Space X Inspiration 4 चे अंतराळप्रवासी यानातील झिरो ग्रॅविटीतुन संवाद साधताना -फोटो - Inspiration 4
Space X -
अमेरीकेची अमेरिकन भूमीवरून स्वयंनिर्मित अंतराळयानातुन अंतराळ ऊड्डान मोहीम यशस्वी झाल्यानंतर आता नागरिकांच्या अंतराळ पर्यटन मोहीमाही यशस्वी होत आहेत मागच्या महिन्यात Blue origin आणी Virgin Galactic कंपनीने सामान्य हौशी नागरिकांना अंतराळ पर्यटन घडवल्या नंतर आता Elon Musk यांच्या Space X कंपनीनेही अंतराळ पर्यटनाचा शुभारंभ केला आहे
मागच्या आठवड्यात Elon Musk ह्यांनी Resilience Crew Dragon मधून चार अंतराळ प्रवाशांना अंतराळात तीन दिवस अंतराळप्रवास घडविला आहे Inspiration 4 ह्या मोहिमेअंतर्गत चार नागरिक मागच्या आठवड्यात तीन दिवस अंतराळात फिरून आले ह्या तीन दिवसात अंतराळविरांचा मुक्काम अंतराळ यानातच होता आणी त्यांचे यान सतत पृथ्वीवरुन अंतराळात फेऱ्या मारत होते विषेश म्हणजे हे चारहीजण अंतराळवीर नव्हते पण त्यांना अंतराळात जाण्यासाठी विषेश ट्रेनिंग देण्यात आले होते
Inspiration 4 हि अंतराळपर्यटन मोहीम Jared Isaacman ह्या ऊद्योगपतींनी आयोजित केली होती त्यांनी त्यांच्या सह ह्या मोहिमेतील तिन अंतराळ प्रवाशांचा तिकिटाचा खर्च केला त्यांनीच तिघांना अंतराळप्रवासासाठी आमंत्रित केले होते हा खर्च तब्बल दोनशे मिलीयन डॉलर एव्हढा होता
51 वर्षीय Dr.Sian Proctor नासा संस्थेच्या माजी ऊमेदवार आणी Geo scientist ऊद्योजक आहेत त्या अनुभवी पायलटही आहेत त्यांनी ह्या मिशनच्या पायलटपदाची जबाबदारी पार पाडली
42 वर्षीय Cris Sembroski हे Aerospace data engineer आणी माजी एअरफोर्स ऑफीसर आहेत ते ह्या मोहिमेचे pilot आणी मिशन प्रमुख होते
नासाच्या Florida येथील Cape Canaveral ह्या ऊड्डान स्थळावरून ह्या चार अंतराळप्रवाशांना घेऊन स्पेस X चे Resilience हे अंतराळयान 15 सप्टेंबरला स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 8 वाजता अंतराळात झेपावले व तीन तासांनी 575k.m.अंतरावर अंतराळात पोहोचले हे अंतर स्पेस स्टेशन किंवा हबल टेलीस्कोप पेक्षाही जास्त होते त्यांचे अंतराळयान ताशी 27,360 की.मी ईतक्या प्रचंड वेगाने अंतराळ प्रवास करत होते आणी दर 90 मिनिटांनी पृथ्वीवर अंतराळात फेऱ्या मारत होते सलग तीन दिवस हे चौघे यानातुन अंतराळात फिरत होते ह्या तीन दिवसांंच्या अंतराळप्रवासा दरम्यान त्यांनी त्यांच्या शरीरात झीरो ग्रव्हिटीत काय बदल होतो शरीर त्या वातावरणात कसे adjust होते ह्याचे निरीक्षण नोंदवले त्यांनी त्यांच्या कुटुंबियांशी चॅट करून संवादही साधला
Jared ह्यांनी अंतराळयान सुरक्षित पणे अंतराळात पोहोचल्यावर संस्थेशी संपर्क साधला आणी आम्ही आता 575 k.m.अंतरावर पोहोचलो असुन आम्ही देखील सुरक्षित असल्याचे दाखवले आम्ही स्पेस X चे खूप आभारी आहोत कारण त्यांच्या मुळे आम्ही अंतराळात पोहोचलो आणी ईथुन पृथ्वीच सौंदर्य पाहु शकलो स्पेस X अंतराळयान अत्यंत स्पेशिअस आणी आरामदायी आहे यानाला मोठ्या खिडक्या आहेत त्यातून आम्ही बाहेर पाहु शकतो असे सांगितले
हेली म्हणाली ईथे झीरो ग्रव्हिटीत तरंगण्याचा अनुभव खुप रोमांचक आहे आम्ही त्याची मजा अनुभवतोय ईथे सारच तरंगत ईथे गोलाकार,वर खाली कसेही तरंगता येत त्याच अवस्थेत ऊभेहि रहाता येत असे म्हणत तीने तरंगत गोलाकार,वरखाली फिरून दाखवल तिने आणलेल्या साफ्टटाईज डॉगदेखील कसा तरंगतो हे देखील दाखवल शिवाय पाण्याची बाटली अंतराळात कशी फिरते सोबतच त्यातील पाणी देखील गोलाकार कसे फिरते ह्याच प्रात्यक्षिक दाखवल हा अनुभव पृथ्वीवर येत नाही असे म्हणत तीने खिडकीतून खाली अंतराळातील सौंदर्य दाखवल खरच हा रोमांचकारी अनुभव दिला त्या बद्दल आम्ही स्पेस X चे खूप आभारी आहोत!
सियान ह्यांनी देखील हा अंतराळप्रवास रोमांचक आणी अविस्मरणीय असल्याचे सांगितले त्यांनी देखील यानाच्या खिडकीतून अंतराळातील सौंदर्य दाखवल दर 90 मिनिटात दिवस आणी रात्रीचा अनुभव घेताना अंधारात चकाकणारे तारे, क्षितिजा वरच्या कलरफुल आकर्षकAvoraचे दर्शन घडवले शिवाय पृथ्वीपासून दुर अंतराळात Metallic Marker च्या सहाय्याने त्यांनी यानात काढलेल चित्रही दाखवल
क्रिस ह्यांनी देखील स्पेस X चे आभार मानत हे सार अदभूत आहे रोमांचकारी आहे अस सांगितल ते म्हणाले अंतराळभ्रमण करताना सियान ह्यांनी चित्र काढल तसच मीही संगीत वादनाचा अनुभव घेतला त्यांनी गिटार वादन करत गाणेही म्हणून दाखवले ह्या साठी मी खूप आधी तयारी केली होती ईथे मी गायलेल गाण तुम्हाला व्यवस्थित ऐकू येईल की नाही माहिती नाही पण मी प्रयत्न केला आहे
तीन दिवसांच्या अंतराळ प्रवासानंतर हे चारहीजण शनिवारी अठरा तारखेला संध्याकाळी पृथ्वीवर परतले स्पेस X Resilience अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करताच हे चारही जण parachutes च्या सहाय्याने Atlantic महा सागरात ऊतरले तेव्हा स्पेस X ची रिकव्हरी बोट तेथे पोहोचली त्यांनी चौघांना सुरक्षित बाहेर काढले पृथ्वीवरच्या कक्षेत शिरताना आणी परतताना यानाला अनेक प्रक्रिया पार पाडाव्या लागल्या हे चारहीजण पृथ्वीवर परतले तेव्हा खूप आनंदात होते त्यांनी पुन्हा हा अंतराळप्रवास घडवल्या बद्दल स्पेसX च्या Elon Musk यांचे आभार मानले आणी सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत त्यांच्या अंतराळ प्रवासाचे अनुभव शेअर केले
No comments:
Post a Comment