'
Artemis मोहिमेतील अंतराळवीर स्पेससूट घालून चंद्रावरील भूमीवर फिरतानाचे काल्पनिक चित्र -फोटो नासा संस्था
नासा संस्था-7 सप्टेंबर
पन्नास वर्षांनी अमेरिकन अंतराळवीर चंद्रावर पाऊल ठेवणार आहेत त्यामुळे नासाच्या Artemis चांद्रमोहिमेची जय्यत तयारी सुरु आहे ह्या मोहिमे अंतर्गत वेगवेगळ्या नाविन्यपुर्ण स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे ह्याच मोहिमेअंतर्गत आर्टेमिस मोहिमेतील अंतराळवीरांना चंद्रावरील भूमीवर फिरताना आणि स्पेसवॉक करताना घालण्यासाठी उपयुक्त असा स्पेससूट बनविण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली होती त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला अंतिम दोन कंपन्यामधून नासा संस्थेने Axiom Space ह्या व्यावसायिक कंपनीची निवड निश्चित केली आहे आणि त्यांना स्पेससूट बनविण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले
Artemis III ह्या मोहिमेतील अंतराळवीरांसाठी ह्या स्पेस सुटची निर्मिती करण्यात येणार आहे अंतराळवीरांना तेथील भूमीवर फिरताना सुरक्षित आणि अंतराळात स्पेसवॉक दरम्यान टेक्निकल सिस्टिम्स व इतर आवश्यक बाबीसाठीची उपयुक्त्तता पारखून ह्या स्पेस सूटची निवड करण्यात आली ह्या स्पेससूटच्या निर्मिती साठी सुरवातीला $228.5 मिलियन खर्च देण्यात येणार आहे
नासाच्या ह्या मोहिमेतील मॅनेजर Lara Kearney म्हणतात ह्या ऐतिहासिक Artemis मोहिमेतील स्पेससूट व इतर आवश्यक गोष्टींच्या निर्मितीसाठी अंतराळविश्वातील Axiom Space ह्या व्यावसायिक कं.शी भागीदारी करण आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे ह्या स्पेससूट निर्मितीच्या निर्णयामुळे पन्नास वर्षानंतर ह्या मोहिमेतील अंतराळवीरांच्या चांद्रभूमीवरील पुन:प्रवेशाचा पाया रोवला जातोय आगामी काळात अंतराळवीर तेथे जातील तेथील भूमीवरील,वातावरणातील सायंटिफिक नमुने गोळा करतील तेथे मानवाला राहण्यायोग्य जागा शोधतील पृथ्वीवरील मानवासाठी उपयुक्त संशोधन करतील आणि अंतराळविश्वातील व्यावसायिक मोहिमेचीही सुरवात होईल
ह्या स्पेससूटचे डिझाईन बनविताना गेल्या पन्नास वर्षातील स्पेससूट एक्स्पर्टशी चर्चा करून काही त्रुटी दूर करून नवीन उपयुक्त बाबींचा समावेश त्यात करण्यात आला टेक्निकल सिस्टिम्स आणि सेफ्टीला प्राधान्य देण्यात आले ह्या स्पेस सूटची निर्मिती करताना त्याचे डिझाईन,क्वालिटी,अंतराळवीरांना लागणाऱ्या सर्व सिस्टिम्सची पूर्तता आणि सुरक्षितता ह्या सर्वांची जबाबदारी Axiom Space वर असेल ह्या सर्व बाबी नासा संस्थेतर्फे तपासल्या जातील ह्या करारानुसार 2034पर्यंत मागणीनुसार स्पेस सूटचा पुरवठा करावा लागेल त्या नंतर आवश्यकतेनुसार भविष्यकालीन अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांसाठी स्थानकात आणि स्थानकाबाहेर स्पेस वॉक दरम्यान घालण्यासाठी स्पेस सूट निर्मितीची ऑर्डर देण्यात येईल
स्पेससूट तयार झाल्यानंतर नासा संस्थेतील अंतराळवीरांच्या ट्रेनिंग दरम्यान पृथ्वीवरील अंतराळासारख्या झिरो ग्रॅविटीच्या कृत्रिम वातावरणात अंतराळवीर हा स्पेस सूट घालून त्याची चाचणी घेतील त्यानंतर तज्ञांमार्फत सर्व बाबींची पूर्तता आणि सुरक्षितता तपासून ह्या मुन वॉकिंग आणि स्पेस वॉकिंग स्पेससूटच्या निर्मितीवर अंतिम शिक्का मोर्तब होईल
No comments:
Post a Comment