अंतराळस्थानकातील व्हेजी चेंबर मधल्या उशी वाफाऱ्यात वाढलेली मिरचीची रोपे आणि त्याला आलेली फुले -फोटो- नासा संस्था
नासा संस्था-15 सप्टेंबर
पृथ्वीपासुन दुर अंतराळात स्थानकातील झीरो ग्रॅव्हीटीत सतत तरंगत्या अवस्थेत रहाणाऱ्या अंतराळविरांना पृथ्वीवरच्या सारखे ताजे गरम जेवण ताज्या भाज्या व फळे खायला मिळत नाहीत त्यांना पृथ्वीवरुन पाठवलेले प्रिर्झव्ह थंड अन्न व भाज्या खाव्या लागतात कारण तेथे ईथल्या सारखी सृष्ठि किंवा वातावरणच नाही म्हणून नासा संस्थेतील शास्त्रज्ञ स्थानकातील व्हेजी चेंबरमधील कृत्रीम बागेत पृथ्वीसारखे वातावरण निर्माण करून व्हेजी प्रोजेक्ट अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, फळे व धान्य पिकवण्याचे प्रयोग सतत करत असतात आणि ते यशस्वीही होत आहेत
अंतराळविरांना सतत झीरो ग्रॅव्हिटीत तरंगत्या अवस्थेत रहावे लागत असल्याने त्यांच्या शरीरावर विपरीत परीणाम होतो त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यांना व्हिटॅमिन युक्त आरोग्यदायी जेवण मिळावे विषेशतः ताजी हिरवी पालेभाजी व फळे मिळावीत म्हणून संशोधक सतत प्रयत्न करत आहेत भविष्यकालीन दुरवरच्या अंतराळनिवासात अंतराळविरांना पृथ्वीवरून अन्न पाठविताना वेळ लागेल त्यामुळे त्यांना स्थानकातच स्वतः अन्न .भाजी व फळे पिकवुन खाता यावीत म्हणून नासाचे शास्त्रज्ञ स्थानकात व्हेजी प्रोजेक्ट राबवत आहेत शास्त्रज्ञांच्या ह्या प्रयत्नांना आता पुन्हा यश मिळाले आहे स्थानकातील व्हेजी प्रोजेक्ट अंतर्गत लावलेल्या मीरचीच्या रोपांना आता फुले आली आहेत ह्या आधी देखील अंतराळविरांनी स्थानकात गहु, Lettuce, लाल कोबी, ह्या सारख्या भाज्या लाऊन त्यांची चवही चाखली आहे स्थानकात सध्या Advanced Plant Habitat (APH) प्रोजेक्ट सुरू आहे Plant Habitat -04 प्रोजेक्ट अंतर्गत स्थानकातील व्हेजी चेंबरमध्ये वेगवेगळ्या भाज्यांची रोपे व बिया लावण्यात आल्या आहेत आता त्या रोपांची चांगली वाढ झाली असुन त्यातील चार मिरचीच्या रोपांना भरपूर हिरवी गार पाने आणी फुले आली आहेत
अंतराळस्थानकातील झीरो ग्रॅव्हिटीत मिरचीची रोपे वाढविणे सोपे नव्हते खूप आव्हानात्मक काम होते पण अंतराळविरांनी त्यांच्या संशोधनाच्या कामातून मिळालेल्या रिकाम्या वेळात ह्या रोपांची निगा राखुन हि रोपे वाढविण्यात यश मिळवले आहे ह्या रोपांच्या वाढीसाठी त्यांना नासाच्या केनेडी स्पेस सेंटर मधील शास्त्रज्ञांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले स्थानकातील वातावरणात मिरचीची रोपे वाढविणे सोपे नव्हते कारण मिरचीचे रोप वाढण्यासाठी खूप दिवस लागतात साधारण चार महिन्यांचा काळ नासाचे अंतराळवीर Shane Kimbrough ह्यांनी बारा जुलैला स्थानकातील व्हेजी चेंबरमधील उशी वाफाऱ्यात हि रोपे लावली होती त्या रोपांची आता चांगली वाढ झाली आहे त्याला भरपूर हिरवीगार पाने आली आहेत आणी त्या पानांना फुले देखील आली आहेत आता आक्टोंबरमध्ये पहिल्या मिरच्या आणी नोव्हेंबरमध्ये दुसऱ्या मिरच्या येतील
मिरचीची वाढलेली हि रोपे आणी फुले पाहून अंतराळवीर आनंदित झाले आहेत कारण अंतराळविरांना स्थानकात मिळत असलेले प्रिर्झव्ह अन्न कमी तिखट असते त्यांना चव आणण्यासाठी त्यांना Chili sauceचा वापर करावा लागतो आता स्थानकातच मिरची आल्यावर त्यांना त्यांच्या जेवणात ताज्या मिरच्यांचा आस्वाद घेता येणार आहे स्थानकातील मिरचीची रोपे आणी त्यांना आलेल्या फुलांचे फोटो सध्या अंतराळस्थानकात रहात असलेल्या नासाच्या अंतराळवीर Megan McArthur ह्यांनी नासा संस्थेत पाठवले आहेत
No comments:
Post a Comment