अंतराळवीर Jessica Watkins आणि अंतराळवीर Kjell Lindgren स्थानकातून लाईव्ह संवाद साधताना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -18 जुलै
नासाच्या अंतराळ मोहीम 67 चे अंतराळवीर Kjell Lindgren आणी Jessica Watkins ह्यांनी Huston मधील WYPR(NPR) Redio (Baltimore )येथील Tom Hall (Midday )ह्यांच्याशी लाईव्ह संवाद साधला त्याचा हा वृत्तांत
Tom-Dr.Watkins आणी Dr.Lindgren तुम्हाला पाहून आनंद झाला आधी तुम्ही आमच्यासाठी वेळ दिल्याबद्दल तुमचे आभार
Dr.Watkins तुझी हि पहिली अंतराळवारी आहे त्या साठी तु दीर्घकाळ ट्रेनिंग घेतल असेल ह्या पहिल्या अंतराळ निवासातील तुला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट कोणती आहे ?
Watkins -हो ,ह्या मिशनसाठी आम्ही बराच काळ ट्रेनिंग घेतल माझी हि पहिलीच अंतराळवारी असल्याने अंतराळ प्रवास,स्थानकातील वास्तव्य हा माझ्यासाठी अत्यंत रोमांचक अनुभव होता मी Geologist असल्याने मला इथे स्थानकाच्या खिडकीतून खाली पृथ्वीकडे पहायला खूप आवडत पृथ्वीवरील वेगवेगळे भाग जिथे मला जावस वाटत होत आणि जायची ईच्छा आहे तो भाग मी ईथे वरुन पाहु शकते तेव्हा खूप अमेझिंग फिलींग येत
Tom - Dr Lindgren ,ह्या मोहिमेसाठी तुम्ही दीर्घकाळ कठीण ट्रेनिंग घेतल असेल हि मोहीम सोपी नाही तुमच्या साठी सगळ्यात challenging गोष्ठ कोणती होती ?
Kjell Lindgren - हो ! अशा प्रकारची मोहीम कठीणच असते आणि आमच्यासाठी Challenging गोष्ठ म्हणजे बदललेला launching चा प्लॅन आमच launching लांबल त्या मुळे आमच्या schedule मध्ये देखील थोडेफार बदल झाले आमची पृथ्वीवर परतण्याची तारीखही पण आम्हाला ट्रेनिंग मध्ये अशा कठीण परिस्थितीत adjust होण्याच ट्रेनिंग दिलेल असल्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही आताच स्थानकात Space X -25 Cargo Vehicle पोहोचले त्या मुळे आम्ही अत्यंत बिझी होतो त्यातील सामान काढण वै.
Tom -Watkins तुझ काय मत आहे ? तुला काय Challenging वाटत ? सध्या स्थानकात सात अंतराळवीर वास्तव्य करत आहेत त्या मुळे राहण्यासाठी कमी जागा असल्याने तुमच्या प्रायव्हसीत बाधा येते का ?
Watkins -आम्ही चौघेजण इथे आणि तीन रशियन अंतराळवीर रशियन सेगमेंट मध्ये राहात असल्यामुळे प्रायव्हसीचा प्रॉब्लेम येत नाही माझे सहकारी अंतराळवीर खूप चांगले आहेत आम्ही चौघेजण आमच्या रशियन अंतराळवीर सहकाऱ्यांसोबत इथे वास्तव्य करतो,संशोधन करतो मोकळ्या वेळेत एकत्र येतो गप्पा मारतो एकत्र जेवण करतो त्या मुळे काही प्रॉब्लेम येत नाही उलट सगळ्यांची चांगली ओळख होते एकमेकांना समजून घेता येत आणि आम्ही इथे सर्वजण आनंदात मजेत वेळ घालवतो
Tom -Lindgren हि तुझी दुसरी अंतराळवारी आहे ह्या आधीही तू स्थानकात वास्तव्य केले आहेस आधीच्या आणि आताच्या वास्तव्यात काय फरक जाणवतो ?
Lindgren -मी लकी आहे मला दुसऱ्यांदा स्थानकात राहायची संधी मिळालीय ह्या आधी मी 2015च्या अंतराळ मोहीमे अंतर्गत स्थानकात वास्तव्य केले होते त्या वेळेस आम्ही तिघे होतो आणि आम्ही सोयूझ अंतराळयानातून अंतराळ प्रवास केला होता आता आम्ही चौघे होतो आणि मी ह्या वेळेस Space X Crew Dragon मधून अंतराळ प्रवास केला Space X Dragon स्पेसियस आहे आरामदायी आहे सोयूझ यानात जागा कमी होती पण स्थानक त्यात सुरु असलेले सायंटिफिक प्रयोग स्थानकासाठीचा Space Walk सगळ सारखच आहे फक्त माझ्या सोबतचे अंतराळवीर बदलले आहेत आधीचे अंतराळवीर चांगले होते आताचेही आहेत आताच्या रशियन अंतराळवीरांसोबत राहण्याचा अनुभव छान आहे अंतराळवीर बदलले तरी आम्ही सारखीच मजा अनुभवतो स्थानक आता अद्ययावत झाले आहे
Tom -Watkins तू Geologist आहेस त्या मुळे तुझ्या संशोधनाच स्वरूप काय आहे तू करत असलेल्या संशोधनाचा उपयोग पृथ्वीसाठी आणि भविष्यकालीन अंतराळ मोहिमेसाठी कसा उपयुक्त ठरेल ?
Watkins - मी इथून पृथ्वीचे ग्रहाच्या दृष्टीकोनातून निरीक्षण करते विशेषतः चंद्र आणी मंगळ ग्रहांचे मी पृथ्वीवरची geological माहिती गोळा करते भविष्यकालीन चंद्र आणि मंगळ मोहिमेसाठी उपयुक्त माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करते त्या साठी Remote Sensing Instrument चा उपयोग होतो शिवाय आताच स्थानकात आलेल्या कार्गोशिप मधून अनेक प्रकारचे Earth Science Experiments आले आहेत त्यात पृथ्वीवरील धुळीचे निरीक्षण ,हवामानातील बदलांचे निरीक्षण त्यांचा पृथ्वीवर होणारा परिणाम या सारखे अनेक सायंटिफिक प्रयोग इथे केल्या जात आहेत हे सर्व संशोधन करताना geologist म्हणून मला निश्चितच आनंद मिळतो हे ग्रहनिरिक्षण भविष्यकालीन अंतराळ मोहिमेसाठी अत्यंत आवश्यक आहे आणि पृथ्वीसाठीही
Tom - Lindgren तू डॉक्टर आहेस तू इमर्जन्सी फिजिशियनचे ट्रेनिंग घेतले आहेस तुझ्या पृथ्वीवरील प्रॅक्टिस मध्ये आणि दोनवेळच्या अंतराळमोहिमेतील स्थानकातील प्रॅक्टिस मध्ये तुला काय फरक जाणवला तुझा अनुभव कसा होता ?
Lindgren - मी दोन्हीवेळेसच्या अंतराळवीरांच्या टीमचा आभारी आहे सुदैवाने मला त्यांना इमर्जन्सी ट्रीटमेंट देण्याची वेळ आली नाही स्थानकातील Aerospace medicine प्रॅक्टिस आणि पृथ्वीवरील प्रॅक्टिस ह्यात फरक आहे इथे खूप काळजी घ्यावी लागते पृथ्वीवरील वातावरण आणि स्थानकातील झिरो ग्रॅव्हीटीतील वातावरण ह्यात फरक आहे इथे शरीर तरंगत राहिल्याने शरीरावर विपरीत परिणाम होतो शिवाय सतत तरंगत्या अवस्थेत असल्याने शारीरिक इजा होण्याची शक्यता असते ती होऊ नये म्हणून सतत काळजी घ्यावी लागते तसेच आजारी पडू नये म्हणूनही काळजी घेतल्या जाते आम्हाला हेल्दी डायट फूड दिल जात आम्ही व्यायाम करतो आणि हेल्दी राहण्याचा प्रयत्न करतो इथून पृथ्वीवर परतल्यानंतरही आम्हाला आमची काळजी घावी लागते त्या साठी काही औषधे दिली जातात तिथे पृथ्वीवर Aerospace इमर्जन्सी फिजिशियन मध्ये जे शिकवल जात ते इथे स्थानकात प्रत्यक्षात अनुभवायला मिळत अंतराळवीरांमधील शारीरिक बदल प्रत्यक्षात पाहता येतात शरीरातील Cardiovascular System ,Bone loss वै गोष्टी प्रत्यक्षात पाहून त्यांचे निरीक्षण नोंदवून त्यावर संशोधन करता येत
Tom -Watkins आतापर्यंत स्थानकात फक्त दहा आफ्रिकन अमेरिकन अंतराळवीरांनी वास्तव्य केलय तू पहिली आफ्रिकन अमेरिकन महिला अंतराळवीर आहेस स्थानकात वास्तव्य करणारी ह्याचा भविष्यात कसा फायदा होईल
Watkins - मी ह्या अंतराळमोहिमेतील एक हिस्सा आहे आधी आणि आताही अंतराळमोहिमेतील मानवी सहभाग आफ्रिकन अमेरिकन अंतराळवीरांसाठी यशस्वी पाऊलवाट आहे मला स्थानकात वास्तव्य करण्याची संधी मिळाली मी लकी आहे भविष्यकालीन आर्टेमिस चंद्र आणि मंगळ मोहिमेसाठी आताच्या संशोधनाचा उपयोग होणार आहे हि माझ्यासाठी सन्माननीय गोष्ट आहे
Tom - Watkins तू लहानपणापासूनच अंतराळवीर व्हायच हे ठरवल होतस का ? नक्की केव्हा हे तुला रियलाईझ झाल त्यासाठी कसे प्रयत्न केलेस ?
Watkins - हो ! मी नऊ वर्षाची होते तेव्हापासूच अंतराळवीर व्हायच माझ स्वप्न होत पण मी जेव्हा तारुण्यात प्रवेश केला तेव्हा मला जाणवल आणि मी अंतराळवीर व्ह्यायच ठरवल नशिबाने मला माझ्या टीचर्स आणि कुटुंबीयांनी साथ दिली माझ्या गुरुंनी मला योग्य मार्गदर्शन केले धैर्य दिल आणि मदत केली मग मी माझ द्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न केले मार्ग शोधला आणि संधी मिळताच अंतराळवीर होण्यासाठी अर्ज केला म्हणून मी मला साथ देणाऱ्या,मार्ग दाखवणाऱ्या सर्वांचे आभार मानते
Tom- Lindgren तुझही अंतराळवीर होण्याच स्वप्न होत का ?तू डॉक्टर होतास इमर्जन्सी फिजिशियन म्हणून प्रॅक्टिस करत होतास मग अंतराळवीर झालास दोन्ही पैकी एक फिल्ड निवडण कठीण होत का ?
Lindgren - हो ! मलाही अंतराळवीर व्हायच होत पण मी आधी मेडिसिनच क्षेत्र निवडल डॉक्टर होऊन प्रॅक्टिस केली दोन्ही क्षेत्र चांगले होते मला इमर्जन्सी डिपार्टमेंट मध्ये फिजिशियन म्हणून काम करण्याची संधी मिळाली पण मला नेहमी माझ अंतराळवीर होण्याच स्वप्न आठवायच तरीही मी ट्रेनिंग पूर्ण केल नंतर मला कळाल कि मी Aerospace medicine केल तर माझ स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळेल म्हणून मी Aerospace medicine च ट्रेनिंग घेतल मला त्याच दरम्यान Flight surgeon पदावर नोकरी मिळाली त्यामध्ये अंतराळवीर आणि त्यांचे कुटुंबीय ह्यांची काळजी घेण्यासाठी काम करायची संधी मिळाली आणि त्याच वेळेस अंतराळवीर पदासाठी निवड होणार असल्याचे कळाले मी अप्लाय केला आणि माझी 2009 मध्ये नासा मध्ये अंतराळवीर होण्यासाठी निवड झाली
Tom -Watkins इथे Baltimore मध्ये वेब टेलेस्कोपशी संबंधित बरेच जण आहेत त्यांनी अंतराळातील दूरवरच्या आजवर माहिती नसलेल्या भागातील ग्रहताऱयांचे अत्यंत सुंदर आणि आश्चर्यकारक फोटो पृथ्वीवर पाठवले आहेत त्यामुळे लोकांमध्ये जागृती निर्माण झाली आहे ते फोटो पाहून लोक ह्या मिशनकडे आकर्षित झाले आहेत तुझ काय मत आहे ?
Watkins -हो ! खरच हे Exiting आहे मला वाटत नासाच्या सर्व अंतराळ मोहिमा मध्ये लोकांचा सहभाग वाढला आहे लोक ह्या यशाने प्रेरित झाले आहेत नासाचे हे यश जगाला आणखी पुढे पुढे यशाच्या मार्गावर नेत आहे लवकरच सौरमाला आणि सौरमालेबाहेरील ब्रह्मांडातील दूरवरच्या ग्रहताऱ्यांबद्दलची मानवाला अज्ञात असलेली माहिती मिळेल आणि मानव अंतराळविश्वात प्रगत दिशेने वाटचाल करेल सध्या अंतराळ विश्वात व्यावसायिक कंपन्यानीही यशस्वी सुरवात केलीय Space X Dragon मधून आम्ही इथे पोहोचलो आहोत Boeing Starliner हि अंतराळस्थानकात येऊन गेले आता सामान्य लोकही अंतराळप्रवास करत आहेत आणि लवकरच Artemis -1चेही launching होईल तो क्षण सुपर Exiting चा असेल सध्याचा काळ अंतराळविश्वातील रोमांचक काळ आहे
Tom -Lindgren स्थानकातील वास्तव्यानंतर तुझ्या मानवतेबद्दलचा दृष्टिकोनात काही फरक पडला का विशेषतः जागतिक दृष्टया ?
Lindgren - हो ! निश्चितच फरक पडतो! इथे आल्यावर आमचा एक फायदा होतो आम्ही इथून पृथ्वीकडे पाहू शकतो पहिल्यांदा पृथ्वीच सौन्दर्य पाहून अचंबित होतो पृथ्वीवरची हिरवळ,पाणी वातावरण हे सार मानवी अस्तित्वासाठी आवश्यक आहे पण पृथ्वीवरची वृक्षतोड,हवेतील प्रदूषण आणि पाण्याचा अपव्यय पाहून वाईट वाटत इथे स्थानकातील वास्तव्यात आम्ही पाणी,अन्न आणि हवेचा तीस टक्के कमी वापर करतो ते वाचवण्याचा प्रयत्न करतो इथल्या कृत्रिम वातावरणात ह्या गोष्टींची कमतरता भासते दुसर म्हणजे इथे स्थानकाबाहेरचा काळोख,रुक्ष वातावरण आणि झिरो ग्रॅव्हीटीत राहताना पृथ्वीवरच दाट वातावरण पृथ्वीवरची हिरवळ आठवते आणि त्याच मोल जाणवत पृथ्वीवरचे लोक हे सार तीस टक्केही वाचवताना दिसत नाहीत तेव्हा वाईट वाटत पृथ्वी रक्षणासाठी हे वाचवण किती आवश्यक आहे ते इथे आल्यावर कळत आणि आमच दुसर घर स्थानकाकडे पाहून मानवी कर्तृत्वाच कौतुक वाटत किती बुद्धिमत्ता वापरून त्यांनी हे वैशिष्ठपूर्ण असामान्य अंतराळातील फिरत घर बनवलय ह्याच आश्चर्य वाटत आणि इथे आंतरराष्ट्रीय टीमसोबत राहताना विश्वातील सर्व देश पाहायला मिळतात त्या देशातील अंतराळवीरांसोबत राहण्याची संशोधन करण्याची संधी मिळते थोडक्यात वैश्विक मैत्री होते दृष्ठीकोन वैश्विक होतो
Tom -Watkins तुझ काय मत आहे ह्या बद्दल ?
Watkins -माझही मत Kjell सारखच आहे हे स्थानक सुरु ठेवण्यासाठी आणि आमच्या सुरक्षिततेसाठी आम्ही करत असलेल्या संशोधनासाठी सतत कार्यरत असणाऱ्या नासा संस्थेतील सर्वांचे कर्तृत्व असामान्य आहे त्यांच्यामुळेच आम्ही वैश्विक सहकारी अंतराळवीर एकत्रित काम करू शकतो आणि पृथ्वीच रक्षण करण किती आवश्यक आहे ते इथे आल्यावरच कळत
Tom -Thank You So much! Safe Travels be Safe god speed !
No comments:
Post a Comment