अंतराळस्थानकातून लाईव्ह संवाद साधत पृथ्वीवासीयांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देताना अंतराळवीर -फोटो नासा संस्था
नासा संस्था -25 डिसेंबर
सध्या अंतराळस्थानकात रहात असलेले नासाच्या अंतराळ मोहीम 66 चे अंतराळवीर Kyla Barron,Raja Chari ,Mark Vande,Mattias Maurerआणी Thomas Mashburn ह्यांनी नुकताच नासा संस्थेशी लाईव्ह संवाद साधुन पृथ्वीवासीयांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या ह्या वेळी त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले त्याचा हा वृत्तांत
-ख्रिसमस विषयी तुमच मत काय?
Thomas Mashburn -ख्रिसमस म्हणजे माझ्या फॅमिली आणि फ्रेंडसोबत एकत्रित साजरा केलेल्या आनंदायी नाताळच्या आठवणी नव्या वर्षाची प्रेरणा देणाऱ्या
Kayla Barron- माझ्यासाठी ख्रिसमस नेहमीच स्पेशल आहे मी तो सण कधी येईल ह्याची वाट पहायची मी नेव्हल अकॅडमीत असताना देखील ख्रिसमसच्या सुट्टीत मी घरी यायचे आणी आम्ही सर्व कुटुंबीय एकत्र ख्रिसमस सण साजरा करायचो
Matthias Maurer- ख्रिसमस हा सण असा आहे की,ह्या वेळी सगळे नातेवाईक आणि मित्र एकत्र येतात खुप मोठ्या प्रमाणात खास पदार्थांच्या मेजवानीचे आयोजन असते खुप वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल असते आमच्या घरी माझी आई खास ख्रिसमसच्या दिवशीच ते पदार्थ करायची त्या मुळे ते फक्त ख्रिसमसलाच खायला मिळायचे
Raja Chari- खरच सर्वजण एकत्र येऊन साजरा करण्याचा हा दिवस आम्ही देखील असाच साजरा करायचो ख्रिसमसचा पारंपरिक सण !
-अंतराळस्थानकातील पहिला ख्रिसमस कसा साजरा कळणार आहात?
Kayla-आम्ही ईथे स्पेसमध्ये असलो तरीही ईथे आमची स्पेशल ईंटरनॅशनल फॅमिली आहे त्यामुळे आम्ही ख्रिसमस ईथे साजरा करणार आहोत काहीतरी ट्रॅडीशनल करणार आहोत घरच्यांशी संवाद साधणार आहोत
Raja Chari- हो! हि आमची स्पेसमधली स्पेशल नवी फॅमिली आहे आम्ही सर्वजण ईथे ख्रिसमस साजरा करणार आहोत
Matthias Maurer - ईथल्या फॅमिली आणी फ्रेंडसोबत ख्रिसमस साजरा कळणार आहोत आम्हाला ईथल कामही करायचय त्यातून वेळ काढून डेकोरेशन करणार आहोत ईथे दर 90 मिनिटांनी दिवस ऊगवतो मावळतो
तुमच्या खास ट्रॅडिशनल आठवणी सांगा ?
Mark Vande- मी जेव्हा ख्रिसमसला घरी जायचो तेव्हा मला माझ्या आईच्या हातच्या चॉकलेट कुकीज खाण्याचे वेध लागायचे ती डबल चॉकलेट मिक्स कुकीज खूप मस्त बनवायची फक्त ख्रिसमसलाच ते बनवायची त्यामुळे वर्षातुन एकदाच त्या खायला मिळत ह्या वर्षी मी त्या मिस करेन
Raja Chari- पुर्वापार चालत आलेले ख्रिसमस Pickles आणी ख्रिसमस ट्रीला लटकावलेले प्रेझेंटस ! ते कधी एकदा ऊघडुन पाहु अस व्हायच त्यामुळे सकाळपर्यंत वाट न पहाता आम्ही ते रात्रीच ऊघडायचो
Matthias- हो ! आम्ही देखील प्रेझेंट रात्रीच ऊघडायचो आमच्याकडे पण स्पेशल मोठ डिनर असायच त्यात भरपूर पदार्थ असायचे आणी फॅमिलीसोबतच एकत्र जेवण खूप एन्जॉय करायचो आम्ही
Thomas Mashburn- मला देखील ख्रिसमसचा खूप मोठा ब्रेकफास्ट आणि डिनर आवडायचा ट्रॅडिशनल फुड तेव्हाच केल जायच माझी फॅमिली देखील ख्रिसमस ट्रि डेकोरेट करायची
Kayla Barron- माझ फेवरीट ख्रिसमस ट्रॅडीशन म्हणजे माझी फॅमिली ख्रिसमस ट्रि डेकोरेट करायची मलाही डेकोरेशन करायला आवडायच आम्ही वेगवेगळ्या झगमगत्या दिव्यांनी,मोती वै सजावटीचे सामान लाऊन ट्रीचा वरचा भाग चमकवायचो आम्ही डिनरसाठी बाहेर पिकनिकला जायचो त्या मुळे तेव्हढाच सर्वांना एकत्रित मोकळा वेळ घालवता यायचा
-नवीन वर्ष स्थानकात कसे साजरे करणार
Thomas Mashburn-आम्ही स्थानकातुन एका ठिकाणाहून दुसरीकडे काही मिनिटात पोहोचतो त्यामुळे सर्व जगाशी एकत्रितपणे जोडल्याची भावना होते त्यामुळे सर्व जगासोबत नवीनवर्षाची सुरुवात होईल
Raja Chari-.आम्ही ईथुन अनेकदा Sunrise पहातो त्या वेळी पृथ्वीवर लोक जागे होतात नव्या वर्षाचे संकल्प करतात मला देखील सगळ्या जगाशी जोडल्या गेल्याची भावना होते माझही मत तसच आहे
-तुमच्या फॅमिलीसोबत काय शेअर करु ईच्छीता ?
Mark Vande- माझ्या फॅमिलीला माझ्या कामाबद्दल माहिती आहे मी ईथे असलो कामात असलो तरी मी कायम त्यांच्या मनात असतो मी ईथे त्यांना मिस करतो मी त्यांच्याशी बोलेन तेव्हा ख्रिसमसच्या शुभेच्छा देईन
Kayla- माझे कुटुंबीय देखील माझी काळजी करत असतील मी इथे कशी आहे वै त्यांना माझी आठवण येत असेल मी लवकर परतण्याची सगळे वाट पहात असतील पण मी ईथल्या स्पेसफॅमिलीसोबत आनंदात आहे अस मी त्यांना सांगेन मी त्यांच्याशी बोलणार आहे
Thomas- मी माझ्या बायकोला,मुलीला,भाऊ,बहिणीला आणी मित्रांना सांगेन मी ईथे आनंदात आहे मी त्यांना ह्या वर्षी मिस करतोय मी लवकरच त्यांच्याशी संवाद साधेन
-शेवटी सर्व अंतराळवीरांनी पृथ्वीवासीयांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या
Happy Christmas! Merry Christmas to all !!
No comments:
Post a Comment