भविष्यकालीन चांद्रमोहिमेतील अंतराळवीरांना उतारण्यायोग्य चंद्रावरील तेरा जागा -फोटो नासा संस्था
नासा संस्था -19 ऑगस्ट
अमेरिकेच्या आर्टेमिस मोहीमेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे पन्नास वर्षांनी पुन्हा एकदा मानवी पाऊल चंद्र भूमीवर पडणार आहे आगामी काळात चंद्रावर मानवी निवासासाठी राहण्यायोग्य वातावरणाचा शोध घेऊन तेथील भूगर्भातील जमिनीचे उत्खनन करून तेथील खडक माती मिनरल्सचे नमुने गोळा करण्याचे काम हे अंतराळवीर करणार आहेत त्या साठी योग्य जागेचा शोध नासा संस्थेने घेतला असून हि तेरा ठिकाणे चंद्रावरील साऊथ पोल जवळ आहेत
Washington तेथील नासा संस्थेतील Deputy Associate Administrator Mark Kirasich म्हणतात ह्या जागेची निवड झाल्यामुळे आता आपण चांद्र मोहिमेच्या आणखी जवळ पोहोचलो आहोत पन्नास वर्षांनी पुन्हा नव्या जोमाने ह्या मोहिमेची तयारी आता सुरु झाली आहे ह्या आधीचे अंतराळवीर जेथे गेले नव्हते अशा ठिकाणी पोहोचून अंतराळवीर तेथे अंतराळ यान आणि अंतराळवीरांच्या लँडिंगसाठी योग्य ठिकाणाचा शोध घेणार आहेत त्या मुळे भविष्यकालीन चांद्र मोहिमेतील अंतराळवीरांचे तेथे जाणेयेणे सुरु होईल हा प्रत्येक भाग चंद्रावरील साऊथ पोल जवळ सहा अंशावर स्थित आहे,भौगोलिक दृष्टया आणि चंद्रावरील पुरातन काळाचा शोध घेण्यासाठी योग्य आहे
शास्त्रज्ञांच्या मते चंद्रावर वैज्ञानिक माहितीचा खजिना आहे हि तेरा ठिकाणे भूगर्भीय उत्खनना साठी समृद्ध आहेत ह्या प्रत्येक भागात उंच डोंगर आणि खोल दऱ्या आहेत उंच पहाडांवर पुरेसा सूर्यप्रकाश आहे खोल दऱ्यांमध्ये मात्र अंधार आहे त्या मुळे ऊन आणि सावली पण आहे डोंगरांच्या लांबच लांब रांगा आहेत आणि पाठारी भागही आहे त्या मुळे अंतराळवीरांना उतरण्यासाठी सुरक्षित आहे इथे उतरून अंतराळवीर रोबोटिक आर्मद्वारे भूगर्भातील जमिनीचे उत्खनन करू शकतो चंद्रावरील पुरातन काळातील शेकडो वर्षांआधीची वैज्ञानिक माहिती गोळा करू शकतील हे अंतराळवीर तेथील पाण्याचे अस्तित्व आणि सजीवसृष्ठी अस्तित्वात होती का ह्याचा शोध घेणारे पुरावे शोधतील हा भाग वैज्ञानिक दृष्ठ्या महत्वपूर्ण आहे आणि इथून अंतराळवीर आणि अंतराळ यानाचा पृथ्वीवरील संस्थेशी आणि संस्थेतील शास्त्रज्ञांशी संपर्क साधण्यास अनुकूल आहे
ह्या तेरा जागेची निवड नासा संस्थेतील शास्त्रज्ञ आणि इंजिनीअर्सच्या टीमने केली आहे त्या साठी त्यांनी नासाच्या Lunar Reconnaissance Orbiter मधील डेटा आणि गेल्या दहा वर्षातील प्रकाशीत माहितीचा तसेच चंद्र विज्ञानाच्या माहितीचा निष्कर्ष काढून अंतिम निरीक्षणानंतर ह्या जागेंची अंतिम निवड केली त्यांनी तेथील लाँच विंडोसाठीची उपयुक्तता सुरक्षित लँडिंगची सोय,ह्या भागातील भौगोलिक परिस्थिती,तेथील चढउतार योग्य प्रकाश सावली आणि संपर्क साधण्यास अनुकूल वातावरण असल्यामुळे ह्या जागेची निवड केली शिवाय भविष्यकालीन चांद्र मोहिमेतील Space Launch System,Rocket ,Orion Space Craft आणि Space X ह्या यानाच्या आणि मानवी अंतराळ मोहिमांचा विचार करून ह्या जागा निश्चित केल्या
No comments:
Post a Comment