Wednesday 22 December 2021

Blue Originने हौशी नागरिकांना घडविले तिसऱ्यांदा अंतराळ पर्यटन

 

 Blue Origin चे अंतराळ प्रवाशी Dylan Taylor,Lane Bess,Cameron Bess,Laura Shepard Churchley ,Michael Strahan आणि Evan Dick-फोटो -Blue Origin 

Blue Origin - 11 डिसेंबर

अमेरिकेने सामान्य नागरिकांसाठी व्यावसायिक अंतराळयानातून अंतराळ प्रवासास मान्यता दिल्या नंतर  Jeff Bezos ह्यांच्या Blue Origin आणि Richard Branson  ह्यांच्याVirgin Galactic कंपनीने सामान्य हौशी नागरिकांना अंतराळप्रवासाचे दालन खुले केले पण त्यासाठीचे तिकीट मात्र सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे ह्या अंतराळपर्यटनाचे तिकीट सामान्य नागरिकांना परवडणारे नसले तरीही अमेरिकेतील हौशी श्रीमंत व्यावसायिक नागरिकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि हि अंतराळमोहीम यशस्वी केली आगामी काळातील अंतराळ पर्यटनाचे तिकीट देखील बुक झाले आहे 

 त्या मुळेच Blue Origin ने आता सामान्य नागरिकांसाठी नियमित अंतराळप्रवासास सुरवात केली आहे मागच्या दोन यशस्वी अंतराळ पर्यटनानंतर 11 डिसेंबरला Blue Origin चे New Shepard NS -19 हे अंतराळ यान सहा अंतराळ प्रवाशांना घेऊन अंतराळात जाऊन आले ह्या यानातून प्रथमच सहा प्रवाशांनी एकत्रित अंतराळ प्रवास केला 

अमेरिकेतील West Texas येथील उड्डाणस्थळावरून 11 डिसेंबरला सकाळी 8.45 वाजता Blue Origin चे New Shepard NS-19 हे अंतराळयान Laura Shepard Churchley Michael Strahan ,Evan Dick ,Dylan Taylor ,Cameron Bess आणि Lane Bess ह्यांच्यासह अवकाशात झेपावले आणि पृथ्वीची कक्षा भेदत 62मैल ( 100k.m.) उंचीवर अंतराळात पोहोचले  अंतराळातील झिरो ग्रॅविटीत पोहोचताच ह्या सहाही अंतराळप्रवाशांनी Oh!My God ! असे उद्गगार काढत वजनविरहित अवस्थेत तरंगण्याचा आनंद लुटला आणि यानातील खिडकीतून अंतराळातून पृथ्वीदर्शन घेतले अवघ्या दहा अकरा मिनिटात New Shepard ह्या प्रवाशांना घेऊन पृथ्वीच्या कक्षेत शिरले हे सहाहीजण पृथ्वीवर परतल्यावर पॅराशूटच्या साहाय्याने पृथ्वीवर सुखरूप उतरले 

ह्या अंतराळवीरांचे स्वागत करायला लॅण्डिंगस्थळी Jeff Bezos ,अंतराळ प्रवाशांचे नातेवाईक आणि नागरिक उपस्थित होते ह्या अंतराळवीरांचे स्वागत करताना Blue Origin चे CEO Bob Smith म्हणाले,"तुम्हा सर्व अंतराळ प्रवाशांचे आम्ही आभारी आहोत तुम्ही सुखरूप पोहोचला आहात हे पाहून आनंद झाला आजवर आम्ही चौदा  नागरिकांना अंतराळ प्रवास घडविला आहे आमच्या Blue Origin च्या टीम मुळे हे शक्य झाले त्यांच्या अथक परिश्रमाचे हे यश आहे त्यांचेही आभार आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो !आता तुम्हालाही अंतराळवीरांचा दर्जा प्राप्त झाला आहे"असे म्हणत त्यांनी सर्वांचे स्वागत केले 

Jeff Bezos ह्यांनी देखील सर्वांचे स्वागत केले आणि सर्वांना तुमचा अंतराळ प्रवास कसा झाला हे विचारले तेव्हा सर्वांनीच अमेजिंग ! अविस्मरणीय ! असे उत्तर दिले ह्या अंतराळ प्रवाशांमध्ये अमेरिकेचे दिवंगत अंतराळवीर Alan Shepard  ह्यांची साठ वर्षीय मुलगी Laura Shepard ह्यांचा समावेश होता Alan Shepard 14 फेब्रुवारी 1971 मध्ये Apollo 14 चांद्रमोहिमे अंतर्गत चंद्रावर गेले होते आणि त्यांनी चांद्रभूमीवर चालत जाऊन तेथे अमेरिकेचा झेंडा फडकावला होता त्या मुळे ते पहिले अमेरिकन अंतराळप्रवासी ठरले होते आपल्या पहिल्या अंतराळ प्रवासाचा अनुभव सांगताना Laura म्हणाल्या हा प्रवास माझ्यासाठी अविस्मरणीय होता क्षणभर मला माझ्या वडिलांना भेटल्यासारखे वाटले आणि अगदी किंचित का होईना मी त्यांच्या पाऊलवाटेने गेले! ते आता नाहीत पण त्यांच्या आठवणी आहेत त्यांनी देशासाठी,कामासाठी अंतराळप्रवास केला आणि मी अंतराळ पर्यटन केले  त्यांचे कर्तृत्व मोठे आहे माझी लहानपणापासूनची अंतराळप्रवास करण्याची इच्छा आता पूर्ण झाली आहे  Alan Shepard ह्यांच्या नावाने प्रेरित होऊन अंतराळ यानाला New Shepard नाव देण्यात आले आहे  Laura Shepard ह्यांना Jeff Bezos ह्यांनी गेस्ट प्रवासी म्हणून ह्या अंतराळ प्रवासासाठी आमंत्रित केले होते Laura आता 372 व्या अमेरिकन अंतराळ प्रवासी ठरल्या आहेत 

Laura Shepard Alan Shepard

 चांद्र मोहिमेतील नासाचे दिवंगत अंतराळवीर Alan Shepard आणि त्यांची मुलगी Laura Shepard Churchley 

Good Morning America Host -Michael Strahan  -माझे अंतराळ पर्यटनाचे स्वप्न सत्यात उतरले हा अंतराळ प्रवास खूप आनंददायी आणि अविस्मरणीय होता 

Dylan Taylor -अंतराळात प्रवास करण स्वप्नवत होत ! अमेजिंग !

Evan Dick -मला Aerospace फील्ड मध्ये करिअर करायची इच्छा होती  आणि आता मला अंतराळात जायला मिळाल हा प्रवास अमेजिंग होता !

Cameron Bess आणि Lane Bess ह्या पिता पुत्राने देखील अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली ह्या दोघांची नोंद पहिले पितापुत्र अंतराळप्रवासी अशी झाली आहे

 हवामान अनुकूल नसल्यामुळे New Shepard चे उड्डाण दोन दिवस लांबले होते पण हवामान अनुकूल होताच New Shepardने अंतराळ प्रवाशांना घेऊन अंतराळपर्यटन घडविले 

No comments:

Post a Comment