नासाच्या James Web Telescope ने कॅमेराबद्ध केलेला ब्रह्मांडातील NGC 3324 Carina Nebula ह्या भागातील फोटो -फोटो नासा संस्था
नासा संस्था -12 जुलै
नासा आणि ESA ह्यांच्या सहकार्याने तयार केलेल्या James Web Telescope ने चित्रबद्ध केलेल्या ब्रह्मांडातील दूरवरच्या अज्ञात घडामोडीचे पहिले फोटो आता सर्वसामान्यांना पाहण्यासाठी उपलब्ध झाले आहेत सोमवारी Washington येथील White house मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष Joe Biden ह्यांच्या हस्ते ह्या पहिल्या फोटोंचे व व्हिडिओचे प्रकाशन करण्यात आले
ह्या वेळी बोलताना Joe Biden म्हणाले,"James Web Telescope ने कॅमेराबद्ध केलेल्या ब्रह्मांडातील दूरवरच्या ठिकाणच्या आणि आजवर मानवाला अज्ञात असलेल्या घडामोडीचे हे फोटो आणि माहिती नवी आहे अमेरिकेने ह्या टेलिस्कोप द्वारे ते प्राप्त केले आहेत आजवर तेथे कोणीही पोहोचले नव्हते ह्या घटनेमुळे अंतराळविश्वात अमेरिकेची ऐतिहासिक नोंद झाली आहे हे फोटो अमेरिकेतील नव्या तरुण पिढीला आणि लहान मुलांना प्रेरणादायी ठरतील त्यांना ह्या जगात अशक्य काही नाही हे कळेल हे फोटो रंगीत स्पष्ठ आणि नाविन्यपूर्ण आहेत
नासाच्या James Web Telescope मधील कॅमेऱ्याने चित्रबद्ध केलेला ब्रह्मांडातील दूरवरच्या SMACS 50723 ह्या भागातील तारका समूह आणि मध्यभागी त्यातील अस्पष्ट धूसर वस्तू फोटो -नासा संस्था
नासा संस्थेने जेम्स वेब टेलिस्कोप 2021च्या डिसेंबर मध्ये अंतराळात प्रक्षेपित केला होता ह्या अथांग विश्वातील मानवाला अज्ञात असलेल्या गोष्ठी आणि घडामोडींचा शोध घेण्यासाठी ह्या टेलिस्कोप मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला ह्या विश्वातील अत्यंत सूक्ष्म घडामोडींचे निरीक्षण नोंदवून त्यांचे लाईव्ह चित्रण करता यावे म्हणून ह्या टेलिस्कोप मध्ये पूर्वी पेक्षा अधिक शक्तिशाली कॅमेरे बसविण्यात आले आहेत त्या मुळेच आता विश्वातील अत्यंत दूरवरच्या आणि पुरातन आकाशगंगा,कृष्णविवर त्यातील ताऱ्यांचा उगम,अस्त,त्यांची निर्मिती प्रक्रिया आणि त्या भोवतालची वातावरण निर्मिती ह्या बद्दल माहिती मिळाली
ब्रह्मांडातील ताऱ्याचा अस्त होण्याआधी त्याच्या पासून बाहेर पडणारे वायू -फोटो नासा संस्था
नासा संस्थेने उपलब्ध केलेला हा फोटो आल्हाददायी आणि नयनरम्य आहे प्रथमदर्शनी आपल्याला हा फोटो पृथ्वीवरील डोंगराळ भागातील चंद्रोदयाच्या वेळचा आहे असे वाटते आजूबाजूला डोंगर त्यावर निळे आकाश आणि त्यात चमकणारे तारे पाहून हा समज होऊ शकतो पण प्रत्यक्षात फोटोतील वातावरण अत्यंत उष्ण,घोकादायक आणि भयाण काळोखातील कृष्णविवरातील निर्वात पोकळीतील आहे
हा फोटो पृथ्वीपासून 2000 प्रकाशवर्षे दूर अंतराळातील दक्षिणेकडील NCG-3324 ह्या भागातील Carina Nebula आणि त्या भोवतीच्या गॅसिअस वातावरणाचा आहे जेम्स वेब टेलिस्कोपच्या शक्तिशाली इन्फ्रारेड कॅमेऱ्याने हा फोटो कॅमेराबद्ध केला आहे ह्या फोटोत दिसणारे डोंगर म्हणजे आकाशगंगेतील कृष्णविवर त्यातील निर्वात पोकळीतील बाजूचे कडे आहेत आणि त्यातील तारे म्हणजे ह्या कृष्णविवरातील पोकळीतील प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे आत ओढल्या गेलेले अत्यंत उष्ण ग्रह तारे आहेत त्यांच्या सोबतच कृष्णविवरातील निर्वात पोकळीत ओढल्या गेलेले कॉस्मिक किरणे,अल्ट्रा व्हायोलेट किरणे ,विद्युतभारित किरणे त्या मुळे निर्माण झालेली उष्णता,रॅडिएशन प्रक्रियेमुळे तयार झालेले आगीचे लोट,त्यातून बाहेर पडणारे विषारी वायू ,धूळ आणि ह्या वातावरणातच होणारी नव्या ताऱ्यांची निर्मिती आणि जुन्या ताऱ्यांचा अस्त ह्या घडामोडीचे लाईव्ह चित्रण जेम्स वेबच्या कॅमेऱ्याने चित्रित केले आहे
ब्रह्मांडातील आकाशगंगेचा समूह आणि कृष्णविवर -फोटो नासा संस्था
हे फोटो घेण्यासाठी जेम्स वेब कॅमेऱ्याला साडेबारा तास लागले ह्या फोटोतील ताऱ्यांची निर्मिती आणि अस्त हि प्रक्रिया अत्यंत जलद होती त्या मुळे ह्या वेगवान घडामोडींचे चित्रण करणे कठीण होते पण जेम्स वेब मधील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सेन्सिटिव्ह कॅमेऱ्याने हि निर्मिती प्रक्रिया तितक्याच वेगाने चित्रित केली फोटोतील डोंगर व रंगीत वातावरण कृष्णविवरातील विध्युत भारित वायू आणि गरम हवेमुळे बाहेर पडणारी धूळ ह्या मुळे तयार झाले आहेत आणि पृथ्वीपासून 7 प्रकाशवर्षे उंचीवर आहेत काही नवे ऊष्ण तारे लाल रंगात दिसत आहेत तेथील अत्यंत प्रकाशमान Ionized किरणांचे वादळ आणि प्रचंड दाबामुळे बाहेर पडणारे वायू आणि धूळ ह्या धूसर वातावरणात नव्या ताऱ्याची निर्मिती स्पष्ठ दिसणे अशक्य असताना ह्या कॅमेऱ्याने चित्रित केलेल्या फोटोत ते स्पष्ठ आणि रेखीव दिसत आहेत नासा संस्थेने सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध केलेल्या इतर फोटोत अंतराळातील दूरवरच्या आकाशगंगांचा समूह,अंतराळात अस्त पावणाऱ्या ताऱ्याभोवतीचे वायूंचे ढगाळ वातावरण आणि त्यात चमकणाऱ्या ताऱ्यांचा समावेश आहे त्यातील एक तारा अत्यंत प्रकाशमान आहे
हे फोटो पाहून नासाचे Administrator Bill Nelson आनंदित झाले आहेत ते म्हणतात ,"ह्या फोटो आणि लाईव्ह व्हिडीओ मुळे ब्रह्मांडातील मानवाला अज्ञात असलेली माहिती मिळाली आहे अशा अनेक अज्ञात गोष्ठी आगामी काळात प्राप्त होतील ह्या फोटोच्या सखोल संशोधनानंतर मानवाला ह्या विश्वातील अनाकलनीय गोष्ठीची उकल होईल आणि आपल्या पृथ्वीची निर्मिती आणि विश्वातील नेमके स्थान कळेल हे जेम्स वेब टेलेस्कोपच्या टीमच असामान्य कर्तृत्व आहे त्यांनी आमच स्वप्न सत्यात उतरवल आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो
ह्या टीमचे प्रमुख सायंटिस्ट John Mather म्हणतात ह्या अथांग विश्वातील अत्यंत पुरातन दूरवरची निर्वात पोकळी त्यात चकाकणारे तारे ,तारकांचा समूह अस्त पावणाऱ्या ताऱ्याजवळ त्यातून बाहेर पडलेल्या रंगीबीरंगी वायूंचे डोंगर Absolutely Thrilling !
No comments:
Post a Comment