Space X Crew -3 चे अंतराळवीर Raja Chari अंतराळवीर Thomas Mashburn अंतराळवीर Mattias Maurer आणि Kayla Barron -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -9 नोव्हेंबर
नासाच्या Space X -2 चे अंतराळवीर कालच पृथ्वीवर सुखरूप परतल्यानंतर आता Space X Crew -3 मोहीमेतील चार अंतराळवीर आज रात्री अंतराळस्थानकात राहायला जाणार आहेत ह्या आधी दोनवेळा ह्या अंतराळवीरांच्या उड्डाणाची तारीख हवामान उड्डाणासाठी अनुकूल नसल्यामुळे लांबली होती अखेर आज अंतराळवीर स्थानकात राहायला जाणार आहेत
Space X Crew -3 मोहिमे अंतर्गत भारतीय वंशाचे नासा अंतराळवीर Raja Chari ,Tom Marshburn ,Kayla Barron आणि युरोपियन अंतराळवीर Matthias Maurer हे चार अंतराळवीर सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी स्थानकात जाणार आहेत ह्या मोहिमेचे कमांडरपदी Raja Chari पायलटपदी Tom Marshburn तर Kayla Barron आणि Matthias Maurer हे दोघांची ह्या मोहिमेच्या मिशन स्पेशॅलिस्टपदी नियुक्ती करण्यात आली आहे ह्या आधी तीनवेळा Space X Crew Dragon अंतराळस्थानकात गेले होते आता चवथ्यांदा Dragon स्थानकात जाणार आहे
नासाच्या Florida येथील Kennedy Space Center मधील 39 -A ह्या उड्डाणस्थळावरून Space X चे Endurance हे अंतराळयान ह्या अंतराळवीरांसह Falcon 9 रॉकेटच्या साहाय्याने रात्री 9.03 वाजता (स्थानिक वेळ) अंतराळात उड्डाण करेल आणि 11नोव्हेंबरला गुरुवारी रात्री 7.10 वाजता स्थानकात पोहोचेल स्थानकात सध्या राहात असलेले अंतराळवीर त्यांचे स्थानकात स्वागत करतील हे चारही अंतराळवीर स्थानकात सहा महिने राहतील व तेथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतील ह्या आधी 31 ऑक्टोबरला किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे अंतराळवीर स्थानकात जाणार असल्यामुळे उड्डाणपूर्व ट्रेनिंग आटोपून चारही अंतराळवीर स्थानकात जाण्यासाठी सज्ज झाले होते
ह्या अंतराळवीरांच्या स्थानकाकडील उड्डाण,स्थानकातील Docking ,Hatching आणि स्थानकातील Welcoming Ceremony चे लाईव्ह प्रसारण नासा T.V. आणि सोशल मीडियावरून करण्यात येणार आहे
(ह्या संदर्भातील बातमी ह्याच ब्लॉगवर)
No comments:
Post a Comment