Friday 16 December 2022

नासाची Artemis -1मोहीम यशस्वी Orion अंतराळयान चंद्रावरून पृथ्वीवर परतले

 NASA's Orion spacecraft shown splashing down in the Pacific Ocean, west of Baja California, at 9:40 a.m. PST Sunday, Dec. 11.

 नासाचे Orion अंतराळयान चंद्रावरून पृथ्वीवर परतल्यावर California येथील पॅसिफिक महासागरात खाली उतरताना -फोटो नासा संस्था

 नासा संस्था-11डिसेंबर

नासाच्या Artemis-1मोहिमेअंतर्गत चंद्रावर गेलेले Orion अंतराळयान पृथ्वीवर परतले रविवारी 11तारखेला California येथील पश्चिमेकडील भागातील पॅसिफिक महासागरात ते सुखरूप खाली ऊतरले Orion अंतराळयान 16 नोव्हेंबरला Florida येथील केनेडी स्पेस सेंटरमधील 39B ह्या ऊड्डाण स्थळावरुन चंद्रावर जाण्यासाठी अंतराळात झेपावले होते आता 25.5 दिवसानंतर मोहीम यशस्वी करून पृथ्वीवर परतले नासा संस्थेने पन्नास वर्षांनी पुन्हा सुरु केलेल्या ह्या Artemis 1 च्या यशाने ईतिहासाची पुनरावृत्ती केली ह्या आधी 11डिसेंबर 1972 मध्ये अपोलो 17 मोहिमेअंतर्गत अंतराळवीर Eugene Cernen आणी अंतराळवीर Harrison Schmitt हे अंतराळवीर चंद्रावर पोहोचले होते आणी चंद्रभुमीवर पाऊल ठेवणारे बारावे अंतराळवीर ठरले होते तेथे त्यांनी तीन दिवस व्यतीत केले होते नंतर हि मोहीम थांबविण्यात आली होती 

NASA's Orion spacecraft splashed down in the Pacific Orion at 12:40 p.m. EST Dec. 11, 2022.

          नासाचे  Orion अंतराळयान पॅसिफिक महासागरात उतरल्यानंतर फोटो -नासा संस्था

Artemis -1 च्या यशाने नासा संस्थेतील ह्या टिम मधील सर्वजण आनंदित झाले आहेत नासाचे Administrator Bill Nelson हे देखील आनंदित झाले आहेत ते म्हणाले,"Artemis मोहिमेला मिळालेले हे यश अंतराळविश्वातील दुरवरच्या अंतराळ मोहिमेला प्रेरित करणारे आहे ह्या टिममधील हजारो कर्मचारी,ईंजीनिअर्स,तंत्रज्ञ,शास्त्रज्ञ ह्यांनी अनेक वर्षे ह्या मोहिमेत स्वतःला झोकून देऊन अथक परीश्रम केले त्यांच्या प्रयत्नांना व असामान्य कर्तृत्वाला मिळालेले हे यश आहे नासा संस्थेतील सहकारी देश आणी एकत्रित मानवी प्रयत्नांना मिळालेले हे यश आहे आगामी दुरवरच्या अंतराळमोहिमेचा हा शुभारंभ आहे ब्रह्मांडातील दूरवरच्या मानवाला अज्ञात असलेल्या गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी असे एकत्रित प्रयत्न ऊपयुक्त ठरतील

ह्या मोहिमेदरम्यान Orion अंतराळ यानाने चंद्रावरील कक्षेत 80 मैल अंतरावर प्रवेश केला.आणी 270,000मैलाचा अंतराळ प्रवास केला ह्या अंतराळ यानातुन अंतराळवीरांना पाठवण्या ऐवजी  मानवी डमींना पाठविण्यात आले होते  चंद्रप्रवासादरम्यान मानवी अवयवांवर काय परिणाम होतो हे  पहाण्यासाठी त्यांना सेन्सर्स बसविण्यात आले होते

नासाचे Associate Administrator Jim Free म्हणतात,आता Orion अंतराळयान चंद्रावर जाऊन सुरक्षीत पृथ्वीवर परतल्यामुळे Artemis -2 मोहिमेतील अंतराळवीरांचा चंद्रावर जाण्याचा मार्ग सुरक्षित झाला आहे ह्या यशानंतर आता मानवी चंद्रमोहिमेचा शुभारंभ तर होईलच शिवाय तेथील सायंटिफिक शोध मोहिमेची देखील सुरूवात होईल आणी आगामी काळातील मंगळ मोहिमेसाठीही ह्याचा ऊपयोग होईल 

पृथ्वीच्या कक्षेत शिरण्याआधी Orion अंतराळयान Service Module पासुन वेगळे झाले ह्या प्रक्रीयेच्या वेळी पृथ्वीवरील E.SA संस्थेतील पॉवर हाऊस मधील ईंजीनिअर्सच्या टिमने सहकार्य केले Orion यान पृथ्वीच्या कक्षेत पुन्हा प्रवेश करण्याआधी यानाचे तापमान 5,000 degree Fahrenheit एव्हढे प्रचंड होते पण 20 मिनिटे आधी यानाने हळूहळू तापमान कमी केले यानाचा वेगही 25,000 mph ईतका होता पण यानाने वेगावर नियंत्रण मिळवत पॅराशूटच्या सहाय्याने समुद्रात ऊतरण्यासाठी वेग 20mph ईतका कमी केला 

ह्या मोहिमेतील Orion यान आजवर चंद्रावर गेलेल्या यानापेक्षा जास्तकाळ चंद्रावर राहिले तेही कुठल्याही स्पेस स्टेशनमध्ये न थांबता कार्यरत राहून यानाने हि मोहीम यशस्वी केली त्या साठी ह्या आधीच्या अपोलो 13 मोहिमेतील अंतराळ यानापेक्षा वेगळे Orion यानाचे विषेश डिझाईन तयार करण्यात आले होते 

आर्टिमस 1मोहिमेचे मॅनेजर Mike Sarafin म्हणतात,"आता Orion अंतराळयान चंद्रावर जाऊन पृथ्वीवर सुरक्षित परतले आहे आमच्या अपेक्षेप्रमाणे यानाने समुद्रात सुरक्षित बुडी देखील मारली आणी यानाने चंद्रावरील कठीण वातावरणात टिकाव धरला शिवाय यानाने परत पृथ्वीच्या कक्षेत शिरण्याआधी वेगावर नियंत्रणही मिळवले

Orion यान समुद्रात ऊतरण्याआधी तेथे नासा संस्थेची landing recovery team हजर होती त्यामध्ये US department of defense Navy amphibious specialists ,Space Force Weather specialist आणी Airforce Specialist तसेच Huston येथील नासा संस्थेतील ईंजीनिअर्स आणी टेक्नीशीयन्सचा समावेश होता 

आता लवकरच Orion यानाला ट्रक मधून नासा संस्थेच्या Kennedy Space Center मध्ये नेण्यात येईल त्यानंतर आर्टिमस टिममधील तंत्रज्ञ यानाचे Hatch ऊघडतील आणी त्यातील अनेक पेलोड ओपन करतील या बरोबरच यानातील मानवी डमी Commander Moonikin Compos,Space Biology experiments,Snoopy आणी official flight kit देखील ऊघडतील चंद्रावरील अंतराळ  प्रवासादरम्यान मानवी डमींवर काय परिणाम झाला व ईतर साहित्यावर तेथील वातावरणात काय बदल झाला ह्याचे निरीक्षण नोंदवतील त्यानंतर शास्त्रज्ञ त्यावर सखोल संशोधन करतील यानातील Capsule आणी heat shield ह्यांना अनेक टेस्ट आणी Analysis प्रक्रियेमधुन जावे लागेल आणी ह्यासाठी अनेक महिने लागतील  

Artemis मोहिमेतील हे पहिले ऊड्डाण यशस्वी करण्यात नासा संस्थेतील हजारो कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने बनविलेल्या SLS Rocket आणी अंतराळयान बनविणाऱ्या जगातील कुशल तंत्रज्ञांंच्या कर्तृत्ववान टिममुळे हे शक्य झाले आता नासा संस्था 2024 मधील Artemis II च्या मानवसहित मोहीमेची तयारी करत आहे

No comments:

Post a Comment