Perseverance मंगळयानाने रोबोटिक टीमद्वारे गोळा केलेले मंगळावरील नमुने पृथ्वीवर आणतानाचे मंगळावरील काल्पनिक चित्र -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -
नासा आणी इसा ( युरोपियन स्पेस एजन्सी) संस्थेतील प्रमुखांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत Perseverance यानाने गोळा केलेले मंगळभुमीवरील खडकांचे नमुने 2033 मध्ये पृथ्वीवर परत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मंगळावरील Jezero Crater ह्या भागात कार्यरत असलेल्या Perseverance यानाने मंगळ ग्रहावरील पुरातन काळच्या सजीव सृष्ठीच्या अस्तित्वाला दुजोरा देणाऱ्या प्रवाहित पाण्याच्या आटलेल्या स्त्रोताच्या आसपासच्या भागातील व भुप्रुष्ठाखालील जमीनीचे उत्खनन करून तेथील खडकांचे नमुने गोळा केले आहेत
आजवर Perseverance यानाने तेथील खडक,माती,मिनरल्सचे अनेक नमुने व एक Atmospheric नमुना गोळा केला आहे आगामी काळात Perseverance यानाद्वारे आणखी नमुने गोळा करण्यात येणार आहेत ह्या कामात Perseverance यानासोबत मंगळावर पोहोचलेल्या Ingenuity Mars helicopter ने देखील मोलाची मदत केली आहे Ingenuity mars हेलिकॉप्टरने मंगळग्रहावरील आकाशात आता 29 वेळा यशस्वी ऊड्डाण केले आहे आणि तेथील आसपासच्या भागातील,वातावरणातील निरीक्षण नोंदवून ऊपयुक्त संशोधीत माहिती व त्या भागातील फोटो काढुन पृथ्वीवर पाठवले आहेत विशेष म्हणजे शास्त्रज्ञांच्या अपेक्षेनुसार ह्या हेलिकॉप्टरची कार्यक्षमता एक वर्षापर्यंतच होती पण Ingenuity हेलिकॉप्टरने अपेक्षेपेक्षा जास्त काळ कार्यरत राहून टिममधील सर्वांना आश्चर्य चकीत केले आहे Ingenuity च्या ह्या यशाने प्रेरित होऊन शास्त्रज्ञांनी आता मंगळावरील नमुने पृथ्वीवर आणण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या हेलिकॉप्टरचे डिझाईनही Ingenuity वर आधारित बनवण्याचा निर्णय घेतला आहे सध्या Perseverance यान Mars Ascent Vehicle आणि ESA चे Sample Transfer Arm ह्यांच्या साहाय्याने गोळा केलेले खडकांचे नमुने Sample Retrieval Lander मध्ये साठवत आहे
पण आता ह्या टीममधील शास्त्रज्ञांनी मंगळ ग्रहावरील नमुने पृथ्वीवर आणण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या Sample Retrieval Lander आणि दोन Helicopters चे डिझाईन नवीन व अद्ययावत यंत्रणेने बनविले आहे त्या मुळे यानाला नमुने गोळा करण्यासाठी आता Fetch रोव्हर किंवा त्याच्याशी संलग्न अशा दुसऱ्या Lander ची आवश्यकता भासणार नाही ह्या नवीन Sample Retrieval Lander सोबत पाठविण्यात येणारे हेलिकॉप्टर बनविताना आधीच्या Ingenuity हेलिकॉप्टरचे डिझाईन वापरून त्यातील त्रुटी कमी करून काही सुधारणा करण्यात आल्या आहेत ज्या मुळे हे काम कमी त्रासाचे आणि सोपे होईल आता ह्या हेलिकॉप्टर मध्येच नमुने गोळा करण्याची क्षमता निर्माण केली असल्यामुळे हे काम आता हेलिकॉप्टर द्वारे केले जाईल
2027-28 च्या उन्हाळ्यात Earth Return Orbiter आणि Sample Retrieval Lander मंगळग्रहावर पाठविण्यात येणार असून 2033 मध्ये ते तेथील खडकांचे व इतर नमुने घेऊन पृथ्वीवर परतेल नुकत्याच झालेल्या बैठकीत ह्या नव्या डिझाईन वर शिक्कामोर्तब झाल्याने लवकरच म्हणजे ऑक्टोबर महिन्यात ह्या कामाचा शुभारंभ होईल आणि एक वर्षांनी हे काम पूर्ण होईल त्यानंतर नासा संस्थेतील ह्या टीममधील इंजिनीअर्स ह्या डिझाईनची परिपूर्णता तपासून पाहतील त्यानंतर अंतिम मान्यता मिळेल
Human &Robotic Exploration ESA चे Director David Parker ह्यांच्या मते आता हे काम लवकरच जोमाने सुरु होईल आणि आगामी काळात Earth Return Orbiter आणि हेलिकॉप्टर्स पृथ्वीवरून मंगळ आणि पुन्हा पृथ्वी असा ऐतिहासिक अंतराळ प्रवास सुरु करेल आणि Sample Transfer Arm द्वारे रोबोटिकली नमुन्यांच्या tubes Orbiting Sample Container मध्ये भरेल
ह्या मंगळ मोहिमेतील नमुने पृथ्वीवर आणण्यासाठी नासा आणि ESAने मिळून एकत्रित केलेले काम वैशिष्ठपूर्ण आहे हे ऐतिहासिक असामान्य कर्तृत्व आहे अस नासाच्या वॉशिंग्टन येथील संस्थेचे Associate Administrator Thomas Zurbuchen म्हणतात सध्या मंगळावरील पहिल्या टप्प्यातील नमुने गोळा करण्याचे काम प्रगतीपथावर आहे 2021पासून Perseverance यान मंगळावरील Jezero Crater ह्या भागात कार्यरत आहे आणि तेथील खडकांचे नमुने गोळा करण्याचे काम यशस्वीपणे पार पाडत आहे आता तेथील खडकांचे अकरा नमुने आणि वातावरणातील एक नमुना (atmospheric sample) त्याने गोळा केले आहेत हे नमुने जेव्हा पृथ्वीवर पोहोचतील तेव्हा नासाचे हे कर्तृत्व जगाला प्रेरित करेल हेलिकॉप्टरच्या नव्या डिझाईन मध्ये दीर्घकाळ उपयुक्ततेचा विचार करून पूर्वीच्या तुलनेत काही बदल केले आहेत अंतिम मान्यतेआधी तज्ञांकडून त्याचे सूक्ष्म निरीक्षण करणे अत्यंत आवश्यक असते नासाच्या ह्या टीममधील इंजिनीअर्स हे काम करतील हे नमुने पृथ्वीवर आणल्यानंतर जगभरातील शास्त्रज्ञांना मंगळावरील खडकांचे अत्याधुनिक यंत्रणा वापरून त्यावर संशोधन करण्याची संधी दिली जाईल हे काम मंगळावर जाऊन करता येणे सध्यातरी शक्य नाही त्यामुळेच तेथील नमुने पृथ्वीवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला अपोलो चांद्र मोहिमेतील खडकांचे आणि मातीचे नमुने आता आपण अद्ययावत यंत्रणा वापरून पाहू शकलो तसेच भविष्यात मंगळग्रहांवरील नमुने पाहता येतील आणि संशोधित करता येतील
No comments:
Post a Comment