नासाच्या अंतराळ मोहीम 68चे अंतराळवीर Koichi Wakata अंतराळवीर Frank Rubio अंतराळवीर Nikole Mann आणि अंतराळवीर Josh Cassada व्हीडिओ गेम मधील कार्टूनचे मुखवटे घालून Halloween पार्टी साजरी करताना- फोटो -नासा संस्था
नासा संस्था-4 नोव्हेंबर
अमेरिकेत दरवर्षी 31आक्टोबरला Halloween दिवस साजरा केला जातो आपल्या पुर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून हा दिवस साजरा करतात त्या दिवशी भोपळ्याचे विषेश महत्व असते भोपळा कंदिलासारखा कोरून त्यात दिवे लाऊन रात्री घराबाहेर लावले जातात नागरीक वेगवेगळ्या डिझाइनचे चित्रविचित्र पोषाख परीधान करतात कार्टून्स वै चे मुखवटे घालतात आणी आपल्या कुटुंबीय,नातेवाईक आणी मित्रांसोबत पार्टीचे आयोजन करतात ह्या पार्टीत भोपळ्यापासून बनविलेल्या वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश असतो
पण पृथ्वी पासून दुर अंतराळात स्थानकातील झीरो ग्रव्हीटित रहाणाऱ्या अंतराळविरांना इथल्यासारखा हा दिवस साजरा करता येत नाही तरीही 2000 साली अंतराळस्थानक स्थापन झाल्यापासुन दरवर्षी अंतराळवीर त्यांच्या व्यस्त दिनचर्येतुन वेळ काढून स्थानकात हा दिवस साजरा करतात त्या दिवशी त्यांचे संशोधनाचे व इतर काम लवकर आटोपून वेळ काढतात स्थानकात असलेल्या सामानातुन स्थानकातील मोकळ्या जागी सजावट करतात सर्व अंतराळवीर एकत्रीत येऊन वेगवेगळे ड्रेस व मुखवटे तयार करतात आणि ते घालून Halloweenला पार्टीचे आयोजन करतात स्थानकात असलेल्या पदार्थांचा आस्वाद घेत Halloween चा आनंद लुटतात नासा संस्थेतर्फे त्यांना अशा सणांच्या पार्टी साठी खास पदार्थ पृथ्वीवरून स्थानकात जाणाऱ्या कार्गोशिप मधून इतर सामानासोबत पाठवले जातात अंतराळवीर त्या दिवशी त्यांच्या कुटुंबियांशी लाईव्ह संवादही साधतात ह्या वर्षी देखील नासाच्या मोहीम 68 च्या अंतराळविरांनी व्हिडिओ गेम्स मधील कार्टून्सचे मुखवटे घालून Halloween साजरा केला
No comments:
Post a Comment