नासाचे निवड झालेले भावी अंतराळवीर Nichole Ayers ,Christopher Williams,Luke Delaney,Jessica Wittner,Anil Menon,Marcos Berrios,Jack Hathaway,Christina Birch,Deniz Burnham,आणि Andre Douglas -फोटो नासा संस्था
नासा संस्था-6 डिसेंबर
नासा संस्थेने नुकतीच अंतराळवीर होण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज करण्याची संधी ऊपलब्ध केली होती त्याला ऊत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता अंतराळवीर होण्यासाठी US मधील पन्नास स्टेटस मधील 12,000 ईच्छुक ऊमेदवारांनी अर्ज केले होते त्यातुन अंतिम दहा अंतराळविरांची निवड झाली असुन त्यातील बहुतांश ऊमेदवार सैन्यात पायलटपदी कार्यरत आहेत
निवड झालेल्या अंतराळविरांमध्ये भारतीय वंशाचे डॉ अनिल मेनन ह्यांचा समावेश आहे ते सर्जन आणी लेफ्टनंट कर्नल आहेत त्यांनी स्पेस X Demo-2 आणी ईतर फ्लाईट साठी फ्लाईट सर्जन म्हणून काम केले आहे निवड झालेले अंतराळवीर तीस ते चाळीस वयोगटातील असुन त्यातील अनेकांना सैन्यातील पायलटपदाचा अनुभव आहे निवड झालेल्या अंतराळविरांची नावे अशी आहेत
1-Nichole Ayers Major, US Air Force 2- Marcos Berrios- Major U.S. Air force 3 -Christina Birch-4-Deniz Burnham - Lieutenant Commander US Navy 5-Luke Delaney-Retired Major US Marine Crops 6-Andre Douglas- US Coast guard as Naval Architect 7-Jack Hathaway-Commander US Navy 8- Anil Menon- Lieutenant US Air-force Flight Surgeon 9-Christopher Williams 10- Jessica Wittner-lieutenant Commander US Navy
नासाच्या Houston येथील Johnson Space Center चे Administrator Bill Nelson ह्यांनी निवड झालेल्या ह्या दहा अंतराळविरांची नावे जाहीर केली ते म्हणाले,ह्या निवडक अंतराळविरांचे आम्ही नासा संस्थेत स्वागत करत आहोत निवड झालेले सर्व अंतराळवीर कर्तबगार आहेत ह्या अंतराळविरांनी त्यांच्या क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी बजाऊन त्यांचे कर्तृत्व सिध्द केले आहे आता ह्या दहाजणांच्या एकत्रित कर्तृत्वाने नासाची भविष्यकालीन अंतराळमोहीम यशस्वी होईल त्यांच्या उत्कृष्ठ कामगिरीने व बुध्दीमत्तेने नासा संस्था व पर्यायाने देशाची मान ऊंचावेल अशी मला खात्री वाटते
नासाच्या Deputy Administrator आणी नासा अंतराळवीर Pam Melroy ह्यांनी देखील ह्या अंतराळवीरांचे स्वागत केले त्या म्हणाल्या ,तुम्हा सर्वांच बॅकग्राऊंड अमेझिंग आहे तुम्हा सर्वात काही ना काही वैशिष्ट्य आहे खरोखरच तुमची टिम नासा संस्थेत सहभागी झाल्याने नासा संस्थेची मान ऊंचावली आहे
ह्या सर्व अंतराळवीरांच्या निवडीसाठी (ते महिला वा पुरुष असो) त्यांनी Stem field मधील मास्टर्स डिग्री धारक असणे बंधनकारक होते आता ह्या सर्वांना अंतराळवीर होण्यासाठीचे ट्रेनिंग दिल्या जाईल जानेवारी 2022 मध्ये ट्रेनिंगला सुरवात होईल सुरवातीच्या दोन वर्षात पाच टप्प्यात ट्रेनिंग दिल्या जाईल त्यात
Space station complex system operating आणी Maintenance,Space Walk,Robotic skills safely operating T-38 training Jet आणी रशियन भाषा शिकवल्या जाईल शिवाय त्यांना कमर्शियल अंतराळयान,Space launch system Rocket, Orion अंतराळयान ह्यांची तांत्रिक माहिती दिल्या जाईल अंतराळस्थानकातील झिरो ग्रव्हिटीत रहाण्याचे आणी तेथे सुरू असलेल्या सायंटिफिक प्रयोगात सहभागी होऊन संशोधन करण्यासाठी ट्रेनिंग देण्यात येईल भविष्यकालीन चांद्रमोहिम आणी मंगळमोहिमेतील दुरवरच्या अंतराळ निवासादरम्यान अंतराळविरांसाठी करण्यात येत असलेल्या ऊपयुक्त संशोधनात ह्या अंतराळविरांना सहभागी करून विषेश प्रशिक्षण देण्यात येणार आहे
No comments:
Post a Comment