Perseverance मंगळयान मंगळभूमीवरील Jezero Crater ह्या भागातील उत्खनन करताना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -7 ऑगस्ट
नासाचे Perseverance मंगळयान सद्या मंगळभुमीवरील Jezero Crater ह्या भागात कार्यरत आहे पंख्याच्या आकाराच्या ह्या भागात मंगळावरील पुरातन काळातील आटलेल्या नदीचे पात्र व सरोवराचे अवशेष सापडले आहेत त्या मुळे शास्त्रज्ञांनी हा भाग संशोधनासाठी निवडला आहे ह्या नदिपात्राजवळ आधळलेल्या वाळु,माती,चिखल आणि गाळापासुन बनलेले खडक,आजुबाजुच्या डोंगरदऱ्यातील खडक व मंगळभुमीवरील जमीनीचे उत्खनन करून तेथील माती,दगड व धुळीचे नमुने गोळा करण्याचे काम सद्या Perseverance मंगळयानाच्या रोबोटिक आर्मच्या साहाय्याने मंगळभूमीवर सुरू आहे
Perseverance यानाची स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित झाल्यावर रोबोटिक आर्मच्या सहाय्याने मंगळावरील जमीन खोदली गेली दगड फोडले गेले पण पहिल्या प्रयत्नात ते गोळा केलेले नमुने कुपीत भरण्यात मात्र हे मंगळयान अयशस्वी ठरले अशी माहिती Perseverance यानाने नासा संस्थेत पाठविली आहे
Perseverance यानासोबत Titanium धातूच्या त्रेचाळीस कुपी पाठवण्यात आल्या आहेत ह्या कुपीत मंगळावरील व भूगर्भातील ऊत्खनन केलेल्या भागातील खडक,माती, धुळ ह्यांचे नमुने भरून पृथ्वीवर आणण्यात येणार आहेत शास्त्रज्ञ त्यानंतर त्यानमुन्यांवर संशोधन करणार असून त्याचा ऊपयोग भविष्य कालीन मंगळमोहिमेतील अंतराळवीरांच्या मंगळनिवासासाठी होणार आहे
ह्या संदर्भात माहिती देताना नासाच्या Washington येथील नासा संस्थेचे Associate Administrator Thomas Zurbuchen म्हणतात आमचा हा पहिला प्रयत्न यशस्वी झाला नसला तरी आम्ही तो पुन्हा यशस्वी करु अशी आमच्या टीमला खात्री आहे परग्रहावरील जमीन फोडून त्यातील खडकांचे तुकडे करुन ते गोळा करून पुन्हा कुपीत भरण हे काम सोप नाही खूप अवघड आहे आमच्या टिमने योग्य रीतीने हि मोहीम पार पाडली होती आणी त्यात यशही आले होते
Perseverance यानाला बसविलेल्या सात फुट लांबीच्या Robotic armच्या शेवटच्या टोकावर पोकळ Coring bit आणी percussive drill बसविण्यात आले आहे त्यांच्या सहाय्याने जमीनीला छीद्र पाडून जमिन भेदुन खोलवर ऊत्खनन करून त्यातील खडक फोडले जातात आणी त्यांचे बारीक तुकडे केले जातात हे सर्व काम आमच्या अपेक्षेप्रमाणे सुरळीत पार पडले पण खडकाचा चुरा,मातीचे नमुने गोळा करून कुपीत भरताना अडचण आली
नासाच्या California येथील JPLLab मधील Perseverance टीमच्या Manager Jessica Samuels म्हणतात, Perseverance मंगळयानात बसविलेली नमुने गोळा करण्याची यंत्रणा स्वयंचलित आहे पण हे नमुने गोळा केल्यानंतर ते कुपीत योग्य प्रमाणात भरल्या गेले आहेत की नाहीत ह्याची खात्री करुन नंतरची प्रक्रिया पार पाडण्यात मंगळयान कदाचित कमी पडले असावे मंगळयानाला बसविलेल्या WATSON ह्या अत्याधुनिक ऊपकरणाच्या सहाय्याने Borehole चे Close-up फोटो घेण्यात आले आहेत ते पाहिल्यावर नक्की काय problem झाला ह्याची माहिती कळेल आणी पुढच्या वेळेस ह्या माहितीचा आम्हाला निश्चितच ऊपयोग होईल कदाचित नमुने गोळा करून कुपीत भरताना खडकांचा चुरा भरण्याची क्षमता किती आहे हे लक्षात आले नसावे अंदाज चुकला असेल किंवा हार्डवेअरमध्ये प्राब्लेम आला असेल ह्या सर्व बाबींचा विचार करून,सखोल संशोधन करून आमची टिम ह्या समस्येवर मात करेल ह्याची आम्हाला खात्री आहे
मागच्या मंगळमोहिमेत मंगळभुमीवरील नमुने गोळा करताना आम्हाला आश्चर्यकारक माहिती मिळाली होती Curiosity मंगळयानाला पण नमुने गोळा करताना अडचणी आल्या होत्या कारण तेथील माती चिकट होती दगड टणक असल्याने फोडण कठीण होत मातीच्या चिकटपणा मुळे माती गोळा करून पुन्हा कुपीत भरण रोबोटिक आर्मला कठीण जात होत खूप वेळा प्रयत्न केल्यानंतर यश मिळाल होत असाच त्रास Insight lander लाही झाला होता दगड कडक असल्याने ते फोडणे कठीण होते अनेक वेळा प्रयत्न केल्या नंतर नमुने मिळाले होते आता पर्यंतच्या मंगळमोहिमेत मी सहभागी असल्याने मंगळग्रहावरील जमीन कडक दगडांची असुन तीथे ऊत्खनन करुन ती फोडणे त्या दगडांचा चुरा करण किंवा तुकडे करण आणी नमुने गोळा करण खूप कठीण आहे हे आमच्या आता लक्षात आले आहे
ह्या मोहिमेत मंगळयानासोबत Ingenuity मंगळ हेलिकॉप्टरही मंगळावर गेले आहे आणी तेथील आकाशात आजवर अकरावेळा यशस्वी ऊड्डाण करुन 1,250 फुट ऊंचीवरुन Jezero Crater ह्या भागातील डोंगर,दऱ्या,आटलेल्या पाण्याचे श्रोत,दगड,माती, वाळू आणी तेथील हवामानाचे निरीक्षण नोंदवून तेथील रंगीत फोटो पाठवले आहेत त्याच माहितीच्या आधारे आता मंगळावरील पुरातन सजीव सृष्ठिचे अवशेष,तेथे पाणी अस्तित्वात होते का?ते कधी, कसे नष्ठ झाले वै सखोल माहिती मिळवण्यात येणार आहे त्यासाठी तेथील दगड,माती, धुळीचे नमुने गोळा करण्याचे काम Perseverance यानामार्फत करण्यात येत आहे
No comments:
Post a Comment