Sunday 30 October 2022

मंगळावरील Salty Region मधील खडकात Curiosity यानाने शोधले मिठाचे अस्तित्व

36th successful drill hole on Mount Sharp

 मंगळावरील Canaima ह्या भागातील पाणथळ भागाचे आटलेले स्रोत आणि Curiosity यानाने ड्रिल केलेला भाग -फोटो -नासा संस्था (JPL)

 नासा संस्था -19 ऑक्टोबर 

उन्हाळ्यात मंगळावरील रेताळ भागातुन प्रवास केल्यानंतर नासाचे Curiosity मंगळयान आता तेथील वाळवंटातील अरुंद भागातून मार्गक्रमण करीत पर्वतीय रांगातील आटलेल्या पाणथळ भागात पोहोचले आणि तेथील Sulfate युक्त भाग शोधून सक्रिय देखील झाले आहे Curiosity यानाच्या टीममधील शास्त्रज्ञ Curiosity मंगळयान ह्या भागात पोहोचण्याची बरेच दिवसांपासून वाट पाहात होते कारण ह्या भागात मिठाचे अस्तित्व असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली होती 

करोडो वर्षांपूर्वी मंगळावर अस्तित्वात असलेल्या मंगळावरील पाण्याचे स्रोत आटल्यामुळे तेथील पाणी नष्ठ झाले पण तेथे असलेल्या पाणथळ जागेतील नदी,नाले,तळे,झरे ह्यांचे अस्तित्व अजूनही तेथे आहे शास्त्रज्ञांच्या मते तेथे करोडो वर्षांपूर्वी पृथ्वीसारखे वातावरण होते कालांतराने अनैसर्गिक घडामोडी मुळे नैसर्गिक आपत्ती मुळे वातावरण बदलले आणि हळू,हळू नष्ठ झाले पण तेथे आटलेल्या पाणथळ जागेतील माती,वाळू ,खडक,मिनरल्स ह्यांच्या मध्ये आटलेल्या थेंबांच्या स्वरूपात अस्तित्वात राहिले ह्याच खडकांच्या नमुन्यात मिठाचे अंश देखील सूक्ष्म कणांच्या रूपात  सापडले आहे Curiosity मंगळ यान मंगळावर जाण्याआधी नासाच्या Mars Reconnaissance Orbiter ला अशा मंगळावरील जागा शोधण्यात यश आले होते तेव्हापासूनच शास्त्रज्ञ मंगळयान तेथे पोहोचण्याची उत्सुकतेने वाट पाहात होते 

आता Curiosity मंगळयान तेथे पोहोचले आणि यशस्वीरीत्या कार्यरत देखील झाले आहे ह्या यानाने तेथील क्षारयुक्त जमीन शोधून तेथील दगड,त्यांचे प्रकार आणि त्यातील मिठाच्या अस्तित्वाचे पुरावे शोधले आहेत Curiosity यानाने ड्रिल करून शोधलेल्या ह्या दगडांचा चुरा केल्यानंतर ह्या दगडांमध्ये आटलेल्या पाण्याच्या थेंबाचे अंश व पॉपकॉर्न textured nodulesच्या स्वरूपात मीठयुक्त मिनरल्स आढळले शास्त्रज्ञांनी सखोल निरीक्षण केल्यानंतर त्यांना ह्या दगडांमध्ये Magnesium Salt(Epsom Salt),Calcium Sulfate आणि Sodium Chloride (आपण वापरतो ते खाण्यातील मीठ ) सापडले ह्या मुळे मंगळावर पुरातन काळी सजीवांचे अस्तित्व असण्याच्या शक्यतेला दुजोरा मिळाला आहे 

  This grid shows all 36 holes drilled by NASA’s Curiosity Mars rover using the drill on the end of its robotic arm

    नासाच्या Curiosity मंगळ यानाने खोदलेल्या 36 खडकांचा ड्रिल केलेला भाग -फोटो नासा संस्था

शास्त्रज्ञांनी ह्या भागाला Canaima असे नाव दिले आहे हे ह्या मोहिमेतील 36 वे ड्रिल सॅम्पल आहे मंगळावरील हे खडक शोधून ड्रिल करून त्याचा चुरा करण हे काम अत्यंत कठीण आहे Curiosity यानाला बसविलेल्या सात फूट लांबीच्या रोबोटिक आर्मला जोडलेल्या हातोड्याने कठीण टोकदार दगड फोडताना रोबोटिक आर्मला आणि हातोड्याला हानी पोहोचू शकते कुठलाही दगड फोडताना आधी तेथील धूळ साफ करावी लागते नंतर ब्रश करून त्यावर मार्किंग करून छेद करून ड्रिल करावे लागते आणि हे काम  वाटते तेव्हढे सोपे नाही असे Curiosity च्या Project Manager Kathya Zamora - Garcia म्हणतात Curiosity तेथील खडकाळ भागात स्थिर राहणे आवश्यक असते त्याची पोझिशन योग्य दिशेने असणे त्याच्या अँटेनाची दिशा पृथ्वीकडे असणे आवश्यक असते शिवाय वाळवंटातून जाताना Curiosity यानाच्या चाकांचे घर्षण होऊन झीज होण्याची भीती असते चाक तेथील जमिनीत रुतुन बसू शकते दगड फोडताना यानातील यंत्रणेला हानी पोहोचू शकते

ह्या समस्या उदभऊ नये म्हणून Curiosity यानाची Engineer टीम सतत दक्ष असते मुख्य म्हणजे Curiosity यान त्याच्या सहा चाकावर स्थिर राहून योग्य दिशेने खडकाजवळ पोहोचून रोबोटिक आर्म कार्यरत करून योग्य दगड निवडून ड्रिल करणे आवश्यक असते  Curiosity यानातील Mast Camera आणि (Sample Analysis at Mars Instrument) SAM  च्या साहाय्याने हे काम केल्या जाते  Curiosity ची टीम आणि यानातील समन्वयामुळे हे काम Curiosity यानाने आता यशस्वीरीत्या पार पाडले आहे Curiosity यान 2012 साली मंगळावर पोहोचले होते आणि यानाने यशस्वीपणे कार्यरत राहून नुकतीच मंगळावरील दहा वर्षे पूर्ण केली आहेत

No comments:

Post a Comment