Perseverance मंगळयान Jezero Crater ह्या भागातील खोदकामादरम्यान फोडलेला खडक आणि त्याला छिद्र पाडून गोळा केलेला चुरा -फोटो नासा संस्था
नासा संस्था -11सप्टेंबर
नासाच्या Perseverance मंगळ यानाला अखेर मंगळावरील भूगर्भातील खडकांचे नमुने गोळा करण्यात यश मिळाले आहे मागच्या महिन्यात Perseverance यानाचा नमुने गोळा करून कुपीत भरण्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला होता पण आता मंगळ यानाने यशवीपणे खडकांचे नमुने गोळा केले आहेत
Perseverance यानाने सहा सप्टेंबरला पहिला आणि आठ सप्टेंबरला दुसऱ्या खडकाचा नमुना गोळा करून त्याला छिद्र पाडून त्याचा चुरा यशस्वीपणे कुपीत भरण्यात यश मिळवले आहे शास्त्रज्ञांनी सहा सप्टेंबरला गोळा केलेल्या पहिल्या खडकाच्या नमुन्यास Montdenier आणि दुसऱ्या खडकाच्या नमुन्यास Montagac असे नाव दिले आहे हे खडकांचे नमुने अत्यंत बारीक असून ते पेन्सिलच्या टोकापेक्षा किंचित जाड आहेत Perseverance यानाला बसविलेल्या रोबोटिक आर्म आणि आत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने मंगळावरील भूगर्भातील जमीन खणून नंतर खडक फोडून त्याचे तुकडे केल्यानंतर त्याचा चुरा,माती,धूळ आणि मिनरल्सचा चुरा योग्य प्रमाणात घेऊन कुपीत भरून सीलबंद करण्यात यानाला आता यश मिळाले आहे मागच्या महिन्यातील पहिल्या प्रयत्नात खडक फोडून त्याचा चुरा करून कुपीत भरताना यानाला अडथळा येत होता ह्या समस्येवर Perseverance टीमने अखेर मात केली आहे
Perseverance चे हे यश पाहून नासाच्या California येथील JP L lab चे ह्या टीमचे प्रमुख शास्त्रज्ञ Ken Farley आनंदित झाले आहेत त्यांच्या मते ह्या पहिल्या खोदकामात सापडलेले खडक बेसाल्ट प्रकारचेआहेत मंगळावरील भूगर्भातील Volcanicघडामोडीदरम्यान ज्वालामुखीतून बाहेर पडलेला अतिउष्ण लाव्हारस थंड झाल्यावर निर्माण झाले असावेत ह्या खडकातील Crystals आणी Minerals ह्या वर सखोल संशोधन केल्यावर शास्त्रज्ञांना मंगळावरील भूगर्भातील घडामोडी आणि तेथील पूरातन काळातील प्रवाहित पाण्याच्या अस्तित्वाचा निश्चित काळ शोधता येईल शिवाय मंगळावरील Jezero Crater भागाच्या आणि तेथील Jezero Lake निर्मितीचा ऐतिहासिक काळ आणी तो कधी निर्माण झाला आणि कधी नष्ठ झाला हेही समजेल शिवाय मंगळ ग्रहावरील पुरातन काळच्या वातावरण बदलाची आणी भुगर्भिय अंतर्गत घडामोडींची माहितीही मिळेल
मंगळावरील ह्या खडकांच्या नमुन्यात आढळलेल्या मिठाच्या अस्तित्वामुळे त्या काळी जमीनीखाली पाण्याचे अस्तित्वही होते हे सिद्ध झाले आहे Volcanic घडामोडी दरम्यान भुगर्भातून बाहेर पडणाऱ्या lava रसाच्या अती ऊष्णतेमुळे जमीनीखालुन वहाणारे पाणी आटले असावे त्यामुळे त्या पाण्याची वाफ झाली असावी त्यातील काही ऊकळत्या पाण्याचे बुडबुडे आटले आणी त्याच स्वरूपात खडकात राहिले असावेत कदाचित लाव्हारस थंड होऊन दगड बनताना तयार झालेल्या केमिकल मध्ये हे खारट पाणी मिक्स झाले असावे म्हणून हे पाण्याचे बुडबुडे खडकात आटलेल्या स्वरूपात दिसत आहेत किंवा खडक तयार होताना झालेल्या केमिकल reaction मध्ये खारे पाणी मिक्स झाल्याने खडकात मीठ आढळले असावे असे मत शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत
ह्या खडकात मिठाचे अंश सापडल्यामुळे तेथे पुरातन काळी पाणी अस्तित्वात होते ह्याला पृष्ठी मिळते आणी जर पाणी असेल तर निश्चितच तेथे सजीव सृष्ठिचे अस्तित्व असेल त्यांच्या दैनंदिन वापरातील मीठ जमिनीत मुरले असेल आणी आटलेल्या स्वरूपात तेथे राहिले असेल असा अंदाजही शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत Perseverance टिममधील शास्त्रज्ञांच्या मते तेथील तळ्यातील किंवा आटलेल्या नदिपात्रातील पाणी प्रवाहित स्वरूपात होते पण हि नदी कीती काळ प्रवाहित होती आणी कधी त्यातील पाणी नष्ट झाले तो काळ निश्चित सांगता येत नाही कदाचित तेथे अचानक आलेल्या पुराच्या पाण्याच्या प्रचंड लोंढ्याने ते तळे एकदमच भरून वहात असेल आणी बहुधा तो काळ पन्नास वर्षांचाही असेल आणी त्यानंतर तळ्यातील पाणी नष्ठ झाले किंवा आटले असावे मंगळावरील अतीऊष्णता अतीपाऊस,वादळवारे आग ह्यामुळेही वातावरणात बदल झाला असावा असे मतही शास्त्रज्ञ व्यक्त करतात
कारण काहीही असले तरीही तेथे पुरातन काळी नदीपात्रात किंवा तळ्यात पाणी वहात होते म्हणजेच जमीनीखालुन आणी वरूनही प्रवाहित पाण्याचे अस्तित्व होते ह्या शक्यतेला दुजोरा मिळतो आणी कालांतराने कदाचित पन्नास वर्षांनी मंगळावर उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे हे पाणी कमी झाले किंवा आटले आणी खडकाळ भागातून वहात गेले असावे आणी कालांतराने नष्ठ होत गेल्यावर आटलेल्या स्वरूपात खडकात अस्तित्वात राहिले असावे मंगळावरील Jezero Crater भाग पुरातनकाळी पाणथळ असल्याचे पुरावे मिळाल्याने शस्त्रज्ञानी हा भाग संशोधनासाठी निवडला आहे आता Perseverance यानाने गोळा केलेल्या खडकांचे पुरावे जेव्हा पृथ्वीवर आणले जातील तेव्हा आणखी सखोल संशोधन केल्यावर तेथील पाण्याच्या आणि सजीवसृष्टीच्या अस्तित्वाचा निश्चित काळ समजेल त्यामुळेच हे नमुने आमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहेत असे ह्या मोहिमेचे प्रमुख शास्त्रज्ञ Mitch Schulte म्हणतात
Perseverance यानाने रोबोटिक आर्मच्या साहाय्याने Titanium Sample Tube मध्ये गोळा केलेल्या खडकाचा नमुना -फोटो -नासा संस्था
सध्या Perseverance मंगळयान मंगळभूमीवरील खडकांचे नमुने गोळा करीत आहे आता पुढील खोदकाम मंगळावरील Jezero Crater च्या South Seitah ह्या भागात कारण्यात येणार आहे शास्त्रज्ञ ह्या भागाला Broken Dinner Plate सारखा आहे असे म्हणतात नुकतेच Ingenuity Helicopter ने मंगळ ग्रहावरील आकाशात तेरावी भरारी मारून तेथील भागातील उंचावरून घेतलेले रंगीत फोटो पृथ्वीवर पाठवले आहेत Ingenuity हेलिकॉप्टरने 3.3प्रतिसेकंद वेगाने 8 मीटर उंचीवर भरारी मारून तेथील फोटो घेतले ह्या फोटोतून ह्या भागात देखील पुरातनकाळी पाणी वाहात होते असे पुरावे मिळाले आहेत ह्या भागात आटलेले नदीपात्र त्याचे काठ,काठाभोवती वाळूच्या लहरी आणि वाळू,नदीतील गाळ,माती ह्यांच्या पासून तयार झालेले खडकांचे लेअर्स Sedimentary खडक आढळले आहेत Perseverance यान त्याच्या रोबोटिक आर्मवर बसविलेल्या अत्याधुनिक यंत्रणेद्वारे मंगळभूमीवरील ह्या भागात 200 मीटर खोल खणून त्यातील खडक,मिनरल्स फोडून त्याचा चुरा करणार आहे आणि रोबोटिक आर्मच्या साहाय्याने हा चुरा,माती मिनरल्सचे सॅम्पल Airtight Titanium tube मध्ये भरून सीलबंद करणार आहे त्यानंतर Perseverance यानात ह्या सॅम्पल tubes व्यवस्थित ठेवल्या जातील आणि भविष्यकालीन मंगळ मोहिमेत नासा आणि ESA ह्यांच्या सहकार्याने मंगळावर यान पाठवून त्यातून ह्या Titanium Sample Tubes पृथ्वीवर आणल्या जातील आणि त्यावर नासा संस्थेतील शास्त्रज्ञ सखोल संशोधन करतील
No comments:
Post a Comment