यासाठी पाठविण्यात आलेल्या दोन रॉकेट मधील Containment ट्युब मध्ये रोबोटिक आर्मच्या साहाय्याने नमुन्यांच्या ट्युब्स भरण्यात येतील नासाने बनविलेले हे रॉकेट प्रथमच परग्रहावर म्हणजे मंगळावर प्रज्वलित होऊन उड्डाण करेल त्या नंतर पृथ्वीवरून मंगळावर हे नमुने आणण्यासाठी पाठविण्यात आलेल्या अंतराळयानात हे Container ठेवण्यात येतील जर काही कारणामुळे अडचण आली आणि मंगळयान हे नमुने पाठवू शकले नाही तर दोन Sample Recovery Helicopters मार्फत हे काम पूर्ण केल्या जाईल  

मंगळावरील यानाने जमा केलेले खडकांचे आणि इतर नमुने ट्युब मध्ये भरून ती ट्युब जमिनीवर ठेवलेली पाहणे हे आमच्या टीमचे प्रमुख उद्दिष्ट साध्य झाले आहे हे काम सहा जानेवारीला संपेल उरलेले काम पूर्ण झाले की ह्या मोहिमेतील हा पहिला टप्पा संपेल असे नासाच्या J.PL Lab मधील Perseverance यानाच्या टीमचे Deputy Project Manager, Rick Welch म्हणतात 

मंगळावरील पुरातन सजीव सृष्टीच्या अस्तित्वाला दुजोरा देणारे मंगळावरील वातावरणातील व भूगर्भातील  पुरावे गोळा करण्यासाठी Perseverance यान मंगळावर गेलॆ आहे

No comments:

Post a Comment