Mars Dune Alpha -पृथ्वीवरील नासा संस्थेतील कृत्रिम मंगळसृष्टीचे नियोजित मॉडेल -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -7 ऑगस्ट
सध्या नासाचे Curiosity आणि Perseverance मंगळयान आणि Ingenuity mars Helicopter मंगळावर कार्यरत आहे त्यांच्या मार्फत मंगळावरील पुरातन सजीव सृष्टीला दुजोरा देणारे पुरावे गोळा केल्या जात आहेत शिवाय भविष्यकालीन मंगळमोहिमेत मानव निवासासाठी पृथ्वीसारख्या पोषक वातावरणाचाही शोध घेतल्या जात आहे इथे पृथ्वीवरील नासा संस्थेतही भविष्यकालीन मंगळ मोहिमेची जोरदार तयारी सुरु आहे आगामी मानवासहित मंगळ मोहिमेसाठी आवश्यक वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत नासाचे अंतराळवीर प्रत्यक्षात मंगळ ग्रहांवर राहायला जाण्याआधी त्यांच्या मंगळनिवासासाठी उपयुक्त अभिनव उपक्रम राबविले जात आहेत
ह्याच उपक्रमाअंतर्गत नासा संस्थेने मंगळावर राहण्यासाठी जायला उत्सुक असलेल्या धाडसी उमेदवारासाठी सुवर्णसंधी जाहीर केली आहे ह्या उपक्रमाअंतर्गत निवड झालेल्या चार शिकाऊ अंतराळवीरांना नासाच्या Johnson Space Center संस्थेतील मंगळासारख्या कृत्रिम वातावरण निर्मिती केलेल्या छोट्या खोलीत एकवर्ष निवास करावयाचा आहे भविष्यकालीन मंगळमोहिमेतील अंतराळवीरांच्या मंगळनिवासासाठी हा प्रयोग करण्यात येणार असून त्याची सुरवात 2022 मध्ये होणार आहे
ह्या साठीची ऊमेदवार निवडीची प्रक्रिया अंतराळवीरांच्या निवडीसारखीच असेल त्या साठी आवश्यक पात्रता खालील प्रमाणे आहे
उमेदवार अमेरिकन देशाचा नागरिक असावा व त्याचे वय तीस ते पंचावन्न वयोगटातील असावे
उमेदवाराने Stem Field मधील Medical ,Engineer,Biology ,Mathematics,Physics किंवा Computer Science मध्ये Masters किंवा डॉक्टरेट डिग्री मिळविलेली असावी त्याला दोन वर्षांचा Stem Professionalचा अनुभव असावा शिवाय त्याने Aircraft उड्डाणाच्या piloting चे प्रशिक्षण घेतलेले असावे आणि कमीतकमी आकाशात 1000 तासाचा उड्डाणाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल तो Test Pilot Program मध्ये सहभागी असावा आणि त्याला चार वर्षांचा अनुभव असण आवश्यक आहे Military Officer Training घेतलेल्या किंवा stem मधील Bachelor Science पदवीधर उमेदवारास प्राधान्य दिले जाईल ऊमेदवारांना एक वर्षाच्या निवासादरम्यान नासा संस्थेशी संपर्क साधताना अडचण येऊ नये म्हणून त्यांना ईंग्लीश व ईतर भाषा अवगत असणे आवश्यक आहे
ह्या सर्व आवश्यक बाबी पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवाराची निवड झाल्यानंतर उमेदवाराला नासा संस्थेच्या Houston येथील Johnson Space Center मधील शास्त्रज्ञ निर्मित कृत्रिम मंगलसृष्टी असलेल्या वातावरणातील छोट्या खोलीत एक वर्ष राहायचे आहे ह्या मोहिमेला Crew Health &Performance Exploration Analog असे नाव देण्यात आले आहे ह्या मोहिमेत तीन ग्रुप तयार करण्यात येणार असून प्रत्येक ग्रुप मध्ये चार उमेदवारांचा समावेश करण्यात येईल त्या पैंकी पहिल्या ग्रुप साठी हि जाहिरात देण्यात आली असून 2022 साली पहिल्या मोहिमेचा शुभारंभ होईल
निवड झालेल्या ऊमेदवारांना Johnson Space Center मधील 1,700 sq.foot जागेत तयार केलेल्या Mars Dune Alpha ह्या 3D printing चा वापर केलेल्या खोलीत वर्षभर रहावे लागेल ह्या एक वर्षाच्या निवासादरम्यान ऊमेदवारांच्या मानसिक आणी शारिरीक दृष्ठ्या काय समस्या ऊद्भवतात त्यांच्या आरोग्यात काय बदल होतात मानवी शरीर मंगळासारख्या वातावरणाला कसे सामोरे जाते ह्याचे निरीक्षण नोंदवून त्या समस्या निवारण्यासाठी ऊपाय शोधले जातील त्या साठी नवीन technology शोधल्या जातील ह्याचा ऊपयोग भविष्यातील मंगळमोहिमेतील अंतराळविरांना होईल अंतराळवीर प्रत्यक्षात जेव्हा मंगळावर निवास करतील तेव्हा त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून खबरदारीचे ऊपाय शोधले जातील त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा हा प्रयत्न आहे त्यासाठीच हा मोहीम पुर्व अभिनव ऊपक्रम राबविण्यात येत आहे असे Johnson Space Center चे प्रमुख शास्त्रज्ञ म्हणतात शीवाय ह्या अंतराळविरांचे निरीक्षण नोंदवून त्या वर संशोधन करून भविष्य कालीन मानवसहित मंगळमोहिमेतील अंतराळविरांसोबत हेल्दी अन्न,आवश्यक गोष्टी व सामान मंगळावर पाठवता येतील कारण भविष्यात मंगळावर मानवी वसाहत निर्माण करण्याचा शास्त्रज्ञांचा विचार आहे त्या द्रुष्टीने हे प्रयत्न सुरू आहेत
ह्या निवासादरम्यान ऊमेदवारांना मंगळग्रहावरील वातावरणात रहाण्यासाठी आवश्यक ट्रेनिंग देण्यात येईल मंगळ ग्रह पृथ्वीपासुन दुर असल्यामुळे अंतराळविरांना तेथून पृथ्वीवर संपर्क साधताना अडचण आली किंवा काही समस्या उद्भवल्यास त्यांना त्वरीत मदत पाठवता येणार नाही त्यामुळे अशा समस्या आल्यास त्यावर मात कशी करता येईल ह्याचे ट्रेनिंग देण्यात येईल,शीवाय तेथील वातावरणातील बदलामुळे येणारा मानसिक ताण किंवा ऊपकरणात समस्या निर्माण झाल्यावर त्याचे निवारण कसे करता येईल हेही शिकवले जाईल ऊमेदवारांना अंतराळविरांसारखे झीरो ग्रव्हिटित रहाण्याचे ट्रेनिंग, Space Walk, Robotic control ,आणी सायंटिफिक प्रयोग ह्याचेही प्रशिक्षण देण्यात येईल
ह्या सर्व बाबी पुर्ण करणाऱ्या ऊमेदवारांना जर जगावेगळे धाडसी कर्तृत्व सिद्ध करावयाचे असेल व नासा संस्थेच्या ह्या अभिनव ऊपक्रमात सहभागी होऊन पृथ्वीवरील क्रुत्रीम मंगळसृष्ठीत एक वर्ष राहून भविष्य कालीन मंगळ मोहिमेतील अंतराळविरांना मदत करावयाची आहे त्यांनी नासा संस्थेशी संपर्क साधावा
No comments:
Post a Comment