मंगळावरील Murray Buttes येथील पर्वतीय भागाचे Curiosity यानाने घेतलेले फोटो -फोटो -नासा संस्था -J.PL lab
नासा संस्था-JPL lab -15 नोव्हेंबर मिळालेल्या
मंगळावर पुरातनकाळी सजीवसृष्ठी अस्तित्वात होती ह्या गोष्टीला पृष्ठी देणारे पुरावे आता सापडू लागले आहेत नासाचे Perseverance मंगळयान आणि Ingenuity Mars Helicopter ह्यांनी घेतलेल्या फोटोतून अशा जागांचा शोधही घेतल्या जात आहे नुकतीच Ingenuity हेलिकॉप्टरने मंगळावरील आकाशात तेरावी उंच भरारी घेऊन तेथील परिसरातील फोटो पृथ्वीवर पाठवले आहेत आणि Perseverance मंगळयानाने मंगळभूमीवर उत्खनन करून भूगर्भातील खडकांचे नमुने दुसऱ्यांदा गोळा केले आहेत
ह्या आधीच मंगळावर कार्यरत असलेल्या Curiosity मंगळयानाने देखील ह्या संदर्भात महत्वपूर्ण माहिती आणि फोटो पृथ्वीवर पाठवले आहेत नासा संस्थेने प्रसारित केलेल्या बातमीनुसार आता Curiosity मंगळयाना मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे भविष्यकालीन मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांना राहण्यासाठी योग्य ठिकाण शोधण्याचे काम शास्त्रज्ञ करीत आहेत
मंगळावरील कडेकपारीतील सुरक्षित जागा ,Lava Tubes आणि गुहांचे फोटो Curiosity मंगळयानाने शोधून पृथ्वीवर पाठवले आहेत ह्या जागा शोधल्यानंतर तेथील वातावरण मानवी निवासासाठी विशेषत:मानवी आरोग्यासाठी योग्य आहे का? ह्यावर सखोल संशोधन केल्या जात आहे कारण मंगळावर पृथ्वीसारखे वातावरण नाही तेथील वातावरण अत्यंत क्षीण आहे तेथे पृथ्वीसारखे दाट चुंबकीय क्षेत्र नाही त्यामुळे तेथील वातावरणातील वायूपासून मानवासाठी आवश्यक असलेले ऑक्सिजन वेगळे करून साठवण्याचे कामही मंगळयानातील अत्याधुनिक यंत्रणेमार्फत सुरु आहे तेथे पाणी नाही पण मंगळावरील फोटोत ह्या पूर्वी गोठलेल्या अवस्थेतील बाष्फ आढळले होते त्या मुळे शास्त्रज्ञ भविष्यकालीन मंगळावरील मानवी निवासासाठी योग्य जागा आहे का ? ह्याचा शोध घेत आहेत
मंगळावर पृथ्वीप्रमाणे चुंबकीय क्षेत्र नसल्यामुळे सूर्यापासून उत्सर्जित होणाऱे आणि वातावरणातून बाहेर पडणाऱे हानिकारक विद्युतभारित किरण डायरेक्ट वातावरणात मिसळतात त्या मुळे मानवी अरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका आहे ह्या घातक किरणांच्या रेडिएशनचा धोका कमी करण्यासाठी आणि भविष्यकालीन अंतराळवीरांच्या सुरक्षिततेसाठी नासाची Curiosity टीम यानात बसविलेल्या RAD( Radiation Assessment Detector) ह्या अत्याधुनिक उपकरणाची मदत घेत आहेत RAD च्या साहाय्याने मंगळावरील प्राकृतिक गोष्ठी विशेषतः खडक माती वाळूचा बनलेला गाळ,चिखल (अर्थात वाळलेला )ह्यांच्या साहाय्याने हानिकारक रॅडिएशन पासून बचाव करण्यासाठी हानीकारकता कमी करण्यासाठी संशोधन करत आहेत नासाच्या South West Research Institute चे प्रमुख Bent Ehresmann ह्यांनी हि माहिती प्रकाशित केली आहे 2016 च्या सप्टेंबर मध्ये Curiosity मंगळ ग्रहावरील Murray Buttes ह्या भागात कार्यरत होते तेव्हा RAD ने नोंदविलेल्या माहितीनुसार त्या भागात त्या काळात वातावरणातील रॅडिएशन चे प्रमाण 4% पर्यंत कमी झाले होते आणि हवेतील निष्क्रिय कणांची टक्केवारी ह्या काळात 7.5% वर आली होती त्या मध्ये मानवी आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या न्यूट्रॉनचा समावेश होता ह्या माहितीवरून शस्त्रज्ञानीं असा निष्कर्ष काढला कि,हे रॅडिएशन मोकळ्या जागी जास्त प्रमाणात होते आणि डोंगर कपारीतील बंदिस्थ जागी कमी प्रमाणात होते त्या मुळे अशा जागी मानवी आरोग्यास कमी धोका होऊ शकतो
आम्ही ह्या निष्कर्षांची खूप दिवसांपासून वाट पहातोय आम्ही Computer Model च्या साहाय्याने हे संशोधन करतोय आता आम्ही अशा सुरक्षित जागा मंगळावर आणखी कोठे आहेत ह्याचा शोध घेतोय असे ह्या टीमचे प्रमुख संशोधक म्हणतात मंगळावर आढळलेले हे घातक कॉस्मिक किरण अवकाशातील सौरमालेबाहेर अंतराळात फिरणाऱ्या ग्रहांच्या विस्फोटापासून बाहेर पडतात तसेच सूर्यावरील सौर वादळ,सौर विस्फोट ह्या मुळे बाहेर पडणाऱ्या अती ऊष्ण विद्युत भारीत कणामुळे निर्माण होतात आणि वातावरणात मिसळतात मंगळावर पृथ्वीसारखे वातावरण नसल्यामुळे ते डायरेक्ट हवेत शिरतात अशी किरणे मानवी आरोग्यासाठी हानिकारक आहेत पृथ्वीवर चुंबकीय क्षेत्र आहे पृथ्वीवरील ओझोन लेअर मुळे हानिकारक किरण गाळले किंवा नष्ट केल्या जातात पण मंगळावरील क्षीण वातावरणात हे शक्य होत नसल्याने अशी कॉस्मिक हानिकारक किरणे,वायू तेथील वातावरणात प्रवेश करतात त्या मुळे भविष्यात अंतराळवीर जर मंगळावर राहिले तर त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणून जेथे अशा किरणांपासून बचाव करता येईल अशी जागा Curiosity यानामार्फत शोधल्या जातेय
Curiosity मंगळ यानातील RAD हे अत्याधुनिक उपकरण तेथे हवामान केंद्रासारखे काम करते शास्त्रज्ञाच्या मते जेव्हा तेथे मोठ्या किंवा तीव्र स्वरूपात रॅडिएशन होते तेव्हा ह्यातील यंत्रणा रॅडिएशनचा धोका 30 ते 50 टक्क्यापर्यंत कमी करून तेथील वातावरण अंतराळवीरांसाठी सुरक्षित करू शकते अशा वेळेस भविष्यकालीन मोहिमेतील अंतराळवीरांना संरक्षण मिळणे आवश्यक आहे त्या साठीच शास्त्रज्ञ सुर्यावरील सौरवादळ आणि सौर ज्वालांचे विस्फोट त्यामुळे बाहेर पडणारे विद्युतभारित कण ,किरणे आणि वायू ,त्यांची तीव्रता ह्या वर संशोधन करीत आहेत ह्याचा उपयोग करून अंतराळवीरांसाठी अशा घातक किरणांपासून बचाव करण्यासाठीचा सुरक्षित काळ आणि निवासासाठी सुरक्षित जागा सध्या शोधल्या जात आहेत 28ऑक्टोबर 2021 मध्ये RAD ने नोंदवलेल्या माहितीच्या आधारे आता सुरक्षित जागा शोधण्याचे काम सुरु आहे
No comments:
Post a Comment