अंतराळस्थानकातील Welcome Ceremony दरम्यान Roscosmos संस्थेशी संवाद साधताना रशियन अभिनेत्री Yulia peresildअंतराळवीर Anton Shkaplerovआणि रशियन सिनेनिर्माते Klim Shipenko स्थानकातील अंतराळवीरांसोबत -फोटो -नासा संस्था
नासा संस्था-6आक्टोंबर
रशियन अंतराळवीर Anton Shkaplerov,रशियन निर्माते दिग्दर्शक Klim Shipenko आणी अभिनेत्री Yulia Peresild पाच तारखेला अकरा वाजता स्थानकात सुखरूप पोहोचले त्यांचे सोयुझ MS-19 हे अंतराळयान कझाकस्थातील बैकानुर येथील ऊड्डान स्थळावरून 4.55a.m.ला स्थानकात जाण्यासाठी अंतराळात झेपावले आणी 8.12a.m.ला स्थानकाजवळ पोहोचले रात्री अकरा वाजता सोयुझ अंतराळयान आणी स्थानक ह्यांच्यातील Hatching आणी Docking प्रक्रिया पार पडली त्यानंतर सोयुझ यान स्थानकाशी व्यवस्थित जोडल्या गेले स्थानकाचे दार ऊघडल्यानंतर ह्या तिनही अंतराळविरांनी स्थानकात प्रवेश केला
प्रथम रशियन अंतराळवीर ह्या मोहिमेचे सोयुझ कमांडर आणी पायलट Anton ह्यांनी स्थानकात प्रवेश केला त्यानंतर रशियन अभिनेत्री Yulia आणी शेवटी रशियन सिनेनिर्माते,दिग्दर्शक Klim ह्यांनी स्थानकात प्रवेश केला स्थानकात सद्या रहात असलेल्या मोहीम 65च्या अंतराळविरांनी ह्या तिघांचे स्थानकात स्वागत केले स्थानकातील अंतराळवीरांची संख्या आता दहा झाली आहे
स्थानकात प्रवेश केल्यानंतर काही वेळातच ह्या तिघांचा स्थानकात Welcome ceremony पार पडला तेव्हा रशियातील Roscosmos आणी नासा संस्थेशी ह्या अंतराळविरांचा लाईव्ह संपर्क साधण्यात आला
संस्था- तुम्हा तिघांचे यशस्वी अंतराळप्रवास करुन स्थानकात सुखरूप पोहोचल्याबद्दल अभिनंदन ! तुमचा आम्हाला अभिमान वाटतो स्थानकातील तुमच आयुष्य सुखी, निरोगी जावो हि सदिच्छा! आता तुमचे president तुमच्याशी संवाद साधत आहेत
Yuliaआणी Klim -Thank you!
President-हि मोहीम यशस्वी केल्याबद्दल आणी तुमच्या स्थानकातील सुखरूप प्रवेशाबद्दल अभिनंदन! खरोखरच तुमची कामगिरी अभिनंदनीय आहे,स्थानकात तुमच सहर्ष स्वागत आहे! आता स्थानकातील तुमच वास्तव्य आनंदात जावो आणी तुम्ही तुमच कार्य व्यवस्थित पार पाडाल आणि तुमच मिशन यशस्वी कराल अशी आम्हाला खात्री वाटते तुम्ही फ्रेश आणी आनंदी दिसत आहात आता आपल्यातील अंतर खूप आहे तुम्ही पृथ्वीपासून खूप दुर आहात पण आपण आता लाईव्ह संपर्क साधुन संवाद साधु शकतोय तुम्ही खूप कमी वेळात खूप लवकर तीन,साडेतीन तासाचा अंतराळ प्रवास करून स्थानकाजवळ पोहोचलात ह्या प्रवासादरम्यान आणी आता स्थानकात पोहोचल्यावर तुमची मनस्थिती कशी होती आता काय भावना आहेत आमच्याशी शेअर करा
Yulia- खूप छान, अविश्वसनिय,स्वप्नवत ! हे सार अदभुत आहे,नवीन आहे मला अजूनही स्वप्नात असल्यासारख वाटतय हे सार मी प्रत्यक्षात अनुभवतेय मी स्थानकातील झीरो ग्रव्हिटीत पोहोचले ह्यावर अजूनही माझा विश्वास बसत नाहीय! Thanks आम्हाला हा अनुभव दिल्याबद्दल!
Klim- खरच माझीही मनस्थिती काहिशी अशीच आहे आता आम्ही काही मिनिटापुर्वी अंतराळात होतो आणी आता स्थानकातील झीरो ग्रव्हिटीतुन तुमच्याशी संपर्क साधतोय ह्यावर विश्वास बसत नाहीय स्वप्नात असल्यासारखे वाटतेय आम्हाला हि संधी दिल्याबद्दल आभार! आता लवकरच शुटींगला सुरवात करू
President- हे तुमच पहिल challenge आहे आम्हाला खात्री आहे तुम्ही त्या वातावरणात adjust व्हाल तुमच्या स्थानकातील सहकारी अंतराळवीरांच्या सहकार्याने तुम्ही तुमच शूटिंग पूर्ण कराल तुम्हाला शुभेच्छा!
रशियातील तुमचे चाहते आणि नागरिकांनी तुमच launching,अंतराळप्रवास आणी स्थानकातील प्रवेश लाईव्ह पाहिल त्यांनी तुमच अभिनंदन केलय,शुभेच्छाही दिल्यात त्या साऱ्यांना तुमचा अभिमान वाटतो पुन्हा एकदा तुमच अभिनंदन आणी तुम्हाला शुभेच्छा! आणि स्थानकातील सर्व अंतराळविरांचे आभार ते ह्या लाईव्ह कार्यक्रमाला ऊपस्थित राहिले त्या बद्दल आता आराम करा लवकरच पुन्हा संवाद साधु !
Yulia आणि Klim- आम्ही Scotland आणी Mascot मधील आमच्या well-wisher ,चाहते ,अधिकारी आणि नागरिकांंचे आभारी आहोत !
No comments:
Post a Comment