Saturday 25 December 2021

अंतराळवीरांनी दिल्या स्थानकातून ख्रिसमसच्या शुभेच्छा!

International Space Station

अंतराळस्थानकातून लाईव्ह संवाद साधत पृथ्वीवासीयांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देताना अंतराळवीर -फोटो नासा संस्था 

नासा संस्था -25 डिसेंबर

सध्या अंतराळस्थानकात रहात असलेले नासाच्या अंतराळ मोहीम 66 चे अंतराळवीर Kyla Barron,Raja Chari ,Mark Vande,Mattias Maurerआणी Thomas Mashburn ह्यांनी नुकताच नासा संस्थेशी लाईव्ह संवाद साधुन पृथ्वीवासीयांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या ह्या वेळी त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले त्याचा हा वृत्तांत 

-ख्रिसमस विषयी तुमच मत काय?

Thomas Mashburn -ख्रिसमस म्हणजे माझ्या फॅमिली आणि फ्रेंडसोबत एकत्रित साजरा केलेल्या आनंदायी नाताळच्या आठवणी नव्या वर्षाची प्रेरणा देणाऱ्या

Kayla Barron- माझ्यासाठी ख्रिसमस नेहमीच स्पेशल आहे मी तो सण कधी येईल ह्याची वाट पहायची मी नेव्हल अकॅडमीत असताना देखील ख्रिसमसच्या सुट्टीत मी घरी यायचे आणी आम्ही सर्व कुटुंबीय एकत्र ख्रिसमस सण साजरा करायचो

Matthias Maurer- ख्रिसमस हा सण असा आहे की,ह्या वेळी सगळे नातेवाईक आणि मित्र एकत्र येतात खुप मोठ्या प्रमाणात खास पदार्थांच्या मेजवानीचे आयोजन असते खुप वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल असते आमच्या घरी माझी आई खास ख्रिसमसच्या दिवशीच ते पदार्थ करायची त्या मुळे ते फक्त ख्रिसमसलाच खायला मिळायचे

Raja Chari- खरच सर्वजण एकत्र येऊन साजरा करण्याचा हा दिवस आम्ही देखील असाच साजरा करायचो ख्रिसमसचा पारंपरिक सण !

-अंतराळस्थानकातील पहिला ख्रिसमस कसा साजरा कळणार आहात?

Kayla-आम्ही ईथे स्पेसमध्ये असलो तरीही ईथे आमची स्पेशल ईंटरनॅशनल फॅमिली आहे त्यामुळे आम्ही ख्रिसमस  ईथे साजरा करणार आहोत काहीतरी ट्रॅडीशनल करणार आहोत घरच्यांशी संवाद साधणार आहोत

Raja Chari- हो! हि आमची स्पेसमधली स्पेशल नवी फॅमिली आहे आम्ही सर्वजण ईथे ख्रिसमस साजरा करणार आहोत

Matthias Maurer - ईथल्या फॅमिली आणी फ्रेंडसोबत ख्रिसमस साजरा कळणार आहोत आम्हाला ईथल कामही करायचय त्यातून वेळ काढून डेकोरेशन करणार आहोत ईथे दर 90 मिनिटांनी दिवस ऊगवतो मावळतो 

   तुमच्या खास ट्रॅडिशनल आठवणी सांगा ?

Mark Vande- मी जेव्हा ख्रिसमसला घरी जायचो तेव्हा मला माझ्या आईच्या हातच्या चॉकलेट कुकीज खाण्याचे वेध लागायचे ती डबल चॉकलेट मिक्स कुकीज खूप मस्त बनवायची फक्त ख्रिसमसलाच ते बनवायची त्यामुळे वर्षातुन एकदाच त्या खायला मिळत ह्या वर्षी मी त्या मिस करेन

Raja Chari- पुर्वापार चालत आलेले ख्रिसमस Pickles आणी ख्रिसमस ट्रीला लटकावलेले प्रेझेंटस ! ते कधी एकदा ऊघडुन पाहु अस व्हायच त्यामुळे सकाळपर्यंत वाट न पहाता आम्ही ते रात्रीच ऊघडायचो

Matthias- हो ! आम्ही देखील प्रेझेंट रात्रीच ऊघडायचो आमच्याकडे पण स्पेशल मोठ डिनर असायच त्यात भरपूर पदार्थ असायचे आणी फॅमिलीसोबतच एकत्र जेवण खूप एन्जॉय करायचो आम्ही

Thomas Mashburn- मला देखील ख्रिसमसचा खूप मोठा ब्रेकफास्ट आणि डिनर आवडायचा ट्रॅडिशनल फुड तेव्हाच केल जायच माझी फॅमिली देखील ख्रिसमस ट्रि डेकोरेट करायची

Kayla Barron- माझ फेवरीट ख्रिसमस ट्रॅडीशन म्हणजे माझी फॅमिली ख्रिसमस ट्रि डेकोरेट करायची मलाही डेकोरेशन करायला आवडायच आम्ही वेगवेगळ्या झगमगत्या दिव्यांनी,मोती वै सजावटीचे सामान लाऊन ट्रीचा वरचा भाग चमकवायचो आम्ही डिनरसाठी बाहेर पिकनिकला जायचो त्या मुळे तेव्हढाच सर्वांना एकत्रित मोकळा वेळ घालवता यायचा

-नवीन वर्ष स्थानकात कसे साजरे करणार

Thomas Mashburn-आम्ही स्थानकातुन एका ठिकाणाहून दुसरीकडे काही मिनिटात पोहोचतो त्यामुळे सर्व जगाशी एकत्रितपणे जोडल्याची भावना होते त्यामुळे सर्व जगासोबत नवीनवर्षाची सुरुवात होईल

Raja Chari-.आम्ही ईथुन अनेकदा Sunrise पहातो त्या वेळी पृथ्वीवर लोक जागे होतात नव्या वर्षाचे संकल्प करतात मला देखील सगळ्या जगाशी जोडल्या गेल्याची भावना होते माझही मत तसच आहे 

-तुमच्या फॅमिलीसोबत काय शेअर करु ईच्छीता ?

Mark Vande- माझ्या फॅमिलीला माझ्या कामाबद्दल माहिती आहे मी ईथे असलो कामात असलो तरी मी कायम त्यांच्या मनात असतो मी ईथे त्यांना मिस करतो मी त्यांच्याशी बोलेन तेव्हा ख्रिसमसच्या शुभेच्छा देईन

Kayla- माझे कुटुंबीय देखील माझी काळजी करत असतील मी इथे कशी आहे वै त्यांना माझी आठवण येत असेल  मी लवकर परतण्याची सगळे वाट पहात असतील पण मी ईथल्या स्पेसफॅमिलीसोबत आनंदात आहे अस मी त्यांना सांगेन मी त्यांच्याशी बोलणार आहे

Thomas- मी माझ्या बायकोला,मुलीला,भाऊ,बहिणीला आणी मित्रांना सांगेन मी ईथे आनंदात आहे मी त्यांना ह्या वर्षी मिस करतोय मी लवकरच त्यांच्याशी संवाद साधेन

-शेवटी सर्व अंतराळवीरांनी पृथ्वीवासीयांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या

Happy Christmas! Merry Christmas to all !!

Friday 24 December 2021

नासाच्या पार्कर सोलर प्रोबने केला सुर्याच्या कोरोनाच्या कक्षेत प्रवेश

  Illustration of Parker Solar Probe facing the Sun

 पार्कर सोलर प्रोब सूर्याच्या कक्षेत प्रवेश करताना -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था- 15 डिसेंबर

आकाशातील तळपत्या तेजोमय सुर्याच्या ऊगवण्याने सृष्टीतील चराचरातील चेतना जागृत होते सर्वत्र प्रकाश पसरतो पण सूर्याच्या प्रखर उष्णतेने सृष्ठी होरपळते प्रखर उष्णतेच्या तेजाने तळपणाऱ्या सूर्याकडे आपण उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही आपले डोळे दिपतात आपली पृथ्वी सूर्यापासून करोडो मैल दूर असून आपली हि अवस्था होते मग सूर्याच्या जवळ किती तीव्र उष्णता असेल ह्याची कल्पना आपण करू शकतो अशा वेळेस एखादे अंतराळयान सूर्याच्या जवळच नाही तर त्याच्या तळपत्या तेजोवलयात शिरून प्रत्यक्ष सूर्याला स्पर्शून आल ह्या वर सहजासहजी विश्वास बसणार नाही पण आजच्या बुद्धिमान शास्त्रज्ञाच्या प्रगत यांत्रिक युगात हे शक्य झालय नासाच्या पार्कर सोलर प्रोबने हे काम केलय पार्कर सौर यानाने सूर्याच्या करोना ह्या भागात म्हणजेच तेजोवलयात प्रवेश केला आणि तोही एकदाच नाही तर तीनदा आणि तेथील विध्युत भारित कणांचे सॅम्पल्स देखील गोळा केले आहेत  पार्कर सौरयान मिशनचे शास्त्रज्ञ,टीममधील इंजिनीअर्स आणि तंत्रज्ञ ह्यांच्यामुळे हे ऐतिहासिक यश प्राप्त झाले आहे  

 Artist's conception of Parker Solar Probe outside the Sun.

 पार्कर सोलर प्रोब सूर्याच्या करोना ह्या भागात प्रवेश करताना -फोटो -नासा संस्था 

नासाचे पार्कर सोलर प्रोब सुर्याच्या कोरोनाच्या कक्षेत प्रवेश करण्यात यशस्वी झाले आहे एप्रिलमध्येच पार्कर सौरयान कोरोनाच्या जवळ पोहोचले होते आणी ऑगस्ट महिन्यात सौरयानाने नववी फेरी पुर्ण केली तेव्हा कोरोनाच्या कक्षेत  पण शास्त्रज्ञांनी थोडी वाट पहायचे असे ठरवले होते अखेर सौरयानाने सुर्याच्या कक्षेभोवती दहावी फेरी पुर्ण केल्यानंतर पार्कर यान कोरोना कक्षेत पोहोचल्याचे पार्कर सोलर प्रोबच्या टिमने जाहीर केले आहे 

  A large group of people pose for a photo.

 पार्कर सोलर प्रोब ची टीम 2018 मध्ये सौर यानाच्या launching आधीJohns Hopkins Applied Physics Laboratory Laurel Meryland येथे एकत्रित -फोटो नासा संस्था 

पार्कर सौरयान 2018 मध्ये सुर्याच्या दिशेने मार्गस्थ झाले होते सुर्यावरील सौरवादळ,मँग्नेटिक फिल्ड,सुर्याभोवतीचे तेजोवलय म्हणजेच करोना कसा आहे त्यातुन बाहेर पडणारी सुर्यकिरणे,प्रकाश ,ऊष्णता त्याचा पृथ्वीवर होणारा परीणाम आणी सुर्यासंबधीत सखोल माहिती मिळवण्यासाठी पार्कर सौरयान सुर्यावर गेले होते आणी आता तीन वर्षांनी पार्कर यानाने महत्त्वपुर्ण माहिती आणी फोटो पृथ्वीवर पाठवले आहेत

मागच्या महिन्यात  पार्कर यानाने सुर्याच्या करोना भागात प्रवेश केला हे ईतिहासात पहिल्यांंदाच घडले आहे आजवर एकही सौरयान सुर्याच्या ईतक्या जवळ गेले नव्हते पार्कर यानाने सुर्याभोवतीचे वातावरण व सौरवादळ ह्या मधील सिमारेषा भेदत कक्षेत प्रवेश केला त्यावेळी यान सुर्याच्या मध्यापासून 3.83 मिलीयन मैल अंतरावर पोहचले होते चार पाच तासाच्या काळात यानाने तिनदा करोना कक्षेत प्रवेश केला आणी यानात बसविलेल्या अत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने तेथील विद्युत भारीत पार्टिकलस पण गोळा केली आहेत खग्रास सुर्यग्रहणाच्या वेळेस आम्ही हि ऐतिहासिक घटना प्रत्यक्ष पाहिली  Washington येथील नासा संस्थेचे Associate Administrator Thomas Zurbuchen म्हणाले पार्कर यानाने सुर्याला स्पर्श केला हि ऐतिहासिक घटना शास्त्रज्ञांसाठी मैलाचा दगड ठरेल आता सुर्याच्या अंतर्गत भागात शीरून पार्कर यान सखोल माहिती मिळवेल सध्या यानाने करोना कक्षेत प्रवेश केल्याचे फोटो आणी ईतर माहिती मिळाली आहे तेथील प्रचंड ऊष्णतेमुळे सर्व क्षणात जळून खाक होईल पण पार्कर यानाची निर्मिती करताना त्यात ऊष्णतारोधक यंत्रणा बसविण्यात आल्यामुळे यान सूर्याच्या कक्षेत आतपर्यंत पोहोचले आणि सुरक्षितपणे बाहेर पडले

सुर्य प्रुथ्वीसारखा Solid नाही तेथे जमीन नाही तो प्रचंड धगधगता आगीचा गोळा आहे तेथे प्रचंड ऊष्णतेमुळे आगीच्या धगधगत्या ज्वाला आणी त्यातून प्रचंड वेगाने बाहेर पडणारे वायू,धुळ,विद्युतभारीत कण ह्यामुळे तेथे सतत सौरवादळ होते आणी तेथे असलेल्या मँग्नेटिक फिल्ड आणी ग्रव्हिटीमुळे हा आगीचा डोंब गोळ्याच्या कींवा बॉलच्या आकारात बांधला जातो ह्या विद्युतभारीत कणांनी सुर्याच्या आतील भागातील Plasma तयार होतो तेथील मँग्नेटिक फिल्ड मुळे तो तेथेच फिरत रहातो पण जेव्हा आगीचा प्रचंड दाब येतो तेव्हा हे पार्टिकल अत्यंत वेगाने बाहेर फेकले जातात आणि तेथे फिरत राहतात 

पार्कर यानाने 2019 मध्ये पाठविलेल्या माहितीमुळे सुर्याभोवतीचे तेजोवलय अशाच सौरवादळामुळे तयार होते आणी त्याचा आकार Zig -Zag आहे हे कळाले त्याला Switchbacks म्हणतात आणी हा भाग सुर्याच्या अत्यंत जवळ आहे पण हे कोठे आणी कसे तयार होतात ह्या बाबतीत डिटेल माहिती मिळाली नव्हती पण आता पार्कर यान करोना भागात शिरल्याने आणि त्याने सॅम्पल्स आणि फोटो घेतल्यामुळे सखोल संशोधनानंतर ह्या संबंधित आणखी  माहिती मिळेल 

आता पार्कर यान 2025पर्यंत सुर्याच्या आणखी जवळ जाईल आणी तेथील चुबंकीय क्षेत्र, सौरवादळ, सौरनिर्मिती ,सौरमाला आणि ब्रम्हांडातील ईतर ग्रह सुर्याच्याबाबतीतली अज्ञात घडामोडींची माहिती मिळेल

Wednesday 22 December 2021

Blue Originने हौशी नागरिकांना घडविले तिसऱ्यांदा अंतराळ पर्यटन

 

 Blue Origin चे अंतराळ प्रवाशी Dylan Taylor,Lane Bess,Cameron Bess,Laura Shepard Churchley ,Michael Strahan आणि Evan Dick-फोटो -Blue Origin 

Blue Origin - 11 डिसेंबर

अमेरिकेने सामान्य नागरिकांसाठी व्यावसायिक अंतराळयानातून अंतराळ प्रवासास मान्यता दिल्या नंतर  Jeff Bezos ह्यांच्या Blue Origin आणि Richard Branson  ह्यांच्याVirgin Galactic कंपनीने सामान्य हौशी नागरिकांना अंतराळप्रवासाचे दालन खुले केले पण त्यासाठीचे तिकीट मात्र सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे ह्या अंतराळपर्यटनाचे तिकीट सामान्य नागरिकांना परवडणारे नसले तरीही अमेरिकेतील हौशी श्रीमंत व्यावसायिक नागरिकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि हि अंतराळमोहीम यशस्वी केली आगामी काळातील अंतराळ पर्यटनाचे तिकीट देखील बुक झाले आहे 

 त्या मुळेच Blue Origin ने आता सामान्य नागरिकांसाठी नियमित अंतराळप्रवासास सुरवात केली आहे मागच्या दोन यशस्वी अंतराळ पर्यटनानंतर 11 डिसेंबरला Blue Origin चे New Shepard NS -19 हे अंतराळ यान सहा अंतराळ प्रवाशांना घेऊन अंतराळात जाऊन आले ह्या यानातून प्रथमच सहा प्रवाशांनी एकत्रित अंतराळ प्रवास केला 

अमेरिकेतील West Texas येथील उड्डाणस्थळावरून 11 डिसेंबरला सकाळी 8.45 वाजता Blue Origin चे New Shepard NS-19 हे अंतराळयान Laura Shepard Churchley Michael Strahan ,Evan Dick ,Dylan Taylor ,Cameron Bess आणि Lane Bess ह्यांच्यासह अवकाशात झेपावले आणि पृथ्वीची कक्षा भेदत 62मैल ( 100k.m.) उंचीवर अंतराळात पोहोचले  अंतराळातील झिरो ग्रॅविटीत पोहोचताच ह्या सहाही अंतराळप्रवाशांनी Oh!My God ! असे उद्गगार काढत वजनविरहित अवस्थेत तरंगण्याचा आनंद लुटला आणि यानातील खिडकीतून अंतराळातून पृथ्वीदर्शन घेतले अवघ्या दहा अकरा मिनिटात New Shepard ह्या प्रवाशांना घेऊन पृथ्वीच्या कक्षेत शिरले हे सहाहीजण पृथ्वीवर परतल्यावर पॅराशूटच्या साहाय्याने पृथ्वीवर सुखरूप उतरले 

ह्या अंतराळवीरांचे स्वागत करायला लॅण्डिंगस्थळी Jeff Bezos ,अंतराळ प्रवाशांचे नातेवाईक आणि नागरिक उपस्थित होते ह्या अंतराळवीरांचे स्वागत करताना Blue Origin चे CEO Bob Smith म्हणाले,"तुम्हा सर्व अंतराळ प्रवाशांचे आम्ही आभारी आहोत तुम्ही सुखरूप पोहोचला आहात हे पाहून आनंद झाला आजवर आम्ही चौदा  नागरिकांना अंतराळ प्रवास घडविला आहे आमच्या Blue Origin च्या टीम मुळे हे शक्य झाले त्यांच्या अथक परिश्रमाचे हे यश आहे त्यांचेही आभार आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो !आता तुम्हालाही अंतराळवीरांचा दर्जा प्राप्त झाला आहे"असे म्हणत त्यांनी सर्वांचे स्वागत केले 

Jeff Bezos ह्यांनी देखील सर्वांचे स्वागत केले आणि सर्वांना तुमचा अंतराळ प्रवास कसा झाला हे विचारले तेव्हा सर्वांनीच अमेजिंग ! अविस्मरणीय ! असे उत्तर दिले ह्या अंतराळ प्रवाशांमध्ये अमेरिकेचे दिवंगत अंतराळवीर Alan Shepard  ह्यांची साठ वर्षीय मुलगी Laura Shepard ह्यांचा समावेश होता Alan Shepard 14 फेब्रुवारी 1971 मध्ये Apollo 14 चांद्रमोहिमे अंतर्गत चंद्रावर गेले होते आणि त्यांनी चांद्रभूमीवर चालत जाऊन तेथे अमेरिकेचा झेंडा फडकावला होता त्या मुळे ते पहिले अमेरिकन अंतराळप्रवासी ठरले होते आपल्या पहिल्या अंतराळ प्रवासाचा अनुभव सांगताना Laura म्हणाल्या हा प्रवास माझ्यासाठी अविस्मरणीय होता क्षणभर मला माझ्या वडिलांना भेटल्यासारखे वाटले आणि अगदी किंचित का होईना मी त्यांच्या पाऊलवाटेने गेले! ते आता नाहीत पण त्यांच्या आठवणी आहेत त्यांनी देशासाठी,कामासाठी अंतराळप्रवास केला आणि मी अंतराळ पर्यटन केले  त्यांचे कर्तृत्व मोठे आहे माझी लहानपणापासूनची अंतराळप्रवास करण्याची इच्छा आता पूर्ण झाली आहे  Alan Shepard ह्यांच्या नावाने प्रेरित होऊन अंतराळ यानाला New Shepard नाव देण्यात आले आहे  Laura Shepard ह्यांना Jeff Bezos ह्यांनी गेस्ट प्रवासी म्हणून ह्या अंतराळ प्रवासासाठी आमंत्रित केले होते Laura आता 372 व्या अमेरिकन अंतराळ प्रवासी ठरल्या आहेत 

Laura Shepard Alan Shepard

 चांद्र मोहिमेतील नासाचे दिवंगत अंतराळवीर Alan Shepard आणि त्यांची मुलगी Laura Shepard Churchley 

Good Morning America Host -Michael Strahan  -माझे अंतराळ पर्यटनाचे स्वप्न सत्यात उतरले हा अंतराळ प्रवास खूप आनंददायी आणि अविस्मरणीय होता 

Dylan Taylor -अंतराळात प्रवास करण स्वप्नवत होत ! अमेजिंग !

Evan Dick -मला Aerospace फील्ड मध्ये करिअर करायची इच्छा होती  आणि आता मला अंतराळात जायला मिळाल हा प्रवास अमेजिंग होता !

Cameron Bess आणि Lane Bess ह्या पिता पुत्राने देखील अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली ह्या दोघांची नोंद पहिले पितापुत्र अंतराळप्रवासी अशी झाली आहे

 हवामान अनुकूल नसल्यामुळे New Shepard चे उड्डाण दोन दिवस लांबले होते पण हवामान अनुकूल होताच New Shepardने अंतराळ प्रवाशांना घेऊन अंतराळपर्यटन घडविले 

Tuesday 14 December 2021

नासाच्या भविष्यकालीन अंतराळमोहिमासाठी दहा अंतराळवीरांची निवड जाहीर

  Group photo of the new class of astronaut candidates

 नासाचे निवड झालेले भावी अंतराळवीर Nichole Ayers ,Christopher Williams,Luke Delaney,Jessica Wittner,Anil Menon,Marcos Berrios,Jack Hathaway,Christina Birch,Deniz Burnham,आणि Andre Douglas -फोटो नासा संस्था 

 नासा संस्था-6 डिसेंबर

नासा संस्थेने नुकतीच अंतराळवीर होण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज करण्याची संधी ऊपलब्ध केली होती त्याला ऊत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता अंतराळवीर होण्यासाठी US मधील पन्नास स्टेटस मधील 12,000 ईच्छुक ऊमेदवारांनी अर्ज केले होते त्यातुन अंतिम दहा अंतराळविरांची निवड झाली असुन त्यातील बहुतांश ऊमेदवार सैन्यात पायलटपदी कार्यरत आहेत 

निवड झालेल्या अंतराळविरांमध्ये भारतीय वंशाचे डॉ अनिल मेनन ह्यांचा समावेश आहे ते सर्जन आणी लेफ्टनंट कर्नल आहेत त्यांनी स्पेस X Demo-2 आणी ईतर फ्लाईट साठी फ्लाईट सर्जन म्हणून काम केले आहे निवड झालेले अंतराळवीर तीस ते चाळीस वयोगटातील असुन त्यातील अनेकांना सैन्यातील पायलटपदाचा अनुभव आहे निवड झालेल्या अंतराळविरांची नावे अशी आहेत 

1-Nichole Ayers Major, US Air Force 2- Marcos Berrios- Major U.S. Air force 3 -Christina Birch-4-Deniz Burnham - Lieutenant Commander US Navy 5-Luke Delaney-Retired Major US Marine Crops 6-Andre Douglas- US Coast guard as Naval Architect 7-Jack Hathaway-Commander US Navy 8- Anil Menon- Lieutenant US Air-force Flight Surgeon 9-Christopher Williams 10- Jessica Wittner-lieutenant Commander US Navy

नासाच्या Houston येथील Johnson Space Center चे  Administrator Bill Nelson ह्यांनी निवड झालेल्या ह्या दहा अंतराळविरांची नावे जाहीर केली ते म्हणाले,ह्या निवडक अंतराळविरांचे आम्ही नासा संस्थेत स्वागत करत आहोत निवड झालेले सर्व अंतराळवीर कर्तबगार आहेत ह्या अंतराळविरांनी त्यांच्या क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी बजाऊन त्यांचे कर्तृत्व सिध्द केले आहे आता ह्या दहाजणांच्या एकत्रित कर्तृत्वाने नासाची भविष्यकालीन अंतराळमोहीम यशस्वी होईल त्यांच्या उत्कृष्ठ कामगिरीने व बुध्दीमत्तेने नासा संस्था व पर्यायाने देशाची मान ऊंचावेल अशी मला खात्री वाटते 

नासाच्या Deputy Administrator आणी नासा अंतराळवीर  Pam Melroy ह्यांनी देखील ह्या अंतराळवीरांचे स्वागत केले त्या म्हणाल्या ,तुम्हा सर्वांच बॅकग्राऊंड अमेझिंग आहे तुम्हा सर्वात काही ना काही वैशिष्ट्य आहे खरोखरच तुमची टिम नासा संस्थेत सहभागी झाल्याने नासा संस्थेची मान ऊंचावली आहे

ह्या सर्व अंतराळवीरांच्या निवडीसाठी (ते महिला वा पुरुष असो) त्यांनी  Stem field मधील मास्टर्स डिग्री धारक असणे बंधनकारक होते आता ह्या सर्वांना अंतराळवीर होण्यासाठीचे ट्रेनिंग दिल्या जाईल जानेवारी 2022 मध्ये ट्रेनिंगला सुरवात होईल सुरवातीच्या दोन वर्षात पाच टप्प्यात ट्रेनिंग दिल्या जाईल त्यात 

Space station complex system operating आणी Maintenance,Space Walk,Robotic skills safely operating T-38 training Jet आणी रशियन भाषा शिकवल्या जाईल शिवाय त्यांना कमर्शियल अंतराळयान,Space launch system Rocket, Orion अंतराळयान ह्यांची तांत्रिक माहिती दिल्या जाईल अंतराळस्थानकातील झिरो ग्रव्हिटीत रहाण्याचे आणी तेथे सुरू असलेल्या सायंटिफिक प्रयोगात सहभागी होऊन संशोधन करण्यासाठी ट्रेनिंग देण्यात येईल भविष्यकालीन चांद्रमोहिम आणी मंगळमोहिमेतील दुरवरच्या अंतराळ निवासादरम्यान अंतराळविरांसाठी करण्यात येत असलेल्या ऊपयुक्त संशोधनात ह्या अंतराळविरांना सहभागी करून विषेश प्रशिक्षण देण्यात येणार आहे

Friday 3 December 2021

स्थानकातील Antenna system बदलण्यासाठी अंतराळवीर Thomas Marshburn आणि Kayla Barron ह्यांनी केला स्पेसवॉक

 

 Spacewalkers Thomas Marshburn and Kayla Barron will spend about six-and-a-half hours replacing a faulty antenna system.

 अंतराळवीर Thomas Marshburn आणि Kayla Barron स्पेससूट घालून Antenna system बदलण्यासाठी स्पेसवॉकच्या तयारीत -फोटो नासा संस्था 

नासा संस्था - 2 डिसेंबर

नासाच्या अंतराळमोहीम 66 चे अंतराळवीर Thomas Marshburn आणि Kayla Barron ह्यांनी गुरुवारी स्थानकाच्या तांत्रिक दुरुस्तीसाठी स्पेसवॉक केला हा स्पेसवॉक सकाळी 7.10 वाजता सुरु झाला आणि साडेसहा तासांनी 12.47 वाजता संपला 

अंतराळवीर Kayla Barron आणि Thomas Marshburn ह्या दोघांनी आधीच ह्या स्पेसवॉकची तयारी सुरु केली होती त्यांनी त्यांचे स्पेससूट चार्ज करून ठेवले होते शिवाय त्यातून हवा लीक होत नाही ना हेही चेक केले आवश्यक फोटो घेतले सकाळी सव्वा सहालाच हे दोघेही स्पेससूट घालून  स्पेसवॉक साठी स्थानकातून अंतराळात जाण्यासाठी तयार झाले आणि 7.10a.m.ला ते स्थानकाबाहेर पडले साडेसहा तासांच्या ह्या स्पेसवॉक दरम्यान ह्या अंतराळवीरांनी स्थानकाच्या Port -1 Truss ह्या भागातील जुनी खराब झालेली अँटेना सिस्टिम बदलली 

हि अँटेना सिस्टिम बिघडल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पृथ्वीवरील नासा संस्थेत  स्थानकातून व्यवस्थित सिग्नल्स मिळण्यात अडचणी येत होत्या त्या मुळे हि जुनी सिस्टिम  बदलवुन त्या जागी नवी सिस्टिम बसवण्याचा निर्णय घेण्यात आला अंतराळवीरांनी हि सिस्टिम बदलवून नवे अँटेना बसविले शिवाय त्यांनी स्थानकाच्या दुरुस्तीसाठी उपयुक्त इतर आवश्यक कामेहि केली त्यांनी पुढील स्पेसवॉकच्या तयारीसाठीही काही कामे पूर्ण केली ह्या अंतराळवीरांना स्थानकातून अंतराळवीर Mark Vande अंतराळवीर Raja Chari आणी अंतराळवीर Mattias ह्यांनी स्पेसवॉक दरम्यान मार्गदर्शन केले 

अंतराळवीर Thomas Marshburn  ह्यांनी त्यांच्या अंतराळस्थानकातील वास्तव्यादरम्यान केलेला हा पाचवा स्पेसवॉक होता त्यांनी त्यांच्या अंतराळ कारकिर्दीत स्पेसवॉक दरम्यान अंतराळात एकतीस तास आणि एक मिनिटे व्यतीत केले आहेत तर Kayla  Barron ह्यांची हि पहिलीच अंतराळवारी असल्याने त्यांचा हा पहिलाच स्पेसवॉक होता त्या साठी त्यांनी अंतराळात साडेसहा तास व्यतीत केले यंदा स्थानकातील मानवी वास्तव्याला वीस वर्षे पूर्ण झाली असून एकविसावे वर्ष सुरु आहे आणि या वर्षातील स्थानकाच्या दुरुस्तीसाठी केलेला हा तेरावा स्पेसवॉक होता

Thursday 25 November 2021

अंतराळवीरांनी दिल्या स्थानकातून Thanks Giving Day च्या शुभेच्छा !

अंतराळ स्थानकातून लाईव्ह संवादादरम्यान अंतराळवीर Kayla ,Mattias ,Tom ,Mark Vande आणि Raja चारी फिस्ट चे पदार्थ दाखवताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था - 25 नोव्हेंबर 

दरवर्षी अमेरिकेत 25 नोव्हेंबरला Thanks Giving Day उत्साहात साजरा केल्या जातो वर्षभरात नातेवाईकांनी ,मित्रांनी आपल्यावर केलेल्या उपकाराची मदतीची जाणीव ठेवून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातॊ त्या दिवशी सर्व कुटुंबीय कामातून वेळ काढून एकत्र जमतात आणि पार्टी करतात त्या पार्टीत मित्रांना,नातेवाईकांना बोलावतात पार्टीत वेगवेगळे पदार्थ असतात पण विशेष प्राधान्य टर्की ह्या  पक्षापासून बनवलेल्या वेगवेगळ्या पदार्थांना असते गेल्या वर्षी कोरोनाच्या निर्बंधामुळे नागरिकांनी घरातच हा डे साजरा केला होता पृथ्वीपासून दूर अंतराळस्थानकात राहणारे अंतराळवीर देखील स्थानकात हा दिवस दरवर्षी साजरा करतात नुकतेच स्थानकात पोहोचलेले Space X च्या मोहीम तीन मधील अंतराळवीर राजा चारी,Kyla Barron ,Mattias Maurer ,Tom Marshburn आणि Mark Vande Hei ह्यांनी नासा संस्थेशी लाईव्ह संवाद साधला आणि सर्वांना Thanks Giving Day निमित्य शुभेच्छा दिल्या 

त्यांनी साधलेल्या संवादाचा हा वृत्तांत 

संस्था -Johnson Space Center - Thanks Giving बद्दल तुम्ही काय सांगाल 

Kayla -माझ्यासाठी Thanks Giving म्हणजे मला आवडणाऱ्या,माझ्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीसोबत वेळ घालवणे म्हणजे माझे कुटुंबीय,मित्र,मैत्रिणी,नातेवाईक ह्यांच्याप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एकत्रित येण आणि पार्टी enjoy करण 

Mark Vande Hei -माझही असच मत आहे! आम्ही कुटुंबीय वेगवेगळ्या ठिकाणी राहतो पण सर्वजण Thanks Giving Day ला Houston मध्ये एकत्र येतो आणि Thanks Giving Day जोशात साजरी करतो आम्ही बाहेर जेवायला जातो एकाच टेबलावर एकत्रित जेवण करतो त्या निमित्याने माझ्या कुटुंबियांना मला त्यांची किती काळजी आहे माझ त्यांच्यावर किती प्रेम आहे ते कळत आणि मी कुठेही असलो तरी मनाने त्यांच्याजवळ असतो ह्याची जाणीव होते माझ्यासाठी हे त्यांना कळण आवश्यक आहे 

Tom Marshburn - मलाही असच वाटत ! आम्ही देखील फॅमिली,फ्रेंड्स एकत्रित येतो आमच्या पार्टीत जेवणाचा मेनू आणि त्यातील पदार्थ ह्यांना प्राधान्य असत आम्ही त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि एकत्रित जेवणाचा आनंद घेतो आता आम्ही इथे एकत्रित पार्टी करणार आहोत इथे आम्ही सर्व अंतराळवीर एकत्र राहतो ,काम करतो 

Kayla -आम्ही सर्वजण इथे स्थानकात कामात बिझी आहोत पण तरीही आम्ही सर्वांना Thanks Giving च्या पार्टीत आमंत्रित करतोय मी इथे नवीन पदार्थ बनवू शकत नाही पण आमच्या जवळचे पदार्थ गरम करून त्यांचा आस्वाद आम्ही घेणार आहोत 

Tom -माझ्या कुटुंबीयांनी आमच्यासाठी काही पदार्थ पाठवलेत त्यात गरम पाणी घालून आम्ही ते खाऊ आणि नासकडूनही आम्हाला फिस्ट साठी पदार्थ आले आहेत त्याबद्दल संस्था आणि कुटुंबियांचे आभार !

                                                Happy Thanks Giving Day !

Raja Chari - आम्हीही असाच एकत्रित जमून पार्टीचा आस्वाद घेतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो Thanks Giving ला सर्वजण टर्की च्या पदार्थाचा आस्वाद घेतात आम्ही ट्रेड मिल घेणार आहोत आमच्या साठी कलर हेडबँड आणि काही पदार्थ आले आहेत खरच ह्या वर्षी Inter National thanks giving पार्टी आहे  Fantastic !Wonderful ! इथे आज सर्व सहकारी अंतराळवीरांसोबत पृथ्वीपासून दूर स्थानकातली पार्टी स्पेशल आहे माझ्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत 

Mark Vande - आम्ही खूप आभारी आहोत अस मलाही सांगावस वाटतय आम्ही सर्व अंतराळवीर एकत्रित पार्टी करू मला खात्री आहे आमची पार्टी खूप छान होणार आहे 

संस्था -पार्टीत कुठल्या पदार्थांचा आस्वाद घेणार आहात ?

Kayla -फिस्ट साठी आलेले पदार्थ खाणार आहोत माझ्याकडे असलेल्या पॅकेट्स मध्ये Crab बिस्किट्स आहेत 

Raja Chari - आणि माझ्याकडच्या पॅकेट्समध्ये Roasted Turkey,Potato ,Groton त्यात आम्ही पाणी घालून गरम करून खाऊ ते नक्कीच डेलिशिअस होतील आणि शिवाय कॅण्डी पण आहेत 

Mattias - मलाही पॅकेट्स मिळालेत.माझयाकडे डेझर्ट चेरी ,ब्लू बेरी ,Cobbler Thanks ! ह्या मोहिमेत मी सहभागी असल्याचा आनंद होतोय मोहिमेतील सर्वांचे आभार!

                                 आमच्या तर्फे सर्वांना Happy Thanks Giving Day !

Tuesday 23 November 2021

Curiosity मंगळयान शोधतोय मंगळमोहिमेतील अंतराळविरांच्या निवासासाठी सुरक्षित जागा

 Farewell to Murray Buttes Hero images

मंगळावरील Murray Buttes येथील पर्वतीय भागाचे Curiosity यानाने घेतलेले फोटो -फोटो -नासा संस्था -J.PL lab

नासा संस्था-JPL lab -15 नोव्हेंबर मिळालेल्या 

मंगळावर पुरातनकाळी सजीवसृष्ठी अस्तित्वात होती ह्या गोष्टीला पृष्ठी देणारे पुरावे आता सापडू लागले आहेत नासाचे Perseverance मंगळयान आणि Ingenuity Mars Helicopter ह्यांनी घेतलेल्या फोटोतून अशा जागांचा शोधही घेतल्या जात आहे नुकतीच Ingenuity हेलिकॉप्टरने मंगळावरील आकाशात तेरावी उंच भरारी घेऊन तेथील परिसरातील फोटो पृथ्वीवर पाठवले आहेत आणि Perseverance मंगळयानाने मंगळभूमीवर उत्खनन करून भूगर्भातील खडकांचे नमुने दुसऱ्यांदा गोळा केले आहेत  

ह्या आधीच मंगळावर कार्यरत असलेल्या Curiosity मंगळयानाने देखील ह्या संदर्भात महत्वपूर्ण माहिती आणि फोटो पृथ्वीवर पाठवले आहेत नासा संस्थेने प्रसारित केलेल्या बातमीनुसार आता Curiosity मंगळयाना मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे  भविष्यकालीन मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांना राहण्यासाठी योग्य ठिकाण शोधण्याचे काम शास्त्रज्ञ करीत आहेत 

मंगळावरील कडेकपारीतील सुरक्षित जागा ,Lava Tubes आणि गुहांचे फोटो Curiosity मंगळयानाने शोधून पृथ्वीवर पाठवले आहेत ह्या जागा शोधल्यानंतर तेथील वातावरण मानवी निवासासाठी विशेषत:मानवी  आरोग्यासाठी योग्य आहे का? ह्यावर सखोल संशोधन केल्या जात आहे कारण मंगळावर पृथ्वीसारखे वातावरण नाही तेथील वातावरण अत्यंत क्षीण आहे तेथे पृथ्वीसारखे दाट चुंबकीय क्षेत्र नाही त्यामुळे तेथील वातावरणातील वायूपासून मानवासाठी आवश्यक असलेले ऑक्सिजन वेगळे करून साठवण्याचे कामही मंगळयानातील अत्याधुनिक यंत्रणेमार्फत सुरु आहे तेथे पाणी नाही पण मंगळावरील फोटोत ह्या पूर्वी गोठलेल्या अवस्थेतील बाष्फ आढळले होते त्या मुळे शास्त्रज्ञ भविष्यकालीन मंगळावरील मानवी निवासासाठी योग्य जागा आहे का ? ह्याचा शोध घेत आहेत 

मंगळावर पृथ्वीप्रमाणे चुंबकीय क्षेत्र नसल्यामुळे सूर्यापासून उत्सर्जित होणाऱे आणि वातावरणातून बाहेर पडणाऱे हानिकारक  विद्युतभारित किरण डायरेक्ट वातावरणात मिसळतात त्या मुळे मानवी अरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका आहे ह्या घातक किरणांच्या रेडिएशनचा धोका कमी करण्यासाठी आणि भविष्यकालीन अंतराळवीरांच्या सुरक्षिततेसाठी नासाची Curiosity टीम यानात बसविलेल्या RAD( Radiation Assessment Detector) ह्या अत्याधुनिक उपकरणाची मदत घेत आहेत RAD  च्या साहाय्याने मंगळावरील प्राकृतिक गोष्ठी विशेषतः खडक माती वाळूचा बनलेला गाळ,चिखल (अर्थात वाळलेला )ह्यांच्या साहाय्याने हानिकारक रॅडिएशन पासून बचाव करण्यासाठी हानीकारकता कमी करण्यासाठी संशोधन करत आहेत नासाच्या South West Research Institute चे प्रमुख Bent Ehresmann ह्यांनी हि माहिती प्रकाशित केली आहे 2016 च्या सप्टेंबर मध्ये Curiosity मंगळ ग्रहावरील Murray Buttes ह्या भागात कार्यरत होते तेव्हा RAD ने नोंदविलेल्या माहितीनुसार त्या भागात त्या काळात वातावरणातील रॅडिएशन चे प्रमाण 4% पर्यंत कमी झाले होते आणि हवेतील निष्क्रिय कणांची टक्केवारी ह्या काळात 7.5% वर आली होती त्या मध्ये मानवी आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या न्यूट्रॉनचा समावेश होता ह्या माहितीवरून शस्त्रज्ञानीं असा निष्कर्ष काढला कि,हे रॅडिएशन मोकळ्या जागी जास्त प्रमाणात होते आणि डोंगर कपारीतील बंदिस्थ जागी कमी प्रमाणात होते त्या मुळे अशा जागी मानवी आरोग्यास कमी धोका होऊ शकतो 

आम्ही ह्या निष्कर्षांची खूप दिवसांपासून वाट पहातोय आम्ही Computer Model  च्या साहाय्याने हे संशोधन करतोय आता आम्ही अशा सुरक्षित जागा मंगळावर आणखी कोठे आहेत ह्याचा शोध घेतोय असे ह्या टीमचे प्रमुख संशोधक म्हणतात मंगळावर आढळलेले हे घातक कॉस्मिक किरण अवकाशातील सौरमालेबाहेर अंतराळात फिरणाऱ्या ग्रहांच्या विस्फोटापासून बाहेर पडतात तसेच सूर्यावरील सौर वादळ,सौर विस्फोट ह्या मुळे बाहेर पडणाऱ्या अती ऊष्ण विद्युत भारीत कणामुळे निर्माण होतात आणि वातावरणात मिसळतात मंगळावर पृथ्वीसारखे वातावरण नसल्यामुळे ते डायरेक्ट हवेत शिरतात अशी किरणे मानवी आरोग्यासाठी हानिकारक आहेत पृथ्वीवर चुंबकीय क्षेत्र आहे पृथ्वीवरील ओझोन लेअर मुळे हानिकारक किरण गाळले किंवा नष्ट केल्या जातात पण मंगळावरील क्षीण वातावरणात हे शक्य होत नसल्याने अशी कॉस्मिक हानिकारक किरणे,वायू तेथील वातावरणात प्रवेश करतात त्या मुळे भविष्यात अंतराळवीर जर मंगळावर राहिले तर त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणून जेथे अशा किरणांपासून बचाव करता येईल अशी जागा Curiosity यानामार्फत शोधल्या जातेय 

Curiosity मंगळ यानातील RAD हे  अत्याधुनिक उपकरण तेथे हवामान केंद्रासारखे काम करते शास्त्रज्ञाच्या मते जेव्हा तेथे मोठ्या किंवा तीव्र स्वरूपात रॅडिएशन होते तेव्हा ह्यातील यंत्रणा रॅडिएशनचा धोका 30 ते 50  टक्क्यापर्यंत कमी करून तेथील वातावरण अंतराळवीरांसाठी सुरक्षित करू शकते अशा वेळेस भविष्यकालीन मोहिमेतील अंतराळवीरांना संरक्षण मिळणे आवश्यक आहे त्या साठीच शास्त्रज्ञ सुर्यावरील सौरवादळ आणि सौर ज्वालांचे विस्फोट त्यामुळे बाहेर पडणारे विद्युतभारित कण ,किरणे आणि वायू ,त्यांची तीव्रता ह्या वर संशोधन करीत आहेत ह्याचा उपयोग करून अंतराळवीरांसाठी अशा घातक किरणांपासून बचाव करण्यासाठीचा सुरक्षित काळ आणि निवासासाठी सुरक्षित जागा सध्या शोधल्या जात आहेत 28ऑक्टोबर 2021 मध्ये RAD ने नोंदवलेल्या माहितीच्या आधारे आता सुरक्षित जागा शोधण्याचे काम सुरु आहे

Saturday 13 November 2021

Space X -3 चे अंतराळवीर Raja chari,Kayla,Tom आणी Matthias स्थानकात पोहोचताच Welcome Ceremony ने झाले स्वागत

 The Expedition 66 crew poses for a photo after SpaceX Crew-3's arrival to station.

 Space X Crew 3चे अंतराळवीर Raja Chari ,Kayla Barron ,Matthias Maurer आणि Tom Marshburn स्थानकात पोहोचल्यानंतर Welcoming Ceremony दरम्यान स्थानकातील अंतराळवीरांसोबत -फोटो नासा संस्था 

नासा संस्था - 11नोव्हेंबर 

नासाच्या Space X -3 चे अंतराळवीर Raja Chari,Kayla Barron,Matthias Maurer आणि Tom Marshburn हे चारहीजण बुधवारी अंतराळस्थानकात सहा महिने राहायला गेले आहेत अमेरिकेतील फ्लोरिडातील Kennedy Space Center येथील उड्डाणस्थळावरून Endurance अंतराळयान ह्या चौघांना घेऊन बुधवारी रात्री 9.03 वाजता स्थानकाच्या दिशेने अंतराळप्रवासास निघाले जाण्याआधी चारही अंतराळवीरांना कोरोना निर्बंधामुळे संस्थेच्या Crew Quarters मध्ये Quarantine मध्ये ठेवण्यात आले होते उड्डाणस्थळी जाण्याआधी अंतराळवीरांची उड्डाणपूर्व चाचणी घेण्यात आली  त्या नंतर इतर आवश्यक प्रक्रिया पार पडल्यावर अंतराळवीरांनी त्यांना सोडायला आलेल्या त्यांच्या नातेवाईकांशी काही वेळ संवाद साधला ठरलेल्या वेळी  उड्डाणस्थळावरून Falcon 9 रॉकेटच्या साहाय्याने अंतराळयान अंतराळात झेपावले आणि स्वयंचलित यंत्रणेने सर्व प्रक्रिया पार पाडत अंतराळयानाने अंतराळात प्रवेश केला त्या नंतर काही वेळातच यान स्थानकाच्या दिशेने मार्गस्थ झाल्यानंतर अंतराळवीरांनी अंतराळयानातुन संस्थेशी संपर्क साधत सर्व ठीक असल्याचे सांगत लाईव्ह संवाद साधला 

अंतराळवीरांनी संस्थेमार्फत नागरिकांना अंतराळयानाची सफर घडविली चारही अंतराळवीरांनी लाईव्ह संवाद साधून व्हिडीओ शेअर केला कायला आणि राजा चारी ह्यांनी त्यांच्या सोबत एक Zero g Indicator Foul कासव नेला आहे कायलाने ते खेळणे दाखवले आणि सांगितले  ट्रेनिंग दरम्यान तिने आणि राजा ह्यांनी हे कासव सोबत नेण्याचे ठरवले मॅथिअस मात्र त्याला peacock म्हणतो असही तिने सांगितले ती म्हणाली आम्ही ट्रेनिंग दरम्यान खूप मजा केली आमच launching लांबल्यामुळे आम्हाला जास्तीचा वेळ मिळाला तेव्हा आम्ही खूप आवडीचे पदार्थ खाल्ले काही नवीन रेसिपीज करून पाहिल्या त्यातलेच थोडे अंतराळप्रवासात खाण्यासाठी घेतले इथे झिरो ग्रॅविटीत ते कसे फिरतात ते पहा असे म्हणून तिने प्रात्यक्षिक दाखवल टॉम ह्यांनी झिरो ग्रॅविटीत पाणी देखील कस फिरत हे दाखवील राजा चारी आणि Tom ह्यांनी Space X चा प्रवास खूप आरामदायी असल्याचं सांगितल तर मॅथिअस ह्यांनी देखील cupola मधून बाहेरच दृष्य पाहता येत हे सांगत अंतराळातील चंद्राच दर्शन घडवल हे अंतराळवीर 24  तासांच्या अंतराळप्रवासानंतर गुरुवारी रात्री 6.32 वाजता स्थानकात पोहोचले त्या नंतर स्थानक आणि अंतराळ यान ह्यांच्यातील Docking आणि Hatching प्रक्रिया पार पडली आणि ह्या अंतराळवीरांनी 8.10 वाजता स्थानकात प्रवेश केला 

अंतराळात सध्या राहात असलेल्या अंतराळवीरांनी ह्या चारही अंतराळवीरांचे स्थानकात स्वागत केले त्या नंतर ह्या अंतराळवीरांच्या Welcome Ceremony पार पडला नासाच्या Space Flight Administrator Kathy Leaders आणि E.SA चे Director General Josef Aschbacher ह्यांनी ह्या चारही अंतराळवीरांचे स्थानकात स्वागत केले 

Kathy leaders -"Welcome Raja Chari ,Kayla Tom &Matthias ! तुमच स्थानकात सहर्ष स्वागत आणि राजा आणि Tom तुम्ही Space X मधून सर्वांना सुखरूप स्थानकात पोहोचवल्या बद्दल तुम्हा सर्वांचं अभिनंदन! दोनवेळा लांबलेल तुमच launching अखेर झाल आणी तुम्ही सुखरूप पोहोचलात हे पाहून आम्हाला आनंद झालाय तुमच्या पेशन्सची आम्हाला कल्पना आहेच कारण तुमच जाण लांबल तरी तुम्ही सहनशीलतेने परिस्थितीला सामोरे गेलात आणि तो लांबलेला काळ एन्जॉय केलात आता येणाऱ्या सहा महिन्यांच्या वास्तव्यात आम्हाला तुमच्या कडून नवनवीन संशोधनाची आशा आहे राजा तुमचा Space X चा प्रवास कसा झाला? कसा अनुभव होता? तुम्ही स्थानकात सोबत कासव नेल्याच ऐकलय स्थानकातील झिरो ग्रॅविटीत एखाद्या टॉयच निरीक्षण नोंदवण चांगलच आहे 

Raja Chari - Thanks ! आमच्या अपेक्षेपेक्षा खूप सुखकर.आरामदायी आणि स्मूथ ड्रायविंग होत Space X च्या सर्व testing येण्याआधीच झाल्याने काही प्रॉब्लेम आला नाही सर्व इंजिन्स व्यवस्थित काम करत होते अंतराळयान पहिल्या स्टेज मधून दुसऱ्या स्टेज मध्ये प्रवेश करताना आणी यान राँकेट पासून वेगळे होताना प्रत्यक्ष पाहता आल Tom सोडून आमचा सर्वांचाच हा पहिला अंतराळप्रवास होता तो आम्ही एन्जॉय केला आता आम्ही झिरो ग्रॅविटीचा अनुभव घेतोय आणि नक्कीच आम्ही नवनवीन संशोधनात सहभागी होऊन चांगले काम करू होय !आम्ही कासव सोबत आणलाय पुन्हा एकदा नासा संस्थेने आणि तुम्ही आम्हाला संधी दिल्याबद्दल आभार !

Mark Vande -ह्या सर्वांना सुखरूप पोहोचलेले पाहून आनंद झालाय मागच्या आठवड्यात आमचे जवळपास साठ पासष्ट संशोधनात्मक प्रयोग पूर्णत्वास आले हे चौघे स्थानकात पोहोचल्याने आम्हाला नक्कीच त्यांची मदत मिळेल 

E.SA चे Director General Joseph Oshbacher -"Hello Matthias!Welcome !" Matthias तुम्हाला स्थानकात पोहोचलेल पाहून खूप आनंद होतोय आणी तुमचे आनंदी हसरे चेहरे पाहण खरच अमेझिंग आहे ! तु पहिल्या अंतराळप्रवासाचा अनुभव घेतलास आणी आता झीरो ग्रव्हिटीत तरंगण्याचा अनुभव घेत असशील मला खात्री वाटते की तु ह्या संधीचा ऊपयोग करून घेशील आणी तीथल्या संशोधनात सहभागी होऊन छान काम करशील विषेशतः तुला  रोबोटिक आर्म आणी ईतर नवीन सायंटिफिक प्रयोगात सहभागी होऊन संशोधन करताना पहायला आम्ही ऊत्सुक आहोत आम्ही त्याची आतुरतेने वाट पहातो आहोत आम्हाला, E.SAला आणी युरोपियन जनतेला तुझा अभिमान वाटतोय तुला नासा संस्थेत रशियन स्पेससुट घालुन काम करताना पाहुन आनंद होतोय आता तीथल वातावरण नवीन आहे लवकरच तु तीथे रुळशील आणी स्थानकाच्या Cupola मधून पृथ्वीवरच्या आणी अंतराळातील  घडामोडींचे निरीक्षण करून त्याचे फोटो शेअर करशील पुन्हा एकदा तुझ स्थानकात सहर्ष स्वागत आणी अभिनंदन! राजा,कायला आणी Tom तुमचही स्वागत आणी अभिनंदन!तुमच्या सहा महिन्यांच स्थानकातील वास्तव्यासाठी शुभेच्छा!

Matthias-Thanks! खरच आमचा कालचा दिवस खूप exciting होता Space X आणी Falcon-9च सेपरेशन पहाण रोमांचकारी होत आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण होता तो! माझ कित्येक वर्षांपासूनच स्वप्न पुर्ण झालय Thanks NASA &E.SA ! Space X अंतराळयानातील प्रवास आरामदायी होता स्मुथ होता माझे सहकारी छान आहेत आम्ही खूप enjoy केल अंतराळात यानाचा प्रवेश होताच माझ्या सहकारी मित्रांनी मला सन्मानाने Cupola ऊघडुन दिला त्यातून पृथ्वीकडे अंतराळात पाहण्याचा पहिला अनुभव खूप आनंददायी होता आणी येणाऱ्या सहा महिन्यात येथील वास्तव्यात संशोधनात सहभागी होऊन मी नक्कीच चांगल काम करेन आणी देशाच नाव ऊंचावेल. 

Wednesday 10 November 2021

Space X Crew -3 चे चार अंतराळवीर आज स्थानकात राहायला जाणार

The official crew portrait for NASA's SpaceX Crew-3 mission.

Space X Crew -3 चे अंतराळवीर Raja Chari अंतराळवीर Thomas Mashburn अंतराळवीर Mattias Maurer आणि Kayla Barron -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -9 नोव्हेंबर 

नासाच्या  Space X -2 चे अंतराळवीर कालच पृथ्वीवर सुखरूप परतल्यानंतर आता  Space X Crew -3  मोहीमेतील चार अंतराळवीर आज रात्री अंतराळस्थानकात राहायला जाणार आहेत ह्या आधी दोनवेळा ह्या अंतराळवीरांच्या उड्डाणाची तारीख हवामान उड्डाणासाठी अनुकूल नसल्यामुळे लांबली होती अखेर आज अंतराळवीर स्थानकात राहायला जाणार आहेत 

Space X Crew -3 मोहिमे अंतर्गत भारतीय वंशाचे नासा अंतराळवीर Raja Chari ,Tom Marshburn ,Kayla Barron आणि युरोपियन अंतराळवीर Matthias Maurer हे चार अंतराळवीर सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी स्थानकात जाणार आहेत ह्या मोहिमेचे कमांडरपदी Raja Chari पायलटपदी Tom Marshburn तर Kayla Barron आणि Matthias Maurer हे दोघांची ह्या मोहिमेच्या मिशन स्पेशॅलिस्टपदी नियुक्ती करण्यात आली आहे ह्या आधी तीनवेळा Space X Crew Dragon अंतराळस्थानकात गेले होते आता चवथ्यांदा Dragon स्थानकात जाणार आहे

नासाच्या Florida येथील Kennedy Space Center मधील 39 -A ह्या उड्डाणस्थळावरून Space X चे Endurance हे अंतराळयान ह्या अंतराळवीरांसह Falcon 9 रॉकेटच्या साहाय्याने रात्री 9.03 वाजता (स्थानिक वेळ) अंतराळात उड्डाण करेल आणि 11नोव्हेंबरला गुरुवारी रात्री 7.10 वाजता स्थानकात पोहोचेल स्थानकात सध्या राहात असलेले अंतराळवीर त्यांचे स्थानकात स्वागत करतील हे चारही अंतराळवीर स्थानकात सहा महिने राहतील व तेथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतील ह्या आधी 31 ऑक्टोबरला किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे अंतराळवीर स्थानकात जाणार असल्यामुळे उड्डाणपूर्व ट्रेनिंग आटोपून चारही अंतराळवीर स्थानकात जाण्यासाठी सज्ज झाले होते 

ह्या  अंतराळवीरांच्या स्थानकाकडील उड्डाण,स्थानकातील Docking ,Hatching आणि स्थानकातील Welcoming Ceremony चे लाईव्ह प्रसारण नासा T.V. आणि सोशल मीडियावरून करण्यात येणार आहे 

(ह्या संदर्भातील बातमी ह्याच ब्लॉगवर)

Tuesday 9 November 2021

नासाच्या Space X -2 चे चारही अंतराळवीर Florida येथील समुद्रात पृथ्वीवर सुखरूप उतरले

NASA's SpaceX Crew-2 mission astronauts smile and wave after splashing on Nov. 8, 2021. 

 नासाच्या Space X Crew -2 चे युरोपियन अंतराळवीर Thomas Pesqute ,नासाचे अंतराळवीर Megan McArthur ,अंतराळवीर Shane Kimbrough आणि जपानी अंतराळवीर Aki Hoshide Space X Crew Dragon Endeavour अंतराळयानातून पृथ्वीवर परतताना -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था -9 नोव्हेंबर 

नासाच्या अंतराळमोहीम Space X Crew -2 चे अंतराळवीर Shane Kimbrough ,Megan McArthur युरोपियन अंतराळवीर Thomas Pesqute आणि जपानचे अंतराळवीर Aki Hoside सोमवारी पृथ्वीवर सुखरूप पोहोचले आहेत ह्या चारही अंतराळवीरांना घेऊन Space X चे Endeavour अंतराळयान Florida तील Gulf Of Mexico येथील खाडीत सोमवारी रात्री 10.33.वाजता पोहोचले त्यानंतर हे चारही जण parachute च्या साहाय्याने समुद्रात उतरले 

 नासाची recovery टीम आधीच ह्या अंतराळवीरांना आणण्यासाठी तेथे पोहोचली होती अंतराळवीर पृथ्वीवर पोहोचताच ह्या टीमने चारही अंतराळवीरांना यानातून सुरक्षितपणे बाहेर काढले नासाच्या recovery टीममधील डॉक्टरांनी ह्या अंतराळवीरांचे प्राथमिक चेकअप केले त्या नंतर ह्या चारही अंतराळवीरांना विमानाने नासाच्या Houston येथील Johnson Space Center मध्ये नेण्यात आले 

नासाचे Administrator Bill Nelson ह्यांनी ह्या अंतराळवीरांचे  संस्थेत स्वागत केले ,"Welcome Shane ,Megan ,Thomas & Aki ! तुम्ही हि अत्यंत अवघड मोहीम यशस्वी केलीत Endeavour Space X अंतराळयान सुरक्षितपणे अंतराळात नेऊन पृथ्वीवर परत आणत हि दुसरी सहा महिन्यांची अंतराळ मोहीम यशस्वी केलीत त्या बद्दल अभिनंदन ! स्थानकातील तुमच्या सहा महिन्यांच्या वास्तव्यात तुम्ही अनेक कठीण जबाबदाऱ्या पार पाडल्या ,स्थानकात आलेल्या अंतराळयानांना रिसिव्ह केल आणि नवीन संशोधनात सहभागी झालात हि कामगिरी भविष्याकालीन अमेरिकन अंतराळ मोहिमांसाठी उपयुक्त ठरेल !" अशा शब्दात त्यांचे कौतुक केले

हे चारही अंतराळवीर 23 एप्रिलला स्थानकात राहायला गेले होते आणि 24 एप्रिलला स्थानकात पोहोचले होते त्यांनी स्थानकात 199 दिवस वास्तव्य केले ह्या दरम्यान त्यांनी पृथ्वीभोवती 3,194 वेळा प्रदक्षिणा केल्या आणि जवळपास 84,653,119 मैल अंतराळप्रवास केला ह्या सहा महिन्यांच्या वास्तव्यात त्यांनी स्थानकातील झिरो ग्रॅविटीतील फिरत्या प्रयोगशाळेत अनेक सायंटिफिक प्रयोग केले  आणी तेथे सुरू असलेल्या संशोधनात सहभाग नोंदवला त्यांनी स्थानकातील झिरो ग्रॅविटीत Gaseous Flame कशी पेटते तिचा आकार कसा बदलतो व इतर परिणामांचे निरीक्षण नोंदवून त्यावर संशोधन केले स्थानकातील व्हेजी चेंबर मधील व्हेजी प्रोजेक्ट अंतर्गत वेगवेगळ्या भाज्यांची रोपे लावली नुकतीच त्यांनी स्थानकात उगवलेल्या मिरच्याचे फोटो सोशल मीडियावरून शेअर केले  ह्या शिवाय त्यांनी स्थानकात Free Flying Robotic Assistant install केला आणि स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी अनेक वेळा स्पेस वॉकही केला 

ह्या सहा महिन्यांच्या काळात त्यांच्या कामातून मिळालेल्या रिकाम्या वेळात पृथ्वीवरील नासा संस्थेत आणि त्यांच्या सहकार्याने पत्रकारांशी ,विद्यार्थ्यांशी लाईव्ह संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली त्या दरम्यान घडलेल्या अंतराळातील आणि पृथ्वीवरील घडामोडी फोटोबद्ध करत त्याही त्यांनी त्यांच्या चाहत्यांशी शेअर केल्या

Saturday 30 October 2021

अंतराळवीर घेणार अंतराळस्थानकात उगवलेल्या मिरच्यांचा आस्वाद

 image of astronauts with chile peppers

अंतराळ स्थानकातील Veggie चेंबर मधील मिरच्यांच्या रोपांना आलेल्या मिरच्यांसोबत फोटो काढताना Thomas Pesqute -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था -29 ऑक्टोबर

पृथ्वीपासुन दुर अंतराळात स्थानकातील झीरो ग्रॅव्हीटीत सतत तरंगत्या अवस्थेत रहाणाऱ्या अंतराळविरांना पृथ्वीवरच्या सारखे ताजे गरम जेवण ताज्या भाज्या व फळे खायला मिळत नसल्याने त्यांना पृथ्वीवरुन पाठवलेले प्रिर्झव्ह थंड अन्न व भाज्या खाव्या लागतात सतत झीरो ग्रॅव्हिटीत तरंगत्या अवस्थेत रहावे लागत असल्याने त्यांच्या शरीरावर विपरीत परीणाम होतो त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यांना व्हिटॅमिन युक्त सकस ताजे जेवण मिळावे विषेशतः ताजी हिरवी पालेभाजी व फळे मिळावीत म्हणून शास्त्रज्ञ सतत प्रयत्न करत आहेत भविष्यकालीन दुरवरच्या अंतराळ मोहीमांतील अंतराळनिवासात अंतराळविरांना पृथ्वीवरून अन्न  पाठविताना वेळ लागेल त्यामुळे त्यांना स्थानकातच स्वतः अन्न ,भाजी व फळे पिकवुन खाता यावीत म्हणून नासाचे शास्त्रज्ञ स्थानकात व्हेजी प्रोजेक्ट राबवत आहेत ह्या आधी अंतराळविरांनी स्थानकात गहु, Lettuce, लाल कोबी, ह्या सारख्या भाज्या लाऊन त्यांची चवही चाखली आहे स्थानकात सध्या सुरु असलेल्या Advanced Plant Habitat -04  प्रोजेक्ट अंतर्गत स्थानकातील व्हेजी चेंबरमध्ये वेगवेगळ्या भाज्यांची रोपे व बिया लावण्यात आल्या होत्या मागच्या महिन्यात त्यातील चार मिरचीच्या रोपांना फुले आली होती आता त्यांची वाढ पूर्ण होऊन त्यांना मिरच्या आल्या आहेत 

अंतराळविरांनी त्यांच्या संशोधनाच्या कामातून मिळालेल्या रिकाम्या वेळात ह्या रोपांची  निगा राखुन हि रोपे वाढविण्यात यश मिळवले आहे ह्या रोपांच्या वाढीसाठी त्यांना नासाच्या केनेडी स्पेस सेंटर मधील शास्त्रज्ञांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले स्थानकातील वातावरणात मिरचीची रोपे वाढविणे सोपे नव्हते कारण मिरचीचे रोप वाढण्यासाठी खूप दिवस लागतात साधारण चार महिन्यांचा काळ लागतो  नासाचे अंतराळवीर Shane Kimbrough ह्यांनी बारा जुलैला स्थानकातील व्हेजी चेंबरमधील उशी वाफाऱ्यात हि रोपे लावली होती त्या रोपांची वाढ पूर्ण होऊन त्याला आता मिरच्या आल्या आहेत 

Image 

 अंतराळस्थानकातील Veggie चेंबर मध्ये वाढलेली मिरचीची रोपे आणि त्याला आलेल्या मिरच्या -फोटो 

नासाचे अंतराळवीर Thomas Pesqute ह्यांनी सोशल मीडियावरून ह्या मिरच्यांचा सगळ्यांसोबत काढलेला फोटो शेअर केला आहे ते म्हणतात "मिरच्यांची हि रोपे अंतराळवीर Mark Vande Hei ह्यांनी लावली होती अंतराळस्थानकातील झिरो ग्रॅविटीत हि रोपे कशी वाढतात त्यांच्या चवीत रंगात आणि आकारात काय फरक पडतो ह्याचे निरीक्षण आम्ही नोंदवले आहे ह्या मिरच्या पृथ्वीवरच्या सारख्याच दिसत आहेत त्या पाहून आम्ही त्याचा आस्वाद घेण्यास आतुर झालो आहोत आम्ही आता अजून वाट पाहू शकत नाही खरतर त्या अजूनही वाढत आहेत पण आता त्यांची पुरेशी वाढ झाली असल्याने आम्ही आज रात्री त्या तोडून त्यांचा आस्वाद घेणार आहोत स्थानकातील वातावरणात भाज्यांची रोपे लावण  ती वाढवण सोप नाही आव्हानात्मक आहे स्वत; लावलेल्या भाज्यांची चव चाखण्याचा आनंद काही औरच आहे इथे पृथ्वीवरच्या सारख पाहिजे तेव्हा ताज्या भाज्या आणून खाता येत नाहीत इथे आम्ही फ्रोझन प्रिझर्व फूड खातो पण जवळपास सहा महिन्यांनी आम्ही आज ताज्या मिरच्या खाणार आहोत "

अंतराळवीर Thomas Pesqute ह्यांनी ह्या मिरच्यांसोबत अंतराळवीरांचा फोटो काढून नासा संस्थेत पाठवून त्यांचा आनंद शेअर केला आहे ह्या मिरचांच्या बिया व काही मिरच्या अंतराळवीर पृथ्वीवर परतताना नमुना म्हणून आणण्यासाठी ठेवणार आहेत 


 

Tuesday 12 October 2021

अभिनेते,दिग्दर्शक, निर्माते William Shatnerआणी Blue Originच्या Audrey powers 13 आक्टोबरला अंतराळप्रवास करणार

 

 Blue Origin चे अंतराळप्रवासी अभिनेते दिग्दर्शक William Shatner,Sarah Knights आणि अध्यक्ष Audrey Powers -फोटो - Blue Origin

Blue Origin-10 आक्टोबर

Blue Originच्या आंतराळ पर्यटनाला जुलै मध्ये यशस्वी सुरवात झाल्यानंतर आता Blue Originचे New Shepard अंतराळयान आता दुसऱ्यांदा अंतराळप्रवासास जाणार आहे 13 तारखेला New Shepard अंतराळयानातून नामवंत सिनेनिर्माते,दिग्दर्शक आणि अभिनेते William Shatner त्यांच्या सोबत Blue Originच्या अध्यक्षा Audrey powers ,Chris Boshuizen आणी Alende Vries हे चार अंतराळ प्रवाशी अंतराळप्रवास करणार आहेत 

13 तारखेला 8.30a.m.ला New Shepard अंतराळयान West Texas येथील ऊड्डाणस्थळावरून अंतराळात ऊड्डाण करेल व त्याच ठिकाणी अंतराळप्रवास करून परतेल हे ऊड्डाण आधी 12 तारखेला होणार होते पण खराब हवामानामुळे आता 13 तारखेला होईल ह्या उड्डाणाचे लाईव्ह प्रसारण करण्यात येणार असून सामान्य नागरिकांना ते पाहता येईल

William Shatner हे नामवंत निर्माते,दिग्दर्शक,Recording artist,लेखक आणि अभिनेते आहेत शिवाय Horseman ही आहेत 1966 मध्ये टिव्ही वर प्रसारित होणाऱ्या Star Trek ह्या गाजलेल्या मालीकेतुन त्यांनी त्यांच्या अभिनयाची सुरवात केली होती ह्या मालिकेतील Captain James हि प्रमुख व्यक्तीरेखा त्यांनी साकारली होती त्या नंतर त्या मालिकेवर निघालेल्या सात सिनेमातही त्यांनी काम केले त्यातील एका सिनेमाचे दिग्दर्शनही त्यांनी केले त्यांची अनेक वर्षांपासूनची अंतराळप्रवास करण्याची ईच्छा आता पुर्ण होणार असुन सर्वात जास्त वयाचा अंतराळप्रवाशी म्हणून त्यांची ऐतिहासिक नोंदही होणार आहे सध्या ते History channel वर प्रसारित होणाऱ्या Unexplained ह्या  एक तासाच्या सिरीयलचे Producer, Executive आणि Host आहेत ह्या सिरीयल मध्ये जगातील पुरातन काळच्या अज्ञात Aliensआणी रहस्यमय आश्चर्य जनक अविश्वसनिय गोष्टीची संशोधीत माहिती प्रसारित होते 

ते म्हणतात, "मी कित्येक वर्षांपासून अंतराळप्रवासाबद्दल ऐकतोय आणी मला अंतराळप्रवास करायची ईच्छा होती आता ती ईच्छा पुर्ण होणार आहे मी खरच अंतराळप्रवास करणार आहे मला हि संधी मिळालीय What a miracle!"

 Audrey  powers ह्या  Blue Origin च्या Test & Flight 0pration प्रमुख आहेत,मिशन प्रमुख आहेत Audrey ह्या ईंजीनिअर,पायलट आणी वकील आहेत 2013 मध्ये त्या Blue Origin मध्ये आल्या त्या आधी त्यांनी दहा वर्षे नासा संस्थेत Flight Controllerपदी काम केल विषेशतः ISS program मध्ये त्यांचा सहभाग होता पायलटपदी कार्यरत असताना त्या Commercial Spaceflight Federation च्या Board of Directors होत्या त्यांना वीस वर्षांचा ईंजीनिअर,वकीली आणी Aerospace विश्वातला अनुभव आहे  Audrey Blue Origin च्या Sponsor group मध्येही  सहभागी आहेत अंतराळयानाच्या launching,landing आणी अंतराळयानाची देखभाल करण्याच काम त्यांच्याकडे आहे 

त्या म्हणतात "ईतक्या वर्षांच्या अनुभवामुळे मला आमच्या टिमने तयार केलेल्या अंतराळयानाच्या उत्कृष्ठतेची खात्री आहे अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर आम्हाला जुलै 2021मध्ये अंतराळ पर्यटनाची परवानगी मिळाली आणी आमची सुरवात देखील चांगली झालीय आमच पहिल अंतराळ पर्यटन यशस्वी झाल्यामुळे आता आम्ही दुसऱ्यांदा अंतराळप्रवास करणार आहोत मला देखील अनेक वर्षांपासून अंतराळप्रवास करण्याची ईच्छा होती ती आता पुर्ण होईल मला आता Blue Origin च्या सामान्य लोकांच्या पर्यटनाच्या ऐतिहासिक ऊड्डाणात सहभागी व्हायला मिळतय "

Friday 8 October 2021

रशियन अंतराळवीर Anton Shkaplerov ,रशियन अभिनेत्री Yulia आणी निर्माते Klim स्थानकात सुखरूप पोहोचले

 The three new residents aboard the station (front row, from left) are Russian actress Yulia Peresild, Roscosmos cosmonaut Anton Shkaplerov, and Russian Producer Klim Shipenko. In the back, are Expedition 65 crew members Shane Kimbrough, Oleg Novitskiy, Thomas Pesquet, Megan McArthur, Pyotr Dubrov, Mark Vande Hei, and Akihiko Hoshide.

 अंतराळस्थानकातील Welcome Ceremony दरम्यान Roscosmos संस्थेशी संवाद साधताना रशियन अभिनेत्री Yulia peresildअंतराळवीर Anton Shkaplerovआणि रशियन सिनेनिर्माते Klim Shipenko स्थानकातील अंतराळवीरांसोबत -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था-6आक्टोंबर

रशियन अंतराळवीर Anton Shkaplerov,रशियन निर्माते दिग्दर्शक Klim Shipenko आणी अभिनेत्री Yulia Peresild पाच तारखेला अकरा वाजता स्थानकात सुखरूप पोहोचले त्यांचे सोयुझ MS-19 हे अंतराळयान कझाकस्थातील बैकानुर येथील ऊड्डान स्थळावरून 4.55a.m.ला स्थानकात जाण्यासाठी अंतराळात झेपावले आणी 8.12a.m.ला स्थानकाजवळ पोहोचले रात्री अकरा वाजता सोयुझ अंतराळयान आणी स्थानक ह्यांच्यातील Hatching आणी Docking प्रक्रिया पार पडली त्यानंतर सोयुझ यान स्थानकाशी व्यवस्थित जोडल्या गेले स्थानकाचे दार ऊघडल्यानंतर ह्या तिनही अंतराळविरांनी स्थानकात प्रवेश केला

प्रथम रशियन अंतराळवीर ह्या मोहिमेचे सोयुझ कमांडर आणी पायलट Anton ह्यांनी स्थानकात प्रवेश केला त्यानंतर रशियन अभिनेत्री Yulia आणी शेवटी रशियन सिनेनिर्माते,दिग्दर्शक Klim ह्यांनी स्थानकात प्रवेश केला स्थानकात सद्या रहात असलेल्या मोहीम 65च्या अंतराळविरांनी ह्या तिघांचे स्थानकात स्वागत केले स्थानकातील अंतराळवीरांची संख्या आता दहा झाली आहे 

स्थानकात प्रवेश केल्यानंतर काही वेळातच ह्या तिघांचा स्थानकात Welcome ceremony पार पडला तेव्हा रशियातील Roscosmos आणी नासा संस्थेशी ह्या अंतराळविरांचा लाईव्ह संपर्क साधण्यात आला 

संस्था- तुम्हा तिघांचे यशस्वी अंतराळप्रवास करुन स्थानकात सुखरूप पोहोचल्याबद्दल अभिनंदन ! तुमचा आम्हाला अभिमान वाटतो स्थानकातील तुमच आयुष्य सुखी, निरोगी जावो हि सदिच्छा! आता तुमचे president तुमच्याशी संवाद साधत आहेत

Yuliaआणी Klim -Thank you!

President-हि मोहीम यशस्वी केल्याबद्दल आणी तुमच्या स्थानकातील सुखरूप प्रवेशाबद्दल अभिनंदन! खरोखरच तुमची कामगिरी अभिनंदनीय आहे,स्थानकात तुमच सहर्ष स्वागत आहे! आता स्थानकातील तुमच वास्तव्य आनंदात जावो आणी तुम्ही तुमच कार्य व्यवस्थित पार पाडाल आणि तुमच मिशन यशस्वी कराल अशी आम्हाला खात्री वाटते तुम्ही फ्रेश आणी आनंदी दिसत आहात आता आपल्यातील अंतर खूप आहे तुम्ही पृथ्वीपासून खूप दुर आहात पण आपण आता लाईव्ह संपर्क साधुन संवाद साधु शकतोय तुम्ही खूप कमी वेळात खूप लवकर  तीन,साडेतीन तासाचा अंतराळ प्रवास करून  स्थानकाजवळ पोहोचलात ह्या प्रवासादरम्यान आणी आता स्थानकात पोहोचल्यावर तुमची मनस्थिती कशी होती आता काय भावना आहेत आमच्याशी शेअर करा

Yulia- खूप छान, अविश्वसनिय,स्वप्नवत ! हे सार अदभुत आहे,नवीन आहे मला अजूनही स्वप्नात असल्यासारख वाटतय हे सार मी प्रत्यक्षात अनुभवतेय मी स्थानकातील झीरो ग्रव्हिटीत पोहोचले ह्यावर अजूनही माझा विश्वास बसत नाहीय! Thanks आम्हाला हा अनुभव दिल्याबद्दल!

Klim- खरच माझीही मनस्थिती काहिशी अशीच आहे आता आम्ही काही मिनिटापुर्वी अंतराळात होतो आणी आता स्थानकातील झीरो ग्रव्हिटीतुन तुमच्याशी संपर्क साधतोय ह्यावर विश्वास बसत नाहीय स्वप्नात असल्यासारखे वाटतेय आम्हाला हि संधी दिल्याबद्दल आभार! आता लवकरच शुटींगला सुरवात करू

President- हे तुमच पहिल challenge आहे आम्हाला खात्री आहे तुम्ही त्या वातावरणात adjust व्हाल तुमच्या स्थानकातील सहकारी अंतराळवीरांच्या सहकार्याने तुम्ही तुमच शूटिंग पूर्ण कराल तुम्हाला शुभेच्छा!

रशियातील तुमचे चाहते आणि नागरिकांनी तुमच launching,अंतराळप्रवास आणी स्थानकातील प्रवेश लाईव्ह पाहिल त्यांनी तुमच अभिनंदन केलय,शुभेच्छाही दिल्यात त्या साऱ्यांना तुमचा अभिमान वाटतो पुन्हा एकदा तुमच अभिनंदन आणी तुम्हाला शुभेच्छा! आणि स्थानकातील सर्व अंतराळविरांचे आभार ते ह्या लाईव्ह कार्यक्रमाला ऊपस्थित राहिले त्या बद्दल आता आराम करा लवकरच पुन्हा संवाद साधु !

Yulia आणि  Klim- आम्ही Scotland आणी Mascot मधील आमच्या well-wisher ,चाहते ,अधिकारी आणि नागरिकांंचे आभारी आहोत !

Sunday 3 October 2021

स्थानकात होणार सिनेमाचे शूटिंग रशियन निर्माता अभिनेत्रीसह अंतराळवीर Anton Shkaplerov पाच ऑक्टोबरला स्थानकात जाणार

.@NASA TV will broadcast the launch of a @Roscosmos cosmonaut and two Russian spaceflight participants to the station on Tuesday at 4:55am ET. More... https://go.nasa.gov/2WAuy2O

 रशियन अभिनेत्री Yulia Peresild अंतराळवीर Anton Shkaplerov आणि सिनेनिर्माते Klim Shipenko स्थानकात जाण्याच्या ट्रेनिंग दरम्यान -फोटो -Roscosmos     

नासा संस्था -2 ऑक्टोबर 

नासाचे रशियन अंतराळवीर Anton  Shkaplerov पाच तारखेला चवथ्यांदा अंतराळस्थानकात राहण्यासाठी  जाणार आहेत त्यांच्या सोबत रशियातील सिनेनिर्माते Klim Shipenko आणिअभिनेत्री Yulia Peresild हे दोघेही स्थानकात जाणार आहेत तेथे ते रशियन सिनेमाचे शूटिंग करणार आहेत 

हे तिघेही पाच तारखेला मंगळवारी कझाकस्थानातील बैकोनूर येथील उड्डाणस्थळावरून सोयूझ MS-19 ह्या अंतराळयानातून स्थानकात जाण्यासाठी अंतराळात उड्डाण करणार आहेत त्यांचे सोयूझ यान स्थानिक वेळेनुसार सकाळी 4.55मिनिटाला ह्या तिघांना घेऊन अंतराळात झेपावेल आणि 8 वाजून बारा मिनिटाला स्थानकाजवळ पोहोचेल सोयूझ अंतराळयान स्थानकाजवळ पोहोचल्यानंतर अंतराळात दोन फेऱ्या मारेल दोन तासांनी सोयूझ यान आणि स्थानक ह्याच्यात संपर्क होईल त्यानंतर यान आणि स्थानक ह्यांच्यातील Docking आणि Hatching प्रक्रिया पार पडेल यान आणि स्थानकातील ह्या दोन्ही प्रक्रिया पार पडल्यानंतर ह्या तिघांचा स्थानकात प्रवेश होईल सध्या स्थानकात राहात असलेले अंतराळ मोहीम 65 चे अंतराळवीर ह्या तिघांचे स्थानकात स्वागत करतील 

अभिनेत्री Yulia Peresild आणि निर्माते Klim Shipenko हे पहिल्यांदाच अंतराळ प्रवास करणार आहेत हे दोघेही स्थानकात बारा दिवस मुक्काम करणार आहेत ह्या बारा दिवसाच्या वास्तव्यात सिनेनिर्माते Klim "Challenge"  ह्या  फिचर फिल्मचे शूटिंग करणार असून त्यात अभिनेत्री Yulia चाही सहभाग आहे अंतराळस्थानकातील झिरो ग्रॅव्हीटीत अंतराळवीर कसे राहतात त्यांना त्या विपरीत वातावरणात राहताना कोणकोणत्या समस्यांना सोमोरे जावे लागते याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन स्थानकातील अंतराळवीरांच्या निवासादरम्यानच्या जीवनमानाचे चित्रीकरण ते  करणार आहेत शिवाय भविष्यकाळात अंतराळविश्वात व्यावसायिक दृष्ठ्या सिनेसृष्ठीसाठी काय आव्हानात्मक संधी उपलब्ध होतील ह्याचा आढावाही ते घेणार आहेत ह्या स्थानकातील सिनेशुटिंगसाठी आणि अंतराळस्थानकातील वास्तव्यासाठी ह्या दोघांनी  रशियन अंतराळसंस्था Roscosmos आणि Moscow based Media Entities ह्यांच्याशी व्यावसायिक करारनामा साइन करून रीतसर परवानगी घेतली आहे 

सिनेनिर्माते Klim आणि अभिनेत्री Yulia हे दोघे अंतराळवीर Oleg Novitskiy ह्यांच्यासोबत 16 ऑक्टोबरला सोयूझ MS-18 ह्या अंतराळयानातून पृथ्वीवर परतणार आहेत तर अंतराळवीर Anton  Shkaplerov हे मात्र मार्चपर्यंत स्थानकात राहून तेथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होणार आहेत आणि नंतर अंतराळवीर Vande Hei आणि अंतराळवीर Dubrov ह्यांच्यासोबत पृथ्वीवर परततील 

ह्या तिघांच्या अंतराळउड्डाण,स्थानकातील Hatching, Docking आणि स्थानकातील प्रवेशाचे लाईव्ह प्रसारण नासा T.V. वरून करण्यात येणार आहे 

Wednesday 29 September 2021

Inspiration 4चे अंतराळयात्री तीनदिवस अंतराळ पर्यटन करून पृथ्वीवर परतले

 Space X Inspiration 4 चे अंतराळप्रवासी यानातील झिरो ग्रॅविटीतुन संवाद साधताना -फोटो - Inspiration 4

Space X - 

अमेरीकेची अमेरिकन भूमीवरून स्वयंनिर्मित अंतराळयानातुन अंतराळ ऊड्डान मोहीम यशस्वी झाल्यानंतर आता नागरिकांच्या  अंतराळ पर्यटन मोहीमाही यशस्वी होत आहेत  मागच्या महिन्यात Blue origin आणी Virgin Galactic कंपनीने सामान्य  हौशी नागरिकांना अंतराळ पर्यटन घडवल्या नंतर आता Elon Musk यांच्या Space X कंपनीनेही अंतराळ पर्यटनाचा शुभारंभ केला आहे 

मागच्या आठवड्यात Elon Musk ह्यांनी Resilience Crew Dragon मधून चार अंतराळ प्रवाशांना अंतराळात तीन दिवस अंतराळप्रवास घडविला आहे Inspiration 4 ह्या मोहिमेअंतर्गत चार नागरिक मागच्या आठवड्यात तीन दिवस अंतराळात फिरून आले ह्या तीन दिवसात अंतराळविरांचा मुक्काम अंतराळ यानातच होता आणी त्यांचे यान सतत पृथ्वीवरुन अंतराळात फेऱ्या मारत होते विषेश म्हणजे हे चारहीजण अंतराळवीर नव्हते पण त्यांना अंतराळात जाण्यासाठी विषेश ट्रेनिंग देण्यात आले होते

Inspiration 4 हि अंतराळपर्यटन मोहीम Jared Isaacman ह्या ऊद्योगपतींनी आयोजित केली होती त्यांनी त्यांच्या सह ह्या मोहिमेतील तिन अंतराळ प्रवाशांचा तिकिटाचा खर्च केला त्यांनीच तिघांना अंतराळप्रवासासाठी आमंत्रित केले होते हा खर्च तब्बल दोनशे मिलीयन डॉलर एव्हढा होता 


 Inspiration 4चे अंतराळप्रवासी Jared Isaacman,SainProctor,CrisSembroskiआणि Hayley Arceneaux फोटो- SpaceX Co . 
 ३8 वर्षीय Jared Isaacman हे Shift 4 payments ह्या कंपनीचे CEOआहेत ते अनुभवी साहसी पायलट आहेत त्यांनी ह्या मिशनच्या कमांडरपदाची आणी पायलटपदाची जबाबदारी पार पाडली त्यांच्या सोबत.Hayley Arceneaux,Chris Sembroski आणी Dr. Sian Proctor हे प्रवासी होते

 29 वर्षिय Hayley हि लहान मुलांच्या रिसर्च सेंटरमध्ये मेडिकल ऑफीसर आणी physician आहे आणी लहानपणी ती कॅन्सर ग्रस्त होती त्यातून ती बरी झाली तीच्या एका पायात रॉड बसविलेला आहे त्यामुळे कृत्रीम अवयवासोबत अंतराळप्रवास करणारी ती पहिली तरुणी ठरली आहे 

 51 वर्षीय Dr.Sian Proctor नासा संस्थेच्या माजी ऊमेदवार आणी Geo scientist ऊद्योजक आहेत त्या अनुभवी पायलटही आहेत  त्यांनी ह्या मिशनच्या पायलटपदाची जबाबदारी पार पाडली 

 42 वर्षीय Cris Sembroski हे Aerospace data engineer आणी माजी एअरफोर्स ऑफीसर आहेत ते ह्या मोहिमेचे pilot आणी मिशन प्रमुख होते

 नासाच्या Florida येथील Cape Canaveral ह्या ऊड्डान स्थळावरून ह्या चार अंतराळप्रवाशांना घेऊन स्पेस X चे Resilience हे अंतराळयान 15 सप्टेंबरला स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 8 वाजता अंतराळात झेपावले व तीन तासांनी 575k.m.अंतरावर अंतराळात पोहोचले हे अंतर स्पेस स्टेशन किंवा हबल टेलीस्कोप पेक्षाही जास्त होते त्यांचे अंतराळयान ताशी 27,360 की.मी ईतक्या प्रचंड वेगाने अंतराळ प्रवास करत होते आणी दर 90 मिनिटांनी पृथ्वीवर अंतराळात फेऱ्या मारत होते सलग तीन दिवस हे चौघे यानातुन अंतराळात फिरत होते ह्या तीन दिवसांंच्या अंतराळप्रवासा दरम्यान त्यांनी त्यांच्या शरीरात झीरो ग्रव्हिटीत काय बदल होतो शरीर त्या वातावरणात कसे adjust होते ह्याचे निरीक्षण नोंदवले त्यांनी त्यांच्या कुटुंबियांशी चॅट करून संवादही साधला

Jared ह्यांनी अंतराळयान सुरक्षित पणे अंतराळात पोहोचल्यावर संस्थेशी संपर्क साधला आणी आम्ही आता 575 k.m.अंतरावर पोहोचलो असुन आम्ही देखील सुरक्षित असल्याचे दाखवले आम्ही स्पेस X चे खूप आभारी आहोत कारण त्यांच्या मुळे आम्ही अंतराळात पोहोचलो आणी ईथुन पृथ्वीच सौंदर्य पाहु शकलो स्पेस X अंतराळयान अत्यंत स्पेशिअस आणी आरामदायी आहे यानाला मोठ्या खिडक्या आहेत त्यातून आम्ही बाहेर पाहु शकतो असे सांगितले

हेली म्हणाली ईथे झीरो ग्रव्हिटीत तरंगण्याचा अनुभव खुप रोमांचक आहे आम्ही त्याची मजा अनुभवतोय ईथे सारच तरंगत ईथे गोलाकार,वर खाली कसेही तरंगता येत त्याच अवस्थेत ऊभेहि रहाता येत असे म्हणत तीने तरंगत गोलाकार,वरखाली फिरून दाखवल तिने आणलेल्या साफ्टटाईज डॉगदेखील कसा तरंगतो हे देखील दाखवल शिवाय पाण्याची बाटली अंतराळात कशी फिरते सोबतच त्यातील पाणी देखील गोलाकार कसे फिरते ह्याच प्रात्यक्षिक दाखवल हा अनुभव पृथ्वीवर येत नाही असे म्हणत तीने खिडकीतून खाली अंतराळातील सौंदर्य दाखवल खरच हा रोमांचकारी अनुभव दिला त्या बद्दल आम्ही स्पेस X चे खूप आभारी आहोत!

सियान ह्यांनी देखील हा अंतराळप्रवास रोमांचक आणी अविस्मरणीय असल्याचे सांगितले त्यांनी देखील यानाच्या खिडकीतून अंतराळातील सौंदर्य दाखवल दर 90 मिनिटात दिवस आणी रात्रीचा अनुभव घेताना अंधारात चकाकणारे तारे, क्षितिजा वरच्या कलरफुल आकर्षकAvoraचे दर्शन घडवले शिवाय पृथ्वीपासून दुर अंतराळात Metallic Marker च्या सहाय्याने त्यांनी यानात काढलेल चित्रही दाखवल

क्रिस ह्यांनी देखील स्पेस X चे आभार मानत हे सार अदभूत आहे रोमांचकारी आहे अस सांगितल ते म्हणाले अंतराळभ्रमण करताना सियान ह्यांनी चित्र काढल तसच मीही संगीत वादनाचा अनुभव घेतला त्यांनी गिटार वादन करत गाणेही म्हणून दाखवले ह्या साठी मी खूप आधी तयारी केली होती ईथे मी गायलेल गाण तुम्हाला व्यवस्थित ऐकू येईल की नाही माहिती नाही पण मी प्रयत्न केला आहे 

तीन दिवसांच्या अंतराळ प्रवासानंतर हे चारहीजण शनिवारी अठरा तारखेला संध्याकाळी पृथ्वीवर परतले स्पेस X  Resilience अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करताच हे चारही जण parachutes च्या सहाय्याने Atlantic महा  सागरात ऊतरले तेव्हा स्पेस X ची रिकव्हरी बोट तेथे पोहोचली त्यांनी चौघांना सुरक्षित बाहेर काढले पृथ्वीवरच्या कक्षेत शिरताना आणी परतताना यानाला अनेक प्रक्रिया पार पाडाव्या लागल्या हे चारहीजण पृथ्वीवर परतले तेव्हा खूप आनंदात होते त्यांनी पुन्हा हा अंतराळप्रवास घडवल्या बद्दल स्पेसX च्या Elon Musk यांचे आभार मानले आणी सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत त्यांच्या अंतराळ प्रवासाचे अनुभव शेअर केले  

Saturday 18 September 2021

नासाचे चार अंतराळवीर ऑक्टोबर मध्ये Space X Crew Dragon मधून स्थानकात राहायला जाणार

 SpaceX Crew-3 astronauts (from left) Matthias Maurer, Thomas Marshburn, Raja Chari and Kayla Barron are pictured during preflight training at SpaceX headquarters in Hawthorne, California.

 Space X Crew -3 चे अंतराळवीर Matthias Maurer युरोपियन अंतराळवीर Thomas Marshburn अंतराळवीर राजा चारी आणि अंतराळवीर Kayla Barron-California येथील Space X Headquarter मधील ट्रेनिंग दरम्यान -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था -10 सप्टेंबर 

नासाचे चार अंतराळवीर Matthias Maurer,Thomas Marshburn,Kayla Barron आणि भारतीय वंशाचे अंतराळवीर राजा चारी नासाच्या Space X Crew -3 Dragon मोहिमे अंतर्गत 31 ऑक्टोबरला स्थानकात राहायला जाणार आहेत 

नासाच्या Florida येथील Kennedy Space Center मधील 39 A ह्या उड्डाण स्थळावरून Space X Crew Dagon 31 ऑक्टोबरला ह्या चारही अंतराळवीरांना घेऊन Falcon -9 रॉकेटच्या साहाय्याने अंतराळात उड्डाण करणार आहे  नासाचे अंतराळवीर राजा चारी ह्यांची ह्या मोहिमेच्या कमांडरपदी तर युरोपियन अंतराळवीर Tom Marshburn ह्यांची पायलट पदी निवड करण्यात आली आहे नासाचे अंतराळवीर Kayla Barron आणि Matthias Maurer हे दोघे ह्या मोहिमेचे मिशन Specialist म्हणून काम पाहतील हे चारही अंतराळवीर स्थानकात सहा महिने वास्तव्य करतील आणि तेथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतील 

भारतीय वंशाचे राजा चारी पहिल्यांदाच स्थानकात राहायला जाणार असून त्यांची हि पहिलीच अंतराळवारी आहे त्यांच्या प्रमाणेच अंतराळवीर Maurer आणि अंतराळवीर Kayla हे दोघेही प्रथमच अंतराळ प्रवास करून स्थानकात राहायला जाणार आहेत अंतराळवीर Tom Marshburn मात्र ह्या आधी दोनदा स्थानकात गेले होते त्यांची हि तिसरी अंतराळवारी आहे 

हे चारही अंतराळवीर स्थानकात गेल्यानंतर मोहीम 65चे चार अंतराळवीर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात Endeavour Crew Dragon मधून पृथ्वीवर परततील अंतिम ट्रेनिंगला जाण्याआधी हे चारही अंतराळवीर अमेरिकन आणि आंतरराष्ट्रीय पत्रकारांशी संवाद साधून ह्या मोहिमेविषयी माहिती देणार आहेत मात्र त्या साठी नासा संस्थेची परवानगी घेणे आवश्यक आहे

Friday 17 September 2021

अंतराळस्थानकातील मीरचीच्या रोपांना आली फुले

 Pepper plants on the Advanced Plant Habitat aboard the International Space Station

 अंतराळस्थानकातील व्हेजी चेंबर मधल्या उशी वाफाऱ्यात वाढलेली मिरचीची रोपे आणि त्याला आलेली फुले -फोटो- नासा संस्था 

 नासा संस्था-15 सप्टेंबर

पृथ्वीपासुन दुर अंतराळात स्थानकातील झीरो ग्रॅव्हीटीत सतत तरंगत्या अवस्थेत रहाणाऱ्या अंतराळविरांना पृथ्वीवरच्या सारखे ताजे गरम जेवण ताज्या भाज्या व फळे खायला मिळत नाहीत त्यांना पृथ्वीवरुन पाठवलेले प्रिर्झव्ह थंड अन्न व भाज्या खाव्या लागतात कारण तेथे ईथल्या सारखी सृष्ठि किंवा वातावरणच नाही म्हणून नासा संस्थेतील शास्त्रज्ञ स्थानकातील व्हेजी चेंबरमधील कृत्रीम बागेत पृथ्वीसारखे वातावरण निर्माण करून व्हेजी प्रोजेक्ट अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, फळे व धान्य पिकवण्याचे प्रयोग सतत करत असतात आणि ते यशस्वीही होत आहेत

अंतराळविरांना सतत झीरो ग्रॅव्हिटीत तरंगत्या अवस्थेत रहावे लागत असल्याने त्यांच्या शरीरावर विपरीत परीणाम होतो त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यांना व्हिटॅमिन युक्त आरोग्यदायी जेवण मिळावे विषेशतः ताजी हिरवी पालेभाजी व फळे मिळावीत म्हणून संशोधक सतत प्रयत्न करत आहेत भविष्यकालीन दुरवरच्या अंतराळनिवासात अंतराळविरांना पृथ्वीवरून अन्न  पाठविताना वेळ लागेल त्यामुळे त्यांना स्थानकातच स्वतः अन्न .भाजी व फळे पिकवुन खाता यावीत म्हणून नासाचे शास्त्रज्ञ स्थानकात व्हेजी प्रोजेक्ट राबवत आहेत शास्त्रज्ञांच्या ह्या प्रयत्नांना आता पुन्हा यश मिळाले आहे स्थानकातील व्हेजी प्रोजेक्ट अंतर्गत लावलेल्या मीरचीच्या रोपांना आता फुले आली आहेत ह्या आधी देखील अंतराळविरांनी स्थानकात गहु, Lettuce, लाल कोबी, ह्या सारख्या भाज्या लाऊन त्यांची चवही चाखली आहे स्थानकात सध्या Advanced Plant Habitat (APH) प्रोजेक्ट सुरू आहे  Plant Habitat -04  प्रोजेक्ट अंतर्गत स्थानकातील व्हेजी चेंबरमध्ये वेगवेगळ्या भाज्यांची रोपे व बिया लावण्यात आल्या आहेत आता त्या रोपांची चांगली वाढ झाली असुन त्यातील चार मिरचीच्या रोपांना भरपूर हिरवी गार पाने आणी फुले आली आहेत

अंतराळस्थानकातील झीरो ग्रॅव्हिटीत मिरचीची रोपे वाढविणे सोपे नव्हते खूप आव्हानात्मक काम होते पण अंतराळविरांनी त्यांच्या संशोधनाच्या कामातून मिळालेल्या रिकाम्या वेळात ह्या रोपांची  निगा राखुन हि रोपे वाढविण्यात यश मिळवले आहे ह्या रोपांच्या वाढीसाठी त्यांना नासाच्या केनेडी स्पेस सेंटर मधील शास्त्रज्ञांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले स्थानकातील वातावरणात मिरचीची रोपे वाढविणे सोपे नव्हते कारण मिरचीचे रोप वाढण्यासाठी खूप दिवस लागतात साधारण चार महिन्यांचा काळ नासाचे अंतराळवीर Shane Kimbrough ह्यांनी बारा जुलैला स्थानकातील व्हेजी चेंबरमधील उशी वाफाऱ्यात हि रोपे लावली होती त्या रोपांची आता चांगली वाढ झाली आहे त्याला भरपूर हिरवीगार पाने आली आहेत आणी त्या पानांना फुले देखील आली आहेत आता आक्टोंबरमध्ये पहिल्या मिरच्या आणी नोव्हेंबरमध्ये दुसऱ्या मिरच्या येतील 

मिरचीची वाढलेली हि रोपे आणी फुले पाहून अंतराळवीर आनंदित झाले आहेत कारण अंतराळविरांना स्थानकात मिळत असलेले प्रिर्झव्ह अन्न कमी तिखट असते त्यांना चव आणण्यासाठी त्यांना Chili sauceचा वापर करावा लागतो आता स्थानकातच मिरची आल्यावर त्यांना त्यांच्या जेवणात ताज्या मिरच्यांचा आस्वाद घेता येणार आहे स्थानकातील मिरचीची रोपे आणी त्यांना आलेल्या फुलांचे फोटो सध्या अंतराळस्थानकात रहात असलेल्या नासाच्या अंतराळवीर Megan McArthur ह्यांनी नासा संस्थेत पाठवले आहेत

Monday 13 September 2021

नासाच्या Perseverance यानाला मिळाले अखेर मंगळभूमीवरील नमुने गोळा करण्याच्या प्रयत्नांना यश

 

   Perseverance मंगळयान Jezero Crater ह्या भागातील खोदकामादरम्यान फोडलेला खडक आणि त्याला छिद्र पाडून गोळा केलेला चुरा -फोटो नासा संस्था 

नासा संस्था -11सप्टेंबर 

नासाच्या Perseverance मंगळ यानाला अखेर मंगळावरील भूगर्भातील खडकांचे नमुने गोळा करण्यात यश मिळाले आहे मागच्या महिन्यात Perseverance यानाचा नमुने गोळा करून कुपीत भरण्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला होता पण आता मंगळ यानाने यशवीपणे खडकांचे नमुने गोळा केले आहेत 

Perseverance यानाने सहा सप्टेंबरला पहिला आणि आठ सप्टेंबरला दुसऱ्या खडकाचा नमुना गोळा करून त्याला छिद्र पाडून त्याचा चुरा यशस्वीपणे कुपीत भरण्यात यश मिळवले आहे शास्त्रज्ञांनी सहा सप्टेंबरला गोळा केलेल्या पहिल्या खडकाच्या नमुन्यास Montdenier आणि दुसऱ्या खडकाच्या नमुन्यास Montagac असे नाव दिले आहे हे खडकांचे नमुने अत्यंत बारीक असून ते पेन्सिलच्या टोकापेक्षा किंचित जाड आहेत Perseverance यानाला बसविलेल्या रोबोटिक आर्म आणि आत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने मंगळावरील भूगर्भातील जमीन खणून नंतर खडक फोडून त्याचे तुकडे केल्यानंतर त्याचा चुरा,माती,धूळ आणि मिनरल्सचा चुरा योग्य प्रमाणात घेऊन कुपीत भरून सीलबंद करण्यात यानाला आता यश मिळाले आहे मागच्या महिन्यातील पहिल्या प्रयत्नात खडक फोडून त्याचा चुरा करून कुपीत भरताना यानाला अडथळा येत होता ह्या समस्येवर Perseverance टीमने अखेर मात केली आहे 

Perseverance चे हे यश पाहून नासाच्या California येथील JP L lab चे ह्या टीमचे प्रमुख शास्त्रज्ञ Ken Farley आनंदित झाले आहेत त्यांच्या मते ह्या पहिल्या खोदकामात सापडलेले खडक बेसाल्ट प्रकारचेआहेत मंगळावरील भूगर्भातील Volcanicघडामोडीदरम्यान ज्वालामुखीतून बाहेर पडलेला अतिउष्ण लाव्हारस थंड झाल्यावर निर्माण झाले असावेत ह्या खडकातील Crystals आणी Minerals ह्या वर सखोल संशोधन केल्यावर शास्त्रज्ञांना मंगळावरील भूगर्भातील घडामोडी आणि तेथील पूरातन काळातील  प्रवाहित पाण्याच्या अस्तित्वाचा निश्चित काळ शोधता येईल शिवाय मंगळावरील Jezero Crater भागाच्या आणि तेथील Jezero Lake  निर्मितीचा ऐतिहासिक काळ आणी  तो कधी निर्माण झाला आणि कधी नष्ठ झाला हेही समजेल शिवाय मंगळ ग्रहावरील पुरातन काळच्या वातावरण बदलाची आणी भुगर्भिय अंतर्गत घडामोडींची माहितीही मिळेल

मंगळावरील ह्या खडकांच्या नमुन्यात आढळलेल्या  मिठाच्या अस्तित्वामुळे त्या काळी जमीनीखाली पाण्याचे अस्तित्वही होते हे सिद्ध झाले आहे  Volcanic घडामोडी दरम्यान भुगर्भातून बाहेर पडणाऱ्या lava रसाच्या अती ऊष्णतेमुळे जमीनीखालुन वहाणारे पाणी आटले असावे त्यामुळे त्या पाण्याची वाफ झाली असावी त्यातील काही ऊकळत्या पाण्याचे बुडबुडे आटले आणी त्याच स्वरूपात खडकात राहिले असावेत कदाचित लाव्हारस थंड होऊन दगड बनताना तयार झालेल्या केमिकल मध्ये हे खारट पाणी मिक्स झाले असावे म्हणून हे पाण्याचे बुडबुडे खडकात आटलेल्या स्वरूपात दिसत आहेत किंवा खडक तयार होताना झालेल्या केमिकल reaction मध्ये खारे पाणी मिक्स झाल्याने खडकात मीठ आढळले असावे असे मत शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत

ह्या खडकात मिठाचे अंश सापडल्यामुळे तेथे पुरातन काळी पाणी अस्तित्वात होते ह्याला पृष्ठी मिळते आणी जर पाणी असेल तर निश्चितच तेथे सजीव सृष्ठिचे अस्तित्व असेल त्यांच्या दैनंदिन वापरातील मीठ जमिनीत मुरले असेल आणी आटलेल्या स्वरूपात तेथे राहिले असेल असा अंदाजही शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत Perseverance टिममधील शास्त्रज्ञांच्या मते तेथील तळ्यातील किंवा आटलेल्या नदिपात्रातील पाणी प्रवाहित स्वरूपात होते पण हि नदी कीती काळ प्रवाहित होती आणी कधी त्यातील पाणी नष्ट झाले तो काळ निश्चित सांगता येत नाही कदाचित तेथे अचानक आलेल्या पुराच्या पाण्याच्या प्रचंड लोंढ्याने  ते तळे एकदमच भरून वहात असेल आणी बहुधा तो काळ पन्नास वर्षांचाही असेल आणी त्यानंतर तळ्यातील पाणी नष्ठ झाले किंवा आटले असावे मंगळावरील अतीऊष्णता अतीपाऊस,वादळवारे आग ह्यामुळेही वातावरणात बदल झाला असावा असे मतही शास्त्रज्ञ व्यक्त करतात 

कारण काहीही असले तरीही तेथे पुरातन काळी नदीपात्रात किंवा तळ्यात पाणी वहात होते म्हणजेच जमीनीखालुन आणी वरूनही प्रवाहित पाण्याचे अस्तित्व होते ह्या शक्यतेला दुजोरा मिळतो आणी कालांतराने कदाचित पन्नास वर्षांनी मंगळावर उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे हे पाणी कमी झाले किंवा आटले आणी खडकाळ भागातून वहात गेले असावे आणी कालांतराने नष्ठ होत गेल्यावर आटलेल्या स्वरूपात खडकात अस्तित्वात राहिले असावे मंगळावरील Jezero Crater भाग पुरातनकाळी पाणथळ असल्याचे पुरावे मिळाल्याने शस्त्रज्ञानी हा भाग संशोधनासाठी निवडला आहे आता Perseverance यानाने गोळा केलेल्या खडकांचे पुरावे जेव्हा पृथ्वीवर आणले जातील तेव्हा आणखी सखोल संशोधन केल्यावर तेथील पाण्याच्या आणि सजीवसृष्टीच्या अस्तित्वाचा निश्चित काळ समजेल त्यामुळेच हे नमुने आमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहेत असे ह्या मोहिमेचे प्रमुख शास्त्रज्ञ Mitch Schulte म्हणतात 

 NASA’s Perseverance rover shows a sample tube with its cored-rock contents inside

 Perseverance यानाने रोबोटिक आर्मच्या साहाय्याने Titanium Sample Tube मध्ये गोळा केलेल्या खडकाचा नमुना -फोटो -नासा संस्था 

सध्या Perseverance मंगळयान मंगळभूमीवरील खडकांचे नमुने गोळा करीत आहे आता पुढील खोदकाम मंगळावरील Jezero Crater च्या South Seitah ह्या भागात कारण्यात येणार आहे शास्त्रज्ञ ह्या भागाला Broken Dinner Plate सारखा आहे असे म्हणतात नुकतेच Ingenuity Helicopter ने मंगळ ग्रहावरील आकाशात तेरावी भरारी मारून तेथील भागातील उंचावरून घेतलेले रंगीत फोटो पृथ्वीवर पाठवले आहेत Ingenuity हेलिकॉप्टरने  3.3प्रतिसेकंद वेगाने 8 मीटर उंचीवर भरारी मारून तेथील फोटो घेतले ह्या फोटोतून ह्या  भागात देखील पुरातनकाळी पाणी वाहात होते असे पुरावे मिळाले आहेत ह्या भागात आटलेले नदीपात्र त्याचे काठ,काठाभोवती वाळूच्या लहरी आणि वाळू,नदीतील गाळ,माती ह्यांच्या पासून तयार झालेले खडकांचे लेअर्स Sedimentary खडक आढळले आहेत Perseverance यान त्याच्या रोबोटिक आर्मवर बसविलेल्या अत्याधुनिक यंत्रणेद्वारे मंगळभूमीवरील ह्या भागात 200 मीटर खोल खणून त्यातील खडक,मिनरल्स फोडून त्याचा चुरा करणार आहे आणि रोबोटिक आर्मच्या साहाय्याने हा चुरा,माती मिनरल्सचे सॅम्पल Airtight Titanium tube मध्ये भरून सीलबंद करणार आहे त्यानंतर Perseverance यानात ह्या सॅम्पल tubes व्यवस्थित ठेवल्या जातील आणि भविष्यकालीन मंगळ मोहिमेत नासा आणि ESA ह्यांच्या सहकार्याने मंगळावर यान पाठवून त्यातून ह्या Titanium Sample Tubes पृथ्वीवर आणल्या जातील आणि त्यावर नासा संस्थेतील शास्त्रज्ञ सखोल संशोधन करतील 

Wednesday 1 September 2021

अंतराळवीरांनी स्थानकात साजरा केला Megan McArthur ह्यांचा 50वा वाढदिवस

अंतराळवीर Megan ह्यांचा पन्नासावा वाढदिवस आनंदाने साजरा करताना स्थानकातील अंतराळवीर -फोटो नासा संस्था

नासा संस्था -31 ऑगस्ट 

नासाच्या अंतराळमोहीम 65 च्या अंतराळवीरांनी स्थानकात एकत्रित येत पार्टीचे आयोजन करून Megan ह्यांचा पन्नासावा वाढदिवस तीस ऑगस्टला आनंदात साजरा केला विशेष म्हणजे त्या वेळी Megan  यांच्यावर स्थानकात येणाऱ्या Space X Cargo Spacecraft च्या docking ची जबाबदारी होती 


                    अंतराळवीर Megan Gift Box मधील सामान काढताना -फोटो -नासा संस्था 

Space X Cargo Spacecraft सोमवारी अंतराळ स्थानकात पोहोचले त्यातून स्थानकासाठी लागणारे हार्डवेअर  ,सायंटिफिक प्रयोगासाठीचे आणि अंतराळवीरांसाठी आवश्यक असलेले जवळपास 48 पाऊंड वजनाचे सामान पाठवण्यात आले होते त्या सामाना सोबतच Megan McArthur ह्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्य नासा संस्थेतर्फे गिफ्टबॉक्सही पाठवण्यात आला होता ह्या बॉक्समध्ये Megan ह्यांच्यासाठी केक,Ice cream ,Avocados ,चेरी टोमॅटोज व इतर डेकोरेशनचे साहित्य पाठविण्यात आले होते अंतराळस्थानकातील इतर सहा अंतराळवीरांसाठीही त्यात treat पाठविण्यात आली होती स्थानकातील सर्व अंतराळवीरांनी आपली कामे लवकर आटोपून एकत्रित येऊन पार्टीचे आयोजन केले त्यांना मिळालेल्या सामानाने डेकोरेशन करून Megan ह्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला 

                    

                        अंतराळवीर Thomas Pesquet केक वर सजावट करताना -फोटो नासा संस्था 

नासा संस्थेशी बोलताना त्या म्हणाल्या ह्या आधी माझ्या वाढदिवसाला कोणी Spacecraft पाठवल नव्हत इतक छान गिफ्ट मला पहिल्यांदाच मिळाल मी आभारी आहे Thanks ! आजच Birthday Celebration किती विशेष आहे माझ्या स्थानकातील भावांनी तो स्पेशल केला आहे आजच्या डिनरमध्ये Quesadillas , Tortilla ,Pizzas ,सोबत चीझ,कुकीज् ,डेकोरेट केलेला चॉकलेट केक आणि Candles आणि अजून आम्ही ice creamचे पॅकेट्स उघडले नाहीत बहुतेक पुन्हा पार्टी मला वाटतय तस! ह्या सर्वांचे आभार !

अंतराळवीरांनी स्थानकात साजरी केली Floating Pizza Night

        
 
नासा संस्था- 1 सप्टेंबर
मोहीम 65 च्या अंतराळवीरांनी मागच्या आठवड्यात  पिझ्झा पार्टी साजरी केली अंतराळवीर Thomas Pesquet ह्यांनी ह्या पार्टीच वर्णन Floating Pizza Night असे केले आहे 

नासाचे Cygnus Spacecraft मागच्या आठवड्यात  स्थानकात पोहोचले त्यात स्थानकासाठी व तिथे सुरु असलेल्या सायंटिफिक प्रयोगासाठी लागणारे आवश्यक सामान पाठवण्यात आले होते शिवाय ह्या Cargo Spacecraft मधून अंतराळवीरांच्या निरोगी आयुष्यासाठी आवश्यक असणारी ताज़ी फळे व अन्न पदार्थ पाठवण्यात आले होते त्या मध्ये सफरचंद,किवी,टोमॅटो ह्या ताज्या फळांसोबत अंतराळविरांसाठी पिझ्झा व तो बनविण्यासाठी लागणारे साँसेस,चीज वै सामानही पाठवण्यात आले होते
 
    Floating Pizza Night
अंतराळविरांनी अंतराळस्थानकातील तरंगत्या वातावरणात हा पिझ्झा खाण्यासाठी एकत्रित पार्टी करून पिझ्झा खाण्याचा आनंद लुटला अंतराळवीर Thomas Pesquet ह्यांनी ह्या पार्टीच वर्णन Floating pizza night असे केले माझ्या स्थानकातील मित्रांसोबत साजरी करताना मला क्षणभर पृथ्वीवरील शनिवारची आठवण झाली ईथे अंतराळ स्थानकात आमच्या प्रमाणे सगळ्या वस्तूही तरंगतात त्या मुळे पिझ्झा हातात पकडून त्यावर साँसेस, चीज टाकून खाण म्हणजे कसरतच असते आम्ही खूप enjoy करतो असे क्षण!  ह्या पिझ्झा पार्टीचे क्षण सोशलमिडीयावरून त्यांनी शेअर केले आहेत 
 

Tuesday 24 August 2021

नासाचे Commercial Space X Dragon Cargo Spacecraft 28 ऑगस्टला अंतराळस्थानकात जाणार

The SpaceX Falcon 9 rocket carrying the Dragon cargo capsule soars upward after lifting off from Launch Complex 39A at NASA's Kennedy Space Center in Florida on June 3, 2021.

नासा संस्था -21 ऑगस्ट 

नासाचे Space X Cargo Spacecraft 28 ऑगस्टला अंतराळवीरांसाठी आणि स्थानकासाठी लागणारे आवश्यक सामान घेऊन स्थानकात जाणार आहे ह्या Cargo Spacecraft च्या उड्डाणाचे लाईव्ह प्रक्षेपण नासा T.V. वरून करण्यात येणार असून नागरिकांना आभासी पद्धतीने हे उड्डाण पाहण्याची संधी नासा संस्थेने जाहीर केली आहे

नासाच्या Florida येथील Kennedy Space Center Florida मधील 39 A Launch Complex वरून  28 ऑगस्टला दुपारी 3.37मिनिटाला (EDT) Space X Cargo Spacecraft अंतराळस्थानकात जाण्यासाठी उड्डाण करेल Falcon 9 ह्या Rocket च्या साहाय्याने अंतराळात झेपावल्यानंतर बारा मिनिटात Cargo Spacecraft रॉकेट पासून वेगळे होऊन अंतराळस्थानकाच्या दिशेने मार्गस्थ होईल आणि रविवारी 29ऑगस्टला स्थानकाजवळ पोहोचेल त्यानंतर Dragon Spacecraft मधील स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित होईल आणि Spacecraft स्थानकाशी जोडले जाईल अंतराळ मोहीम 65 चे अंतराळवीर आणि Flight Engineers Shane Kimbrough आणि Megan McArthur अंतराळस्थानकातून ह्या Spacecraft च्या Docking आणी Hatchingची प्रक्रिया पार पाडतील हे Spacecraft एक महिन्यापर्यंत स्थानकाला जोडलेले राहील आणि नंतर पृथ्वीवर परतेल 

ह्या Spacecraft मधून अंतराळवीरांसाठी लागणारे आवश्यक सामान,पृथ्वीवरील नासा संस्थेत संशोधित केलेल्या सायंटिफिक प्रयोगाचा डाटा आणि इतर आवश्यक सामान पाठवण्यात येणार आहे ह्या मध्ये पृथ्वीवरील नासा संस्थेत संशोधित करण्यात आलेल्या सायंटिफिक प्रयोगाचा डाटा पाठविण्यात येणार असून अंतराळस्थानकातील झिरो ग्रॅव्हीटीतील फिरत्या लॅब मध्ये ह्या प्रयोगाचे पुन्हा टेस्टिंग करण्यात येणार आहे अंतराळवीरांच्या निरोगी आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रयोगांचाही त्यात समावेश आहे अंतराळवीर स्थानकातील झिरो ग्रॅव्हीटीत सतत तरंगत्या अवस्थेत राहतात त्या मुळे त्यांची शारीरिक हालचाल होत नाही त्यामुळे त्यांचे स्नायू आखडतात शिवाय त्यांना तिथे प्रिझर्व केलेले अन्न खावे लागते परिणामी त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो त्यांची हाडे ठिसूळ होतात हे दुष्परिणाम टाळण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा वाईन तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बिया ह्या Spacecraft मधून पाठवण्यात आल्या आहेत शास्त्रज्ञ त्यांना आरोग्यदायी अन्न मिळावे म्हणून सतत प्रयोग  करत असतात स्थानकातील veggie चेंबर मध्ये veggie प्रोजेक्ट राबवून वेगवेगळ्या भाज्या,सलाद वै  पिकवल्या जात आहेत आता स्कॉउट गर्ल्सनी संशोधित केलेले काही plants स्थानकात पाठवण्यात येणार आहेत शिवाय त्यांनी ants आणि brine shrimp ह्यांच्यावर झिरो ग्रॅव्हीटीत काय परिणाम होतो हे अभ्यासण्यासाठी स्थानकात पाठवले आहेत ह्या शिवाय काही संशोधित औषधे आणि पृथ्वीवर अचानक काही आपत्ती ओढवल्यास त्या संकटावर मात करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या रोबोटिक आर्मचाही ह्या Spacecraft मध्ये समावेश करण्यात आला आहे 

ह्या Space X Cargo Spacecraft च्या launching चे लाईव्ह प्रसारण नासा T.V. वरून करण्यात येणार असून नागरिकांना आभासी पद्धतीने तो पाहता येणार आहे सोशल मीडियावरूनही ह्याचे लाईव्ह प्रसारण होणार असून ह्या दरम्यान काही निवडक पत्रकारांच्या प्रश्नांना Kennedy Space Center मधील शास्त्रज्ञ उत्तरे देणार आहेत अर्थात त्यासाठी नासा संस्थेची परवानगी घेणे आवश्यक आहे 

Thursday 12 August 2021

पृथ्वीवरील मंगळासारख्या कृत्रिम वातावरणात एक वर्ष राहण्यासाठी सुवर्णसंधी जाहीर

 

 https://www.nasa.gov/sites/default/files/thumbnails/image/icon_nasa_chapea_mars-dune-alpha-000-wm.png

         Mars Dune Alpha -पृथ्वीवरील नासा संस्थेतील कृत्रिम मंगळसृष्टीचे नियोजित मॉडेल -फोटो -नासा संस्था  

नासा संस्था -7 ऑगस्ट 

सध्या नासाचे Curiosity आणि Perseverance मंगळयान आणि Ingenuity mars Helicopter मंगळावर कार्यरत आहे त्यांच्या मार्फत मंगळावरील पुरातन सजीव सृष्टीला दुजोरा देणारे पुरावे गोळा केल्या जात आहेत शिवाय भविष्यकालीन मंगळमोहिमेत मानव निवासासाठी पृथ्वीसारख्या पोषक वातावरणाचाही शोध घेतल्या जात आहे इथे पृथ्वीवरील नासा संस्थेतही भविष्यकालीन मंगळ मोहिमेची जोरदार तयारी सुरु आहे आगामी मानवासहित मंगळ मोहिमेसाठी आवश्यक वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत नासाचे अंतराळवीर प्रत्यक्षात मंगळ ग्रहांवर राहायला जाण्याआधी त्यांच्या मंगळनिवासासाठी उपयुक्त अभिनव उपक्रम राबविले जात आहेत  

ह्याच उपक्रमाअंतर्गत नासा संस्थेने मंगळावर राहण्यासाठी जायला उत्सुक असलेल्या धाडसी  उमेदवारासाठी सुवर्णसंधी जाहीर केली आहे ह्या उपक्रमाअंतर्गत निवड झालेल्या चार शिकाऊ अंतराळवीरांना नासाच्या Johnson Space Center संस्थेतील मंगळासारख्या कृत्रिम  वातावरण निर्मिती केलेल्या छोट्या खोलीत एकवर्ष निवास करावयाचा आहे भविष्यकालीन मंगळमोहिमेतील अंतराळवीरांच्या मंगळनिवासासाठी हा प्रयोग करण्यात येणार असून त्याची सुरवात 2022 मध्ये होणार आहे 

ह्या साठीची ऊमेदवार निवडीची प्रक्रिया अंतराळवीरांच्या निवडीसारखीच असेल त्या साठी आवश्यक पात्रता खालील प्रमाणे आहे 

उमेदवार अमेरिकन देशाचा नागरिक असावा व त्याचे वय तीस ते पंचावन्न वयोगटातील असावे 

उमेदवाराने  Stem Field मधील Medical ,Engineer,Biology ,Mathematics,Physics किंवा Computer Science मध्ये Masters किंवा डॉक्टरेट डिग्री मिळविलेली असावी त्याला दोन वर्षांचा Stem Professionalचा अनुभव असावा शिवाय त्याने Aircraft उड्डाणाच्या piloting चे प्रशिक्षण घेतलेले असावे आणि कमीतकमी आकाशात 1000 तासाचा उड्डाणाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल तो Test Pilot Program मध्ये सहभागी असावा आणि त्याला चार वर्षांचा अनुभव असण आवश्यक आहे  Military Officer Training घेतलेल्या किंवा stem मधील Bachelor Science पदवीधर उमेदवारास प्राधान्य दिले जाईल ऊमेदवारांना एक वर्षाच्या निवासादरम्यान नासा संस्थेशी संपर्क साधताना अडचण येऊ नये म्हणून त्यांना ईंग्लीश व ईतर भाषा अवगत असणे आवश्यक आहे  

ह्या सर्व आवश्यक बाबी पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवाराची निवड झाल्यानंतर उमेदवाराला नासा संस्थेच्या Houston येथील Johnson Space Center मधील शास्त्रज्ञ निर्मित कृत्रिम मंगलसृष्टी असलेल्या वातावरणातील छोट्या खोलीत एक वर्ष राहायचे आहे ह्या मोहिमेला Crew Health &Performance Exploration Analog असे नाव देण्यात आले आहे ह्या मोहिमेत तीन ग्रुप तयार करण्यात येणार असून प्रत्येक ग्रुप मध्ये चार उमेदवारांचा समावेश करण्यात येईल त्या पैंकी पहिल्या ग्रुप साठी  हि जाहिरात देण्यात आली असून 2022 साली पहिल्या मोहिमेचा शुभारंभ होईल 

निवड झालेल्या ऊमेदवारांना Johnson Space Center मधील 1,700 sq.foot जागेत तयार केलेल्या Mars Dune Alpha ह्या 3D printing  चा वापर केलेल्या खोलीत वर्षभर रहावे लागेल ह्या एक वर्षाच्या निवासादरम्यान ऊमेदवारांच्या मानसिक आणी शारिरीक दृष्ठ्या काय समस्या ऊद्भवतात त्यांच्या आरोग्यात काय बदल होतात मानवी शरीर मंगळासारख्या वातावरणाला कसे सामोरे जाते ह्याचे निरीक्षण नोंदवून त्या समस्या निवारण्यासाठी ऊपाय शोधले जातील त्या साठी नवीन technology शोधल्या जातील ह्याचा ऊपयोग भविष्यातील मंगळमोहिमेतील अंतराळविरांना होईल अंतराळवीर प्रत्यक्षात जेव्हा मंगळावर निवास करतील तेव्हा त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून खबरदारीचे ऊपाय शोधले जातील त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा हा प्रयत्न आहे त्यासाठीच हा मोहीम पुर्व अभिनव ऊपक्रम राबविण्यात येत आहे असे Johnson Space Center चे प्रमुख शास्त्रज्ञ म्हणतात शीवाय ह्या अंतराळविरांचे निरीक्षण नोंदवून त्या वर संशोधन करून भविष्य कालीन मानवसहित मंगळमोहिमेतील अंतराळविरांसोबत हेल्दी अन्न,आवश्यक गोष्टी व सामान मंगळावर पाठवता येतील कारण भविष्यात मंगळावर मानवी वसाहत निर्माण करण्याचा शास्त्रज्ञांचा विचार आहे त्या द्रुष्टीने हे प्रयत्न सुरू आहेत 

ह्या निवासादरम्यान ऊमेदवारांना मंगळग्रहावरील वातावरणात रहाण्यासाठी आवश्यक ट्रेनिंग देण्यात येईल मंगळ ग्रह पृथ्वीपासुन दुर असल्यामुळे अंतराळविरांना तेथून पृथ्वीवर संपर्क साधताना अडचण आली किंवा काही समस्या उद्भवल्यास त्यांना त्वरीत मदत पाठवता येणार नाही त्यामुळे अशा समस्या आल्यास त्यावर मात कशी करता येईल ह्याचे ट्रेनिंग देण्यात येईल,शीवाय तेथील वातावरणातील बदलामुळे येणारा मानसिक ताण किंवा ऊपकरणात समस्या निर्माण झाल्यावर त्याचे निवारण कसे करता येईल हेही शिकवले जाईल ऊमेदवारांना अंतराळविरांसारखे झीरो ग्रव्हिटित रहाण्याचे ट्रेनिंग, Space Walk, Robotic control ,आणी सायंटिफिक प्रयोग ह्याचेही प्रशिक्षण देण्यात येईल 

ह्या सर्व बाबी पुर्ण करणाऱ्या ऊमेदवारांना जर जगावेगळे धाडसी कर्तृत्व सिद्ध करावयाचे असेल व नासा संस्थेच्या ह्या अभिनव ऊपक्रमात सहभागी होऊन पृथ्वीवरील क्रुत्रीम मंगळसृष्ठीत एक वर्ष राहून भविष्य कालीन मंगळ मोहिमेतील अंतराळविरांना मदत करावयाची आहे त्यांनी नासा संस्थेशी संपर्क साधावा

Saturday 7 August 2021

Perseverance मंगळयानाचा मंगळभुमीवरील खडकांचे नमुने कुपीत भरण्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी

 This image taken by one the hazard cameras aboard NASA’s Perseverance rover on Aug. 6, 2021, shows the hole drilled in what the rover’s science team calls a “paver rock” in preparation for the mission’s first attempt to collect a sample from Mars.

 Perseverance मंगळयान मंगळभूमीवरील Jezero Crater ह्या भागातील उत्खनन करताना -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था -7 ऑगस्ट 

नासाचे Perseverance मंगळयान सद्या मंगळभुमीवरील Jezero Crater ह्या भागात कार्यरत आहे पंख्याच्या आकाराच्या ह्या भागात मंगळावरील पुरातन काळातील आटलेल्या नदीचे पात्र व सरोवराचे अवशेष सापडले आहेत त्या मुळे शास्त्रज्ञांनी हा भाग संशोधनासाठी निवडला आहे ह्या नदिपात्राजवळ आधळलेल्या वाळु,माती,चिखल आणि गाळापासुन बनलेले खडक,आजुबाजुच्या डोंगरदऱ्यातील खडक व मंगळभुमीवरील जमीनीचे उत्खनन करून तेथील माती,दगड व धुळीचे नमुने गोळा करण्याचे काम सद्या Perseverance मंगळयानाच्या रोबोटिक आर्मच्या साहाय्याने मंगळभूमीवर सुरू आहे
 Perseverance यानाची स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित झाल्यावर रोबोटिक आर्मच्या सहाय्याने मंगळावरील जमीन खोदली गेली दगड फोडले गेले पण पहिल्या प्रयत्नात ते गोळा केलेले नमुने कुपीत भरण्यात मात्र हे मंगळयान अयशस्वी ठरले अशी माहिती Perseverance यानाने नासा संस्थेत पाठविली आहे
Perseverance यानासोबत Titanium धातूच्या त्रेचाळीस कुपी पाठवण्यात आल्या आहेत ह्या कुपीत मंगळावरील व भूगर्भातील ऊत्खनन केलेल्या भागातील खडक,माती, धुळ ह्यांचे नमुने भरून पृथ्वीवर आणण्यात येणार आहेत शास्त्रज्ञ त्यानंतर त्यानमुन्यांवर संशोधन करणार असून त्याचा ऊपयोग भविष्य कालीन मंगळमोहिमेतील अंतराळवीरांच्या मंगळनिवासासाठी होणार आहे 
ह्या संदर्भात माहिती देताना नासाच्या Washington येथील नासा संस्थेचे Associate Administrator Thomas Zurbuchen म्हणतात आमचा हा पहिला प्रयत्न यशस्वी झाला नसला तरी आम्ही तो पुन्हा यशस्वी करु अशी आमच्या टीमला खात्री आहे परग्रहावरील जमीन फोडून त्यातील खडकांचे तुकडे करुन ते गोळा करून पुन्हा कुपीत भरण हे काम सोप नाही खूप अवघड आहे आमच्या टिमने योग्य रीतीने हि मोहीम पार पाडली होती आणी त्यात यशही आले होते
Perseverance यानाला बसविलेल्या सात फुट लांबीच्या Robotic armच्या शेवटच्या टोकावर पोकळ Coring bit आणी percussive drill बसविण्यात आले आहे त्यांच्या सहाय्याने जमीनीला छीद्र पाडून जमिन भेदुन खोलवर ऊत्खनन करून त्यातील खडक फोडले जातात आणी त्यांचे बारीक तुकडे केले जातात हे सर्व काम आमच्या अपेक्षेप्रमाणे सुरळीत पार पडले पण खडकाचा चुरा,मातीचे नमुने गोळा करून कुपीत भरताना अडचण आली 
नासाच्या California येथील JPLLab मधील Perseverance टीमच्या Manager Jessica Samuels  म्हणतात, Perseverance मंगळयानात बसविलेली नमुने गोळा करण्याची यंत्रणा स्वयंचलित आहे पण हे नमुने गोळा केल्यानंतर ते कुपीत योग्य प्रमाणात भरल्या गेले आहेत की नाहीत ह्याची खात्री करुन नंतरची प्रक्रिया पार पाडण्यात मंगळयान कदाचित कमी पडले असावे मंगळयानाला बसविलेल्या WATSON ह्या अत्याधुनिक ऊपकरणाच्या सहाय्याने Borehole चे Close-up फोटो घेण्यात आले आहेत ते पाहिल्यावर नक्की काय problem झाला ह्याची माहिती कळेल आणी पुढच्या वेळेस ह्या माहितीचा आम्हाला निश्चितच ऊपयोग होईल कदाचित नमुने गोळा करून कुपीत भरताना खडकांचा चुरा भरण्याची क्षमता किती आहे हे लक्षात आले नसावे अंदाज चुकला असेल किंवा हार्डवेअरमध्ये प्राब्लेम आला असेल ह्या सर्व बाबींचा विचार करून,सखोल संशोधन करून आमची टिम ह्या समस्येवर मात करेल ह्याची आम्हाला खात्री आहे
मागच्या मंगळमोहिमेत मंगळभुमीवरील नमुने गोळा करताना आम्हाला आश्चर्यकारक माहिती मिळाली होती Curiosity मंगळयानाला पण नमुने गोळा करताना अडचणी आल्या होत्या कारण तेथील माती चिकट होती दगड टणक असल्याने फोडण कठीण होत मातीच्या चिकटपणा मुळे माती गोळा करून पुन्हा कुपीत भरण रोबोटिक आर्मला कठीण जात होत खूप वेळा प्रयत्न केल्यानंतर यश मिळाल होत असाच त्रास Insight lander लाही झाला होता दगड कडक असल्याने ते फोडणे कठीण होते अनेक वेळा प्रयत्न केल्या नंतर नमुने मिळाले होते आता पर्यंतच्या मंगळमोहिमेत मी सहभागी असल्याने मंगळग्रहावरील जमीन कडक दगडांची असुन तीथे ऊत्खनन करुन ती फोडणे त्या दगडांचा चुरा करण किंवा तुकडे करण आणी नमुने गोळा करण खूप कठीण आहे हे आमच्या आता लक्षात आले आहे
ह्या मोहिमेत मंगळयानासोबत Ingenuity मंगळ हेलिकॉप्टरही मंगळावर गेले आहे आणी तेथील आकाशात आजवर अकरावेळा यशस्वी ऊड्डाण करुन 1,250 फुट ऊंचीवरुन Jezero Crater ह्या भागातील डोंगर,दऱ्या,आटलेल्या पाण्याचे श्रोत,दगड,माती, वाळू आणी तेथील हवामानाचे निरीक्षण नोंदवून तेथील रंगीत फोटो पाठवले आहेत त्याच माहितीच्या आधारे आता मंगळावरील पुरातन सजीव सृष्ठिचे अवशेष,तेथे पाणी अस्तित्वात होते का?ते कधी, कसे नष्ठ झाले वै सखोल माहिती मिळवण्यात येणार आहे त्यासाठी तेथील दगड,माती, धुळीचे नमुने गोळा करण्याचे काम Perseverance यानामार्फत करण्यात येत आहे

Thursday 22 July 2021

Blue Origin कंपनीच्या New Shepard अंतराळयानाने केला अंतराळ पर्यटनाचा शुभारंभ

  

 Blue Origin कंपनीच New Shepard कमर्शियल अंतराळयान अंतराळवीरांसह अंतराळात झेपावताना

Blue Origin - 21जुलै 

अमेरिकेच्या स्वयंनिर्मित Space X Crew Dragonने अमेरिकेची बंद पडलेली अंतराळ उड्डाण मोहीम पुन्हा यशस्वी केल्यानंतर आता अमेरिकन व्यावसायिकांनी अंतराळातविश्वात अंतराळ पर्यटन मोहीमेची मुहूर्तमेढ रोवली आहे ह्या महिन्यात दोन खाजगी कंपन्यांनी स्वयंनिर्मित अंतराळयानातून नागरिकांना अंतराळ पर्यटन घडवले आहे गेल्या आठवड्यात Sir Richard Branson ह्यांनी त्यांच्या Virgin Galactic कंपनिच्या  Unity अंतराळयानातून अंतराळप्रवासाचा यशस्वी  शुभारंभ केल्यानंतर आता अमेझॉनचे संस्थापक आणि C.E.O Jeff Bezos ह्यांनी देखील New Shepard कमर्शियल अंतराळ यानातून अंतराळ पर्यटनाचा ऐतिहासिक शुभारंभ केला आहे 

 Jeff Bezos and Blue Origin New Shepard crew

             New Shepard यानातील प्रवाशी Oliver ,Jeff Bezos ,Mark Bezos आणि Wally Funk 

वीस जुलैला संध्याकाळी साडेसहा वाजता  West Texas येथील लाँच साईटवरून New Shepard अंतराळ यानाने रॉकेटच्या साहाय्याने अंतराळात झेप घेतली  ह्या अंतराळ यानातून Jeff  Bezos,Mark Bezos ,Wally Funkआणि Oliver Daemen ह्या चौघांनी अंतराळप्रवास केला रॉकेट प्रज्वलनानंतर रॉकेट अंतराळात झेपावले आणि काही मिनिटातच यान रॉकेटपासून वेगळे झाले यानाने आवाजाच्या तिप्पट वेगाने अंतराळात प्रवेश केला पृथ्वीच्या वरच्या वातावरणाची कक्षा भेदून शंभर मीटर उंचीवर (62 मैल )यान पोहोचताच सर्वांनी आनंदाने जल्लोष केला ह्या दहा मिनिटांच्या अंतराळ प्रवासादरम्यान चार मिनिटे सर्वांनी गुरुत्वाकर्षण विरहित अवस्था अनुभवली त्या वेळेस त्यांनी  सीटबेल्ट काढून यानात तरंगण्याची मजा लुटली शिवाय New Shepard यानाला असलेल्या अनेक खिडक्यांमधून पृथ्वीच सौन्दर्य न्याहाळताना त्यांनी WOW! अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केली ह्या चौघांनी पृथ्वी आणि अंतराळातील सीमारेषा असलेली Karman line भेदून अंतराळप्रवास केल्यामुळे त्यांना आता अंतराळवीरांचा दर्जा देण्यात आला आहे उड्डाणानंतर दहा मिनिटांनी अंतराळयान पॅराशूटच्या साहाय्याने सुरक्षितपणे पृथ्वीवर उतरले तेव्हा सर्वांनी एकच जल्लोष केला

 072021-floating3.jpg

New Shepard अंतराळयानातील गुरुत्वाकर्षण विरहित अवस्थेत तारांगण्याचा आनंद लुटताना अंतराळ प्रवाशी 

पृथ्वीवर परतलया नंतर आणि प्रवासाआधी Wally Funk ह्यांचा आनंद आणि उत्साह वाखाणण्याजोगा होता त्यांची कित्येक वर्षांची अंतराळप्रवासाची इच्छा पूर्ण झाली होती ह्या अंतराळयानातून अंतराळात यशस्वी झेप घेणाऱ्या चार अंतराळवीरांमध्ये Wally Funk ह्या 82 वर्षीय माजी अंतराळवीर महिला आहेत त्या माजी पायलट असून त्यांच्या कार्यकाळात त्यांनी विमान उड्डाणादरम्यान आकाशात 19,600 तास व्यतीत केले आहेत साठच्या दशकातच त्यांना अंतराळात जाण्याची इच्छा होती त्या मुळे त्यांनी अंतराळवीरांसाठी आवश्यक असलेल ट्रेनिंग पूर्ण केल होत पण केवळ महिला असल्याने त्यांना अंतराळप्रवास नाकारण्यात आला होता विशेष म्हणजे त्यांनी उत्कृष्ट पायलट म्हणून अनेक बक्षिसेही मिळवली होती पण तरीही त्यांच्यावर अन्याय झाला ह्या अंतराळ मोहिमेमुळे त्यांची त्या वेळेसची हुकलेली संधी त्यांना पुन्हा मिळाली त्या वेळेस त्या एकवीस वर्षांच्या होत्या आता मला पुन्हा पंचविशीत असल्यासारख वाटल असं त्यांनी पृथ्वीवर परतल्यानंतर सांगितल मला ह्या वयात अंतराळप्रवास करायला मिळेल अस स्वप्नातही वाटल नव्हत पण खूप इच्छा होती म्हणून हि संधी दिल्याबद्दल मी Jeff Bezos ह्यांचे विशेष आभार मानते अस मत त्यांनी परतल्यावर व्यक्त केल आता त्यांनी सर्वात जास्त वयाच्या अंतराळप्रवास करणाऱ्या महिला अंतराळवीर होण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे 

 

         New Shepard कमर्शियल यान पॅराशूटच्या साहाय्याने पृथ्वीवर सुरक्षितपणे उतरताना

Oliver Daeman हा सर्वात लहान अंतराळवीर ठरला ह्या अंतराळप्रवासासाठी त्याच्या वडिलांनी कमर्शियल फ्लाईटच तिकीट काढल होत आणि ते दुसऱ्या ट्रिप मध्ये जाणार होते पण ह्या यानातून जाणाऱ्या प्रवाशाला जाण्यास अडचण आल्याने त्यांच  जाण ऐनवेळी रद्द झाल आणि ते तिकीट Oliver च्या वडिलांना मिळाल पण त्यांनी त्यांच्या ऐवजी Oliver ला ह्या अंतराळप्रवासाची संधी दिली 

Jeff Bezos आणि Mark Bezos हे दोघे भाऊ आहेत आणि Blue Origin कंपनीचे मालकही New Shepard हे अंतराळयान त्यांनी स्वखर्चांनी निर्मित केल आहे प्रायव्हेट कंपनीने तयार केलेल्या ह्या अंतराळयानाला अधिकृत व्यावसायिक अंतराळ प्रवासाचा परवाना मिळाला आहे आता ह्या विमानातून अंतराळवीराप्रमाणेच हौशी नागरिकांनाही अंतराळात जाता येता येणार आहे शिवाय ह्या अंतराळयानाचा पुनर्वापर अनेकदा करता येणार आहे 

ह्या यशस्वी अंतराळपर्यटन मोहिमेच्या यशस्वीतेनंतर Blue Origin चे CEO Bob Smith म्हणतात ,ह्या मोहिमेच्या यशाने आम्ही आनंदित झालो आहोत आजचा दिवस अंतराळविश्वातील ऐतिहासिक दिवस ठरला आहे विशेषतः मानवी अंतराळ पर्यटनासाठी ह्या मोहिमेतील इंजिनिर्स तंत्रज्ञांच्या टीमने उत्कृष्ठ कामगिरी पार पाडून त्यांचे असामान्य कर्तृत्व सिद्ध केले आहे ह्या मोहिमेचे काम त्यांनी व्यवस्थित पार पाडल्यानेच हि मोहीम यशस्वी झाली अंतराळविश्वातील अंतराळपर्यटनाच्या शुभारंभाचा हा पहिला टप्पा निर्विघ्नपणे पार पडला आहे आता ह्या वाटेवरून भविष्यकालीन मोहीमाही यशस्वी होतील ह्या वर्षी अजून दोनवेळा आम्ही नागरिकांना अंतराळपर्यटन घडवणार आहोत आणि पुढच्या वर्षी अनेक मोहिमाद्वारे नागरिकांना अंतराळपर्यटनाची संधी उपलब्ध करून देणार आहोत त्या मुळे ज्यांना अंतराळ पर्यटन करायचे आहे त्यांनी Blue Origin co. शी संपर्क साधावा अर्थात सध्या तरी त्यासाठी तिकिटाचा खर्च मात्र करोडोत करावा लागेल